युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बटाटे शालो फ्राय करायचे होते, पण ते बरेच मोकळे झालेत. आता सगळा मिळून एकच मोठा गोळा झालाय बटाट्याचा. त्याचे काय करू आता? बरेच तेल पण आहे त्यात.

थलिपिठा सारखं थापुन नॉन स्टीक वर खरपुस भाजुन घे..

किवा त्यात बाकिच्या उकडलेल्या भाज्या घालुन टीक्की कर..

किवा कच्चा कांदा अन हिरवी मिरची बरिक चिरुन वरुन कोथींबीर भुरभुरुन पोळी सोबत खा!

साबुदाना भिजत घालुन साबुदाणा वडे पण करता येतील.. मस्त खरपुस होतील..

किंवा मावेल इतकी कणीक घालुन अन बाकी(धणे जिरे पावडर, तिखट मीठ ई घालुन) पराठे लाट.. Happy

चिवड्याच्या डब्यातला खाली उरलेला, न संपणारा व काहीसा खारट चुरा, भेळभत्त्याच्या पिशवीतला तळातला चुरमुरे-फरसाणाचा गाळ, चकल्यांचा किंवा कडबोळ्यांचा भुगा इत्यादी डब्याच्या तळात उरलेल्या, न संपणाऱ्या अवशेषांचे तुम्ही काय करता?
साळीच्या लाह्यांचाही तळात असाच गाळ उरतो. चुरा, भुगा व तत्सम प्रकारांना कसे खपवता?

हो दिनेशदा, पीठ पेरायच्या भाज्यांची युक्तीच या चुऱ्यातून मुक्ती देते बरेचदा!

मंजूडी, यावर्षी तीन प्रकारचे चिवडे (एक प्रकार घरी केलेला, बाकीचे दोन प्रकार नातेवाईकांकडून), दोन चकल्यांचे डबे, एक कडबोळ्याचा डबा असा मिळून बऱ्यापैकी चुरा उरला. शेवटी तो पीठ पेरायच्या भाजीतच ढकलला. पण त्याखेरीज इतर काही युक्ती असेल तर म्हटलं विचारावं. Happy
पोह्याच्या व चुरमुऱ्याच्या चिवड्यातला सर्वात तळातला भाग कितीतरी दिवस तस्सा लोळत पडून राहातो चिवडे संपले तरी!

योकु, नाही रे, हेतेढकलभेळेत नाही खपत. (प्रयत्न अयशस्वी)

राजसी, मी रोज संध्याकाळी समई लावते या बाबतीत निरीक्षणातुन मला असे वाटते की वातीचे टोक जर वात समईमध्येजिथे ठेवतो त्याच्या बाहेर आले तर केशाकर्ष्णाने तेल गळते आणि समईच्या खाली सांडते. म्हणून वात ही कधीही समईच्या बाहेर येणार नाही असे बघितले तर तेल कधीही खाली सांडत नाही. राजसी, तुमच्या समईत दोष नसून तो वात ठेवण्याच्या पद्धतीत आहे.

मंजूडी, आपण म्हणता तशी रिंग समईत ठेवणे कसे शक्य आहे? समईची वात आडवी असते ना? निरांजनासाठी , ज्यात वात उभी ठेवतात तिथे तशी रिंग उपयोगी होते असे मला वाटते.

उरलेला चुरा पेरूला वगैरे लावून बरा लागतो. पण तसंही मला तो जरा अति खारट नि तिखट वाटतो नुसता खायला .

समईत फुलवात कशी ठेवणार? मध्यभागी ठेवली तर मग निरंजनच का वापरु नये?
मध्यभागी समई उंच आणि टोकदार असते.

छोले भटुरे करताना भटुर्यांसाठी कोणी टोर्टिया तळलेत का? कोणते? व्हीट की आॅ ल पर्पज चे? उद्या छोले भटुरे करायचेत. भटुरे शाॅर्ट कट हवेत.

आमच्या इकडे बर्‍याच जणी रोटीलँडच्या पोळ्या तळतात. पण ते भटुरे नाही म्हणता येणार खरं.. मोठ्ठ्या पुर्‍याच त्या.

स्वाती२ म्हणतेय तसे मी केलेत काहीवेळा.

छोले भटुरे करताना भटुर्यांसाठी कोणी टोर्टिया तळलेत का? कोणते? व्हीट की आॅ ल पर्पज चे? उद्या छोले भटुरे करायचेत. भटुरे शाॅर्ट कट हवेत.>>
येस! मिसन ब्रॅन्ड चे एकाचे ४ कापुन तळ! ऑल-पर्पज

मध्ये हपिसात एकाची सेंडॉफ पार्टी झाली तेव्हा पिझे मागवले होते. त्यात्ली बरीच चिलि फ्लेक्स, मसाल्याची पाकिटे उरली होती. मी ती घरी घेउन आले होते. घरी डोमिनो पिझा मागवला कि पण ते लोक्स देतातच. अश्याचा एक डबा केला आहे. मध्येच काचेच्या क्यूट बरण्या विकत घेतल्यात चार.
मॅसन जार ? ना आज त्यातील एकात आपले साधे सफोला तेल( ऑलिव्ह ऑइल पण चालेल) वरील चिली फ्लेक्स ची चार पाकिटे. इटालिअन सीझनिन्ग ची पाकिटे मीठ व ठेचलेले लसूण घातले.. मुरायला ठेवले आहे. ह्यात कोथिंबीर, लिंबू रस पण घालता येइल असे वाट्ते आहे. शॉर्ट्कट सलाड ड्रेसिन्ग किंवा पास्ता वर घेता येइल. गार्लिक ब्रेड तव्यावर भाजून त्यावर घालून खाल्ले तरी मस्त लागते आहे.

जालावर सध्या मॅसन जार मध्ये करायच्या अनेक पाककृती आल्या आहेत. माझ्या फेवरिट म्हणजे कोल्ड कॉफी, पुडींग, मँगो मूस लाइट फ्रूट कस्टर्ड. फ्रूट व व्हेजी स्मूदीज, जलजीरा, तिखटापैकी चक्क दहीभात. दडपे पोहे इत्यादि.
एका माण्साचे सर्विंग बरोबर फिट होते. व धुवून टाकायला सोप्पे. घेउन खायला देखील सोपे पड्ते प्लेट पेक्षा. कारण एका हाताने आपण माउस क्लिक करत असतो!! चार मॅसन जार्स मध्ये सारा संसार होउन जाईल माझा.

मनीमोहोरशी सहमत. माझ्या समईही खुप गळायची. आता वात समईच्या टोकाबाहेर काढत नाही तर तिथेच जरा मागे वर करुन ठेवते. म्हणजे नागाच्या डोक्यासारखी थोडी वर उभी अशी. समई अजिबात गळत नाही.

एकात चहा कॉफी प्यायची, एकात स्वीट बनवून ठेवुन द्यायचे, एकात मेन कोर्स. एकात काहीतरी स्नॅक्स.

त्यात्ली बरीच चिलि फ्लेक्स, मसाल्याची पाकिटे उरली होती. मी ती घरी घेउन आले होते. घरी डोमिनो पिझा मागवला कि पण ते लोक्स देतातच. अश्याचा एक डबा केला आहे. <<
अमा, शक्यतो हे रेग्युलर वापरू नका. या अश्या मसाल्यांमधे एम एस जी चे प्रमाण प्रचंड असते.
त्यापेक्षा जे ड्राय हर्ब्ज म्हणून बाटल्यांमधे मिळतात ते आणा व वापरा.

केया ब्रँडचे आहेत ड्राय हर्ब्स. आता लक्षात ठेवले पाहिजे. धन्यवाद. मला माहीतच नव्हते. काटकसर महागात पडेल. सोडीअम हाय बीपी साठी जाम डेंजरस आहे.

Pages