युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे बर्फी नको असं कळलं मागाहुन :प
मग असं कर.. मस्त आंबा (टीन), सफर्चंद आणी सटर फटर फळे घालुन कस्टर्ड कर!

गोडाचच होईल पण चीकु म्हंटला की!
चिकु चे तिखट पदार्थ शोधायला हवेत.. कुणी तरी केलच असेल की प्रयोग!

रीया | 30 September, 2014 - 20:31

आजच ऑफिसमधे उपवासाचे खाकरे मिळाले.
कोणाला रेसीपी माहीत आहे का?

या खाकर्‍यांची उपवासाचे एभेळ करायची आहे. काय काय घालता येईल त्यात?
काको आणि राजगिर्‍याच्या लाडूचा चुरा मस्ट!
आणखी काय?

चिमुरीने पिंचीवर काही काही सुचवले होते पण त्यात सगळेच तळणाचे पदार्थ अरेरे
माझ्याने इतके तळण उपवासाच्या दिवशी सलग खाल्लं जात नाही

संपादन

सीमंतिनी | 30 September, 2014 - 20:36

का को म्हणजे काय? कांदा कोथिंबीर?? उपवासाला कांदा?

- रताळे उकडून तुकडे किंवा बटाटा, उपासाची शेव आणि फळे (डाळिंब इ) एवढेच मी भेळेत घालेल.

स्वाती_आंबोळे | 30 September, 2014 - 20:46

काकडीची कोशिंबीर असावी.

सीमंतिनी | 30 September, 2014 - 21:00

ओह ओके. नको नको काकडी कोशिंबीर भेळेत नको. फारच सात्विक होतंय. डोळा मारा

रीया | 30 September, 2014 - 21:02

हो काकडीची कोशिंबीर स्मित

डाळिंब चालेल म्हणा.
पण हे फारच कमी नाही का वाटतेय?

संपादन

स्वाती_आंबोळे | 30 September, 2014 - 21:04

>> भेळेत नको. फारच सात्विक होतंय.

आता राजगिर्‍याच्या लाडवांचा चुरा ज्या पदार्थात घालून त्याला भेळ म्हणायचं ठरलं आहे, त्यात बाकी काही का पडेना! फिदीफिदी

रिया,

तो बटाट्याचा चिवडा किंवा कीस घालतात, दाण्याची किंवा काजूची जरा जास्त चटपटीत उसळ करून ती घालता येईल.

रीया | 30 September, 2014 - 21:08

उपवासाला सात्विकच पदार्थ हवेत ना? डोळा मारा
दही न घातलेली किसलेल्या काकदीची फोडणी दिलेली कोशिंबीर मस्त लागते यात स्मित

संपादन

सीमंतिनी | 30 September, 2014 - 21:09

ओके ही माझी फायनल रेसिपी:

काजू उसळ (चटपटीत, मिळमिळीत चालणार नाही!!!), उपवासाची शेव, उकडलेले रताळे, डाळिंब, कोथिंबीर - आता ह्यात खाकरा चुरून घालणे, वर खजूर चटणी- हिरवी चटणी.

ह्यापेक्षा वेगळी भेळ खाशील तर पापी ठरशील डोळा मारा

रीया | 30 September, 2014 - 21:10

बटाट्याचा तिखट चिवडा यम्म लागेल स्मित
पुरे ना इतकंच? स्मित
परवा करते आणि सांगते कसं लागलं ते

येस सिमंतीनी स्मित
असचं करते स्मित

चटपटीत, मिळमिळीत चालणार नाही!!!) >>> ही उपवासाला चालते का? हो असल्यास रेसीपी द्या प्लिज (सॉरी मी स्वयंपाकाबाबत अगदीच ही आहे)

संपादन

स्वाती_आंबोळे | 30 September, 2014 - 21:11

रताळं नको. त्याने गोडुस आणि सॉगी होईल.

सीमंतिनी | 30 September, 2014 - 21:11

उपवासाला सात्विकच पदार्थ हवेत ना? डोळा मारा >> मराठीत म्हण आहे - बैल गेला आणि झोपा केला (झोपा म्हणजे बैलाचा तबेला.) उपवासाला सात्विक पदार्थ हवे तर भेळ का विचारतेस? आता विचारले आहेच तर होऊ दे खर्च.. स्मित डोळा मारा

रीया | 30 September, 2014 - 21:15

सीमंतिनी , अगं गणेशोत्सवात नाही का पौर्णिमाने खाकरा भेळचे एरेसीपी दिलेली?
आता उपवासाचा खाकरा मिलतोय तर त्याची भेळ करुन पहावी म्हनतेय.

मी रताळं आणि बटाता दोनन्ही रद्द करुन तळलेले पनीर घालायचे ठरवले आहे फिदीफिदी

इथे अमेरिकेत मिळणार्‍या फ्रोझन चिकूची खीर बेकार लागते हां. मी टाकून दिलं होतं ते प्रकरण ....
थोडीशीच करुन पहा एकदा.

अर्धा किलो अक्रोड शिल्लक आहे, आणि गृहमंत्र्यांचा आदेश आहे की लवकरात लवकर संपवायचे आहेत.
काय करता येईल? मिल्कशेक/ बिना अंड्याचा केक अथवा आणखी काही?

दाद, कस्टर्डसोबत चिक्कूचे तुकडे खायला आवडतील का?
किंवा सफरचंद, केळं, द्राक्ष, डाळिंबाचे दाणे गारेग्गार करून त्यांसोबत फ्रोझन चिक्कूचे अनफ्रोझन तुकडे, वरून आवडीनुसार साखर / मध, पिस्ते-बदामाचे काप...
किंवा चॉकलेट सिरप / मेल्टेड चॉकलेट असा प्रकार करून डेझर्ट!! Proud

अक्रोड हलवा मस्त होईल खवा घालून. आईस्क्रीममध्येही चॉकलेट्/कॉफी + वॉलनट फ्लेवर करता येईल. केक्स्/ब्राऊनी आहेतच. पूड करुन वडया/बर्फी पण करतात. सॅलड्स करत असाल तर त्यात चॉप करुन घाला. झालंच तर कधी ओट्स + मिल्क / कॉर्न प्लेक्स + मिल्क असा नाश्ता करत असाल तर त्यात घालायचे.
(मी अक्रोड प्रेमी आहे हे कळलंच असेल. माझ्याकडे उरतच नाहीत!)

इतर पदार्थ काय करता येतील हे इथले अनुभवीजन सांगतीलच! अक्रोडाचा भरड चुरा करून सॅलड्समध्ये भुरभुरवून घालून खाता येईल.

रोज घरातल्यांनी प्रत्येकी एक अक्रोड खाल्ला तरी संपेल लवकर.

अर्धा किलो अक्रोड शिल्लक आहे, आणि गृहमंत्र्यांचा आदेश आहे की लवकरात लवकर संपवायचे आहेत.>>>> संपायला कितीसा वेळ लागेल.रच्याकने, अक्रोड कधी बाहेर नका ठेवू,फ्रीजमधे ठेवा.

वॉलनट पेस्टो बनवा = अक्रोड + कोथिंबीर/बेसिल + ताजी लाल मिरची + थोडे ऑलिव्ह ऑईल + लिंबाचा रस, मिठ मिरपूड चवी प्रमाणे = मिक्सर वर भरड वाटा.

हा पेस्टो कुक्ड पास्ता, न्यॉकी, ब्रेड टोस्ट, सॅलड्स, ब्रुशेटा (ब्रुस्केटा म्हणतात काही), क्रिस्प्स, चिप्स, ब्रेड स्टिक्स इ इ बरोबर खाऊन पटापट संपेल Happy

१ टेस्पून साखर ( इथली अमेरिकेतली बारीक रव्यासारखी असते ती. भारतात असाल तर थोडी भरड दळून घ्यावी लागेल) , दोन चिमूट मिरची पावडर हे एकत्र करुन ते मिश्रण + १ कपभर अक्रोड मिक्स करा.
जाड तव्यावर थोडे तेल घालून मंद आचेवर अक्रोड थोडावेळ परतून घ्या. असे अक्रोड नुसते खायला किंवा सॅलडमधे घालून खायला एकदम भारी लागतात.

Sad टाकून देणे आरोग्याला उपकारक Sad

एखादा महिन्यातील पीठ असेल तर केळे घालून केक सारखे ओव्हन मध्ये भाजता येते. केक नाव त्या पदार्थाला शोभत नाही पण चवीला चांगले लागते.

पोटॅटो प्लेक्स पुण्यात मिळतात. कुठल्याही चांगल्या दुकानात मिळतील. दोराबजी, रिलायन्स इथे नक्की मिळतील. >>> धन्यवाद चिनूक्स. ह्या धाग्याबद्दल विसरुनच गेले. आज दुसरा प्रश्न विचारायला आले आणि पोस्ट दिसली Happy

खजूर-चिंच-गुळाची चाटसाठी करतात ती चटणी फ्रिजमध्ये टिकेल का ? किती दिवस टिकेल ?
एरवी फ्रीजरमध्ये ठेवते पण मग दरवेळी तो दगड थॉ करायला खूप बोअर होतो. आज एक पोर्शन फ्रीजरमध्ये ठेवलाय पण एक छोटी बाटली चटणी फ्रीजमध्ये ठेवावी म्हणते. मनात आलं की भेळ बनवून खाता आली पाहिजे.

धन्यवाद अवतार.
आता भेळ, रगडा पॅटीस, एस्पीडीपी असं सगळं लायनीत लावलं पाहिजे पुढच्या पंधरा दिवसांत. उरलेली चटणी आमटीत ढकलून बघण्याचा प्रयोग करता येईल.
सीमंतिनी Happy

महिनाभर टिकायला काही हरकत नसावी. माझ्या फ्रीजमध्ये असते नेहेमी. पण ती घरी न केलेली. दीप ची असते.

बाहेरच्या चटणीत प्रिझर्व्हेटिव्ह असतं शूम्पे. ती खूप महिनेही टिकू शकते ( माझ्याकडे एकदा लोळली होती बरेच महिने दीपची चटणी. वास तर चांगला येत होता पण सहा महिन्यांच्यावर झाल्याने मी ती फेकून दिली होती )

आरामात दोन तीन महिनेही टिकते. मी मोठी बरणी भरून ठेवते .आणी फ्रीजमधेच ठेवते. फ्रीजर मधे नाही.चांगली व्यवस्थीत उकळवून गार करून ठेवलेली असेल तर नाही खराब होत. लागेल तेवढी काढून घेताना ओला चमचा वापरायचा नाही. उरलेली चटणी परत त्याच डब्यात स्टोअर करायची नाही.

अगो, माझ्या सा.बा. अशी चटणी करून फ्रीजमधे ठेवतात. (डीप फ्रीजमधे नव्हे) २-४ महिनेही टिकते.

त्यांचं पाहून मी इथे तशी करून ठेवली. रादर त्यांनीच केली आणि ठेवली. तर इथे १५-२० दिवसांत त्याला वास यायला लागला Sad

मग आम्ही दोघींनी असा निष्कर्ष काढला, की पुण्यात टिकते, मुंबईच्या हवेला नाही टिकत Sad
(दुसरं काही कारण सापडलं नाही आम्हाला.)

ही चटणी कशी करता त्याचं जरा प्रमाण वगैरे पण देऊन रेसिपी द्या. टिकाऊ असेल तर आयत्यावेळी चाट आयटम्स करायला बरं पडेल.

Pages