काही किस्से शेअर करतो, विथ डिसक्लेमर - नाव-संदर्भ बदललेले आहेत.
पहिला किस्सा क्रमांक १
नवीन जॉब, नवीन ऑफिस, नवीन कामाची जागा आणि नवीन सहकर्मचारी. प्रत्येकाची नव्याने प्रथमच ओळख होत होती. प्रत्येकाबद्दल पहिल्याच भेटीत काही ठोकताळे माझ्याकडून बांधले जात होते, मात्र त्यातील किती खरे अन किती खोटे ठरणार..., ये तो अब आनेवाला वक्तही बतानेवाला था.
पण अश्यातच मेंदूच्या टेंपररी मेमरी डिस्कवर ठसठशीतपणे कोरले गेलेले एक व्यक्तीमत्व म्हणजे प्रल्हाद सर!
टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये मोठ्या हुद्द्यावर! मला किमान दहा वर्षे सिनिअर! त्यांच्याशी माझी पहिली ओळख झाली ते माझ्या नोकरीच्या दुसर्याच दिवशी नव्याने आलेल्या प्रोजेक्टसंबंधी ते सेमीनार देत असताना. त्यात त्यांना संबंधित क्षेत्राचे असलेले सखोल ज्ञान सहजपणे दिसत होते. नजीकच्या काळात कामानिमित्त त्यांच्याशी संबध येण्याची शक्यता होती म्हणून सेमीनारनंतर त्यांच्याशी थोड्या गप्पाही मारल्या. अर्थातच प्रोजेक्टसंबंधी आणि टेक्निकल विषयांवरच. त्यातून ते केवळ रट्टाबहाद्दर नाहीत तर ईंटलिजंट सुद्धा आहेत हे समजायला मुळातच हुशार असलेल्या मला वेळ लागला नाही. त्यांची तीच ईमेज डोक्यात फिट्ट करून तो दिवस संपला. येत्या काही दिवसांत इतरांकडूनही त्यांच्या हुशारीबद्दल आणि मॅनेजमेंट स्किलबद्दल चांगलेच ऐकायला मिळाले. एकंदरीतच दोनचार गाठीभेटींतच त्यांचा माझ्यावर असा काही प्रभाव पडला की मनोमन त्यांना आपला रोल मॉडेल बनवून येत्या दहा वर्षांनी मी स्वताला त्यांच्या जागी बघू लागलो .... आणि मग एके दिवशी त्यांची आणि माझी ऑफिसबाहेर एके ठिकाणी सहजच अचानक भेट झाली.
मला एक खूप जुना, गंभीर आणि बरेपैकी जीवघेणा आजार आहे. दुखने अधूनमधून डोके वर काढत असते. त्याचे औषधपाणी चालूच असते. त्याच संदर्भात मी डॉक्टरकडे गेलो होतो. परतताना मला रस्त्यात नेमके प्रल्हाद सर दिसले. मीच त्यांना हाक मारून थांबवले. चौकशी करता समजले की ते तिथे जवळपासच राहणारे होते. तर माझ्या चौकशीतून त्यांना माझ्या आजाराबद्दल समजले. मी नेहमीसारखे भाव खात माझा आजार कसा डेंजरस आहे, आजवर मी त्यामुळे किती त्रास सोसलाय आणि तरीही त्याच्याशी कसा निडरपणे झुंजतोय वगैरे आनंद चित्रपटातील राजेश खन्ना असल्याच्या आविर्भावात सांगू लागलो. त्यांनीही त्यात रस दाखवून तब्बल पंधरा ते वीस मिनिटे माझ्या आजारावर माझ्याशी गप्पा मारल्या. आणि मग हळूच अंदाज घेत एक पिल्लू सोडले. तेच ते नेहमीचे शब्द. बरेच उपाय झाले असतील तर मी एक सांगू... नाही, म्हणजे सारेच आजार औषधपाण्याने बरे होणारे नसतात, किंवा होत नाहीत तेव्हा त्यांच्यामागे काही आणखीही कारण असते... असे म्हणत त्यांचे मला बुवाबाजीचा सल्ला देणे सुरू झाले. नाव नाही घेत, कोणाच्या पोटापाण्यावर मला लाथ नाही मारायचीय, पण मुंबईतीलच एका मध्यवर्ती भागातील कोणा बुवांकडे जाण्याचा सल्ला मिळाला.
माझ्यासाठी हे सारे शॉकिंग होते. आपण एका विद्वान माणसाशी बोलत आहोत म्हणून मी माझ्या आजारातील खाचाखोचा ज्या मी सरसकट सर्वांनाच सांगत नाही त्या देखील त्यांना उत्साहाने सांगत होतो. ते वैद्यकीय क्षेत्रातले नसूनही त्यांची बुद्धीमत्ता पाहता त्यांना त्याचे स्वरूप समजू शकेल असा एक विश्वास होता. मात्र त्यांचे विचार ऐकून मला मी माझा टाईम टोटल वेस्ट केला असे वाटू लागले. तुम्ही तो अक्षयकुमार, सुनिल शेट्टी आणि परेश रावलचा हेराफेरी चित्रपट पाहिला आहे का? त्यात सुनिल शेट्टीला कसे कोर्या कागदावर साईन करताना "गोलमाल है, भाई सब गोलमाल है" गाणे ऐकू येते, तसेच त्यांची बडबड ऐकताना मला माझ्या कानामध्ये "नाम बडे और लक्षण खोटे" गाणे ऐकू येऊ लागले.
"माझा या भोंदूगिरीवर जराही विश्वास नाही" हे त्यांच्या तोंडावर सांगायची धमक न दाखवल्याने, आणि त्यांनीही माझा यावर विश्वास आहे की नाही हे जाणून घेणे गरजेचे न समजल्याने, मला पुढील जवळपास अर्धा तास त्या बाबामहाराजांबद्दल, त्यांच्या अलौवकिक अनुभवांबद्दल ऐकावे लागले आणि ऐकून तृप्त झालोय असे खोटे खोटे भावही चेहर्यावर ठेवावे लागले. माझी हि लगन पाहून बाबामहाराजांना खुश करायची ट्रिक म्हणजे लाल फुले आणि नारळाची भेट हे सिक्रेट देखील त्यांनी मला लगे हाथ सांगून टाकले आणि मला धन्यपतितपावन केले..!
हो, हो, नक्की नक्की म्हणत मी तिथून सटकलो तर खरे ............ पण
सोडा, आता दुसरा किस्सा ऐका !
क्रमश :
पुढचा किस्सा पुढच्या भागात पण त्या आधी काही तळटीपा :-
तर, आता तुमच्याकडे खालील पैकी ३ पर्याय आहेत.
१) आपणही या प्रकारचे किस्से शेअर करू शकता.
२) माझ्या किश्श्यांची चिरफाड करू शकता.
३) आपल्या आवडीनुसार टाईमपास, दुर्लक्ष, धागा भरकटवणे ईत्यादी करू शकता.
आभारी आहे,
ऋन्मेऽऽष
तो जुना व गंभीर आजार म्हणजे
तो जुना व गंभीर आजार म्हणजे बोटारीया असेल तर भावुक होण्याचं कारण नाही. कारण ज्याला हा आजार झालाय त्याला ( भरपूर वेळ मिळत असल्यास ) त्याचा अजिबात त्रास होत नाही.
तुला हेराफेरी म्हणायचं आहे का
तुला हेराफेरी म्हणायचं आहे का गोलमाल?
सीमंतिनी, धन्यवाद .. हेराफेरी
सीमंतिनी, धन्यवाद .. हेराफेरी असा बदल करतो.
दयाघना, वोके बॉस
नाम बडे और दर्शन छोटे अस गाणे
नाम बडे और दर्शन छोटे अस गाणे आहे. नाव मोठे आणि लक्षण खोटे अशी म्हण आहे. तुला ऐकू आले ते हायब्रीड मजेदार!!!
सीमंतिनी, ओह्ह .. हे मला आज
सीमंतिनी, ओह्ह .. हे मला आज आता पहिल्यांदाच समजले. किंबहुना मी लहानपणी कधीतरी ते गाणे एकदोनदाच ऐकले असावे, अन तेव्हापासून मी स्वता जेव्हा ते गातो वा कानात ऐकू येते ते लक्षण असेच .. कदाचित म्हण डोक्यात बसल्याने असावे..
किंबहुना ती म्हण अभ्यासक्रमात यायच्या आधी "राम बडे और लक्ष्मण छोटे" असे गीतरामायण समजून गायचो.
Technical Department मध्ये
Technical Department मध्ये मोठ्या हुद्द्यावर असणारा माणूस बुवाबाजीवर विश्वास ठेवेल हे अजिबात पटल नाही
एक्जॅक्टली प्रितीऽऽजी, न
एक्जॅक्टली प्रितीऽऽजी, न पटण्यासारखे म्हणून तर या शीर्षकाअंतर्गात आले.
शेवटी अश्या प्रकारांना आहारी जाण्याचा आणि शिक्षणाचा / अभ्यासातील हुशारीचा काहीही संबंध नसतो हेच खरे.
कमजोर मनाचे लक्षण !
शिक्षणाचा आणि श्रद्धेचा काय
शिक्षणाचा आणि श्रद्धेचा काय संबंध?
ISRO chief takes Mars mission replica to Tirupati
http://ibnlive.in.com/news/isro-chief-takes-mars-mission-replica-to-tiru...
शिक्षणाचा आणि अंधश्रद्धेचा
शिक्षणाचा आणि अंधश्रद्धेचा काय संबंध? असे म्हणायचे आहे का आपणास?
वरच्या उदाहरणाला श्रद्धेमध्ये मोजता येईल.
तिरुपती वरचा विश्वास म्हणजे
तिरुपती वरचा विश्वास म्हणजे श्रद्धा पण परमपूज्य बापुंवरचा विश्वास म्हणजे अंधश्रद्धा?
कसं ठरवता हो हे तुम्ही?
तेरा खून खून, दुसरेका खून पानी?
टग्या (मस्त नाव), अगदी असेच
टग्या (मस्त नाव),
अगदी असेच नाही, पण मला कोणी श्रद्धा म्हणून वैद्यकीय उपचारांबरोबर पाच सोमवार शंकराच्या मंदीरात जायचा सल्ला देत असेल तर त्याला मी श्रद्धा म्हणेन. पण जर कोणी मला देवाच्या प्रसादाचे केळे दुधात कुस्करून औषध म्हणून घ्यायला सांगत असेल तर ती अंधश्रद्धा झाली.
ईन्टेलिजन्स मल्टिपल असतात़ हे
ईन्टेलिजन्स मल्टिपल असतात़ हे तुम्हि हुशार असल्याने माहित असेलच तुमचे सर कुठल्या प्रकारात मोडतात ते बघा ़ आणि आपापल्या क्शेत्रातील अती हुशार लोके दुसर्या ठिकाणी आचरट वागताना बघितली आहेत ़