अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही बातमी वाचा.

During a mohalla sabha held by an AAP MLA in Sangam Vihar this week, residents proposed to give away a plot of land to set up a dispensary in the area.
According to residents of the area, the plot measuring 100 square yards was procured by the residents’ association around a decade ago.

“Around 10-12 years ago, we had taken donations from residents and purchased the plot. There was acute shortage of electricity in those days. But as the situation improved over the next few years, we decided to put the land to public use. In a recent mohalla sabha held by the MLA, we proposed that land be used for a dispensary,” Vijay Rathore, a member of the residents’ association in I-2 block, Sangam Vihar, said.
Roshan Pawar, a resident of Sangam Vihar, said, “There is no dispensary in this locality. There is one health centre in
D block of Sangam Vihar which is far from here. We rely either on these private clinics or go to the government hospital in Malviya Nagar.”

“The idea came from the people. The plot is worth Rs 70-80 lakh. To get such a plot in this area, where most people belong to the economically weaker sections, is extremely difficult,” Mohania said."

कलेक्टिव विस्डमचं हे एक प्रातिनिधिक उदाहरण. लोकांचे प्रश्न लोकांना जास्त चांगल्या पद्धतीने माहीत असतात आणि त्याची उत्तरेही.

<<भाजपा निवडणूक घेत नाहीये? ती जबाबदारी निवड्णूक आयोगाची असते ना?>>

मागची पाने वाचून काढाल का जरा ? तिथे ही चर्चा झाली आहे.
भाजपाचं केंद्रसरकार अजून दिल्लीत निवडणूका घ्यायला तयार नाही. काल सर्वोच्च न्यायालयात ह्यावर सुनावणीसुद्धा झाली आहे. आप, काँग्रेस निवडणूकीला तयार आहेत. भाजपा अजून 'विकल्प' शोधत आहे. म्हणजे काय ते त्यांनाच ठाऊक!

तिथे फक्त मूलभूत गोष्टी वीज, पाणी, रस्ते, शाळा, दवाखाने असल्या गोष्टींची चर्चा होणार. >>> मोहल्ला सभा वॉर्डवाईज असणार का? साधारण किती काळानंतर त्याच ठिकाणी परत मोहल्ला सभा होणार? मोहल्ला सभा कोण कंडक्ट करणार? एका वॉर्डमध्ये अमिर-गरीब, सुशिक्षित-अशिक्षित असे सर्व सामाजिक थरातील लोक असू शकतात आणि प्रत्येकाचे प्रश्न त्यांच्या त्यांच्या परीने महत्वाचे असू शकतात. प्रश्न सोडवण्यासाठी नक्की काय क्रायटेरिया असेल? मोहल्ला सभेतून सर्व निधी योग्य ठिकाणी वापरला जाण्याची खात्री आहे का की जो मोहल्ला सभेला हजर असेल किंवा अ‍ॅग्रेसिव्ह असेल (फक्त त्याचेच प्रश्न ठसवले गेले जाण्याची शक्यता आहे) त्याच्याचसाठी तो निधी जायची शक्यता आहे का? असे झाले तर जे अ‍ॅग्रेसिव्ह नसतील त्यांच्यावर अन्याय होणार नाही का? वीज, पाणी, रस्ते, शाळा, दवाखाने ह्या गोष्टी एकदा पुरवल्या की लोकसंख्या वाढल्यासच विस्ताराव्या लागतील. मग मोहल्ला सभांमध्ये काय चर्चा केल्या जातील? देशातील बर्‍याच ठिकाणी मोहल्ला सभांशिवाय देखिल लोकांना सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात, मग तिथे मोहल्ला सभांसाठी कोणता असा पर्याय असतो?

वरील प्रश्न 'मोहल्ला सभा' ह्या प्रकाराचा अवाका जाणून घेण्याच्या अनुषंगाने मनात आले आहेत. जर ही प्रश्नावली वाटत असेल तर पास दिलात तरी चालेल.

<<वरील प्रश्न 'मोहल्ला सभा' ह्या प्रकाराचा अवाका जाणून घेण्याच्या अनुषंगाने मनात आले आहेत. जर ही प्रश्नावली वाटत असेल तर पास दिलात तरी चालेल.>>

नाही नाही. उपयुक्त प्रश्न आहेत, पास कशाला?
मी स्वतः मोहल्ला सभा अटेण्ड केलेली नाही. पण व्हिडिओज आणि दिल्लीतील दोस्तमंडळी ह्यांच्याकडून मिळणार्‍या माहितीवर लिहू शकेन.
जमल्यास रात्री लिहिते.

हे बर आहे मिर्ची ताई आम्ही काही लिहील की खोचक काय?

हेच काम महापालिकेच्या कॉर्पोरेटर कडुन अपेक्षीत आहे. (नागरिक शास्त्राच्या पुस्तका प्रमाणे.) मग तो कोणत्याही पक्षाचा असुदे.

थोडक्यात काय तर आअप चे आमदार लोकांमधे जावुन समस्या समजावुन घेत आहेत आणि कामे करत आहेत.

मान्य आहे की फ़ार थोडे हाताच्या बोटावर मोजता येतिल असे आमदार खासदार कॉरपोरेटर
ही काम करत आहेत पण अश्या कमिट्या नसल्या तरी ही कामे होवु शकतात. हा कमिट्यांपेक्षा राजकिय इच्छाशक्ती चा भाग आहे.

कधी कधी असे वाटते की अनिल कपुरचा नायक चित्रपट आणि केजरीवाल यांच्या आम आदमी चे सरकार या कल्पनेत साम्य असावे.

असो मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे हा कलेक्टीव विस्ड्म असुन उत्तर सापडलेले नाही.

'आम आदमी'च्या टोप्या घालून देशभरच्या मीडियात चमकलेल्या आणि लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आम आदमी पक्षाची टोपी भिरकावून देणाऱ्या शाजिया इल्मी आता काँग्रेसची टोपी घालण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसच्या तिकीटावर त्या दिल्लीतून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

-------------

हे काय चालू आहे मिर्ची ताई. केजरीवालांना त्यांच्या जवळची माणसे पण ओळखता नाही आली?

The idea came from the people >> अशा कल्पना लोकांकडून येत असतील तर चांगलंच आहे. पण ही एक फारच साधी कल्पना आहे. बागा, इस्पितळं, खेळाची मैदानं,गटारी, रस्ते या गोष्टी मुळात प्लॅनिंगमधे यायला पाहिजेत जे मोहल्ला सभेमधे होउ शकत नाही. मोहल्ला सभेमधे 'आफ्टर द फॅक्ट' गोष्टी ठरवता येतील पण आधीच जे प्लॅनिंग लागतं ते नाही होउ शकत. त्यामुळे फक्त मोहल्ला सभा हाच एक उपाय नाहिये. कलेक्टीव्ह विझडमपेक्षा 'इंटेलिजंट प्लॅनर्स' आणि त्याप्रमाणे एक्झिक्यूट करून घेणारे नगरसेवक/आमदार हे जास्त महत्त्वाचे आहेत. 'सामान्य जनतेला' पक्षी 'कलेक्टीव्ह विझडम'ला एवढं सगळं कळत (आणि वळत) असतं तर भारतातले काही इश्शूज कधीच आले नसते.

यूरो, तुम्ही पार मतदानापासून ते केजरीवालांच्या एसेमेसपर्यंत पोहोचलात म्हणून वाटलं तसं. तरी कंस टाकलाय ना Happy

<<मान्य आहे की फ़ार थोडे हाताच्या बोटावर मोजता येतिल असे आमदार खासदार कॉरपोरेटर
ही काम करत आहेत पण अश्या कमिट्या नसल्या तरी ही कामे होवु शकतात. हा कमिट्यांपेक्षा राजकिय इच्छाशक्ती चा भाग आहे.>>

नक्कीच होऊ शकतात. पण होत नाहीत ना. राजकीय इच्छाशक्ती असती तर मग आणखी काय हवं होतं?

<<असो मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे हा कलेक्टीव विस्ड्म असुन उत्तर सापडलेले नाही.>>

RTI च्या माध्यमातून विचारणा करायला पाहिजे, किती पोती सिमेंट ठरलं होतं, किती वापरलं, किती वेळा फक्त कागदोपत्री रस्ते दुरूस्त केले गेले. मग खड्ड्यांमागचं रहस्य कळेल आणि उत्तरही सापडेल Happy

<<हे काय चालू आहे मिर्ची ताई. केजरीवालांना त्यांच्या जवळची माणसे पण ओळखता नाही आली?>>

ह्यात केजरीवालांना दोष का द्यायचा? उद्या तुम्ही किंवा मी.मराठी गेलात आणि म्हटलात की आम्हाला पण भ्रष्टाचाराचा तिटकारा आहे आम्ही सुद्धा तुमच्यासोबत लढणार, तर केजरीवाल काय नको थोडीच म्हणणार आहेत? (तुमच्या माबोवरच्या पोस्टी त्यांनी वाचल्या असोत किंवा नसोत :डोमा:)

<<अशा कल्पना लोकांकडून येत असतील तर चांगलंच आहे. पण ही एक फारच साधी कल्पना आहे. बागा, इस्पितळं, खेळाची मैदानं,गटारी, रस्ते या गोष्टी मुळात प्लॅनिंगमधे यायला पाहिजेत जे मोहल्ला सभेमधे होउ शकत नाही. मोहल्ला सभेमधे 'आफ्टर द फॅक्ट' गोष्टी ठरवता येतील पण आधीच जे प्लॅनिंग लागतं ते नाही होउ शकत. त्यामुळे फक्त मोहल्ला सभा हाच एक उपाय नाहिये. कलेक्टीव्ह विझडमपेक्षा 'इंटेलिजंट प्लॅनर्स' आणि त्याप्रमाणे एक्झिक्यूट करून घेणारे नगरसेवक/आमदार हे जास्त महत्त्वाचे आहेत. 'सामान्य जनतेला' पक्षी 'कलेक्टीव्ह विझडम'ला एवढं सगळं कळत (आणि वळत) असतं तर भारतातले काही इश्शूज कधीच आले नसते.>>

मनिष,
मोहल्ला सभेमध्ये सर्वसामान्य लोक रस्त्यांचं,इस्पितळाचं,बागांचं प्लॅनिंग करणारच नाहीत !
ते फक्त सांगणार की त्यांना कशाकशाची गरज आहे. प्लॅनिंग करायला त्या-त्या क्षेत्रातील सरकारचे तज्ञ अधिकारी असणार ना. आपण इंटेलिजण्ट प्लॅनर्सना काढून टाकून त्यांच्या जागेवर लेमॅनला बसवत नाही आहोत.

मला स्वतःला मोहल्ला सभा हा प्रकार खूप प्रभावी वाटतोय. पण मी प्रत्यक्षदर्शी नाही.
(ह्याबाबतीत नरेश मानेंनी मागे म्हटल्यासारखं मी फक्त नेटवरूनच माहिती घेऊ शकतेय. मी भारतात होते तेव्हा हे सगळं चालू नव्हतं. आता सुट्टीत आल्यावर पुण्यातून खास दिल्लीला जाऊन मोहल्ला सभा स्वतः हजर राहून पाहणार आहे. तेव्हा लिहीनच इथे.)
लोक्स, ज्यांना शक्य आहे त्यांनी आणखी फर्स्ट हॅण्ड माहिती घ्या, किंवा दिल्लीतील माबोकरांनी जाऊन पहायला हरकत नाही.

अश्विनी, तुमच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्यायला जरा वेळ लागू शकतो. उद्या नेमकी बिझी आहे. अधनंमधनं डोकावू शकते फक्त. बैठक मारून लिहायला जमेल असं दिसत नाही. गैसन Happy

तोवर इच्छुकांनी हे पुस्तक पहायला हरकत नाही - 'स्वराज' - हिंदी आवृत्ती

पण एक गोष्ट मान्य करावीच लागेल की राजकारण येत नसतानाही केजरीवालांनी दिल्लीत इतक्या जुन्याजाणत्या भाजपाला कात्रीत पकडलंय...वैध मार्गाने. इकडे आड, तिकडे विहिर...राजकारण स्वच्छ ठेवूनही रोचक,रंजक होऊ शकतं असं कधीच वाटलं नव्हतं मला
>>कात्रीत आप आहे. निवडणुका नसल्यामुळे आपचे पेशन्स टेस्ट होत आहेत असं मानायला वाव आहे. त्यामुळेच आपने सुप्रीम कोर्टात केस दाखल केली असावी. एकदा सत्तेत राहिल्यामुळे आणि आता काहीही ठोस नसल्यामुळे आपला निवडणुकांची नितांत आवश्यकता आहे. भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार डॉ हर्षवर्धन, तसेच विजय गोयल, मिनाक्षी लेखी इ इ आता खासदार मंत्री आहेत. सध्या भाजपकडे मुख्यमंत्री म्हणून कोणीही चेहरा नाहीये. अशा परिस्थितीत आपला ताटकळत ठेवून आप तुटते का ते पाहणं एक राजकीय पक्ष म्हणून त्यांना सोयीचे वाटत असावे. उपलब्ध वेळेत भाजपा नक्कीच निवडणुकीची गणितं जुळवत असेल.
ता.कः परिक्षा कितीही अवघड असली तरीही एकदा तारिख आली की हुरूप येतो आणि तयारी करता येते. इथे आपला परिक्षा कधी आहे हेच माहित नाहिये.

ह्यात केजरीवालांना दोष का द्यायचा? उद्या तुम्ही किंवा मी.मराठी गेलात आणि म्हटलात की आम्हाला पण भ्रष्टाचाराचा तिटकारा आहे आम्ही सुद्धा तुमच्यासोबत लढणार, तर केजरीवाल काय नको थोडीच म्हणणार आहेत? (तुमच्या माबोवरच्या पोस्टी त्यांनी वाचल्या असोत किंवा नसोत )>>>>

अहो मिर्ची ताई- ती शाजीया बाई नुस्ती आप ची मेंबर नव्हती तर केजरीवालांच्या आतल्या चौकडी मधली होती.

माझ्या माहीतीप्रमाणे शाजिया इल्मी ही आम आदमी पार्टीची संस्थापक सदस्य होती. अशा व्यक्तिला आपचा हात सोडावासा का वाटला असावा ?

अय्या, तुमचा आधीचा प्रतिसाद वाचून तर वाटतंय की तुम्हाला इल्मीबाईंबद्दल फार काही माहीत नाही.

इल्मीच काय अश्वनी उपाध्याय पण
त्यांच्या मुलाखतीची एक लिन्क मी दिलेली आहे याच धाग्यावर आधी,

केजरीवाल ह्यांनी राजीनामा देणे चूक होते. कॉंग्रेसच्या सहकार्याने त्यांनी कार्यकाल पूर्ण करायला हवा होता. अर्थात त्यांनी आपली चूक मान्य केली हा त्यांच्या मनाचा मोठेपणा झाला. पुंन्हा निवडणुका झाल्या तर आपला बहुमत मिळावे अशी मी आशा करतो देशाला अजून एक चांगला पक्ष मिळाला तर ते देशासाठी चांगलेच असेन. सध्याच्या भारत सरकारचा कारभार पाहता केजरीवाल दिल्लीला निवडून येवू शकतात असे वाटते.

<<कात्रीत आप आहे. निवडणुका नसल्यामुळे आपचे पेशन्स टेस्ट होत आहेत असं मानायला वाव आहे. त्यामुळेच आपने सुप्रीम कोर्टात केस दाखल केली असावी. एकदा सत्तेत राहिल्यामुळे आणि आता काहीही ठोस नसल्यामुळे आपला निवडणुकांची नितांत आवश्यकता आहे.>>

नाही पटत चिखलु. (चिखल्या आणि चिखलु वेगळे आहेत का? :अओ:)
आपने जन्मापासून दोन मोठ्या निवडणुकांना तोंड दिलं आहे. भरपूर खर्च झाला आहे, चिखलफेक झाली आहे, धुरळा उडला आहे. लॉजिकली पाहिलं तर सगळ्या २७ आमदारांनी घरी बसून फुकट पगार घेणं, जरा विश्रांती घेणं (जसं बाँग्रेसी आमदार करतायेत) हे जास्त सयुक्तिक वाटतं. अशात पुन्हा निवडणुका घ्यायला (तेही लोकसभेतील सो कॉल्ड पराभवानंतर) ते कशाला मागे लागतील?

विधानसभा भंग करेपर्यंत हेच आमदार राहतात ना? मला माहीत नाही.

मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. भाजपा निवडणुका का घेत नाही? तुम्ही म्हणता तसं आपचे आमदार तुटतात का हे पहायला असं करत असेल तर ते लोकशाहीच्या विरूद्ध आहे,लाजिरवाणं आहे ! घोडेबाजार भाजपाला नवीन नाही.

<<उपलब्ध वेळेत भाजपा नक्कीच निवडणुकीची गणितं जुळवत असेल.>>

येस. उत्तरप्रदेशात जुळवतेय तशीच Wink

<<ता.कः परिक्षा कितीही अवघड असली तरीही एकदा तारिख आली की हुरूप येतो आणि तयारी करता येते. इथे आपला परिक्षा कधी आहे हेच माहित नाहिये.>>

आपचे आमदार परिक्षेच्या तारखेसाठी वाट पहात बसतील असं वाटत नाही. त्यांचं काम चालू आहे असं दिसतंय.मिडिया दाखवणार नाही (फॉर ऑब्वियस रिझन्स)

<<अहो मिर्ची ताई- ती शाजीया बाई नुस्ती आप ची मेंबर नव्हती तर केजरीवालांच्या आतल्या चौकडी मधली होती.>>

त्याने काय फरक पडतो?
काँग्रेसमधून बाहेर पडलेले ११४ महात्मे आज भाजपातर्फे खासदार बनून त्याच संसदेत बसलेत (काँग्रेसमुक्त भारताचा दावा होता बरं मोदींचा!)
ह्या गोष्टीवर काँग्रेससमर्थक म्हणतात ते लोक स्वार्थी होते, फायदा दिसेल तिथे पळाले.
पण आपमधून कोणी बाहेर पडलं तर मात्र ती व्यक्ती खराब नाही तर आपच खराब आहे. मज्जाय दुटप्पीपणाची.

दरम्यान, शाझियातैंचे ट्वीटस वाचा -
"No statement from me or any in Cong yet the rumour is rife that I'm joining Cong. I don't want to waste my breath denying mistruths!!"

"Its funny. First ppl make up stories about u, plant liesin media , then expect you to react to mistruths.. Good luck. Won't work dear jokers"

आहे की नै गंंमत? आता निवडणूकांचं वारं वहायला लागल्यावर तर आपविरोधी अफवांना उधाण येईल. मधु किश्वरतैंनी मुहुर्तमेढ रोवली आहे. हळूहळू बाकीचे विद्वान,पत्रकार सगळे उतरतील रिंगणात.

<<इल्मीच काय अश्वनी उपाध्याय पण
त्यांच्या मुलाखतीची एक लिन्क मी दिलेली आहे याच धाग्यावर आधी,>>

महेश, तुम्ही लिहिणार होता अश्विनी उपाध्यायांचे मुद्दे. त्यांच्यात आणि शाझियामध्ये फरक वाटतो. उपाध्याय बाहेर पडले आणि अनेक बिनबुडाचे आरोप केले (त्यातला फॉरिन फंडिंगचा दिल्ली उच्चन्यायालयाने सुद्धा फेटाळून लावलाय)
शाझिया बाहेर पडल्या पण त्यांनी 'अरविंद के लिए मेरे मन में अभी भी उतना ही रिस्पेक्ट है, लेकिन ४-५ लोगों ने उन्हें घेर लिया है" असं विधान केलं होतं. ह्यावरून त्यांचं आणि पक्षातील इतरांची काहीतरी वैयक्तिक कुरबूर असावी असं वाटतं.
१०० मूर्ख सोबत घेऊन फिरणं सोप्पं आहे पण १० विद्वान एकत्र धरून ठेवणं अवघड असतं म्हणतात. प्रत्येकाचा अहंकार, माझंच ऐकावं वगैरे वगैरे.
मला अजूनही शाझियाबद्दल राग नाही. पुन्हा आपमध्ये नाही आल्या, अपक्ष म्हणून लढल्या तरी काही वाटणार नाही. आदर वाटेल. पण बाँग्रेसमध्ये गेल्या तर मात्र कटाप Proud

सचिन पगारे +१

<<कॉंग्रेसच्या सहकार्याने त्यांनी कार्यकाल पूर्ण करायला हवा होता. >>

५ वर्षे सोडा, ४९ दिवसांत सुद्धा अवघड होत असणार. ज्यांच्याविरुद्ध केसेस केल्यात, ज्यांना तुरुंगात पाठवायची तयारी चालवली आहे ते कसे सहकार्य करतील?

>>महेश, तुम्ही लिहिणार होता अश्विनी उपाध्यायांचे मुद्दे. त्यांच्यात आणि शाझियामध्ये फरक वाटतो. उपाध्याय बाहेर पडले आणि अनेक बिनबुडाचे आरोप केले

लिहिणार नक्की लिहिणार पण जरा वेळ लागणार.

(चिखल्या आणि चिखलु वेगळे आहेत का? )
>>>> नाही
आपने जन्मापासून दोन मोठ्या निवडणुकांना तोंड दिलं आहे. भरपूर खर्च झाला आहे, चिखलफेक झाली आहे, धुरळा उडला आहे. लॉजिकली पाहिलं तर सगळ्या २७ आमदारांनी घरी बसून फुकट पगार घेणं, जरा विश्रांती घेणं (जसं बाँग्रेसी आमदार करतायेत) हे जास्त सयुक्तिक वाटतं. अशात पुन्हा निवडणुका घ्यायला (तेही लोकसभेतील सो कॉल्ड पराभवानंतर) ते कशाला मागे लागतील?
>>>तसं नसेल तर आपने सुप्रीम कोर्टात याचिका का दाखल केली निवडणुकांसाठी? याउलट भाजपा आणि काँग्रेस थंड आहेत.

विधानसभा भंग करेपर्यंत हेच आमदार राहतात ना?
>>> हो

मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. भाजपा निवडणुका का घेत नाही? तुम्ही म्हणता तसं आपचे आमदार तुटतात का हे पहायला असं करत असेल तर ते लोकशाहीच्या विरूद्ध आहे,लाजिरवाणं आहे ! घोडेबाजार भाजपाला नवीन नाही.
>>>
असे तुटक तुटक वाचु नका, मी आधी च लिहिलय, आपचे पेशन्स तपासले जात आहेत. जर सत्ता नसेल तर ठोस काही करता येणार नाही, आणि आपने बाकीच्या राज्यात निवडणुका न लढविण्याचा निर्णय घेतलाय. मग राहता राहिलं दिल्ली आणि इथे तर अजुन सगळ्या उड्या अंधारातच आहेत. अशा परिस्थितीत पार्टी फुटण्याचाच जास्त धोका, मिडीया कव्हरेज नाही, सत्ता नाही, जनाधार राहिलच याची खात्री नाही.

<<उपलब्ध वेळेत भाजपा नक्कीच निवडणुकीची गणितं जुळवत असेल.>>

येस. उत्तरप्रदेशात जुळवतेय तशीच
>>>????
रच्याकने आपने काँग्रेसचा पाठिंबा घेतला ते काय होतं? ते तर तुमचे विरोधक होते ना? सगळेच पक्ष राजकारण करतात. समर्थकांचं मात्र आपला तो बाब्या दुसर्याचं ते कार्ट असं काहिसं असतं.

<<ता.कः परिक्षा कितीही अवघड असली तरीही एकदा तारिख आली की हुरूप येतो आणि तयारी करता येते. इथे आपला परिक्षा कधी आहे हेच माहित नाहिये.>>

आपचे आमदार परिक्षेच्या तारखेसाठी वाट पहात बसतील असं वाटत नाही. त्यांचं काम चालू आहे असं दिसतंय.मिडिया दाखवणार नाही (फॉर ऑब्वियस रिझन्स)
>>> पुन्हा तेच, एकीकडे कोर्टात केस दाखल करायची निवडणुकांसाठी, उपराज्यपालांवर पक्षपातीपणाचे आरोप करायचे निवडणुकांच्या संदर्भात आणि वर म्हणायचं आपला निवडणुकांची घाई नाही. चांगलय. तुमचं तुम्हाला तरी पटतय का?

मला अजूनही शाझियाबद्दल राग नाही. पुन्हा आपमध्ये नाही आल्या, अपक्ष म्हणून लढल्या तरी काही वाटणार नाही. आदर वाटेल. पण बाँग्रेसमध्ये गेल्या तर मात्र कटाप >>>

मिर्ची ताई,
एक साधासा प्रश्न विचारते. शाजिया इल्मी काँग्रेसमध्ये गेल्या तर तुम्ही त्यांना कोणतंही समर्थन देणार नाही असं तुम्ही म्हणता. त्या स्वतः भ्रष्ट नसल्या तरीही त्या आपच्या राजकीय विरोधक असलेल्या पक्षात गेल्या म्हणून तुमचा त्यांना विरोध.

याच न्यायाने उद्या लालूप्रसाद यादव आपमध्ये आले तर ते आपमध्ये आहेत म्हणून तुम्ही त्यांचं समर्थन करणार आहात का?

>>मला अजूनही शाझियाबद्दल राग नाही. पुन्हा आपमध्ये नाही आल्या, अपक्ष म्हणून लढल्या तरी काही वाटणार नाही. आदर वाटेल. पण बाँग्रेसमध्ये गेल्या तर मात्र कटाप

आपने सत्ता स्थापन करताना कॉन्ग्रेसचा आधार घेतला होता ते कसे काय चालले तुम्हाला ?
तुमच्या या इल्मींच्या लॉजिकप्रमाणे पुर्ण आपच कटाप व्हायला पाहिजे होता तुमच्यासाठी

वि.सू. : मला मिर्ची या आयडीचे संयमित भाषेतले प्रतिसाद चांगले वाटतात. Happy

<<तसं नसेल तर आपने सुप्रीम कोर्टात याचिका का दाखल केली निवडणुकांसाठी? याउलट भाजपा आणि काँग्रेस थंड आहेत.>>

ज्या कारणासाठी राजकारणात आले ते पूर्ण करण्यासाठी.

<<असे तुटक तुटक वाचु नका, मी आधी च लिहिलय, आपचे पेशन्स तपासले जात आहेत. जर सत्ता नसेल तर ठोस काही करता येणार नाही, आणि आपने बाकीच्या राज्यात निवडणुका न लढविण्याचा निर्णय घेतलाय. मग राहता राहिलं दिल्ली आणि इथे तर अजुन सगळ्या उड्या अंधारातच आहेत. अशा परिस्थितीत पार्टी फुटण्याचाच जास्त धोका, मिडीया कव्हरेज नाही, सत्ता नाही, जनाधार राहिलच याची खात्री नाही. >>

वाचलं की ते सुद्धा. तरी माझा मुद्दा तोच आहे. आप चे आमदार तुटोत की काँग्रेसचे, असा घोडेबाजार करणं, करायला अवधी देणं हेच मूळात चूक आहे. लोकशाहीच्या विरूद्ध आहे. असं आहे का की आपल्याला आता हे इतकं सवयीचं झालंय की त्यात काही वावगं वाटत नाही ?

<<रच्याकने आपने काँग्रेसचा पाठिंबा घेतला ते काय होतं? ते तर तुमचे विरोधक होते ना? सगळेच पक्ष राजकारण करतात. समर्थकांचं मात्र आपला तो बाब्या दुसर्याचं ते कार्ट असं काहिसं असतं.>>

ह्याच्यावर चर्चा झाली आहे.
आपने अल्पमतातील सरकार बनवलं होतं. ते बनवताना आपने न मागता स्वतः काँग्रेसने पाठिंबा दिला होता. तरी तो घ्यायला आप तयार नव्हतं. "दिलेली वचनं पाळता येत नाहीत म्हणून आप जबाबदारीपासून पळतंय" असा आरोप भाजपावाल्यांनी करायला सुरूवात केली. शेवटी सुमारे ८-१० दिवसांच्या जनमतचाचणीनंतर आपने काँग्रेसच्या विनाशर्त पाठिंब्यासहित सरकार बनवलं आणि दिलेल्या १८ वचनांपैकी १६ की १७ पूर्ण केली.

:तिरकस मोड ऑनः
तोच मूर्खपणा झाला. दिलेली वचने पूर्ण करणं हे राजकारण्यांना अगदीच शोभत नै हो ! आमचे मोदी बघा कस्सले पटाईत राजकारणी आहेत. सगळ्या वचनांवर यु-टर्न. प्राऊड ऑफ हिज पॉलिटिकल स्किल्स. आता १५ ऑगस्ट येतोच्चे. पुन्हा एकदा आवेशपूर्ण भाषण होईल, ढीगभर वचनं दिली जातील आणि मोडली जातील. हेच तर राजकारण आहे. लोकसेवा-बिकसेवा, भ्रष्टाचारनिर्मूलन ह्यॅ...अगदीच डाउनमार्केट ब्वॉ..)
:तिरकस मोड ऑफः

<<पुन्हा तेच, एकीकडे कोर्टात केस दाखल करायची निवडणुकांसाठी, उपराज्यपालांवर पक्षपातीपणाचे आरोप करायचे निवडणुकांच्या संदर्भात आणि वर म्हणायचं आपला निवडणुकांची घाई नाही. चांगलय. तुमचं तुम्हाला तरी पटतय का?>>

चिखल्याभौ,
आपला निवडणूकांची घाई आहे, राजीनामा दिलेल्या दिवसापासून आहे. निवडणूका नकोत असं कुठे म्हटलंय मी? काम करायला निवडणूकांची वाट पहात नाहीयेत असं म्हटलंय. आपापल्या मतदारसंघात आमदारनिधी वापरून व्यवस्थित कामं चालू आहेत.
मला पटतंय. पण बहुतेक पटवून देता येत नाहीये. लेखनदोष Happy

<<मिर्ची ताई,
एक साधासा प्रश्न विचारते. शाजिया इल्मी काँग्रेसमध्ये गेल्या तर तुम्ही त्यांना कोणतंही समर्थन देणार नाही असं तुम्ही म्हणता. त्या स्वतः भ्रष्ट नसल्या तरीही त्या आपच्या राजकीय विरोधक असलेल्या पक्षात गेल्या म्हणून तुमचा त्यांना विरोध.>>

आपच्या राजकीय विरोधक असलेल्या पक्षात गेल्या म्हणून नव्हे त्यांना विरोध नसेल. ज्या पक्षातील भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलनात उतरल्या त्यांच्यातच जाऊन सामील झाल्या तर मग आंदोलनात उतरल्याच कशाला? मूळ हेतूवरच शंका येत नाही का मग?
अण्णा, किरण बेदी, रामदेवबाबा, व्हीकेसिंग वगैरेंना जसं फक्त काँग्रेसमधील भ्रष्टाचारावर आक्षेप आहे, भाजपातील भ्रष्टाचार चालतोय त्यातलाच प्रकार होईल ना तो?
रच्याकने, अण्णा सध्या कुठे आहेत कोणाला काही कल्पना? लोकांची फसवणूक करून भूमिगत? जाऊ द्या, त्यांचा राग येण्यापेक्षा वाईट जास्त वाटतं. आयुष्यभराची क्रेडिबिलिटी घालवली नको त्या लोकांच्या नादाला लागून.

<<याच न्यायाने उद्या लालूप्रसाद यादव आपमध्ये आले तर ते आपमध्ये आहेत म्हणून तुम्ही त्यांचं समर्थन करणार आहात का?>>

लालूप्रसाद आपमध्ये येऊच शकत नाहीत कारण ते आपच्या चाळणीतून पहिल्याच फेरीत बाद होतील !
आणि जर ते आपमध्ये आलेच तर ह्या धाग्याला माझ्याकडून कुलूप Proud

Pages