मध्यंतरी माझ्या वाचनात एक चर्चा आली होती की पालकांनी मुलांचे मोबाईल चेक करावेत का?
एक मतप्रवाह होता की आपला मुलगा / मुलगी काय गुण उधळतोय यावर लक्ष ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे.
दुसरा मतप्रवाह होता की मग सज्ञान झालेल्या मुलांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचे काय?
असाच एक प्रश्न गेले काही दिवस मला अनुभवांतून छळतोय.
गर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का?
नवरा-बायको नाते एकवेळ समजू शकतो, तुम्ही एकमेकांचे मोबाईल चेक करा किंवा चुलीत घाला, पण आयुष्यभर एकमेकांनाच झेलायचे आहे.
मात्र प्रेमप्रकरणात आपल्या गर्लफ्रेंडला हा अधिकार देण्यात यावा का?
होते काय, एखादी जस्ट फ्रेंड मैत्रीण सकाळी सकाळीच गूड मॊर्निंग करते. हल्ली त्या वॉटस्सपवर निघालेल्या सुंदर सुंदर स्माईलींचा वापरही त्यात (फ्री असल्याने) सढळ हस्ते असतो. असे तिने आपल्या फ्रेंडलिस्टमधील दहा जणांना पाठवून झाल्यावर अकरावा नंबर आपला लावला असतो. पण तरीही आपली "हि" मात्र तिने तुला (च) का गूडमॉर्निंग केले म्हणून आपली तासून काढते. अश्यावेळी उगाच ‘खायापिया कुछ नही गिलास तोडा बारा आणा’ अशी स्थिती होते.
बरं हे कधीतरीच नाही, तर वारंवार होते. फक्त समोरची "ती" बदलत राहते. त्या तिलाही अगं बाई असे करू नकोस म्हणून सांगायची सोय नसते, कारण यात पुन्हा आपणच वाईट ठरतो. नुसते वाईटच नाही तर जुनाट बुरसटलेल्या विचारांचे किंवा मैत्रीचा घाणेरडा अर्थ घेणारेही ठरतो. भले हा घाणेरडा(?) अर्थ आपल्या हिने काढला का असेना.
एण्ड ऑफ द डे, यातून चांगले काही घडत तर नाहीच. पण ‘तेलही गेले आणि तूपही गेले’ या म्हणीचा अनुभव येतो की काय, अश्या भितीची टांगती तलवार डोक्यावर ठेऊन प्रेमप्रकरण निभवावे लागते.
हे एक उदाहरण झाले, अशी अनेक आणि विविध उदाहरणे देता येतील. स्मार्टफोन, ईंटरनेट, फेसबूक, व्हॉटस्सप वगैरे वापरणार्या सर्वांना याची कल्पना न सांगताच येऊ शकेल.
सध्या हेच भोगतोय, अन यावर सुवर्णमध्य शोधतोय. जिस से ‘साप भी बचे और लाठी भी ना तुटे’. जाणकार आणि अनुभवींचे सल्ले अपेक्षित. वैयक्तिक अनुभवांची प्रशंसा करण्यात येईल.
तळटीप - या प्रश्नाला व्हायसे वर्सा देखील करता येईल पण बॉयफ्रेंड हि जमात अश्या जासूसी प्रकारांबाबत पुरेशी निरुत्साही असते (हे.मा.वै.म.) ,, तरीही स्त्री-पुरुष समानता राखायला या अंगानेही भाष्य केल्यास माझी किंवा कोणाचीही काही हरकत नसावी.
आभारी आहे,
ऋन्मेssष
धि का यांचा सल्ला भारी आहे.
धि का यांचा सल्ला भारी आहे.
साधी गोष्टय ...गर्लफ्रेंडचा
साधी गोष्टय ...गर्लफ्रेंडचा मोबाईल तुमी चेक करायला सुरवात करा, ती परत तुमचा मोबाईल मागणार नाही.
>>>
झाले मग कल्याण. माझ्या असे करण्याने माझी उरलीसुरली(?) प्रायव्हसी सुद्धा गेली. म्हणजे ती आता जे करतेय ते कसलाही संकोच न बाळगता हक्काने केल्यासारखे करेल.
कुणी मला एक गर्ल्फ्रेंड देईल
कुणी मला एक गर्ल्फ्रेंड देईल का?
माझा मोबाईल चेकायला द्यावा म्हणतो..
एक आयड्या करा, एक
एक आयड्या करा, एक शेकंडह्यान्ड फोन घ्या ,त्याद्वारे डुप्लिकेट स्त्री आयडी घेऊन तुमच्या खर्या वाट अप्स, फेबुवर आयडीवर पोस्ट टाकत चला. डुप्लिकेट स्त्रीने तुमाला भाऊ मानले आहे असे भासवायचे, मग बळेबळेच आपला मोबाईल मैत्रीणीला द्यायचा, तिला असे वाटेल कि हा आपल्याशिवाय कोणालाही गर्लफ्रेट माणत नाही, बहीणीच मानतो
असाही बाफ येऊ शकतो सत्य हे
असाही बाफ येऊ शकतो
सत्य हे कधी न कधी बाहेर येतंच. त्यापेक्षा सगळं खरं खरं एकदाच काय ते सांगून टाकावं. >>>> करेक्ट! एकदा का तुम्ही खोटं बोलताय (ते ही अश्या बाबतीत) हे तिच्या लक्षात आलं तर तिचं कितीही तुमच्यावर प्रेम असलं तरी ती तुमच्यावर आधीसारखा १००% विश्वास कधीच ठेवू शकणार नाही आणि ते रिलेशनला चांगलं नाही. आणि मग इन्सिक्युरिटी/फसवणुकीची भावना येणं साहजिक आहे.
प्रेमात विश्वास महत्वाचा असला तरी असुरक्षिततादेखील बहुतांश वेळा त्याच प्रेमातून येते. >>>> प्रेमात विश्वास वगैरे थिअरीटीकली बरोबर असलं तरी जमाना खराब है भाऊ! मोबाईल बदलण्याच्या स्पीडनेच गर्ल्फ्रेंड बॉयफ्रेंड बदलले जातात. ट्रान्झिशन पिरियड मध्ये दोन दोन गर्लफ्रेंड्स (एक सोडायच्या मार्गावर आणि दुसरी पटवायच्या मार्गावर) असलेल्या पाहिल्या आहेत. एका मुलीनेही असं केलेलं (डबल गेम) पाहिलं आहे आणि ज्याला सोडला त्याच्या आईने मुलाच्या काळजीने बीपी वाढवून घेतलं आणि अंथरुण धरलं होतं. नशिब, तो मुलगा मात्रं तिचं खरं रुप वेळीच दिसल्याबद्दल देवाचे आभार मानून लगेच सावरला. तेव्हा तिच्याबाबतीत सिरियस असाल तर तुमचं इतर मित्र मैत्रिणींशी असलेलं नातं खर्या खुर्या रुपात तिच्यासमोर येऊद्या. ती तुमच्यावर जिवापाड प्रेम करत असेल तर ते गमवू नका.
चुकुनही तुमचे फ्रेन्ड्स हे गर्लफ्रेंड पेक्षा महत्वाचे आहेत हे तिला जाणवु देउ नका.. मेक हर युअर प्रायॉरिटी.. >>> +१ तुम्ही तिला कमिट करुनही तिला दुर्लक्षित करुन इतर मैत्रिणींच्या जास्त मागे मागे कराल तर तिला नक्कीच तिच्याबाबतीतल्या तुमच्या हेतूची शंका येऊ शकते. पण तिला तिच्या तुमच्या आयुष्यातील स्थानाप्रमाणे वागवूनही ती ओव्हरपझेसिव्ह असेल तर चिमुरी म्हणते त्याप्रमाणे नातं पुढे नेण्याबाबत विचार करणे.
पण प्रेमात असलेल्या मुलींना समजवणे भारी पडते अरेरे >>> प्रिती सुरी दुधारी....
All the best !
बाकी काय ते जाउद्या. पण एवढी
बाकी काय ते जाउद्या. पण एवढी प्रेम करणारी गर्लफ्रेंड तुम्हाला मिळाली, भारीच लक्की बाई तुम्ही ऋन्मेssष.
स्वाती, धन्यवाद
स्वाती, धन्यवाद
धिका,
भाऊ-बहीण नात्याची आयड्या करायची काही गरज नाही, माझ्या काही बहिणीदेखील (नेटफ्रेंडस सारखे नेट सिस्टर्स) आहेतच.
आता विषय निघालाच आहे तर त्याचाही एक किस्सा ऐका.
मध्यंतरी माझी तब्येत बरी नव्हती, आठवडाभर घरी होतो. तब्येत सुधारून कामावर जायला लागलो तसे पहिल्याच दिवशी कामावरून सुटल्यावर तिला भेटलो. रात्रीची उशीराची म्हणजे साडेदहाची वेळ. म्हणजे तिला ड्रॉप करून निघणारच होतो. हल्ली कितीही मित्र-मैत्री-प्रेम असले तरी ठराविक गप्पा संपल्यावर लोकांचे मोबाईलवर चाळे सुरू होतात. त्यालाच अनुसरून माझ्याही हातात मोबाईल होता. ईतक्यात गूगल चॅटवर आलेल्या एक मेसेजचे नोटीफिकेशन मोबाईल स्क्रीनवर आले. साधासाच मेसेज "हाईईई, कसा आहेस?"...
तर हि चौकशी होती माझ्या तब्येतीची. समोरची मुलगी माझ्या बहीणीसारखीच, बस्स प्रत्येक पोस्टमध्ये "हाई दादा" लिहित नाही इतकेच. मी हिचा चेहरा पाहिला तर एवढ्या रात्री तुला एखादी मुलगी हाई करतेच कशी असे काहीसे भाव.
आता मी गोंधळात, त्या "हाई" ला पलटून उत्तर द्यावे तर माझ्याशी बोलायचे सोडून तू तिच्याशी चॅट कसा करतोस म्हणून फायरींग. आणि रिप्लाय द्यायचे टाळले तर काहीतरी लपवतोय हा संशय. याच कारणास्तव "आता बिजी आहे आपण नंतर बोलूया" असाही रिप्लाय देऊ शकत नव्हतो.
मग चेहर्यावर नाईलाजीचे असहाय्यतेचे भाव आणल्यासारखे करत उत्तरादाखल "आता तब्येत बरी आहे" एवढाच मेसेज टाकला आणि हिला आमच्या बहीणभावाच्या नात्याची ओझरती कल्पना द्यायचा प्रयत्न केला. पण त्यावरही एवढे एक्सप्लेनेशन का देतोयस हेच भाव.
धाग्याचं नावच
धाग्याचं नावच "गर्लफ्रेंड्सना" असं असेल तर एकच सल्ला प्रत्येकीला कसा लागू पडेल ? सगळ्याच सारख्या नसतात.
शीर्षकातच असा अप्रामाणिकपणा तर...
पालथ्या घड्यावर पाणीच
प्रेमात विश्वास महत्वाचा असला
प्रेमात विश्वास महत्वाचा असला तरी असुरक्षिततादेखील बहुतांश वेळा त्याच प्रेमातून येते. >>>> १०० % अनुमोदन,
आता मोदक खाऊन झाले असतील तर उपाय सांगतो,
सोशल नेटवर्कींगमधे १. फेसबुक २. whatsapp दोन अॅप्स सर्वात जास्त वापरले जातात. यापैकी whatsapp एका मोबाईल मध्ये एकाच नंबर साठी वापरता येतो, ड्युअल सीम असला तरी. डुप्लिकेट फेसबुक तुम्ही डोल्फीन/ युसी ब्राऊजर सारख्या अॅप्समधून वापरू शकता, त्याच प्रकारे डुप्लिकेट whatsapp वापरण्यासाठी मोबाईलमधे OGWhatsApp ईन्स्टॉल करा
नंतर हे अॅप्स तुम्ही अॅप ड्रॉवरमधे हाईड करून ठेवा आणि हवे तसे वापरा.
मस्त धागा आहे. खूप आवडला.
मस्त धागा आहे. खूप आवडला.
आरती, आवडला तुम्हाला धागा,
आरती, आवडला तुम्हाला धागा, सही.... माझ्या निवडक दहात
प्रसिक,
तंत्रज्ञानात मी थोडा कच्चा लिंबू आहे, पण तुम्ही म्हणता तसे डुप्लिकेट व्हॉट्सअॅपसाठी डुअल सिम व दोन नंबर लागतील ना मग.
कुणाच्या गर्लफ्रेंडना?
कुणाच्या गर्लफ्रेंडना?
ब्र.आ. यांचे पोस्टना अनुमोदन.
बाकी हा धागा वाह्यात आहे.स्वारी.
तरी ठराविक गप्पा संपल्यावर
तरी ठराविक गप्पा संपल्यावर लोकांचे मोबाईलवर चाळे सुरू होतात. त्यालाच अनुसरून माझ्याही हातात मोबाईल होता >>> प्रोब्लेम हा आहे. गर्लफ्रेंड, हाई करणारी बहिण, 'द्याव का नाही द्याव' हे प्रश्न सगळ झूट. समोर कुणी (गर्लफ्रेंड काय इतर कुणीही असेल) असेल तर मोबाईल चेक करू नये हे बेसिक. अर्थात हा प्रोब्लेम असणारे जगात तुम्ही पहिले, शेवटचे किंवा एकटेच नाहीत. सबब इथे तुम्हाला भरपूर पाठींबा आणि समस्या निराकरण उपाय सापडतील. (हलके घ्या! दिवे घ्या!! ). फेबु वर "लुक अप" म्हणून एक विडीयो आहे, जरूर बघा.
सीमंतिनीला अनुमोदन. तुम्ही
सीमंतिनीला अनुमोदन.
तुम्ही एका नात्यात आहात, कमिटेड आहात मग काही बेसिक नियम स्वतःवर घालून घ्यायला काय हरकत आहे? तुमच्या मैत्रीणींना तुम्ही तुमच्या कमिटमेंटची कल्पना देत असाल असं गृहीत धऊन म्हणते की मैत्रीणींना असे वेळीअवेळी मेसेज करू नयेत अशी रिक्वेस्ट करा. तुमच्या गर्ल्फ्रेंडबरोबरचा वेळ फक्त तिच्यासाठीच ठेवा की!
मैत्रीणींना कल्पना द्या की त्यांच्या अश्या वागण्याने प्रॉब्लेम्स होतायत. तरीही कोणी तुमच्याबद्दल 'वेगळी' फीलिंग्ज असल्याने तुम्हाला कधीही मेसेज करत असेल, भलत्या स्मायलीज टाकत असेल तर तिचा हेतू फक्त मैत्रीचा नाही हे तुम्हाला समजायला हवं. आणि जर तुम्ही तुमच्या गर्ल्फ्रेंडशी खरोखरच प्रामाणिक असाल तर अश्या 'मैत्रीणीं'पासून दूर रहा.
सगळ्यात सोप्पा उपाय आहे. ज्या ज्या गोष्टींमुळे गर्ल्फ्रेंड संशय घेते आहे त्या त्या गोष्टींत स्वतःच्या जागी तिला आणि तिच्या जागी स्वतःला इमॅजिन करून पहा. तुम्हाला पटलं असतं तिला १०-१२ मुलांनी हे असे स्मायलीज किंवा वेळीअवेळी मेसेजेस केलेले? किंवा तुमच्याशी बोलता बोलता तिने स्वतःला येणार्या मेसेजेस वर जास्त फोकस केलेलं चाललं असतं तुम्हाला?
तुम्ही एका नात्यात आहात,
तुम्ही एका नात्यात आहात, कमिटेड आहात मग काही बेसिक नियम स्वतःवर घालून घ्यायला काय हरकत आहे? >> कस लाख मोलाच बोललीस! दुसर्याच्या वागण्यातील बोट दाखवणे सोपे असते. स्वतःवर नियम घालणे फार अवघड. अर्थात हळूहळू लक्षात येईल की कुठल्याही नात्यात आपण नियम फक्त स्वतःवर लावू शकतो.
आपुन तर मोबाईलच्या खूप
आपुन तर मोबाईलच्या खूप आधीच्या जमान्यातला मानूस पन बायका तर सगळ्या जमान्यात त्याच असतात ना ! सहज बायकोशी बोलताना एकदां मीं तिला मला तरूणपणी एका मुलीच्या नांवाने चिडवायचे असं सांगितलं. झालं ! जरा काय बिनसलं कीं तिचं ठरलेलं फणकार्यातलं नेहमींचं वाक्य, ' मग करायचं होतंत ना लग्न तिच्याशींच !'. मग एकदां तिला तिच्या मैत्रीणीला सांगताना मीं ऐकलं, ' चल ग, मला माहित आहे, टाईमपास म्हणून ती यांच्याशीं कधींतरी बोलायची, तेंही ह्यांची फिरकी घ्यायलाच ; पण तिचं नांव घेवून मीं रागावलें कीं यांचा 'इगो' सुखावतो म्हणून मींही करते जरा नाटक, इतकंच !'
<< पण तरीही आपली "हि" मात्र तिने तुला (च) का गूडमॉर्निंग केले म्हणून आपली तासून काढते >> ऋन्मेssषजी, माझं ऐका आणि यांतही तसं काय नाहीं ना, हें नीट चेक करून घ्या.
भाऊ
भाऊ
भाऊ वेगळाच अॅंगल दावलात हो,
भाऊ
वेगळाच अॅंगल दावलात हो, खरेच असे पण असू शकते. म्हणूनच कदाचित यावरून आमचे तेवढ्यापुरते वाजते पण लॉंग लास्टींग भांडण वा रुसवेफुगवे झाले नाहीत. असे असेल तर तुर्तास प्रकरण सेफ आहे असे समजायला हरकत नाही, फक्त हे असेच आहे याची खात्री कशी करणार हा प्रश्न तेवढा शिल्लक राहील.
सीमंतीनी, हलके घ्या दिवे घ्या
सीमंतीनी,
हलके घ्या दिवे घ्या हे आपण म्हणाला नसता तरी चालले असते, उगाच मग त्याने पोस्टचा टोन आणि अर्थच बदलतो. कारण आपण जे म्हणता ते खरेच आहे, मान्यही आहे. एखाद्याला गप्पा अपेक्षित असताना दुसर्याने मोबाईल काढला तर इरीटेट हे होतेच. ती पुरेशी काळजी मी पण घेतो, किंवा तिने कधी मोबाईल ठेव बाजूला म्हटले तर जे काही उघडले असेल ते तिथेच लॉक करून खिश्यात टाकतो. आमच्या भेटीची फ्रिक्वेन्सी रोजच संध्याकाळ अशी असल्याने अधूनमधून सवयीने काढणे होते इतकेच, अगदी एखादा मेसेज वा फोटो तिला दाखवणे, एखाद्या ऎप्लिकेशनबद्दल सांगणे अश्या दोनचार गप्पा त्या मोबाईलवरूनही होतात. त्यामुळे सध्या तरी मी तुम्हाला इतकेच विश्वासाने सांगू शकतो मी तिला डावलून त्यात घुसलोय असे कधी होत नाही. इनफॅक्ट ट्रॅव्हलिंग करतानाही कानात हेडफोन लाऊन त्याच फोनवरून तिच्याशीच गप्पा मारत असतो. आणि हा कॉल तासाभराचे ट्रॅव्हलिंग असेल तर तासभर चालतो. त्यामुळे मोबाईलला ती आपली सवत नाही तर आम्हाला जोडणारा दुवाच समजत असेल.
आर.एम.डी.,
तुम्ही सुचवलेले नियम जर माझ्यापुरते असतील तर जे जे तिला अपेक्षित आहे ते ती बिनधास्त सांगते आणि मी ते पाळतोच किंवा चर्चा करून सुवर्णमध्य काढतोच. पण एखाद्या मैत्रीणीला वेळीअवेळी (??) मेसेज करू नकोस, किंवा करूच नकोस हे सांगणे हा कदाचित उपाय असला तरी माझ्या स्वभावाला जमणारा नाही. अगदी मला वेगळी फिलींग असणारी कोणी वाटली तरी मी तिला कोणताही रॉंग (ग्रीन) सिग्नल जाणार नाही याचीच काळजी घेतो, पण थेट काही सांगणे हे पुन्हा मला काही जमणार नाही. आणि चुकून यात माझा अर्थ काढण्यात गल्लत झाली असेल तर मग आयुष्यभर ती गिल्ट फीलींग राहील.
वेळीअवेळी (??) - म्हणजे काय नक्की हे कसे डिफाईन करणार, आणि कोणती वेळ मग योग्य? इथे वाद घालायचा हेतू नाही पण वेळीअवेळी या शब्दाने त्या वाक्याला एक वेगळीच धार येतेय.
..........
तर चिमुरी म्हणते त्याप्रमाणे नातं पुढे नेण्याबाबत विचार करणे.
>>>>>>>>>
हे प्रकरण या लेवलचे असते तर मी इथे असा धागाही काढला नसता. तिचा स्वभाव ओवरपझेसिव किंवा संशयी असा नाहीये. माझ्या कामाच्या ठिकाणच्या वा कॉलेजच्या एखाद्या मैत्रीणीबद्दल सांगताना ती कधीच त्यात काही शोधत बसत नाही. फक्त हा मोबाईल सर्व फसाद की जड आहे.
ऋन्मेऽऽष, म्हणूनच कदाचित
ऋन्मेऽऽष,
म्हणूनच कदाचित यावरून आमचे तेवढ्यापुरते वाजते पण लॉंग लास्टींग भांडण वा रुसवेफुगवे झाले नाहीत. >>> प्रेमात असंच असावं. भांडण हे चवीपुरतंच असावं. फाल्तू गैरसमज, इगो वगैरे तुमच्या दोघांच्या नाहीत. तुम्ही तिला व्यवस्थित वेळ देताय. त्यामुळे मोबाईल ही पण जड की फसाद होणं बंद होईल. तुमच्या पोस्ट्स वरुन वाटतंय की तुम्हा दोघांच्या नात्यात खरंतर काही प्रॉब्लेम नाहीच आहे. ऑल इज वेल
ऋन्मेssष, >>>>एवढ्या रात्री
ऋन्मेssष,
>>>>एवढ्या रात्री तुला एखादी मुलगी हाई करतेच कशी असे काहीसे भाव>>>>
तुमचंच वाक्य आहे हे. ती एवढ्या रात्रीची वेळ तिला चुकीची वाटलीच ना? म्हणून अवेळ म्हणाले.
पहा, कोणाला खरंच मदतीची गरज आहे आणि तिने तुम्हाला अश्या वेळांना संपर्क केला तर माझी खात्री आहे की तुमची gf समजून घेईल. पण मोबाईल आहे, सोशल नेटवर्किंग आवडतंय म्हणून कधीही उठून मेसेज करणं योग्य आहे का? मी अशी कितीतरी कपल्स पाहीली आहेत ज्यांच्यात या असल्या मुद्द्यांवरून वाद झालेत आणि सुंदर नात्यांचा कचरा झालाय. खरंच सांगा, do you think it is worth? म्हणूनच तुम्हाला म्हणाले की स्वतःला तिच्या आणि तिला स्वतःच्या जागी ठेवून पहा आणि प्रामाणिकपणे स्वतःला उत्तर द्या की तुम्हाला तिने असं मित्रांशी कधीही गप्पा मारत राहीलेलं चालेल?
थेट सांगणं तुम्हाला जमणार नाही म्हणता. मी समजू शकते. पण तुमच्या महत्त्वाच्या नात्यात जर कोणामुळे गैरसमज होत असतील तर ते थेट बोलून सोडवणं योग्य आहे असं मला वाटतं.
असं आहे, शेवटी चॉईस तुमचा आहे की तुम्ही कुठल्या नात्याला जास्त महत्त्व देता. तुम्ही जे काही सांगितलंत त्यावर बेस्ड उत्तरं दिली. फायनल टेक तुमचाच असणार आहे. जमलं तर दुसरं सिम/फोन, खोटं बोलणं इत्यादी प्रकार करू नका. नुकसान तुमचंच आहे.
बेस्ट ऑफ लक!
अश्विनी के आर.एम.डी., ओके
अश्विनी के
आर.एम.डी.,
ओके आणि धन्यवाद,
बाकी खोटेपणा आणि लपवाछपवीच्या आयडीया मी फक्त जनरल नॉलेज वाढवायला म्हणूनच स्विकारतोय, या नात्यात मला त्याची गरज नाहीयेच
अवांतर : ऋन्मेssष, एक विनंती
अवांतर :
ऋन्मेssष,
एक विनंती : तुमच्या सदस्यनामातला ss काढून त्याच्या जागी ऽऽ टाका. इथे केश्विनी यांनी टाकलाय तसा.
आ.न.,
-गा.पै.
ती पुरेशी काळजी मी पण घेतो,
ती पुरेशी काळजी मी पण घेतो, >> म्हणून हलके घ्या म्हणाले होते. कारण जर आपण मोबाइल आणि जनसंपर्क शिष्टाचार व्यवस्थित पाळत असाल तर मी पुन्हा तेच नव्याने सांगणे म्हणजे इरिटेटिंग! मोबाईल जोडणारा दुवा आहे हे भान आहे तर सगळ छान आहे
सततचा संशय हा एक प्रकारचा छळ
सततचा संशय हा एक प्रकारचा छळ (=abuse) असतो. तेव्हा असा अब्युज सहन करु नका. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे अतीसंशयी प्रेयसीला टाटा करा.
विचारवंताना दांडगा अनुभव आहे
विचारवंताना दांडगा अनुभव आहे असं वाटतंय
<< ....फक्त हे असेच आहे याची
<< ....फक्त हे असेच आहे याची खात्री कशी करणार हा प्रश्न तेवढा शिल्लक राहील.>> तुमच्या 'इगो'वरून मोराचं पीस फिरल्यासारखं तुम्हाला वाटत का, एवढी तरी खात्री तुम्हीच करून घेवूं शकता ना !
गर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल
गर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का? > अजिबात देऊ नका , फक्त क्रेडीट कार्ड तेवढं द्या.
वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे अतीसंशयी प्रेयसीला टाटा करा. > पण त्याआधी तुम्हाला तुमचं आडनावं बदलावं लागेल ना ?
एकदाचं शुभ मंगल सावधान करुन
एकदाचं शुभ मंगल सावधान करुन टाका.
<< एकदाचं शुभ मंगल सावधान
<< एकदाचं शुभ मंगल सावधान करुन टाका.>> करून टाकायची वेळ येवूं नये म्हणून तर हा धागा काढलाय ना !
Pages