मध्यंतरी माझ्या वाचनात एक चर्चा आली होती की पालकांनी मुलांचे मोबाईल चेक करावेत का?
एक मतप्रवाह होता की आपला मुलगा / मुलगी काय गुण उधळतोय यावर लक्ष ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे.
दुसरा मतप्रवाह होता की मग सज्ञान झालेल्या मुलांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचे काय?
असाच एक प्रश्न गेले काही दिवस मला अनुभवांतून छळतोय.
गर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का?
नवरा-बायको नाते एकवेळ समजू शकतो, तुम्ही एकमेकांचे मोबाईल चेक करा किंवा चुलीत घाला, पण आयुष्यभर एकमेकांनाच झेलायचे आहे.
मात्र प्रेमप्रकरणात आपल्या गर्लफ्रेंडला हा अधिकार देण्यात यावा का?
होते काय, एखादी जस्ट फ्रेंड मैत्रीण सकाळी सकाळीच गूड मॊर्निंग करते. हल्ली त्या वॉटस्सपवर निघालेल्या सुंदर सुंदर स्माईलींचा वापरही त्यात (फ्री असल्याने) सढळ हस्ते असतो. असे तिने आपल्या फ्रेंडलिस्टमधील दहा जणांना पाठवून झाल्यावर अकरावा नंबर आपला लावला असतो. पण तरीही आपली "हि" मात्र तिने तुला (च) का गूडमॉर्निंग केले म्हणून आपली तासून काढते. अश्यावेळी उगाच ‘खायापिया कुछ नही गिलास तोडा बारा आणा’ अशी स्थिती होते.
बरं हे कधीतरीच नाही, तर वारंवार होते. फक्त समोरची "ती" बदलत राहते. त्या तिलाही अगं बाई असे करू नकोस म्हणून सांगायची सोय नसते, कारण यात पुन्हा आपणच वाईट ठरतो. नुसते वाईटच नाही तर जुनाट बुरसटलेल्या विचारांचे किंवा मैत्रीचा घाणेरडा अर्थ घेणारेही ठरतो. भले हा घाणेरडा(?) अर्थ आपल्या हिने काढला का असेना.
एण्ड ऑफ द डे, यातून चांगले काही घडत तर नाहीच. पण ‘तेलही गेले आणि तूपही गेले’ या म्हणीचा अनुभव येतो की काय, अश्या भितीची टांगती तलवार डोक्यावर ठेऊन प्रेमप्रकरण निभवावे लागते.
हे एक उदाहरण झाले, अशी अनेक आणि विविध उदाहरणे देता येतील. स्मार्टफोन, ईंटरनेट, फेसबूक, व्हॉटस्सप वगैरे वापरणार्या सर्वांना याची कल्पना न सांगताच येऊ शकेल.
सध्या हेच भोगतोय, अन यावर सुवर्णमध्य शोधतोय. जिस से ‘साप भी बचे और लाठी भी ना तुटे’. जाणकार आणि अनुभवींचे सल्ले अपेक्षित. वैयक्तिक अनुभवांची प्रशंसा करण्यात येईल.
तळटीप - या प्रश्नाला व्हायसे वर्सा देखील करता येईल पण बॉयफ्रेंड हि जमात अश्या जासूसी प्रकारांबाबत पुरेशी निरुत्साही असते (हे.मा.वै.म.) ,, तरीही स्त्री-पुरुष समानता राखायला या अंगानेही भाष्य केल्यास माझी किंवा कोणाचीही काही हरकत नसावी.
आभारी आहे,
ऋन्मेssष
एक साधं लॉजिक कळालेलं
एक साधं लॉजिक कळालेलं नाही.
मुली पझेसिव्ह असतात. ठीक.
पण इन्सिक्युअर्ड असणं (असतात हे मान्य ) ...
मुलांना पण तसंच वाटत असेल हे का नाही लक्षात येत ?
शुभमंगल सावधान हा यावर उपाय
शुभमंगल सावधान हा यावर उपाय आहे![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
नाही म्हणजे करेलच मी ते, तिच्याशीच करेन. पण आतापावेतो फक्त वय या एकाच निकषाला पार केलेय. दोघे मिळून टोटलमध्ये सेटल झालो तर करूच. पण पळवाट म्हणून नक्कीच नाही.
अवांतराचे प्रत्युत्तर_गामा पैलवान धन्यवाद_बदल करवला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल
गर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी ?
)
बिनधास्त द्या................ ( फक्त बॅटरी काढून ठेवा खिशात
मग काय निष्कर्ष निघाला शेवटी?
मग काय निष्कर्ष निघाला शेवटी?
निष्कर्ष : सत्यमेव जयते आणि
निष्कर्ष : सत्यमेव जयते आणि कर नाही त्याला डर कशाला ...
ऋन्मेष, बेस्ट!! आवडलं आणि
ऋन्मेष, बेस्ट!! आवडलं
आणि समजा हातून समजा चुका झाल्या तरी ब्रेव्हली मान्य करायच्या आणि पुढच्या खोट्याच्या मालिकेला मुळातच बाद करायचं. कोण चुकत नाही? साधी माणसं आहोत आपण.
पण मी म्हणतो एक चॉकलेट खात
पण मी म्हणतो एक चॉकलेट खात असताना दूधगोळ्या बघायच्याच कशाला. माणसाने कसे रामासारखे असावे - एक पत्नी व्रत ................................................. ( एकावेळी)
शाब्बास ऋन्मेष.
शाब्बास ऋन्मेष.
अश्विनी, विचारवंत
अश्विनी, विचारवंत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किरणकुमार,
आम्हीही एकपत्नीव्रत (इथे वनगर्लफ्रेंडरूल) चेच पालन करतोय. पण रामालाही मैत्रीणी असतीलच ना (भले रामायणात उल्लेख नसेल), आणि त्यामुळे सीतेच्या स्थानाला नक्कीच धक्का लागला नसेल. तसेच हे. फक्त आमच्या सीतेला आमच्यातील राम अजून दिसला नाही इतकेच !
अहो ऋन्मेऽऽष का टेंशन घेताय
अहो ऋन्मेऽऽष
का टेंशन घेताय , वरील सर्व उपायांनी काही फरक पडत नसेल तर जरा पहा गर्लफ्रेंड का चिडचिड करत आहे, तिला काही टेंशन आहे का , एकदा जरा चौकशी तर करा घरुन काही दडपण आहे का , तिला कुणी त्रास देतय का.
सर्व ठीक होईल ,काळजी करु नका.
फक्त आमच्या सीतेला आमच्यातील
फक्त आमच्या सीतेला आमच्यातील राम अजून दिसला नाही इतकेच !>>
क्या बात है. आवडलं वाक्य. एकदाच तिला एकांतात (म्हणजे तुम्ही दोघे बोलत असताना कुणी ऐकणार नाही असे बघुन) सांग: "बाई गं. माझ्यावर तुझाच पहिला हक्क आहे, आपुन के दिल पे तुम्हारा ही हक हय. पण मला जसे मित्र आहेत तशाच मैत्रिणी देखील आहेत. तुला देखील मित्र असू शकतात. याउप्पर मी तुला समजावू शकत नाही. काय ते ठरव."
आणि ऋन्मेष, एक पुस्तक आवर्जून
आणि ऋन्मेष, एक पुस्तक आवर्जून वाचा आणि तुमच्या "तिला" वाचायला द्या. आपली ओळख असती तर तुम्हाला भेटच दिले असते.
हे पहा
गद्धे पंचविशी
गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किंवा
गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किंवा नवरा-बायको नात्यात एकमेकांची स्पेस आणि प्रायवसी जपणे हवे. त्यामुळे मोबाईल चेक करणे माझ्यामते बिग नो.
गर्लफ्रेंड नव्हती नाही नसेल,
गर्लफ्रेंड नव्हती नाही नसेल, आमची फेस वल्यु नाही तितकी!! अन वॉलेट वल्यु तर त्याहुन नाही!!! काय अनुभव येतो सांगा बायको (चुकुन लगन झालेच तर) वर वापरेन!!!
लपवण्यासारख काहिच नाही तर
लपवण्यासारख काहिच नाही तर जरुर द्यावा. उलट, तिने मागायच्या आधीच द्यावा.
स्वाती २ _ मला वाटते हे या
स्वाती २ _![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला वाटते हे या धाग्यावरचे पहिलेच रोखठोक उत्तर.
सोन्याबापू,
माफच कर मित्रा (तुझेही लग्न झालेले नाही, आणि मित्रत्वाचा सल्ला द्यायचाय म्हणून एकेरी उल्लेख करतोय रे) पण माफच कर यासाठी की कन्सेप्ट गंडलेय मित्रा. फेस वॅल्यू किंवा मनी वॅल्यू पेक्षा जे लोक बोलीबच्चन, वाकचतुर, आणि निर्भीडपणे संवाद साधणारे असतात त्यांनाच मी आजवर इथे बाजी मारताना पाहिले आहे. हे नसले तर उलट अंगी असलेले इतर गुणही पाण्यात जातात आणि गपगुमान अरेंज मॅरेज करावे लागते. अर्थात, पण तिथे मग चांगले स्थळ पदरी पडते.
विचारवंत,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गद्धेपंचविशी ऐकून आहे, जमले तर वाचेन नक्की. बाकी तुम्ही भेट देऊ नका, पण एक माबोकर म्हणून आपली ओळख आहेच.
कविता,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपण दाखवलेल्या आपलेपणाबद्दल धन्यवाद,
पण खरेच तसा काही प्रॉब्लेम नाहीये, (अर्थात माझ्यामते)
तुम्ही एकत्र असतांना तुमच्या
तुम्ही एकत्र असतांना तुमच्या जी एफ च्या फोन वरही तिच्या मित्रांचे कॉल्स्/मॅसेजेस येतात का? येतच असणार कारण ती पण वॉट्सअॅप वापरतेच. त्यावेळी ती कसे हॅन्डल करते? तुम्हीही तसेच करा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अदिती अर्थातच, उलट मुलींना
अदिती अर्थातच,
उलट मुलींना व्हॉट्सप आणि फेबूवर मेसेजेस कॉमेंटस लाईक्स वगैरे मुलांच्या तुलनेत जास्त आणि खचाखचच येतात.
पण इथे प्रश्न ती हँडल करते तसे मी हँडल करण्याचा नाही तर नेमका उलट आहे.
म्हणजे मी सहज समजून घेतो की मुलगी म्हटले की चार मुले हायहेल्लो करत पुढे मागे असणारच, मग ते निव्वळ मित्र असो वा आणखी कोणत्या हेतूने ट्राय मारत असो. त्यामुळे तिचा फोन फेसबूक चेक करून "हा कोण ग्ग? हा का तुझ्या प्रत्येक फोटोवर कॉमेंट देतो?" वगैरे शंका घेत तिला पिडण्यात अर्थ नाहीच.
पण याउलट मुलांच्या बाबतीत मात्र त्यांच्यावरच संशय घेतला जातो की हा आपलाच समोरून दाणा टाकत असणार त्याशिवाय का ती मुलगी बोलायला येणार आहे वगैरे वगैरे.
आणि हे सहज घडते, म्हणजे यात मी असाच मुलगा असणार, माझी इमेज तशीच असणार, उगाच का ती अविश्वास दाखवते... इत्यादी इत्यादी असे काही मॅटर करत नाही.
हे खरे तर अनादी कालापासून चालत आले आहे आणि चालत राहणार ... प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की या मोबाईल तंत्रज्ञानाने फार गोची करून ठेवली आहे.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
>>पण याउलट मुलांच्या बाबतीत
>>पण याउलट मुलांच्या बाबतीत मात्र त्यांच्यावरच संशय घेतला जातो की हा आपलाच समोरून दाणा टाकत असणार त्याशिवाय का ती मुलगी बोलायला येणार आहे वगैरे वगैरे.>> हे जनरलाझेशन झाले.
असा संशय घेणे मुलं अणि मुली दोन्ही करतात. मात्र कमिटेड रिलेशनशिप असेल तर 'समोरची व्यक्ती पझेसिव आहे/ इनसिक्युअर आहे' वगैरे सबबी दिल्या तरी असे वर्तन नॉर्मल नाही आणि कॅज्युअल डेटिंग असेल तर दोघेही फ्री एजंट असल्याने प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे असे संशय घेणे, मोबाईल वगैरे चेक करणे एक पालक म्हणून माझ्या दृष्टीने रेड फ्लॅग.
कमिटेड असाल तर पुढे जाण्याआधी कपल काउंसेलिंगचा विचार करावा.
<गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किंवा
<गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किंवा नवरा-बायको नात्यात एकमेकांची स्पेस आणि प्रायवसी जपणे हवे. त्यामुळे मोबाईल चेक करणे माझ्यामते बिग नो.>
अगदी मान्य.
आजच्या मटा पुरवणीत याच संबंधी
आजच्या मटा पुरवणीत याच संबंधी आलेल्या एका नव्या अॅपची माहिती वाचली![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
हे जनरलाझेशन झाले. >> हो, इथे
हे जनरलाझेशन झाले. >> हो, इथे चर्चा करताना सर्वसमावेशकच अपेक्षित असते ना, न की माझ्या एकट्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा म्हणून इथे मांडलेय. केस बाय केस काहीबाही फरक असणारच, आणि माझ्या केसमधील खाचेखोचे जे नेमके मलाच माहीत आहेत त्यानुसारच शेवटी मी किंवा प्रत्येकजण आपापला निर्णय घेणार.
पण आपले मत पटले आहे,
<<<<< "" 'समोरची व्यक्ती पझेसिव आहे/ इनसिक्युअर आहे' वगैरे सबबी दिल्या तरी .... <<<<
सहमत, या सबबी दिल्या तरी हे व्यक्तीस्वातंत्र्यच नाही तर रिलेशनसाठीही घातक आहेच. आणि आपल्यापरीने हे दूर करायचा प्रयत्न करूनही जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर नक्कीच प्रॉब्लेम आहे. आशा करतो ती वेळ आमच्यात येणार नाही.
@ कपल कौसेलिंग,
हे काम करते की नुसतेच पाश्चात्य फॅड आहे ?
ललिता-प्रिती नक्की काय अॅप,
ललिता-प्रिती नक्की काय अॅप, वाचतो मी आज घरी जाऊन मटा
कपल कौसेलिंग <, रीलेशन्च्या
कपल कौसेलिंग <, रीलेशन्च्या ह्या स्टेजलाच जर कौसेलिंग लागत असेल तर विचार करा!
ऋन्मेऽऽष .. खर तर या विषयावर
ऋन्मेऽऽष ..
खर तर या विषयावर धागा काढायची काहीच गरज नाही किंवा इतर कोणाकडून फूकटचे सल्लेही घेण्यात काही अर्थ नाही.
या प्रकारच्या नात्यामध्ये एक भावनिक गुंतागुंत असते ती तशीच ठेवली तरच ती नाती जास्त टिकतात.प्रेमात सार काही माफ म्हणतात मग चिरीमिरीच्या भांडणाचे भांडवल कशाला. ही लूटूपूटीची भांडणे तर नात्यात रस टिकवून असतात, ती भांडणेही एक प्रकारचा संवाद असतो. प्रेम अपेक्षेने करण्यापेक्षा त्यागानेच केले पाहिजे.
तसेही टाळी एका हाताने वाजत नाही सुरवात कोणी केली म्हणून आपणही तसेच वागणे योग्य नाही तुम्ही आगीत तेल ओतण्याऐवजी शांत रहा - हो बाई तुझ खर अस म्हणा बघा काय फरक पडतोय ते.
अशी भांडणे चालू व्हायची लक्षणे दिसताच तिच्या सौंदर्याची स्तूती करा.(उगाचच). आज छन ड्रेस घातलाय,कपाळावर उभी टिकली किती सूंदर दिसते तूला वगैरे वगैरे, माझ्या आतापर्येंतच्या थोड्याफार अनुभवातून मुलींना त्यांच्याकडे लक्ष हवे असते, वेळ हवा असतो (पैसा,हिंडणे,फिरणे पेक्षाही). तेवढे द्या.
बाकि प्रेम तुमच आमच कधीच सेम नसत.. प्रत्येकाच वेगळे असते...................![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ही घ्या लिंक -
ही घ्या लिंक -
http://epapermt.timesofindia.com/Article.aspx?eid=31829&articlexml=24072...
ह्या लिंकमधलं अॅप तर अगदीच
ह्या लिंकमधलं अॅप तर अगदीच वॉच डॉग सारखं दिसतंय. इतकं करायची वेळ कुणावर येत असेल तर त्या रिलेशनला अर्थ नाही. भांडणं झाली तरी प्रतारणा होणार नाही एवढी विश्वासार्हता दोन्हीकडून हवी.
येस सहमत .. काहीही आहे ते
येस सहमत .. काहीही आहे ते अॅप
गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमध्ये हे अॅप म्हणजे रिलेशनला अर्थच नसल्यासारखे.. नवराबायकोत हे अॅप म्हणजे नाईलाजाने राखावे लागलेले नाते.. दोघांकडूनही .
>>@ कपल कौसेलिंग, हे काम करते
>>@ कपल कौसेलिंग,
हे काम करते की नुसतेच पाश्चात्य फॅड आहे ?>>
फॅड नाही. कुठल्याही नात्यात चढ-उतार असतात. अश वेळी नुसते एकमेकांवर प्रेम आहे एवढ्या भांडवलावर नाते फुलणे, टिकणे कठीण जाते. निर्माण होणारे कंफ्लिक्ट्स सकारात्मक पद्धतीने कसे सोडवावे, एकमेकांशी संवाद कसा साधावा, नात्याबद्दलच्या अवास्तव अपेक्षांची जाणीव, एकमेकांची बलस्थाने तसेच विकपॉईंट लक्षात घेत नाते फुलवणे वगैरे बाबत मार्गदर्शन मिळते.
>>कपल कौसेलिंग <, रीलेशन्च्या ह्या स्टेजलाच जर कौसेलिंग लागत असेल तर विचार करा!
>>
असहमत! असे काउंसेलिंग रिलेशनशिपमधे केव्हाही उपयोगी ठरु शकते. प्रश्नकर्त्याला हे नाते टिकवण्यात खरेच इंटरेस्ट आहे असे दिसत आहे. इतर सर्व गोष्टी पॉझिटिव असतील तर निव्वळ एवढ्या एका कारणाने विसंवाद होऊन दुरावा निर्माण होणार असेल तर काउंसेकिंगचा उपाय खरेच करावा. बरेचदा नात्यातील व्यक्तीला आपले वागणे चुकीचे आहे किंवा आपल्या मनातील भीती व्यक्त करण्याचा हा योग्य मार्ग नाही हेच कळत नसते. काही वेळा या चक्रातून बाहेर पडायचे असते पण मार्ग सापडत नसतो. अशावेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर खूप फरक पडतो. अगदी उद्या वेगळे व्हायचा निर्णय घ्यावा लागला तरी मी माझ्या परीने सर्व प्रयत्न केले हे समाधान असेल शिवाय नव्याने नाते बांधण्यासाठी उपयोगी टुल्स असतील.
@ऋन्मेऽऽष : मैत्री वगैरे अशी
@ऋन्मेऽऽष : मैत्री वगैरे अशी गोंडस नावे देउन तुम्ही स्वताला फसवता आहात.
तुम्हालाच २ ( किंवा अनेक ) दगडांवर पाय ठेवायचे आहेत असे दिसतय. त्याला तुम्ही व्यक्तीस्वातंत्र्य, Personal Space अशी नावे देताय,
तुमच्या जीफ ला कोणा मुलाकडुन सकाळी GM आणि रात्री GN असले मेसेज यायला लागले तर तुम्ही काय कराल ( उगाच आदर्शवादी उत्तरे देउ नका ).
स्वताच्या Priority सेट करा. सध्याच्या जीफ बरोबर नाते टीकवायचे असेल तर दुसर्या सो कॉल्ड मैत्रीणींना स्पष्ट सांगायला हरकत नाही. खरे तर त्या सो कॉल्ड मैत्रिणींनाच अक्कल हवी त्या काय करत आहेत त्याची.
तुमची Priority च जर वेगळी असेल तर कोणी तुमचे मेसेज वाचले तर काय फरक पडतो?
Pages