मोदी सरकार- एन डी ए २०१४ : जागता पहारा! - भाग १

Submitted by साती on 22 May, 2014 - 00:20

येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.

या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल

याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.

-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.

१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.

२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड

अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री

३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार

४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.

१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार

१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<हा हा हा. तो आक्रस्ताळेपणा नाही. त्यांच्याबद्दल मला जाम आदर होता. पण ही लॉस्ट इट !>>
केदार, सॉरी टु से, पण मग तुम्ही तुमची विचारधारा फार लवकर बदललीत. मिडियाच्या कुटील डावाला बळी पडलात. आपलं वैयक्तिक काहीच भांडण नाही. त्यामुळे प्लीज कसलाही आकस ठेवू नका.
केजरीवालांनी चुका केल्या आहेत पण गुन्हे केलेले नाहीत. चुका कोण करत नाही?
वरच्या आकडेवारीत आणि मोदींच्या वागण्यातल्या फरकाला फसवणूक म्हणता येईल. तसंच साबरमतीबद्दल. मागच्या पानांवर चर्चा झालीये. हा गुन्हा आहे. हा गुन्हा तुम्ही माफ करू शकता पण राजीनाम्याची चूक माफ करू शकत नाही? Uhoh

<<शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा फार मोठा गहन आणी वेगळा विषय आहे. त्यासाठी नुसते "शेतकरी" असे व्यवसाय असलेल्या व्यक्तींच्या आकड्यांची माहिती देऊन भागत नाही. >>
नंदिनी, अशी सवलत फक्त गुजरातच्या शेतकर्‍यांनाच द्यायची आहे का? मी आधी लिहिलं की सगळे confounding factors काढून टाकल्याशिवाय तुलना करता येणारच नाही.

<<इतका आक्रस्ताळेपणा निव्वळ आपचे लोक करताना पाहिले आहेत. त्यांचा नक्की काय प्रॉब्लेम आहे तेच कळत नाही. विरोधाला विरोध करायचा, तुम्ही काय करून दाखवा म्हट्ले की धरण्यावर बसायचे. >>
आपचं सोडा. मी इथे लिहायला सुरूवात केल्यापासून आक्रस्ताळेपणा केल्याची एक तरी पोस्ट दाखवा. मी केदार ह्यांच्या पोस्टबद्दल लिहिलं होतं.
बाकी आपबद्दल लिहिता येईल. पण मी इथे कुठल्या पक्षाचा प्रचार करायला आलेली नाही. त्यामुळे ते बाजूला ठेवूया.

मंत्रीगट बरखास्त करुन सर्व निर्णय स्वतःकडे ठेवले आहेत. >> मंत्रीगट हे युपीए पूर्वी नव्हतेच. म्हणजे पूर्वी काँग्रेसच्या राज्यातही माईल्ड कम्युनिझम होता असे तुम्ही म्हणत आहात का?

मला वाटतं काँग्रेसच्या राज्यात हुकूमशाही आणि हुजरे होते कम्युनिझम नव्हता.

बरोबर मयेकर. आणि अपघाती मृत्यू म्हणून नोंदवलेल्या बर्‍याच कुटुंबांना भरपाई मिळालेली नाही.

"According to the policy of Gujarat Government, all farmers who die due to ‘Accidental Reasons’ are to be given a compensation of 1 lakh Rupees under the Farmers’ Insurance Scheme. However, only 1909 farmers out of the 6055 farmers have actually received the insurance amount.
--Read More At: http://www.truthofgujarat.com/farmer-suicides-gujarat-facts-figures-vs-g..."

<<थोडक्यात एक प्रकारची कम्युनीस्ट लष्करी राजवटच ते राबवत आहेत.>> त्याचीच तर भिती आहे.

अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल त्यांचं जनलोकपाल बिल आणि आंदोलन याबद्दल साशंक असणारे लोक दुर्दैवाने खरे ठरलेले आहेत. त्या वेळी केजरीवाल यांचेही जालावर असेच सपोर्टर होते जसे सचिनचे होते किंवा मोदींचे अजूनही आहेत. यातले अनेक कॉमनच होते. अण्णा हजारेंना जवळून ओळखणारे लोक आहेत. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत जनलोकपाल बिलावरून जे काही नाट्य रंगवायचा प्रयत्न केला त्यावरून लोकांना जो काही अंदाज आला तो निकालात उतरलेला आहे.

हे सर्व असूनही कुठलाही माणूस १००% वाईट नसतो, तसाच १००% चांगलाही नसतो. तसं रंगवणारे (मेडीया, भक्त, समर्थक किंवा विरोधक) आणि त्यावर विश्वास ठेवणारे आपण त्याला महाजबाबदार असतो. त्यातून मग अभद्र व्यक्तिपूजा किंवा मूर्तीभंजन, टोकाच्या अपेक्षा आणि त्यातून अपेक्षाभंग वाट्याला येतो.

मेडीयाच्या रोलबद्दलही अनेक जण वारंवार इशारे देत आलेले आहेत. पण त्यांच्याकडे बघण्याची पद्धत विचित्र आहे. अशा अल्पसंख्य लोकांना चक्क इग्नोर केले जाते हे दुर्दैव. प्रकरण अंगाशी आले की मग तेच मुद्दे घेऊन लढण्याची वेळ येते. केजरीवालांच्या आंदोलनाने जी आंदोलने झाकोळली गेली त्यात एक शेतक-यांच्या आत्महत्येचेही होते. ते आंदोलन झाकोळले गेले, पण त्यातली आकडेवारी केजरीवालांनी निवडणुकीसाठी वापरली. व्हेअरअ‍ॅज शेतक-यांचं आंदोलन हे शासनाकडे न्याय मागण्यासाठी, लक्ष वेधून घेण्यासाठी होते.

<<केजरीवाल बरळतो. त्याला ह्या देशातले कुठलेही कायदे (अगदी बेलचा) पण मान्य नाहीत.>>
ह्या बेल प्रकरणाबद्दल लिहिता येईल. पण तो धाग्याचा विषय नाही. त्यामुळे असो.

<< नुसतं आरडाओरडा करून विकास होत नाही. कामं करावी लागतात, मग लोक दुसृयांदा निवडून देतात. नाहीतर घरी बसवतात.>>
नॉट नेसेसरी नंदिनी. वरच्या आकडेवारी समक्ष मोदी ३ वेळा निवडून आले तशा शीला दिक्षित ही ३ वेळा निवडून आल्या आणि तसाच ओवेसीही ३ वेळा निवडून आला Happy
यंदाच्या निवडणूकीत NOTA वापरण्यात गुजरात हे भारतातील ४ थ्या क्रमांकावरील राज्य आहे.

मिडियाच्या कुटील डावाला बळी पडलात. आपलं वैयक्तिक काहीच भांडण नाही. त्यामुळे प्लीज कसलाही आकस ठेवू नका.
केजरीवालांनी चुका केल्या आहेत पण गुन्हे केलेले नाहीत. चुका कोण करत नाही? >>

नाही मिर्ची, आकस कसला, मी इथे स्वतःहून आकस धरत नाही, जो पर्यंत तुम्ही पर्सनल लिहित नाही तो पर्यंत कसला आलाय आकस?

बाकी मी आप पासून का दुर गेलो हे इथे अवांतर आहे. तुमच्या विपूत सविस्तर लिहितो थोड्यावेळाने.

ओक्के केदार Happy
<<मस्त करमणूक होते आहे.>> ५००० शेतकरी मेल्याची चर्चा वाचून करमणूक होणार्‍यांसाठी एकच शब्द - डिसगस्टिंग!

मिनिस्ट्री ऑफ़ कॉर्पोरेट अफेयर्स ने काल सीएस लोकांसाठी चांगली बातमी दिली

http://www.egazette.nic.in/

मार्च महिन्यात MCA ने विचित्र धोरण जाहीर केल होते
जून attempt वाली मूल आणि एकंदरीतच संपूर्ण सीएस कम्युनिटीला निराशेचा शॉक दिला होता
एम्प्लॉयमेंटचाच प्रश्न निर्माण करून ठेवलेला विचित्र रुल issue करून
now its big relief ! हुश्श्य

Proud

मिर्ची, आत्तापर्यंत बोलत नव्हतो. मला तुमच्या पोश्टीतला फालतूगिरी आणि कावेबाजपणा पाहून करमणूक होते आहे असे मी म्हणतोय हे लक्षात घे. कुणी मेल्याची चर्चा वाचून करमणूक व्हायला मी म्हणजे तुम्ही नव्हे. आणि मेलेल्या लोकांच्यावर राजकारण करणार्‍या तुमच्यासाराख्या लोकांसाठी तर शब्दच नाहीये.

Now you are not only being disgusting, but the worst sort of Gobel's followers that I have ever seen. Get well soon. आणि परत असे घाणेरडे आरोप करु नका. First and last warning.

हळूहळू गुजरात मॉडेल जसं रंगवलं तसं नाही ही टीका अनाठायी नसल्याचं समोर येऊ लागलेलं आहे. पण हे म्हणजे बैल गेला नि झोपा केला असं झालं. वेळेवर विश्वासार्ह बातम्या देणे फाट्यावर बसवून मेडीयाने मोदी निवडून येतील याचीच काळजी घेतली. अशोक चव्हाणांना जर पेड न्यूज प्रकरणी नोटीस मिळते तर या सर्व वाहीन्या जे काही करत होत्या त्यातून आयोगाने त्यांना सूट का दिलीय ?

हळू हळू आणखी काय काय समोर येतय कुणास ठाऊक. अर्थात ते किती लोकांपर्यंत पोहोचतं हे जास्त महत्वाचं आहे.

<<मला तुमच्या पोश्टीतला फालतूगिरी आणि कावेबाजपणा पाहून >> कुठली पोस्ट? दाखवा.
First & last warning >> घाबरले मी Lol

<<पण हे म्हणजे बैल गेला नि झोपा केला असं झालं.>> असंच काही नाही. सुबह का भूला शाम को....

... मिर्ची यांनी मोदीचीच पॉलिसी ने उत्तर दिले... Wink
काँग्रेस ने निच राजनिती करत आहात असे मोदींना म्हणाले..
मोदींनी नीच शब्द स्वतःच्या जाती साठी घेतला. आणि म्हणाले.. मुझे नीच कहो पर मेरी जाती को तो ना कहो .. Happy

गजरात मधील शेतकर्‍याच्या आत्महत्यासंदर्भात -

http://www.truthofgujarat.com/farmer-suicides-gujarat-facts-figures-vs-g...

आणि शेतकर्‍यांची जमिन बळकावणार्‍याविरुद्ध केलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न -

http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=IDFIWp9eW-E

“focused activity” for the welfare of Muslims is not 'appeasement'. ह्याच्या इतकी जबरदस्त कोलांटी कधी पाहिली नाही, अच्छे दिन ते हेच!

काँग्रेसने केले की मुस्लिम तुष्टीकरण, दाढ्या कुरवाळने इ इ.व भाजपने केले कि मुस्लिम सबलीकरण.अच्छे दिन आ गये Proud

आता केजरी ... पूर्ण अवातंर

केजरीवालांबद्दल तुम्ही जो काही आक्रस्ताळेपणा दाखवलाय दोन्ही पोस्टींमध्ये त्याबद्दल एकच वाक्य लिहावंसं वाटतं >>.

हा हा हा. तो आक्रस्ताळेपणा नाही. त्यांच्याबद्दल मला जाम आदर होता. पण ही लॉस्ट इट ! दिल्लीत भाजपा पेक्षाही त्यांना जास्त सिट मिळाल्या तेंव्हा मी न्युयॉर्क मध्ये होतो अन टीम ला जेवण दिले होते. एक कोणीतरी माणूस काहीतरी करतोय, ज्यामुळे देशाचे चांगले होईल वगैरे वगैरे भावना होती तेंव्हा !!........................>

<................... ही इज जस्ट अनादर नौटंकी टू मी नाऊ. (पूर्वी कुणीतरी हाच शब्द त्यांच्याबद्दल उच्चारला, तर मला वाईट वाटले होते बरं का मिर्ची, पण ही डिजर्व्ह इट. )
>>>>
केदार दुर्दैवाने तुझ्याशी सहमत. तुमने मेरे मुंहकी बात छीन ली !

आगाऊ | 12 June, 2014 - 11:08
“focused activity” for the welfare of Muslims is not 'appeasement'. ह्याच्या इतकी जबरदस्त कोलांटी कधी पाहिली नाही, अच्छे दिन ते हेच! >>>

आजच मोदींचे हे विचार ऐकून लिहायला आले होते.
तर बाफ भरभरून वाहतोय.

मिर्ची , तुम्ही लिहा.
कारण हे पूर्वीचे असले तरी उपयोगी आहे.

आणि तुमच्या पोस्टस आवडत आहेत.

लोक भडकविणारे काही लिहित असले तरी तुम्ही संयमित आणि अभ्यासपूर्ण लिहायचे सोडू नका.

बाकी इथे मोदी आणि पुढे काय असा घिसापिटा विषय स्पर्धेकरिता येणार म्हणे.
विजेते कोण हे दिसू लागलंय.

ह्या पोस्ट्ला मोदक..
केजरीवाल सुरुवातीला खुप चांगले मुद्दे घेउन लढले, नंतर भरकटले. त्यांनीही आप मध्ये गुन्हे नोंद झालेले उमेदवार घेतल्याचं स्मरतय (नाव आठवत नाही) (आता हे म्हणु नका की गुन्हे सिद्ध झाले नाहियेत वगैरे, हे तर बाकीचे सगळे पक्ष म्हणतातच).
दिल्लीतही सुरुवात चांगली होती, पण नंतर मोर्चा, धरणे, रस्त्यावर झोपने हे प्रकार सुरु झाले :(, उद्देश चांगला असला तरी मुमं ना न शोभनारा प्रकार होता तो.
थोडी वाट पाहुया काहीतरी चांगलं होइल, काही नाही तर, गेला बाजार विरोधी पक्ष तरी चांगला मिळेल.
रच्याकने नीखिल वागळे ने लाइव्ह शोमध्ये अंजली दमानियावर आगपाखड केली होती, अगदी वैयक्तिक भांडण असल्याप्रमाणे अ‍ॅटॅक चालु होता.

मिर्ची यांच्या बर्‍याच पोस्ट्स पाहिल्या. बरीच रिलेव्हंट माहिती आहे आणि काही गंभीर आरोपही आहेत. पण कोठे वैयक्तिक टीका वगैरे दिसली नाही. हे एकूण एक पोस्ट्स बद्दल नाही. मी बर्‍याचश्या वाचल्या व त्यात दिसले नाही. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबद्दल मला फारशी माहिती नाही, पण जर कोणाकडे उत्तरे असतील तर त्यांनी जरूर द्यावीत.

बाकी खोडसाळपणा आहे वगैरेला काही अर्थ नाही. त्यांनी मुद्दे उपस्थित केले आहेत, ते कोणत्या हेतूने केले आहेत याने काहीच बदलत नाही.

Pages