मोदी सरकार- एन डी ए २०१४ : जागता पहारा! - भाग १

Submitted by साती on 22 May, 2014 - 00:20

येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.

या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल

याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.

-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.

१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.

२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड

अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री

३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार

४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.

१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार

१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भेंडी इथ अस चाललय की मी इथे काँग्रेसच्या/भाजपच्या समर्थकाला गप्प केल म्हणजे केंद्रातल सरकारच बदलुन जाइल. तिकडे दोन्ही सरकार मजेत आणी लोकं घरच खावुन अनोळखी लोकांवर आपली खुन्नस काढताहेत.......लैच मजेदार.

थोडेफार पोटापाण्याचे पण उद्योग बघा, की ओवाळुन टाकलय.

अहो ००७, शांत व्हा.
चावडीवर, पारावर, क्लबात गप्पा रंगतात राजकारणावर इतकेच कशाला चाळींच्या गॅलर्यांत अग्रलेखावर हमरीतुमरीवर विवाद घडतात ते काय एका माणसाच्या ओरडण्यामुळे सरकार बदलायला?
अशीच मते बनत बदलत जातात चर्चांनी.
यावेळी सरकार बदललं की नै?
हां , आता पोटापाण्याचे उद्योग मात्रं करायलाच हवेत, सगळ्या फुकट योजना ऑफिशीयली गरीबांसाठी आणि सगळ्या अंडर टेबल सेटलमेंटस श्रीमंतांसाठी.
मग सरकार कुठलेही असू द्या.
थोडक्यात काय , तुम्ही भेंडी म्हणा की पडवळ; इथे (म्हणजे कुठेही दोन सामान्य माणसांच्यात) चर्चा चालू रहाणारच.
Wink

अजचा दिवस असा आहे की कोणत्या धाग्यावर खुर्ची टाकून बसावे तेच समजेनासे झालेले आहे.

मोदी सरकार - जागता पहारा

मुक्ताफळे

होणार सून मी या घरची

जुळून येती रेशीमगाठी

भाजपानेच फितुरी केलेली त्याने आणि त्याच्या शुक्राचार्याने....... तुम्ही कितीही झाकले तरी घाणेरडे राजकारणाचा वास येतोच सगळ्यांना.......

केदार, रॉबिनहूड, अग्निपंख...तुमच्यासारखेच अनेक आहेत जे आधी आपला सपोर्ट करत होते आणि नंतर आपविरोधी झाले. असे सगळे एका बदलाला सपोर्ट करत होते. हे खूप कौतुकास्पद आहे.अशांनी काही गैरसमज दूर करून घेतले तर आपल्या समाजासाठी खरंतर खूप बरं होईल. >>>

मिर्ची अहो आप एका दिवसात दिल्ली काबिज आणि दुसर्‍या दिवशी देश काबिज करायला बघत होती.

१. आपला कुठलाही अजेंडा नाही. त्यांच्या अजेंडा एकच, आम्हीच काय ते खरे आणि बाकी सगळेच चूक !
२. आप व्हायच्या आधी अण्णा होते, आपने अण्णांना गुंडाळून ठेवले, इतकेच काय त्यांना कदाचित मरणाच्या दाढेत केजरीवालने ढकलले असते. ( आठवा ते आमरण उपोशन दिवस)

३. आपचे मॉडेल फेसबुक आणि मिडिया मुळे हिट झाले. कारण तुम्हा आम्हासारख्यांना दुसरा कुठलाही मार्ग नव्हता.
४. मोदी तेंव्हा भाजपाचे उमेदवार जाहीर झाले नव्हते. जर जाहिर झाले असते तर लोकं भाजपाच्या पाठीमागे गेले असते, आपच्या नाही. निवडणूकीत त्यामुळे आपचे काय झाले ते दिसते आहे.
५. केजरीवाल हे देशाचे नेता मटेरियल नाहीत.

६. सत्तेसाठी तडजोड :पुरावाच घ्यायचा तर आजचा पेपर पाहा. राहूल गांधीकडे जाऊन ते परत राज्य स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि रागा डिड गुड ! मागच्या महिन्यातही हाच प्रकार झाला. म्हणजे सत्तेसाठी काही पण हे आप कडे पण आहे! त्याआधी काँग्रेस सपोर्ट घेणे हे पण चूक, पण निदान समजू शकते.
७. सारखी धरसोड वृत्ती : किती उदाहरणं देऊ? नको तुम्ही नेट सॅव्ही आहात, खूप लिंका देत आहात. ह्या पण द्या. Happy

केजरीवालांनाच एवढं फुटेज आणि मानहानी का मिळाली? >>>
तुम्ही देशात नाहीत असे दिसते. इथे मिडीया केजरी, केजरी, केजरीचा गजर नमो नमो आणि रागा रागा पेक्षा जास्त करत होते. तुम्हाला ते माहिती नसावे. ही पूर्ण पार्टीच मिडीयाने क्रियेट केलेली आहे.

(आणि नंतर त्यांना कव्हरेज मिळेनासे झाले की ते मिडिया अ‍ॅक्विझिशनकडे डोळे वटारून बघतात. - त्यांना फक्त आरोप करता येतात त्यामुळे त्यांना सिरियसली घेण्याचे काही कारण राहिले नाही असे माझे मत आहे.)

थोडक्यात केजरीवाल इज गॉन केस.

एवढं होऊनही मोदी जर फेल गेले आणि पुढच्या ५ वर्षात केजरींनी आणखी त्यांची चांगली पत (नौटंकीपत नाही) वाढवली तर त्यांना जनता सिरियसली घेईल. मोदी सरकारने चांगले काम केले तर ती गरजच उरणार नाही !!

तुमचा मोदीविरोध मी समजू शकतो, पण मोदी हे ना ही केजरीवाल आहेत, ना ही रा गा. ही हॅज औरा. आणि म्हणूनच अनेक चांगले निर्णय ऑलरेडी घेतले आहेत, जे इथेही लिहिले गेले. मोदींबाबत २००६ च्या लिंक देऊन त्याला प्रसिद्धी दिली, केजरीवालला नाही हे म्हणणेच बरोबर नाही असे माझे म्हणणे आहे. Happy

आय वुड प्रिफर मोरान रागा ओव्हर केजरी. निदान बाकीचे काँग्रेस लिडर रागांना साभांळून घेतील. केजरीवालची दुसरी फळी तर अगम्य आहे.

होणार सून मी या घरची

जुळून येती रेशीमगाठी>>
बेफी तिथे ममं च राज्य असणार, तिथे कशाला कडमडायचं Light 1
उर्वरित दोन्ही धागे चांगले आहेत खुर्ची टाकायला Happy

अग्निपंख,

मी ममंमध्ये किती लोकप्रिय आहे ह्याची तुम्हाला कल्पना आहे का?

(साती - अवांतराबद्दल क्षमस्व)

आय वुड प्रिफर मोरान रागा ओव्हर केजरी. निदान बाकीचे काँग्रेस लिडर रागांना साभांळून घेतील. केजरीवालची दुसरी फळी तर अगम्य आहे.<<< +१. सीरीयसली!!

आप हा भारतीय लोकशाहीचा नुसता मजाक उडवत आहे. दिल्लीमध्ये निवडणुका कशाला लढवल्या? पाच वर्षे ते सरकार चालवण्यासाठी, मग लोकसभा निवडणुका लागल्यावर (त्या २०१४ मध्ये होणारच होत्या, केजरीवालला तेवढे माहित असणार) लगोलग दिल्लीचा राजिनामा देऊन मोदीविरोधात लढायला वाराणसीतच का गेला? यामागे नक्की काय कार्यकारणभाव होता हे समजेल का?

लोकांना दिल्ली राज्य सरकारामध्ये मतं मागायची, त्यांनी मतं दिल्यावर त्याबद्दल काहीही काम न करता चक्क पळ काढायचा? एवढंच होतं तर दिल्ली विधानसभा निवडणुका लढवायच्या नव्हत्या, लोकसभेच्याच लढवायच्या ह्त्या. किमान त्या दिल्लीकरांचा भ्रमनिरास तरी झाला नसता आता तिथे राष्ट्रपती राजवट आहे म्हणून सगळी जबाबदारी केंद्र सरकारची असा पवित्रा काढला आहे. तुमच्यावर जबाबदारी होती ती का पूर्णप्णे निभावली नाहीत.

मोदीकडे बोट दाखवणं फार सोप्पं आहे, पण किमान तो मुख्यमंत्री म्हणून काहीतरी काम करत होता. तीच जबाबदारी तुमच्यावर आल्यावर तुम्ही काय केलंत? दुसर्‍यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावनं फार सोपं,पण त्याचे पुरावे द्या म्हटलं की लगेच नौटंकी चालू. न्यायालयाचे कायदे आम्ही पाळणार नाही, कारण आपची मर्जी.

असो. विषय मोदी सरकारचा आहे.

Enjoyed a good meeting with @smritiirani on India's educational challenges. Appreciate an engaged&receptive Minister. Best wishes for MHRD.

शशी थरूरने केलेले ट्वीट. यातून गहन अर्थ काढू नका, राजकीय शिष्टाचाराचा एक भाग आहे Proud

केजरीवालची दुसरी फळी तर अगम्य आहे.>>
कुणाचा कुणाला ताळमेळ दिसला नाही कधी, ४-५ लोक्स सोडले तर बाकी आनंदच होता.
त्यांनी दिल्ली चालवुन दाखवायला हवी होती, सत्तेत असल्यावर काहीतरी करता आलं असतं (असं उगाच वाटतय, कारण प्रस्थापित पक्षांनी कदाचित 'आप'ला सळो की पळो करुन सोडलं असतं ही देखिल एक शक्यता आहे), आता ना अधिकार राहिले ना जनमत/ पाठींबा.
केजरीवाल हे देशाचे नेता मटेरियल नाहीत. >>
जर चुकुन केजरीवाल पंप्र झाले असते तर काय अराजकता माजली असती कल्पना करवत नाही.
रच्याकने>>
मिडियावाले जेव्हढे बाकिच्या नेत्यांना वचकुन राहतात, तेव्हढे केजरीवाल मुमं झाल्यावरही तसं काही दिसलं नाही, एका मुलाखतीत (अर्णब होता बहुतेक, आठवत नाही नीट) तर एकेरी उल्लेख केला होता त्या मुलखत कर्त्याने.

मी ममंमध्ये किती लोकप्रिय आहे ह्याची तुम्हाला कल्पना आहे का?>>
ते माहितेय हो! पण उगाच कशाला तिकडे,चालुद्या त्यांच काय चालल्य ते Wink
तसही सिरियल हा प्रकार प्रचंड बोरिंग आहे

मी ममंमध्ये किती लोकप्रिय आहे ह्याची तुम्हाला कल्पना आहे का?
<<
मान न मान मै तेरा म्हैमान.

किंवा इन शिंप्लर वर्ड्स, ऑटोरुब्रिफिकेशन. (Auto-rubrification)

Wink दिवे घ्यावेत @ बेफि.

अण्णांच्या आंदोलनाच्या वेळी त्यांच्या मागण्याची त-हा पाहूनही अनेक जण खूष होत होते. माझा पाठिंबा काँग्रेस या पक्षाला नाही. तर जी व्यवस्था स्विकारलेली आहे त्या विरोधात अण्णा आपल्या अज्ञान प्रकट करत असतानाही वाहीन्या ज्या प्रकारे फक्त सपोर्ट आणि सपोर्टच करत होत्या त्याला आहे. एकाच घटनेचं २४ X ७ प्रक्षेपण, त्यात एकही घटना अन्य न दाखवणे हे चिंताजनक होतं. ज्यांना संसद, लोकशाही मान्य नाही त्यांची भाषणं टीपेला पोहोचली होती. या कुणालाही जनलोकपालमधे रस नाही हे स्पष्टपणे जाणवत होतं.

ते नेमकं काय होतं आणि वेळ येताच लोकांचे पवित्रे का बदलले यावर पुष्कळ बोलता येईल, पण या धाग्याचा तो विषय नसल्याने थांबतो.

आज बलात्काराच्या एका केसमधे एका केंद्रीय मंत्र्याविरुद्ध नोटीस वजावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत अशी ब्रेकींग न्यूज दुपारी होती.

यावर पुष्कळ बोलता येईल, पण या धाग्याचा तो विषय नसल्याने थांबतो.

>>>

कशाला थांबता ब्र आ.? लगे रहो. धाग्याचा विषय नसला तरी विषयाबाहेर लिहायला मनाई नाही. लोक वाचतात. तुमची बांधीलकी वाचकांशी आहे . धाग्याच्या विषयाशी नाही::फिदी:

मची बांधीलकी वाचकांशी आहे . धाग्याच्या विषयाशी नाही >> Lol

अन्यथा मध्ये आपने जोर पकडला नसता आणि मोदी विरोधानेही. त्यांच्या पंतप्रधाणपदानंतरच्या घटनांचा आढावा इतकाच धाग्याचा आवाका असावा. पण मालकीन बाई देखील मोदी विरोधात, आणा जुने आणा असे म्हणत आहेत.

साती, मिर्ची (दोघी जुळ्या बहिनींना Light 1

मुळात 'अण्णा जिंकण्यासाठी लढताहेत की..' असा एक धागा होता, त्या आधीदेखिल अण्णांच्या आंदोलनावेळच्या धाग्यांपासून केजरीवालाबद्दलचे माझे मत मी मांडलेलेच आहे. की हा माणूस बिलंदर दिसतो. काही उपयोगाचा नाही.

आआप ला निवडून आणतानाच मेडियामुळे काय गम्मत घडू शकते याची कल्पना आलेली होती. मेडियाने पिकवलेल्या कंड्याबाहेर आआप चे अस्तित्व नाही. त्यामुळे आआप कडे अंगुलिनिर्देश करून मोदी सरकार काय करते आहे, तिकडून लक्ष विचलित करू नये ही नम्र विनंती.

केजरीवालांना व आआपला उद्देशून कुजबुजपटूंनी जी काय हिणकस शब्दप्रणाली शोधून काढलीये ती सगळी ठाऊक आहे. मुद्दा तो दिसत नाहिये. स्वतः मुख्यमंत्रीच आंदोलन काय करतो म्हणून जे हिणवणे झाले, त्याबद्दल बोलताना वर मिर्चीअक्कांनी ज्या लिंका दिल्या त्यात इतर मुख्यमंत्री आहेत तसेच मोदी देखिल आहेतच. त्याबद्दल काही बोलणे झाले नाही, पण,

तिथून आपचा विषय आला, अन आता पद्धतशीर आआपला दूषणे देण्यात मूळ मुद्दा बाजूलाच ठेवला जातो आहे, जो सध्याच्या सरकारच्या निवडणूकपूर्व राणाभीमदेवी गर्जना, अन आत्ताची वागणूक यातली कथनी-करनी मोजणे हा आहे.

तेव्हा, गाडी पुन्यांदा हिकडं आणावी ही विनंती -->

धन्यवाद!

अरारा!! इब्लिसराव चुकिचा रुळ आणलाय, माबोवर असला 'सरळ' रुळ कायबी कामाचा नाय बगा!

एक तर असा11_0.jpg
किंवा हा बी चाललं बगा22.jpg

कसला रूळ हो ह्यो?

दुर दुर पाहिलं तरी कोण्चं ठेसनच न्हाइ.>>
त्यो काँग्रेसचा सत्तेकडं जाणारा रुळ हाये लै लांब पर्यंत ठेसनच नाय आता!

त्यो काँग्रेसचा सत्तेकडं जाणारा रुळ हाये लै लांब पर्यंत ठेसनच नाय आता!
<<
कांग्रेसची गाडी ठेसनात हुबी हाये सध्या. तिथून पुढे दिसणारे रूळ आहेत ते. टेन्शन घेउ नका.

आय वुड प्रिफर मोरान रागा ओव्हर केजरी. निदान बाकीचे काँग्रेस लिडर रागांना साभांळून घेतील. केजरीवालची दुसरी फळी तर अगम्य आहे.
+१००००

माझाही भ्रमनिरास झाला आपबद्दल. मला केजरी कधीच भला वाटला नव्हता पण दिल्ली निवडणुकीनंतर हा माणुस काम चांगले करु शकेल हा भास झालेला. केजरीने मला उगीच जास्त दिवस भ्रमात ठेवले नाही याबद्दल त्याचे आभार.

बाकी सध्याच्या कॉग्रेस्ला ला सपोर्ट करणारे नक्की कोणाला सपोर्ट करताहेत कळत नाही. रागा हाच त्यांचा पंप्रचा आदर्श उमेदवार असेल तर त्याने कमीतकमी लिहुन दिलेले कागद नीट क्रमवार हातात धरुन ते तसेच क्रमवार 'माझे भाषण' म्हणुन वाचुन दाखबणे एवढे करण्याची हुशारी तरी कमावली पाहिजे. तो सोडला तर मग बाकी कोण आहे लायक उमेदवार? जो कोणी पुढे येईल त्याचा मनमोहन होणार. आणि सोगा/रागानी कॉ. सोडली तर कॉ. चे जितके नेते तितके तुकडे होणार कारण मग प्रत्येकालाच पंप्र व्हायची स्वप्ने पडणार.

भाजपाने आधीच पंप्रचा उमेदवार जाहीर केला नस्ता तर निवडणुकीनंतर तिथेही प्रत्येकाला पंप्र व्हायची स्वप्ने पडली असती हे नक्की. अर्थात पंप्रचा उमेदवार आधीच जाहीर केला नस्ता तर त्यांना आजचे यश मिळाले नसते हेही तेवढेच खरे.

बाकी धागा मनोरंजक आहे. पण असेच मनोरंजन चालु राहिले तर अ‍ॅडमिन लवकरच टाळे लावणार. सातीने लिहिलेली पाच वर्षे किंबा मोदीकाळ यापैकी कमी यात अ‍ॅडमिन हा फॅक्टरही अ‍ॅड करावा.

आय वुड प्रिफर मोरान रागा ओव्हर केजरी.
निदान बाकीचे काँग्रेस लिडर
रागांना साभांळून घेतील.
केजरीवालची दुसरी फळी तर अगम्य आहे.>>>>>> +1

दिल्लीत काहीतरी करून दाखवतील अशी आशा होती
पण नौटकीच प्रिय
मसुरिच्या अकादमीमधल ट्रेनिंग निव्वळ फुकट घालवल

कशाला थांबता ब्र आ.? लगे रहो. धाग्याचा विषय नसला तरी विषयाबाहेर लिहायला मनाई नाही. लोक वाचतात. तुमची बांधीलकी वाचकांशी आहे . धाग्याच्या विषयाशी नाही >>>

समजलं नाही. हा माझा क्लेम आहे का कुठे केलेला ? असल्यास सपशेल माफी !

जनलोकपाल आंदोलनाच्या वेळी नौटंकी नव्हती असं लोकांना का वाटत राहीलं असावं ? अण्णांचा पुतळा बनवायची देखील तयारी सुरू झाली होती असं बोललं जात होतं. उपोषणाला अण्णा आणि वाटाघाटींना टीम. टीम अतिशय ताठर होती. नेमकी चर्चा काय होत होती याची कल्पना नाही, पण अण्णांच्या जिवाची काळजी आहे असं वाटत नव्हतं. चुकून जर काही बरं वाईट झालं असतं, तर काय झालं असतं तेच अपेक्षित होतं का अशी दाट शंका येते आहे.

अण्णांना जीव प्यारा आणि गावचं शहाणपण म्हणून ते उठून बसले. टीममधे धुसफूस का झाली असावी ? धुसफूस झाल्यानंतर ज्या अण्णांच्या जिवावर हा आंदोलनाचा डोलारा उभारला गेला त्यांना खड्यासारखं वगळून मीडीया अचूक केजरीवाल यांच्या मागे गेला हे सर्व पूर्वनियोजित वाटत नाही का ?

अरे गाडी रुळावर आणा... पाच वर्षे आपण भाण्डतच राहू, पहारा देण्याचे काम सोपवले आहे... दिलेले काम वेळात पुर्ण करा.

वेळात कसे पूर्णं होणार?
आपण काम करतोय म्हणून पाच वर्षं लवकर संपणार आहेत का?
किंवा मोदी सरकार तरी?
आपण आपापल्या स्पीडने जाऊ.

तर आपची चर्चा बंद करून मोदीकाकांविषयी लिहा लोकहो.

दिनांक १ जून २०१४ च्या हिंदू दैनिकात प्रसिध्द झालेले लिना सरमा यांचे लेखन

मराठी स्वैर अनुवाद

२४ वर्षापूर्वी केलेला एक रेल्वे प्रवास मला आजही आठवतोय. विशेष करून त्या प्रवासात भेटलेले दोन सहप्रवासी व त्यांनी दाखवलेले औदार्य तर मला आजही आश्चर्यचकीत करून जाते.

१९९० चा उन्हाळा असेल. रेल्वेत वाहतूक अधिकारी या पदाची माझी उमेदवारी चालू होती. कामानिमित्त मी व माझी एक मैत्रीण लखनौ-दिल्ली प्रवास करत होतो. दोन संसद सदस्य त्याच बोगीतून प्रवास करत होते. इथपर्यंत ठीक होते. मात्र त्यांच्या बरोबर आलेल्या १०-१२ जणांकडे आरक्षण तर नव्हतेच पण त्यांची वागणूक मात्र उरात धडकी भरविणारी होती. अर्वाच्य भाषा वापरत व शिविगाळ करत त्यांनी आम्हाला चक्क आमच्या आरक्षीत बर्थ व आसनावरून ऊठायला भाग पाडून सामानावर बसायला लावले. आम्ही संतापाने फणफणत व धास्तीने थरथरत होतो. त्या बेलगाम माणसांच्या संगतीत ती रात्र काढणे खरोखरच एक अग्निदिव्य होते. मान व अपमान यातील पुसट सिमारेषेवर आम्ही ती संपूर्ण रात्र कशीबशी काढली. तिकिट तपासनीसासहित डब्यातले इतर सहप्रवासी केव्हांच गायब झालेले होते.

दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही दिल्लीला पोहोचलो. त्या हलकट माणसांनी आम्हाला शारिरिक इजा जरी केलेली नसली तरी त्यांनी आमच्या भावना खोलवर दुखावल्या होत्या. माझी मैत्रीण तर इतकी हादरली होती की तिने अहमदाबादचा प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा पुढे ढकलून दिल्लीलाच राहाणे पसंत केले. अहमदाबादच्या या प्रशिक्षणासाठी आणखी एक जण मला येऊन मिळणार असल्याने मी प्रशिक्षण चालू ठेवण्याचे ठरविले.(माझा तो दुसरा भिडू म्हणजे उत्पलपूर्ण हजारिका, सद्याच्या रेल्वे बोर्डाच्या कार्यकारी संचालक) आम्ही गुजराथच्या राजधानीला जाण्यासाठी रात्रीची ट्रेन पकडली. यावेळी आमच्या कडे आरक्षण नव्हते. आरक्षण करायला आम्हाला पुरेसा वेळच मिळाला नसल्याने आमची तिकिटे प्रतीक्षासूचीतील होती.

आम्ही पहिल्या वर्गाच्या तिकीट तपासनीसाला भेटलो व त्याला आम्ही कोणत्या परिस्थितीत अहमदाबादला चाललो आहोत ते सांगितले.गाडीला तुडुंब गर्दी होती पण त्याने चांगुलपणा दाखवून आम्हाला कुपेमधे नेले व तिथे आम्हाला बसायला मिळण्यासाठी मदत केली. मी त्या कुपेतील दोन सहप्रवाशांकडे नजर टाकली आणि माझ्या अंगावर शहारा आला. त्यांचे पांढरे खादीचे पोशाख ते राजकारणी असल्याचे ओरडून सांगत होते.

इतक्यात टीसीने सांगितले, "ही चांगली माणसे आहेत आणि या मार्गावरचे हे नेहमीचे प्रवासी आहेत. तेव्हा काळजी करण्याचे काही कारण नाही."

त्यांच्यापैकी एक पस्तीशीचा साधारण चेहर्‍याचा व जरासा मायाळू वाटेल असा तर दुसरा साधारणत: तिशीचा रुबाबदार पण जरा हेकट वाटत होता. त्यांनी झटकन सरकून आम्हाला जागा करून दिली. पण खरे सागायचे तर आमच्यासाठी त्यांना कोपर्‍यात दाटीवाटीनेच बसायला लागले होते.

ते दोघे गुजराथ भाजपाचे पदाधिकारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी त्यांची नावेही सांगितली. पण प्रवासात सहप्रवाशांची नावे कुठे आपण काळजीपूर्वक लक्षात ठेवतो. आमचेही तसेच झाले. आमचा रेल्वे अधिकारी म्हणून उमेदवारीचा काळ चालू असून आम्ही आसाममधले आहोत अशी आम्ही पण आमची ओळख करून दिली. त्यानंतर आंमचे संभाषण अनेक विषयांवरून वळणे घेत घेत शेवटी इतिहास व राजशास्त्र या विषयांवर येऊन ठेपले. माझ्या बरोबरची मैत्रीण दिल्ली विद्यापीठातून इतिहास विषय घेऊन पदव्युत्तर परिक्षा पास झालेली असल्याने ती त्या संभाषणात ओढली गेली. मी पण मधूनमधून तोंडी लावण्याईतपत भाग घेत होते. शेवटी ती चर्चा हिंदू महासभा व मुस्लिम लिग यांची स्थापना याबाबत मतांतरे करण्यात संपली.

जो मोठा होता त्याला चर्चा करण्यात रस होता व तो भागही घेत होता. तर दुसरा जो तरूण होता तो शांत बसला होता. तो संभाषणात भाग घेत नसला तरी तो अगदी मनापासून ऐकतोय हे त्याच्या देहबोलीवरून जाणवत होते. बोलता बोलता मी श्यामाप्रसाद मुखर्जींच्या म्रुत्युचा उल्लेख केला. मी म्हटले,

"आज इतक्या वर्षांनीही त्यांच्या मृत्यूचे गूढ वलयाबद्दल लोक का बोलताहेत काही कळत नाही."

यावर मात्र तो तरूण एकदम उद्‍गारला. "तुम्हाला श्यामा प्रसाद मुखर्जीं कसे काय माहित?"

तेव्हा मी त्याला सांगितले की, माझे वडिल जेव्हा कलकत्ता विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत होते तेव्हा कुलगुरू असलेल्या मुखर्जीनी एका आसाममधल्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळवून दिली होती. माझे वडिल या गोष्टीचा नेहमीच उल्लेख करीत असत व त्यांना नेहमीच मुखर्जींच्या अकाली मृत्यूचे (जून १९५३ वयाच्या ५१ व्या वर्षी) वाईट वाटत असे.

यानंतर मात्र तो तरूण कुठेतरी दुसरीकडेच शून्यात नजर लावत, स्वताशीच जणू काही बोलत आहे अशा प्रकारे म्हणाला. "हं. त्यांच्याबद्दल काहीतरी माहित आहे हे तस चांगलच आहे म्हणायच..."

इतक्यात त्या मोठा वाटणाऱ्या माणसाने सुचवले की, "तुम्ही आमच्या पक्षाच्या गुजराथ शाखेत सामील व्हा की."

यावर आम्ही दोघी हसायला लागलो आणि म्हणालो, "अहो आम्ही गुजराथी नाही."

आता मात्र त्या तरूणाला राहवले नाही. तो एकदम म्हणाला,

"नसाल तुम्ही गुजराथी. पण त्याने काय फरक पडतोय? आमची तरी काहीच हरकत नाही. जर कोणी बुध्दीमान माणसे गुजराथेत यायला तयार असतील तर आम्ही तरी त्यांचे स्वागतच करू."

हे सगळे तो बोलत असताना त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक जाणवत होती.

इतक्यात जेवण आले. जेवण म्हणजे रेल्वेच्या चार शाकाहारी थाळ्या. आम्ही काही न बोलता जेवण आटोपले. नंतर जेव्हा रेल्वेचा माणूस पैसे मागायला आला तेव्हा त्या तरूण माणसाने सगळ्यांचेच पैसे दिले. मी तोंडातल्या तोंडात बोलल्यासारखे धन्यवाद दिले खरे. पण त्या तरुणाला आपण काही विशेष केले आहे असे वाटलेसुध्दा नाही. मला त्यावेळेला त्याच्या डोळ्यात एक वेगळीच छटा जाणवली जी मी विसरणेच शक्य नाही. तो कधीतरीच बोलायचा पण ऐकायला नेहमी तयार असायचा.

मग तिकीट तपासनीस महाशय आले आणि गाडी पूर्ण भरली आहे त्यामुळे आमची झोपायची व्यवस्था होऊ शकणार नाही हे सांगायला लागले. पण हे दोघे एकदम ऊठले आणि म्हणाले,

"ठीक आहे. ठीक आहे. आम्ही बघतो काय करायचे ते. त्यांनी चटकन जमीनीवर कापड अंथरले आणि त्यावर ते झोपायची तयारी करू लागले. अर्थातच आम्हाला झोपायला बर्थ मिळाली!

खरच केवढा विरोधाभास होता हा. काल रात्री राजकारणी माणसांच्या गोतावळीतून प्रवास करताना आम्हाला खूपच असुरक्षीत वाटत होते तर आज त्या कुपेमधे दोन राजकारण्यांच्या सहवासात आम्हाला भितीचा लवलेशही शिवला नाही.

दुसर्‍या दिवशी सकाळी जेव्हा अहमदाबाद जवळ आले तेव्हा त्या दोघांनी आमची शहरात राहायची काय व्यवस्था आहे ते विचारले. त्यांच्यातल्या जो मोठा होता त्याने तर सांगूनच टाकले की आम्हाला राहाण्या संदर्भात काही अडचण आली तर केव्हाही माझ्या घरी आले तरी चालेल. त्याच्या बोलण्यात म्हणा किंवा चेहर्‍यावरचे हावभाव म्हणा तो खर्‍या कळकळीने बोलत असल्याचे जाणवत होते. याउलट त्या तरूणाने स्वच्छ सांगून टाकले की, तो एक भटक्या माणूस आहे. त्यामुळे त्याच्याकडे आम्हाला बोलवायला योग्य असे घरच नाहीय्ये. पण जर खरोखरच आमच्या पुढे सुरक्षीत निवासाचा प्रश्न असेल तर आम्ही जरूर त्या दुसर्‍या माणसाची विनंती मान्य करावी.

आम्हाला आपुलकीने बोलावल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानले आणि आमच्या राहाण्याच्या व्यवस्थेबाबत काहीसुध्दा गैरसोय होणार नसल्याचे पटवून सागितले.

जेव्हा गाडी थांबण्याच्या बेतात होती तेव्हा मी माझी डायरी काढून त्यांची नावे परत एकदा विचारून घेतली. राजकारणी लोकांबद्दलचे माझे जे एकंदरीत मत होते त्यात आमूलाग्र बदल करायला लावणार्‍या त्या विशाल अंतकरणाच्या दोघांची नावे मला अजिबात विसरायची नव्हती. मी गाडी थांबेपर्यंत त्यांची नावे झटकन खरडली : शंकरसिंग वाघेला आणि नरेंद्र मोदी.

१९९५ साली या घटनेवर आधारित मी आसामी वृत्तपत्रात लिहिले. स्वत:ची गैरसोय सोसून दोन आसामी स्त्रियांची सोय बघणारे दोन अनामिक गुजराथी राजकारणी! मी जेव्हा हे लिहिले, तेव्हा हे दोघे पुढे एवढे महशूर होतील किंवा पुढे कधितरी मला त्यांच्याबद्दल ऐकायला मिळेल अशी पुसटशी शंकाही मनाला शिवली नव्हती. जेव्हा १९९६ साली श्री. वाघेला गुजराथचे मुख्यमंत्री बनले तेव्हा मला आनंद झाला. २००२ साली जेव्हा मोदी मुख्यमंत्री झाले तेव्हा तर अत्यानंद झाला. (त्यानंतर काही महिन्यांनी दुसर्‍या एका आसामी दैनिकाने १९९५ मधला माझा लेख पुनर्प्रकाशीत केला.) आणि आता तर ते भारताचे पंतप्रधान बनलेत.

जेव्हा जेव्हा मी त्यांना टीव्ही वर बघते तेव्हा तेव्हा मला तो रेल्वे प्रवास आठवतो. ते जेवण, त्या जेवणातला आपलेपणा, ते सौजन्य, तो हळूवारपणा आणि घरापासून कितीतरी दूर असताना अनुभवलेली सुरक्षिततेची ती जाणीव. माझ्या नकळत माझे हात जोडले गेलेले असतात.

लेखिका सेंटर ऑफ रेल्वे इन्फर्मेशन सिस्टिम, भारतीय रेल्वे न्यू दिल्ली. येथे जनरल मॅनेजर म्हणून काम करतात.

सर्वाधिकार २०१४, द हिंदू

ओ अ‍ॅडमिन, ^^^ही पोस्ट उडवा ब्वा. यांना लिंक द्यायला काय जातंय? लै ठिकाणी वाचून झालिये ही आरती.

Pages