येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.
या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल
याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.
-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.
१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.
२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड
अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री
३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार
४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.
१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार
१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.
स्वैर मराठी अनुवादाची कशी
स्वैर मराठी अनुवादाची कशी लिंक देनार ? मूळ लेखन इंग्लिश मध्ये हय ना !
बापरे, आपचं नाव काढताच बाफ
बापरे, आपचं नाव काढताच बाफ पेटला. तीरकमान सज्ज.
<<चावडीवर, पारावर, क्लबात गप्पा रंगतात राजकारणावर इतकेच कशाला चाळींच्या गॅलर्यांत अग्रलेखावर हमरीतुमरीवर विवाद घडतात ते काय एका माणसाच्या ओरडण्यामुळे सरकार बदलायला?
अशीच मते बनत बदलत जातात चर्चांनी.>> साती +१
"कल ही पताचला है कि गुजरात का विकास और दिल्ली की बिजली की शादी हो गयी है,60 महीने के हनीमून पर अज्ञात स्थान पर गए हैं.असुविधा के लिए क्षमा ! - जनहित में जारी" (सौ. चिवचिव)
<<लै ठिकाणी वाचून झालिये ही आरती.>> इब्लिस +१०००
आणि असेलही सगळं खरंखुरं पण १९९० नंतर पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलंय.
हात शिवशिवत आहेत आप बद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला
<<दिल्लीत भाजपा पेक्षाही
<<दिल्लीत भाजपा पेक्षाही त्यांना जास्त सिट मिळाल्या तेंव्हा मी न्युयॉर्क मध्ये होतो अन टीम ला जेवण दिले होते.>>
केदार, चूक. दिल्लीत भाजपाला ३१, आपला २८ आणि काँग्रेसला ८ सीटस मिळाल्या होत्या. जास्त सिटस मिळूनही भाजपाने सरकार का नाही बनवलं हे एक (सोप्पं) कोडंच आहे.
<<तुम्ही फक्त त्या लाटेत असल्यामुळे ते अॅटोक्रॅटिक, लहरी वगैरे आहेत हे तुम्हाला मान्य होणार नाही. त्यांचे अजेंडा देखील पहिल्या काही दिवसात बदलले.
१ आधी राहूल.
२ मग अंबानी
३ आणि पर्यायाने मोदी / भाजपा.>>
म्हणून तर लोक कन्फ्यूज आहेत की त्यांना काँगी एजण्ट म्हणायचं की भाजपा एजण्ट !
पण ह्या सगळ्यांतून एकच अधोरेखित होतंय...ते भ्रष्टाचार, वंशवाद, गुन्हेगारी आनि पिळवणूकीच्या विरूद्ध आहेत. मग असे लोक कुठल्याही पक्षातील असोत.
<< एका मुलाखतीत (अर्णब होता बहुतेक, आठवत नाही नीट) तर एकेरी उल्लेख केला होता त्या मुलखत कर्त्याने>>
परवा राहुल कंवल ने पण एकेरी उल्लेख केला...पण त्यातनं केजरीवालांचा कमीपणा नाही तर मिडियाचा माजोरडेपणा सिद्ध होतो. वैम.
मोदीकाकांचे घोषणापत्र, आप की अदालत, फ्रँकली स्पीकिंग बघितलेत का ?? कशी शेपटं घालून बसतात. ह्यात आदर नसतो...चक्क भिती टपटपत असते. घोषणापत्र मधल्या तिघांची अवस्था तर बघवत नव्हती अक्षरशः
सगळ्या कार्यक्रमाचा फॉर्मॅटच बदलून टाकला होता...
हात शिवशिवत आहेत आप बद्दलच्या
हात शिवशिवत आहेत आप बद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला

<<
बडवा की मग!
तेरी हिम्मत पे पुतली हमें नाज है
तेरा मैदाँमें आना गज़ब हो गया...
संदर्भः कैसे बेशर्म आशिक है ये आज के..
<<दिल्लीत भाजपा पेक्षाही
<<दिल्लीत भाजपा पेक्षाही त्यांना जास्त सिट मिळाल्या तेंव्हा मी न्युयॉर्क मध्ये होतो अन टीम ला जेवण दिले होते.>>
केदार, चूक. दिल्लीत भाजपाला ३१, आपला २८ आणि काँग्रेसला ८ सीटस मिळाल्या होत्या. जास्त सिटस मिळूनही भाजपाने सरकार का नाही बनवलं हे एक (सोप्पं) कोडंच आहे.

<<
श्श्श्शऽ!
त्यांना अजिब्बात चूक म्हणायचं नाही. ते रागावतात.
एका मित्राने पाठवलेली गंमत.
एका मित्राने पाठवलेली गंमत. ख.खो.दे.जा.
<<बडवा की मग!>> अहो इब्लिसभौ,
<<बडवा की मग!>>
अहो इब्लिसभौ, पोटापाण्याचं बघायला पाहिजे की. घरातल्यांपासून लपूनछपून लष्कराच्या भाकर्या भाजणं चालू आहे. सवड झाली की बडवते. (सोडते की काय...)
विचारवंत,
कसले जुने-पुराणे आरोप करता ओ? टाइमटर्नर वापरून जरा पुढे पाठवू या का आपण तुम्हाला?
हे बघा फॉरिन फण्डिंग कोणाला मिळाली आहे ती -- http://timesofindia.indiatimes.com/home/news/Delhi-HC-finds-BJP-Congress...
आता फॉरिन फण्डिंग घेणं कसं देशहिताचं असतं त्यावर स्पष्टीकरणं तयार होतील !
त्यांना अजिब्बात चूक म्हणायचं
त्यांना अजिब्बात चूक म्हणायचं नाही. ते रागावतात. >> माझी चूक झालेली दाखवल्यावर मी कधी रागावलो आहे इब्लिस? एकतरी उदाहरण द्या.
उलट तुम्ही आत्ताही विकूल्लाखान मध्ये तुमची चूक दाखवून दिल्यावर दिलगीर आहे असे म्हणायची साधा संस्कार तुमच्यात नाही आणि तुम्ही इतरांना बोलताय?
मिर्ची बरोबर. ३१ आणि २८ धन्यवाद.
जास्त सिटस मिळूनही भाजपाने सरकार का नाही बनवलं हे एक (सोप्पं) कोडंच आहे.
<< आपला घाईची लागली होती आणि भाजपाला कोणीही सपोर्ट दिला नसता !
<<मोदीकडे बोट दाखवणं फार
<<मोदीकडे बोट दाखवणं फार सोप्पं आहे, पण किमान तो मुख्यमंत्री म्हणून काहीतरी काम करत होता. >>
खरंय तुमचं नंदिनी. आत्तापर्यंत साबरमती आणि शेतकरी ही दोन कामं तर उलगडून बघितलीच आपण
<<तीच जबाबदारी तुमच्यावर आल्यावर तुम्ही काय केलंत? दुसर्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावनं फार सोपं,पण त्याचे पुरावे द्या म्हटलं की लगेच नौटंकी चालू. >>
इथे वाचा आम्ही काय केलं ते (हायला हे जाम भारी वाटतंय. आप ने केलेलं आम्ही केलं म्हणायला
एकदम पक्षप्रवक्ती असल्याचा फील येतोय.)
http://www.hindustantimes.com/india-news/arvindkejriwalacommonmaninpolit...
साध्या वीजेचं उदाहरण घेऊ या.
वीजकंपन्यांनी नाटकं चालू केल्यावर केजरीवालांनी धमकी दिली होती त्यांचं लायसन्स रद्द करण्याची. आणि वीजपुरवठा सुरळीत झाला होता.
इथे भाजपावाले म्हणतायेत अजून १०-१५ दिवस लागतील. राजधानीतला वीजपुरवठा सुरळीत करता येत नसेल तर १०० नवीन शहरांचं काय लोणचं घालायचं ?
<<आपला घाईची लागली
<<आपला घाईची लागली होती>>
घाईची लागलेली त्यांनी १ आठवडा आवरून धरली होती रेफरेंडम होईपर्यंत.
भाजपाची हिंमत होती का आप चा विरोधी पक्ष म्हणून सामना करायची?
>> हात शिवशिवत आहेत आप
>> हात शिवशिवत आहेत आप बद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला <<
नविन बाफ काढाच, इथे नको सातीताई रागावतील (तुमची जुळी बहिण असुनहि)...
बर्याच दिवसांत चांगली करमणुक झालेली नाहि (आणी बरेच जण हात साफ करायला टपुन बसलेले आहेतच)...
Kedar has not shied away from
Kedar has not shied away from correcting factual errors when pointed out and these slips happen from everyone. That said, it is wrong to say AAP was in a hurry to for govt.
>> AAP was in a hurry to for
>> AAP was in a hurry to for govt. <<
आप (रीड केजरी) वॉज इन अ हरी टु डु एव्हरीथिंग, इन्क्लुडिंग गेटिंग इन्कार्सरेटेड...
>> हात शिवशिवत आहेत आप
>> हात शिवशिवत आहेत आप बद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला <<
नविन बाफ काढाच, इथे नको सातीताई रागावतील (तुमची जुळी बहिण असुनहि)...
बर्याच दिवसांत चांगली करमणुक झालेली नाहि (आणी बरेच जण हात साफ करायला टपुन बसलेले आहेतच)... >>
नाही. मिर्ची चा जन्म ह्या बाफसाठीच झालाय. हे जीवितकार्य नीट पार पाडल्यावरच मिर्चीचं पंचामृत होईल...
विकु +१
जशी तुमची मर्जी; पण तुमचा
जशी तुमची मर्जी; पण तुमचा अवतार लवकर संपु नये अथवा संचार अनिरबंधित रहावा असं का कुणास ठाउक वाटायला लागलं आहे...
उलट तुम्ही आत्ताही
उलट तुम्ही आत्ताही विकूल्लाखान मध्ये तुमची चूक दाखवून दिल्यावर दिलगीर आहे असे म्हणायची साधा संस्कार तुमच्यात नाही आणि तुम्ही इतरांना बोलताय?
<<
दिलखुलास दिलगिरी!
आय मीन्ट टू सेण्ड यू अ पीएम, अँड नेव्हर गॉट अराउंड टू बी डूइंग इट.
looks like what i said pissed u off, and i didnt mean to do it that way.
sorry boss.
लेट पण थेट.
(आणी बरेच जण हात साफ करायला
(आणी बरेच जण हात साफ करायला टपुन बसलेले आहेतच)...
<<
मग काय पंगत उठायची वाट पहाताय का. मीठ लिंबू लावलं ना? उठा आता. भरपूर झालं.
पंगत उठायची? एव्हढ्यात?
पंगत उठायची? एव्हढ्यात? आत्ता तर हातावर पंचामृत पडलंय आणि "वदनी कवळ घेता" सुरु होतंय; अजुन "हर हर महादेव" चा घोष व्हायचा आहे.
>>(आणी बरेच जण हात साफ करायला टपुन बसलेले आहेतच)... <<
बादवे, हात साफ करणे म्हणजे हस्तप्रक्षालन नव्हे. इथे "लोहा गरम है, हतोडा मारदो" या अर्थी अपेक्षीत...
हरर्र म्हादेव? चाय्ला, पंगत
हरर्र म्हादेव?
चाय्ला, पंगत हाये का सुल्तानढवा?
हितं तरी पंगतीत कधी हरहर महादेव ऐकलं न्हाई बा. कोकणात वेगळं असतंय का?
आपचं कायपण आपल्या धाग्यावर
आपचं कायपण आपल्या धाग्यावर नाय हां.

सांगून ठेवत्येय.
मिर्चीताई , तू नविन धागा काढ.
>>कोकणात वेगळं असतंय का?
>>कोकणात वेगळं असतंय का? <<
हो; स्पेशल पंगतीत...
कोंकणात शेवटी 'जयजय रघुवीर
कोंकणात शेवटी 'जयजय रघुवीर समर्थं ' असतं.
हरहर महादेव मी ही पहिल्यांदाच ऐकत्येय.
माझी बांधिलकी वाचकांशी आहे हा
माझी बांधिलकी वाचकांशी आहे हा क्लेम मी कुठे केलाय या प्रश्नाचं उत्तर काही मिळालं नाही, त्यामुळे रॉबीनहूड यांची पोस्ट समजली नाही आणि हस-या स्मायल्यांचा अर्थही कळाला नाही. काही विनोद असल्यास संदर्भ समजला नाही. समजला तर एन्जॉय करू की !
तेरी हिम्मत पे पुतली हमें नाज
तेरी हिम्मत पे पुतली हमें नाज है
तेरा मैदाँमें आना गज़ब हो गया..<<<
छान!
हा न्यायीपणा ड्यु आय डीं नासुद्धा दाखवला की झाले.
मिर्ची हा काही ड्यु आय डी नाही. मिर्ची नावाच्या बायका असतात की!
<< आपचं कायपण आपल्या धाग्यावर
<< आपचं कायपण आपल्या धाग्यावर नाय हां.
सांगून ठेवत्येय.डोळा मारा
मिर्चीताई , तू नविन धागा काढ.>>
नवीन धागा नको...मी खरंच आपचा प्रचार करायच्या हेतूने इथे लिहायला सुरूवात केलेली नाही.आपचा विषय निघाला म्हणून जरा लिहिलं. सॉरी बर्का सातीतै.
मला मोदीभाईंचा फुगा फोडावा असं वाटलं. आणि त्याला निमित्त झालं उडन खटोलांच्या गंगेच्या धाग्यावरचा "अशा महापुरूषाच्या प्रतिभाशक्तीला लाख सलाम" हे वाक्य. अजिबात सहन नाही झालं आणि टाकली पोस्ट. आता मैदानातनं अर्ध्यातनं निघून कसं जायचं? म्हणून लढा चालू आहे.
बाकी, ह्या राजकारणी लोकांच्या अंदाधुंदीतून आपल्याला वाचवायला आप शिवाय पर्याय नाही ह्याविषयी मला कसली ही शंका नाही!
(स्वगतः मिर्चे, हे वाक्य कोट करून अनेक टोमणे आणि हसर्या बाहुल्या येणार आहेत...तयारीत रहा :हाहा:)
तेरी हिम्मत पे पुतली हमें नाज
तेरी हिम्मत पे पुतली हमें नाज है
तेरा मैदाँमें आना गज़ब हो गया..<<<
इब्लिस, हे जाम आवडलं बर्का आपल्याला. आता हेच घोळेल जरा वेळ डोक्यात.
<<जशी तुमची मर्जी; पण तुमचा अवतार लवकर संपु नये अथवा संचार अनिरबंधित रहावा असं का कुणास ठाउक वाटायला लागलं आहे...>>
आणि हे पण.जीवाला हसं गारगार वाटलं
आम आदमी पक्ष हे सेवादल,
आम आदमी पक्ष हे सेवादल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची संयुक्त निर्मिती आहे हे माझं मत झालेलं आहे. प्रादेशिक, कामगार, शेतकरी, छोट्या समूहांच्या अस्मिता असलेले पक्ष यांचे भारतीय राजकारणात स्थान नगण्य असावे यासाठी एकतर भाजप किंवा आप अशी व्यवस्था असावी असं काहींना वाटतंय. त्यामुळं हा लढा हा लुटुपुटीचा वाटतो. ज्यांना खराखुरा वाटतो त्यांच्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
धन्यवाद विकु. इब्लिस धन्यवाद
धन्यवाद विकु.
इब्लिस धन्यवाद !
एनीटाईम, केदार. रच्याकने,
एनीटाईम, केदार.
रच्याकने, माझी गाण्याची पोस्ट उडाली की काय?
बाकी, ह्या राजकारणी लोकांच्या
बाकी, ह्या राजकारणी लोकांच्या अंदाधुंदीतून आपल्याला वाचवायला आप शिवाय पर्याय नाही ह्याविषयी मला कसली ही शंका नाही<<< त्यांची आपपापसांतील काय ती अंदाधुंद चालू आहे ती आधी संपू द्यात. ते राजिनामा-राजिनामा खेळणं संपलं काय??
आपचा वेगळा धागा काढायचा का? (आधी रेफरंडम घ्यावं!!!!!)
Pages