येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.
या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल
याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.
-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.
१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.
२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड
अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री
३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार
४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.
१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार
१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.
आपचा धागा ऑलरेडी आहे.
आपचा धागा ऑलरेडी आहे. http://www.maayboli.com/node/49140
बाकी मिर्चाक्काने मी लिहिलेल्या ६-७ मुद्द्यांना योग्य ती बदल दिली आहे पण भाजपाने सरकार का स्थापन केले नाही ह्याचे उत्तर मात्र मी दिले आहे.
तिकडे या. मग अजून विचारू.
बाकी केजरीवाल पळून का गेले? हा आद्यप्रश्न आहेच.
केदारभौ, धाग्याच्या
केदारभौ,
धाग्याच्या मालकीणबाईंनी दटावलं ना आपबद्दल लिवायचं न्हाय म्हणून...
तुमच्या धाग्यावर लिहावं असं वाटायला लागलंय.
(आप बद्दल लिहिणार नाही म्हणत म्हणत लिहावं असं वाटायला लागलंय म्हणतेय रे ही मिर्ची...आप तर आप, आप चे समर्थकही युटर्न मारतात...चॅनेलवाले, तुमच्यासाठी ब्रे.न्यू. :डोमा:)
मिर्ची, तुमचा फोकस मोदी
मिर्ची, तुमचा फोकस मोदी सरकारवरच ठेवा हो. तुमचे बाण व्यवस्थित लक्ष्यभेद करीत असल्याने तुमचे लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न चालले आहेत. त्याकडे दुर्लक्ष करा.

तुमची आक्रस्ताळी पोस्ट कोणती ते अजूनही शोधतोय.
मोदीकाका सरदार सरोवराची उंची
मोदीकाका सरदार सरोवराची उंची सतरा मिटर्सनी वाढवतायत.
चांगलं की वाईट लोकहो.
<< मिर्ची, तुमचा फोकस मोदी
<< मिर्ची, तुमचा फोकस मोदी सरकारवरच ठेवा हो. तुमचे बाण व्यवस्थित लक्ष्यभेद करीत असल्याने तुमचे लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न चालले आहेत. त्याकडे दुर्लक्ष करा. >>
करे़क्ट
म्हणून तर अजून लिहीना त्याबद्दल.
मोदीसरकार ची पॉलिसीच वापरत आहेत भक्तगण. ज्या दिवशी प्रसिद्ध झालं "मोदीसरकार गॅसची किंमत वाढवून ८$ करणार" त्यादिवशी चॅनेलवाले "आप संपली, कोलमडली" हे दाखवत होते.
४ खासदार असलेल्या पार्टीला एवढे का बुवा घाबरतात हे लोक? मोडू दे, संपू दे. एवढी जुनी बसपा नाही का संपली.
पण #AAPbreakingUp देशाच्या दृष्टीने जास्त महत्वाचं होत #StopGasPriceHike पेक्षा!
साती,
किमान २.५ लाख लोक (शेतकरी, मच्छीमार वगैरे) ह्यामुळे पीडित होणार आहेत असं रिपोर्ट्स सांगत आहेत.
पण त्याने तसा काही फारसा फरक पडत नाही. हे लोक त्यासाठीच जन्मलेले आहेत!
आपचा वेगळा धागा काढायचा का?
आपचा वेगळा धागा काढायचा का? (आधी रेफरंडम घ्यावं!!!!!)
----- नाही काढायचा... (असे मी आज म्हणतो आहे)
दोन आठवड्यानन्तर - धागा सुरु न करण्याबद्दलचा माझा निर्णय चुकीचा होता (असे मन मोठे करुन) ही मी मान्य करतो. चुका कोण करत नाही? मी पण माणुसच आहे अशी मखलाशी.
चार आठवड्यानन्तर - धागा सुरु करावा असे वाटते...
या व्यक्तीमधी निर्णय घेण्याची क्षमता अजिबात नाही आहे. कधीतरी चुकीचे निर्णय घेतलेलेही जनतेला चालतात (सर्व नेते चुका करतात.... काही तर घोड चुका करतात)... पण प्रत्येक प्रश्नात धर सोड काय कामाची? राजिनाम्यानन्तर विधानसभा बरखास्त करा, ३ महिन्यानन्तर विधानसभा बरखास्त करु नका आम्ही सरकार बनवण्याचा दुसरा प्रयत्न करु...
केजरीवाल आणि आपने रेल्वे मन्त्रालयासमोर फसलेले नाटक केले आणि नन्तर राजिनामा द्यावा लागला... मला त्या नाटकाबद्दलही काही म्हणायचे नाही पण ज्या कारणासाठी ते नाटक एक माजी IRS अधिकारी करतो ते बघितल्यावर ह्याना कायदा पण माहित नाही आणि समजुन घेण्याची पण तयारी नाही...
जनता निवडुन देते ते राज्य करण्यासाठी... ७८ मधे जनता सरकार अन्तर्गत सत्ता स्पर्धेमुळे पडले नन्तर जनतेने त्यान्ना त्यान्ची जागा दाखवली.
आज हजार धावा होणार असे दिसते आहे...
साती, लिंक द्या की.
साती, लिंक द्या की.
मोदी इंटरव्यू मधून का पळून
मोदी इंटरव्यू मधून का पळून गेले
????
<<तुमची आक्रस्ताळी पोस्ट
<<तुमची आक्रस्ताळी पोस्ट कोणती ते अजूनही शोधतोय>>
तुम्हाला सापडली की मला पण सांगा.
केदार, नंदिनी,
साबरमती आणि शेतकरी आत्महत्या फसवणूकीबद्दल एखादी तरी निषेधात्मक टिप्पणी कराल असं वाटलं होतं.
कारण टिपिकल भक्त (कल्टवाले) आणि तुम्ही ह्यात (अजूनतरी) मला फरक वाटतो.
http://m.timesofindia.com/ind
http://m.timesofindia.com/india/Narendra-Modi-gives-Gujarat-its-lifeline...
मोदी काल म्हटलेत की ५ वर्षांत
मोदी काल म्हटलेत की ५ वर्षांत पार्लमेण्ट गुन्हेगारमुक्त होईल.
Parliament live: Modi asks SC for quick steps on MPs with criminal cases
http://www.firstpost.com/politics/parliament-live-modi-asks-sc-for-quick...
उत्तम !
आता आपण पाहू या.भाजपा खासदार निहालचंदचा गुन्हा रद्द होतो की निहालचंदची हकालपट्टी होते.
जयपूर कोर्टाने आपल्या माननीय मंत्र्यांना बलात्काराच्या आरोपात समन्स पाठवलंय.
http://timesofindia.indiatimes.com/india/Modi-minister-Nihal-Chand-summo...
मानहानीच्या दाव्यामध्ये
मानहानीच्या दाव्यामध्ये स्मृतीतैंवर संजय निरुपमांकडून दावा दाखल.
http://m.firstpost.com/politics/smriti-irani-summoned-as-accusedsanjay-n...
दरम्यान सूत्रांकडून असं कळलं की स्मृतीतै कुरकुरत होत्या "गडकरी बाप्पा चोरियाने केजरूवर मानहानीचा दावा केला त्याला मेली इतकी प्रसिद्धी आणि मला अज्जिबात नाही. भ्यांsss"
मिर्चीबाई, तुमच्या "शेतकरी
मिर्चीबाई, तुमच्या "शेतकरी आत्महत्या" बद्दल मी लिहिलेलं आहे. तुमच्याकडे अजून काही रीपोर्ट्स असतील तर तेही मागितले आहेत. "शेतकर्यांनी शेतीमधील नुकसानीपायी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणे" या विषयाशी संबंधित काही असेल तर वाचायला आवडेल.
तुम्ही मीडीया गाईडलाईन्सबद्दल लिहिलं होतं त्यामध्ये हा एक उत्तम पायंडा का आहे यावर मी सविस्तर लिहिलेलं आहे. मागील पानांवर तुम्ही ते वाचू शकता. अजून एका बीबीवर यासंदर्भात लिहिले आहे.
साबरमतीबद्दल मी बोलत नाही, कारण ना मी ती नदी प्रत्यक्ष पाहिली आहे, न मला त्यातले आकडे काही समजतात. मी त्याच विषयावर बोलते ज्यामध्ये मला बर्यापैकी माहिती आहे, अथवा ज्याचा अभ्यास अकरण्यासाठी वेळ आहे. गूगल सर्व आणि विकीपीडीया वाचून मी मते बनवत नाही. निव्वळ आकडेवारी हवी तशी फिरवून मतं बनवता येतात हे ट्रेड सिक्रेट मला माहित असल्यामुळे मी आकडेवारीवर विश्वास ठेवत नाही. मी रीएझल्ट्सवर विश्वास ठेवते. आणि मोदी सरकारला रीझल्ट्स देण्यासाठी मी अजून थोडावेळ देणार आहे. एका महिन्यांत देशाचे निर्णय बदलत नसतात. ते तसे बदलणे हे फार धोकादायक असू शकते, त्यामुळे मोदी सरकारने काँग्रेसच्या चांगल्या योजना पुढे नेल्या तर त्यात उलट आनंद आहे, त्याचसोबत इतर काही स्तुत्य पावलं उचलाली तर त्यांचं कौतुक अवश्य करेन. धोपटायचं म्हणून मी काँग्रेसला आजवर कधी धोपटलेले नाही.
आपला धोपटतेय, कारण ते तसं वागत आहेत. कुणालाही अमुक मोदीभक्त, काँगीभक्त,आपप्टार्ड असली विशेषणे लावून मी लिहत नाही. दुसर्यांच्या मताचा मी मान ठेवते.
मी मोदीभक्त वगैरे अजिब्बात नाही. आणि मी हिंदुत्त्ववादी वगैरे तर बिल्कुल नाही. प्लीजच.
मला एक राजकारणी म्हणून, एक शासक म्हणून मोदींचं काम आतापर्यंत (त्यांच्या सगळ्या गुणदोषासकट) आवडलेलं आहे. कुणी किती विनोद केले तरी मनमोहन सिंग हे पंतप्रधान म्हणून आवडले होते, दुर्दैवाने त्यांना त्यांच्या हुशारीची पूर्ण्पणे वापर करून काम करता आलेले नाही हेदेखील तितकेच सत्य आहे. सध्यातरी मला मोदी हा एक सशक्त पर्याय वाटत आहेत.
उद्या जर मला काही न आवडण्यासारखे काम केले तर त्याबद्दल निषेध जरूर व्यक्त केला जाईल. अगदीच निराशाजनक अनुभव आला तर २०१९मध्ये मतदानावर याचा जरूर परिणाम होइल.
भाजपा चे खासदार फुटबॉलच्या
भाजपा चे खासदार फुटबॉलच्या अभ्यासासाठी जनतेचे ८९ लाख रूपये खर्च करून ब्राझिलला जाणार.
http://www.firstpost.com/politics/goa-parrikar-approves-rs-89-lakh-world...
दरम्यान, काल एक शेतकरी बैलाशी बोलताना आढळला. "चल ढवळ्या, बिगी बिगी चाल. आरं लई काम हाये. सर्कारला पैकं द्यायचंत नव्हं. मंत्री फूटबॉल चा आब्यास कराया फॉरेनला निगालंत"
<<गूगल सर्व आणि विकीपीडीया
<<गूगल सर्व आणि विकीपीडीया वाचून मी मते बनवत नाही. निव्वळ आकडेवारी हवी तशी फिरवून मतं बनवता येतात हे ट्रेड सिक्रेट मला माहित असल्यामुळे मी आकडेवारीवर विश्वास ठेवत नाही. मी रीएझल्ट्सवर विश्वास ठेवते.>>
ओक्के, म्हणजे तुमचा आकडेवारीवर विश्वास नाही तर. मग रिझल्टस कसे ठरवायचे म्हणे?
बाकी तुमच्या पोस्टमध्ये अनेक विसंगत वाक्ये आहेत. पण त्यांचं चर्वण करून काही साध्य होणार नाही. त्यामुळे आपण मुद्द्यांवरच बोलू या.
समजा क्रिकेटचा खेळ एका
समजा क्रिकेटचा खेळ एका मैदानात चालू आहे. क्लब क्रिकेट आहे. खेळाडू खेळतायत आणि पाहणारे पाहतायत. घरच्या संघाची स्थिती नाजूक आहे. असे असताना कुणी एक जण येऊन तावातावाने फलंदाजांना शिव्या द्यायला लागतो. गर्दी देखील उत्साहात सामील होते. फलंदाजाने फटके कसे लगावायला हवे होते, कोणत्या गोलंदाजाला कसे तोंड द्यायचे, त्याला सगळे ठाऊक असते आणि तो सगळ्यांना ते पटवून देत असतो. मग थोड्या वेळाने तो म्हणतो, "अरे ह्यांच्यापेक्षा चांगले तर मी खेळून दाखवेन!" गर्दीला ते पटते आणि ती गर्दी त्याला बदलीचा खेळाडू म्हणून आत पाठवते. तिथे गेल्यावर १ षटक खेळायची संधी त्याला मिळते, आणि त्या षटकात ब्याटीला बॉल लागत नाही. (किंवा तुमच्या आवडीनुसार, ६ षटकार जातात. दुसर्या शक्यतेनुसार तर पुढे होणारी गोष्ट तर जास्त विनोदी आहे.) आणि मग एकदम हा भिडू 'आमी नाही खेळत जा. हंपायर, कॅमेरामन, बाऊंडरीवाले, स्कोरर, लाईटवाले, गर्दीत वडापाव विकणारे, पाणीवाले, गेटकीपर, पार्किंगचे रखवालदार, स्टेडियम बांधणारा काँट्रॅक्टर, आकाशात उडणारे पक्षी, भारतीय हवामान खाते, चीनमध्ये पंख हलवणारे फुलपाखरू, सगळे चिकीखाव आहेत.' असे म्हणून मैदानाच्या बाहेर पडतो आणि सैरभैर गर्दीला 'मला कसोटी संघात पाठवा' म्हणून सांगायला लागतो आणि ते झाले नाही, की नॅशनल लेव्हलचे प्लेयर मला घाबरले असे म्हणायला लागतो. अरे बाबा, पिचवर उभे राहायला मिळतेय तर जास्तीत जास्त रन्सा का ठोकत नाहीस तू? तू चांगला प्लेयर आहेस असे तूच म्हणतोयस त्यावर किती दिवस विश्वास ठेवायचा?
(इथे इतक्या लोकांनी इतके असंबद्ध लिहून झाले आहे की मला ह्या अपराधासाठी येक डाव माफी मिळंल आसं कायतरी बघा बोवा.)
दरम्यान, काल एक शेतकरी बैलाशी
दरम्यान, काल एक शेतकरी बैलाशी बोलताना आढळला. "चल ढवळ्या, बिगी बिगी चाल. आरं लई काम हाये. सर्कारला पैकं द्यायचंत नव्हं. मंत्री फूटबॉल चा आब्यास कराया फॉरेनला निगालंत" >>>
तुम्ही फॅक्टसवर लिहीत असताना हे वाक्य खटकलं. त्यावरच फोकस ठेवा. विषयांतर करणा-यांना जरासुद्धा स्कोप कशाला द्यायचा ?
गौतम अदाणी या व्यावसायिकास 1
गौतम अदाणी या व्यावसायिकास 1 रुपाया ते 34 रुपये प्रती चौरस मीटर या दराने पंधरा हजार एकर जमीन मोदींनी दिली आहे, याउलट गुजरातेत टाटा, फोर्ड ,मारुती सुझुकी इ कंपन्यांना 400ते 1000 रु प्रतिचौरस मीटरने जमीन दिली आहे. फक्त अदाणीला इतक्या कवडीमोल दराने पंधरा हजार एकर एवढी अवाढव्य जमीन द्यायचे कारण मोदींनी स्पष्ट केलेले नाही.
http://www.business-standard.com/article/companies/adani-group-got-land-...
मोदीकाका सरदार सरोवराची उंची
मोदीकाका सरदार सरोवराची उंची सतरा मिटर्सनी वाढवतायत.<<< मेधा पाटकर कुठेत?? त्यांचा बाईट घ्या आधी..
मिर्चीताई आणि हा धागा- एकाचं नाव काढताच,दुसरा हमखास आठवेल्,असं समीकरण तयार झालं आहे.सातीताई त्या तुमच्या जुळ्या भगिनी आहेत,तेव्हा त्यांची स्तुती चालवून घ्या बरं..
मोदी जेव्हां महाराष्ट्रात
मोदी जेव्हां महाराष्ट्रात येऊन शेतक-यांच्या आत्महत्वेबद्दल साभिनय बोलू शकतात आणि त्यावर लेखच्या लेख, पॅनेल डिस्कशन्स होऊ शकतात तेव्हां या आत्महत्यांच्या केस टू केस रीपोर्ट्सबद्दल कुणीच बोलत नाही. मागेही याच आत्महत्यांच्या मुद्यावर महाराष्ट्रात सत्तांतर झालेलं होतं आणि सत्तांता झाल्यावर आत्महत्येबद्दल तेव्हाच्या सरकारने जी काही मुक्ताफळं उधळ्ली होती ती अजून लक्षात असतील.
तेव्हां आकडा इज आकडा हाच रुल मान्य करायला हवा. आणि जरी मान्य केला नाही तरी ५००० + हा आकडा असताना १ हा आकडा सांगणे हे इमानदारीबद्दल शंकाच नाही घृणा निर्माण करणारे ठरते. ज्या गोष्टीचा गवगवा करून केद्रात साठ महीने मागितले तो पायाच ठिसूळ असेल तर फसवणूक झाल्याची भावना निर्माण होईल. हे अर्थातच व्यक्तीपूजकांना लागू होत नाही.
मोदीकाका सरदार सरोवराची उंची
मोदीकाका सरदार सरोवराची उंची सतरा मिटर्सनी वाढवतायत.<<< मेधा पाटकर कुठेत?? त्यांचा बाईट घ्या आधी. >>>> घ्या
http://abpmajha.abplive.in/india/2014/06/12/article342005.ece/%E0%A4%B8%...
साबरमतीबद्दल मी बोलत नाही,
साबरमतीबद्दल मी बोलत नाही, कारण ना मी ती नदी प्रत्यक्ष पाहिली आहे >> मी प्रत्यक्ष पाहूनही त्या कुठे ते मान्य करत आहेत.
अदानी आणि मोदी
अदानी आणि मोदी --
http://www.truthofgujarat.com/modi-adani-affair-revealed/
http://www.truthofgujarat.com/modi-promotes-adanis-murder-environment-pr...
सडेतोड, उत्तम माहीती.
सडेतोड,
उत्तम माहीती. धन्यवाद!
मी मोदींचा चाहता आहे म्हणून म्हणावंसं वाटतं की येत्या पाच वर्षांत प्रदूषणावर काहीतरी तोडगा निघेल. मात्र अदानीने केलेल्या भ्रष्टाचाराचे समर्थन करणे आजिबात शक्य नाही. मोदींनी अदानीस दिलेल्या जमिनीचं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे.
आ.न.,
-गा.पै.
<<आणि जरी मान्य केला नाही तरी
<<आणि जरी मान्य केला नाही तरी ५००० + हा आकडा असताना १ हा आकडा सांगणे हे इमानदारीबद्दल शंकाच नाही घृणा निर्माण करणारे ठरते.>> +१००
भास्कराचार्यांच्या पोस्टीला पास. उत्तर नाहीये म्हणून नाही हां.
<<फक्त अदाणीला इतक्या कवडीमोल दराने पंधरा हजार एकर एवढी अवाढव्य जमीन द्यायचे कारण मोदींनी स्पष्ट केलेले नाही.>>
असल्या क्षुल्लक प्रश्नांना मोदी कध्धीच उत्तरे देत नाहीत !
<<मी प्रत्यक्ष पाहूनही त्या कुठे ते मान्य करत आहेत.>>
तुम्ही पाहिलेला ६०० मीटर्सचा पट्टा सुंदर झालाय हे मी आत्तापर्यंत एकदाही अमान्य केलं नाहीये.
मागच्या-पुढच्या पट्ट्याचं काय? रिव्हरफ्रंट ११ किमीचा आहे, साबरमती ३७१ किमी आहे !
http://twocircles.net/2014apr29/untold_story_behind_sabarmati_riverfront...
सडेतोड,
अदानी आणि मोदींचे अतिशय घनिष्ठ साटेलोटे आहे.
शरीफसाहेबांना बिर्याणी खाऊ घालणारे, आणि आधी स्कल कॅप घालायची नाकारणारे मोदी नंतर शरीफमियांनी पाठवलेल्या साडीचं कौतुक ट्वीट करतात ह्यात बरंच काही लपलेलं आहे.
दरम्यान, पाकने आज पुन्हा बॉर्डरवर गोळीबार केलाय. पण एकच सैनिक मेलाय. तेवढं होणारच, नाही का !
http://www.ndtv.com/article/india/ceasefire-violation-in-j-k-mortar-firi...
५६" छातीवाला वाघ कधी गर्जना करणार देव जाणे.
की पंतप्रधानांची खुर्चीच jinxed आहे? मंत्रालयात कोणी मांत्रिक-तांत्रिक आहेत का रे ?
मिर्ची, तुमचा तिखटपणा असाच
मिर्ची,
तुमचा तिखटपणा असाच मुद्देसूद राहो!
गुजराती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या वस्तुस्थितीवर प्रकाश टाकल्याबद्दल धन्यवाद!
आ.न.,
-गा.पै.
<<दरम्यान, काल एक शेतकरी
<<दरम्यान, काल एक शेतकरी बैलाशी बोलताना आढळला. "चल ढवळ्या, बिगी बिगी चाल. आरं लई काम हाये. सर्कारला पैकं द्यायचंत नव्हं. मंत्री फूटबॉल चा आब्यास कराया फॉरेनला निगालंत" >>>
तुम्ही फॅक्टसवर लिहीत असताना हे वाक्य खटकलं. त्यावरच फोकस ठेवा. विषयांतर करणा-यांना जरासुद्धा स्कोप कशाला द्यायचा ?>>
मान्य आहे, माझा टोन जास्त तिरकस होत चाल्लाय. पण सहन नाही होत हे.
तेही युरियाच्या किंमतीत १०% वाढ करायचं घाटत असताना.
http://www.firstbiz.com/economy/government-plans-urea-price-hike-by-10-t...
शेतकरीच का?
४ महिन्यांच्या बाळाला कोणा दाईच्या भरोशावर टाकून हृदयावर दगड ठेवून, लोकलमध्ये लोंबकळत कामाला जाणार्या महिलाही आज हेच म्हणत असतील-
"चला बाई, ह्या महिन्यात रोज एक तास ओव्हरटाइम करायला पाहिजे. आपले गुणी मंत्री ब्राझिलला जाणारेत ना फुटबॉलचा अभ्यास करायला. ८९ लाख लागणार आहेत.पैसे नकोत का द्यायला त्यांना?"
गापै, धन्यवाद
गापै, धन्यवाद
साबरमती वाह्ती आणि स्वच्छ
साबरमती वाह्ती आणि स्वच्छ राखण्यासाठी नर्मदा धरणाचे पाणी तिच्यात वळवले आहे असे ऐकले आहे. हे खरे असेल तर केवळ सुशोभितीकरणासाठी पाणी असे वापरणे योग्य आहे काय? तर मग मुळा-मुठेतही खडकवासल्याचे पाणी सोडण्याची मागणी करता येईल. साबरमतीच्या या नवजलाचा वापर पुढे (डाउन स्ट्रीम) कसा होतो? सिंचनासाठी साबरमतीला कालवे आहेत. मग मुख्य पात्रात केवळ सौंदर्यीकरणासाठीच पाणी सोडले असावे का? की हे पाणी पुन्हा त्यातल्याच एखाद्या कालव्यास जाऊन मिळते? कुणी खुलासा केल्यास बरे होईल.
devnaagareet lihitaa yet
devnaagareet lihitaa yet naaheey. kaay karave?
Pages