निवडणूक २०१४ - मतमोजणी - निकाल

Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31

१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.

भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२

भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.

नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय

जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साती Happy ते काम पब्लिकने केलय.
मला फक्त आकडेवरीवरुन कुणा दुसर्‍यातिसर्‍या क्रमान्कावरचेही डिपॉझिट जप्त होणार ते बघायचे होते.

सुप्रिया सुळे आघाडीवर

सुशीलकुमार शिंदे पिछाडीवर

ए विचारवन्त, विचार करायचे सोडून हस्तोस काय? Wink

लटेस्ट स्क्रिन बारामतीचा
MAHADEV JAGANNATH JANKAR Rashtriya Samaj Paksha 123033
SUPRIYA SULE Nationalist Congress Party 121394

लईच घासून चाललीये..... माझही ब्लडप्रेशर वाढू लागलय, झटक्यात कमी होतय......

Pages