निवडणूक २०१४ - मतमोजणी - निकाल

Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31

१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.

भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२

भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.

नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय

जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा, अशोकराव, चान्गली बातमी! Happy
वाराणसीचे नेमके काय होतय?
दिल्लीची काय खबरबात?

(आम्हाला हापिसातुन फारस काही कळत नाही Sad सरकारी नेटसाईटवर अवलम्बुन रहावे लागतय) )

जर काही चांगले व्हायला हवे असेल तर खालील गोष्टी व्हायला हव्या आहेतः

सुप्रिया सुळे
विश्वजीत कदम
मुलायम सिंग
निलेश राणे

हे चौघे हारायला हवेत.

बेफि.. तिघे तर नक्कीच पराभूत होणार असे दिसते आहे.. सुप्रिया सुळे येतील निवडून बहुतेक.. राकाँची तेव्हढी तरी सीट पक्की आहे..

नवी दिल्लीत ७ जागा आहेत....प्रत्येक जागेवर भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. पण वैशिष्ट्य म्हणजे या सातही जागावर दुसर्‍या क्रमांकावर सारे उमेदवार "आप" चे असून यानीही प्रत्येकी १ लाखापेक्षा जास्त मते घेतली आहेत..... काँग्रेसचे उच्चाटन झाले आहे दिल्लीत....तिसर्‍या क्रमांकावर आहेत सारे उमेदवार.

भाजप एकट्याच्या बळावर सरकार स्थापन करेल का? मित्रपक्ष कितीही जवळचे असले तरी कधी नव्हे ती एकपक्षी सरकार येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने ही किती मोठी संधी आहे नाही का?

नीधप++

रागा पंप्र होण्याची भीती + बीजेपी आल्यास बदल घडण्याची शक्यता + कॉ ग्रेस चा वीट

बे हिमस्कूल्स, ह्या लिस्टीत आणखीन ए. नाव अ‍ॅड करा.. पण तो उमेदवार पडणार नाहीचे Sad

स्पष्ट बहुमत..
एक एक कहाण्या इतक्या भयानक की जाहीर बोलणार्‍याला भीती वाटावी..
फर्‍स्ट हँड ऐकलेल्या..

नवी दिल्लीत ७ जागा आहेत....प्रत्येक जागेवर भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. पण वैशिष्ट्य म्हणजे या सातही जागावर दुसर्‍या क्रमांकावर सारे उमेदवार "आप" चे असून यानीही प्रत्येकी १ लाखापेक्षा जास्त मते घेतली आहेत..... काँग्रेसचे उच्चाटन झाले आहे दिल्लीत....तिसर्‍या क्रमांकावर आहेत सारे उमेदवार<<<

अशोकराव, सहमत

@ आनंदयात्री
महाराष्ट्रात लवकरच विधानसाभा निवडणूक आहे.. त्यामुळे बीजेपी शिवसेनेला बाजूला ठेवण्याची शक्यता कमी आहे.. एखादे तरी मंत्रीपद मिळू शकेल.. सेनेला..

सेना आणि तेलगूदेसम ह्या दोनच पक्षांना बर्‍यापैकी जागा आहेत.. बाकीचे पक्ष प्रत्येकी जास्तीत जास्त ५ जागा मिळवतील.. त्यांना भाव दिला नाही तरी काही फरक पडणार नाही..

एकूण भाजप+मित्रपक्ष = स्पष्ट बहूमत नक्कीच आहे (किमान २८५+ जागा)
पुण्यात शिरोळे जवळपास पाउन लाखाने आघाडीवर

रत्नागिरी पेटण्याची शक्यता<<<

उदयन, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते कृपया पुरेसे स्पष्ट लिहीत जाल का? काही समजतच नाही.

यात्री - भाजप मित्रपक्षांना बरोबर घेण्याची शक्यता अधिक वाटते कारण सहा महिन्यात विधानसभा निवडणूका आहेत महाराष्ट्रात!

<ह्या सहा राज्यात भाजपचे निर्विवाद बहुमत! काँग्रेस पूर्णतः नेस्तनाबूत! >
हे कळले नाही. विधानसभेच्या निवडणुका असतील तर निर्विवाद बहुमत म्हणता येईल.
क्लीन स्वीप म्हणायचे असेल तर युपी, बिहार, महाराष्ट्रात अन्य पक्षांचे काही उमेदवार पुढे आहेत.
महाराष्ट्रात राकॉ व स्वाभिमान पक्षाचे उमेदवार दिसताहेत.
बहुतेक गुजरात, राजस्थान, मप्र मध्ये भाजपचे क्लीन स्वीप होईल.

>>>> रागा पंप्र होण्याची भीती + बीजेपी आल्यास बदल घडण्याची शक्यता + कॉ ग्रेस चा वीट <<<<
माझ्यामते यात अजुन एक कारण हवे, ते असे की कधी नव्हे ते "अल्पसन्ख्यान्क व बहुजनान्ची" मते हक्काची धरुन चाललेल्यान्ना धक्का बसला आहे, व ती बीजेपीच्या पारड्यात पडली आहेत/असावित असे एकन्दरीत आकडेवारीवरुन वाटते आहे. Happy बरोबर आहे का हे?

आत्ता असलेल्या मित्रपक्षांना बाजूला ठेवणार नाहीत.. नवीन 'मित्रांची' गरज नाही ते फार बरय !!

मुख्य म्हणजे ब्लॅकमेलिंगचं राजकारण होणार नाही प्रादेशिक पक्षांकडून.. परराष्ट्र व्यवहारांमध्ये केंद्र सरकारला ठाम निर्णय घेता येतील..

माझ्यामते यात अजुन एक कारण हवे, ते असे की कधी नव्हे ते "अल्पसन्ख्यान्क व बहुजनान्ची" मते हक्काची धरुन चाललेल्यान्ना धक्का बसला आहे<<<

पटत आहे

परराष्ट्र व्यवहारांमध्ये केंद्र सरकारला ठाम निर्णय घेता येतील..<<< +१

तसेच इतरही अनेक क्षेत्रांमध्ये!

मयेकर - काँग्रेसला त्या सहा राज्यांंमध्ये नगण्य जागा मिळत आहेत.

Pages