मी आणि प्रसाद एकाच कॉलेज मधले. पहिल्या दिवशीच्या पहिल्या लेक्चरला एक शांत मुलगा चौथ्या -पाचव्या बाकावर येउन बसला आणि एक मितभाषी मुलगा अशी त्याची पहिली छाप माझ्यावर पडली. मी देखील फार बोलकी वगेरे नाही. पण ओळख आणि मैत्रीची खात्री पटली की मी अगदी मनापासून गप्पा मारते. हळू हळू कॉलेज मध्ये सर्वांशी ओळख होत होती आणि मित्र-मैत्रिणी ह्यांची संख्या वाढत होती. पण ह्याचे मितभाषी असणे अजूनही तसेच होते. जे काही शिकवले जायचे ते मात्र अगदी व्यवस्थित वहीत उतरवून घ्यायचा तो. आणि एके दिवशी 'फौंडेशन कोर्स' नावाचा विषय आम्हाला शिकवला जाणार हे कळले. एकंदर सामाजिक भान वाढविण्यासाठी हा विषय होता. लेक्चरच्या वेळेस प्रोफेसरांनी 'आरक्षण हवे का नको' ह्या विषयावर चर्चा करायचे ठरविले. हा फार संवेदनशील विषय आहे हे मला माहिती होते परंतु वर्गातील सारी मुलं एवढ्या तावातावाने विरोधात बोलतील हे मला अनपेक्षित होतं. त्यातल्या एकाने आरक्षणासाठी थेट डॉ. आंबेडकरांना जबाबदार धरले आणि त्यांच्यामुळे देशाचे वाटोळे झाले असे सांगितले. सारा वर्ग टाळ्या वाजवू लागला आणि एकदम एका मुलाने हात वर केला. त्याला बोलायची संधी दिली गेली आणि बाबासाहेबांबद्दल तो इतके सुंदर बोलला की बस्स - प्रोफेसर देखील त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले. वर्गातील मुलांना देखील त्यापुढे काही बोलता आले नाही आणि बऱ्याच लोकांनी काहीतरी निरर्थक मुद्दे काढून उगीच विरोध करायचा प्रयत्न केला. परंतु ते फोल ठरले आणि चर्चा संपली! मी मुद्दाम वर्गाबाहेर जाउन त्याच्याशी बोलले. प्रसाद सारखा शांत मुलगा एवढे प्रभावी बोलू शकेल ह्यावर माझा विश्वास बसत नव्हता!
पुढे आमची ओळख वाढली. गप्पा वाढल्या. बरेच विषय बोलले जायचे परंतु वैचारिक चर्चा जास्त होत असे. कधी कधी लायब्ररी मध्ये नोट्स काढणे म्हणून बसले जायचे परंतु अभ्यास सोडून सामाजिक विषय जास्त बोलले जायचे. त्याला त्यावर बोलणे फार आवडायचे आणि त्याचे मुद्दे देखील खूप प्रभावी असायचे. खूप वाचन होते. आणि शिवाय विचार अगदी सर्वसमावेशक होते. माझ्या घरी भिंतीवर बाबासाहेबांचा फोटो होता परंतु माझ्याकडे त्या फोटोला नमस्कार करणे ह्यापलीकडे काहीच नव्हते. आणि त्याचे त्यांच्याबद्दल असलेले वाचन मला शरमेने मान खाली घालायला लावायचे. आमची मैत्री वाढत गेली तसा तो अधिक बोलका होऊ लागला. एकदा असाच एक विषय सुरु होता. प्रसाद भान सोडून बोलत होता. लायब्ररी मध्ये पुढे बसलेल्या लोकांनी एक-दोन वेळेस मागे वळून आमच्याकडे पाहिले देखील. "आणि मग आम्हाला मातृभूमी नाही असे बाबासाहेब म्हणाले त्यात चूक काय?" अंगावर शहारा आला होता आणि डोळे पाणावले होते त्याचे. तो लालबुंद चेहरा मला अजून लक्षात आहे.
एकमेकांचा नंबर तर होता आमच्याकडे! त्यामुळे मेसेज वगेरे सुरु झाले. तेव्हा व्हाटसअप वगेरे नव्हतं आणि फेसबुक पण नुकतंच सुरु झालेलं! त्यामुळे मेसेज फॉरवर्ड करणं सुरु असायचं. आणि मी त्याच्या विचारांच्या आणि नंतर त्याच्या प्रेमात केव्हा पडले हे कळले देखील नाही. पण विचारायचे कसे? शिवाय विचारायच्या आधी आमची भिन्न पार्श्वभूमी लक्षात आली आणि क्षणभर बिचकले! परंतु मन सांगत होते विचारून मोकळी हो! आणि मी एकेदिवशी आम्ही घरी येताना त्याला सांगून टाकले. क्षणभर तो माझ्याकडे बघत राहिला! नंतर म्हणाला, " मला देखील तुला हेच विचारायचे होते!"
मी जे ऐकले त्यावर माझा विश्वासच बसेना! काही न बोलता आम्ही नुसतेच चालत राहिलो. आणि अचानक मनात आलेल्या विचाराने मी पुन्हा घाबरले. आणि धैर्य गोळा करून म्हणाले, " आमच्या घरी बाबासाहेबांचा फोटो आहे तरी सुद्धा तुला चालेल?"
तो माझ्याकडे पाहून हसला. म्हणाला, " माझे विचार आणि माझी कृती ह्यात फरक नाही!"
आमच्या घरी आणि नातेवाईकांना समजावणे हे एक आव्हानच होते. आपली मुलगी एका बामणाच्या घरी चालली आहे ह्या कल्पनेने काही नातेवाइक एकदम खूश होते तर काही एकदम नाराज! त्याच्या घरचे नातेवाइक तर अजिबात तयार होत नव्हते. परंतु प्रसाद माझ्याबरोबर उभा होता आणि मला ह्यात समाधान होते. दरम्यान मी त्याच्या घरी जाऊ लागले. त्याच्या घरच्यांशी ओळख होऊ लागली होती. त्याचा मोठा भाऊ प्रकाश हा रशियात
डॉक्टर होण्यासाठी गेला होता. आणि एके दिवशी घरी बातमी आली की प्रकाश दादाला रशियात एक रशियन मुलगी आवडली आहे आणि दोघे लग्न करणार आहेत! घरी अर्थात सगळे खुश झाले होते. तो घरी केव्हा येईल ह्याची वाट बघत होते. पोरांना ह्या गोऱ्या वाहिनीला बघण्याची ओढ लागली होती. 'स्काइप' वर आजीने होणाऱ्या सूनेला पाहिले होते आणि 'किती गोरी आहे माझी सून' असे आनंदाने म्हणून नात्याला पसंती दिली होती! प्रकाश दादाला देखील आपल्या होणाऱ्या बायकोची स्वीकृती झाल्यामुळे आनंद झाला होता. लग्नाचा दिवस उजाडला. मी देखील मदत म्हणून प्रसादच्या घरी असायचे. त्याचे इतर काही मित्र देखील होते. लग्न अगदी व्यवस्थित पार पडले आणि रशियन सूनेने अगदी उत्सुकतेने सारे विधी पार पाडले. तिला आपल्या 'कल्चर' बद्दल बरेच काही सांगितले गेले होते. ' आपल्या प्राचीन आणि महान संस्कृती बद्दल तिला सारे कळले पाहिजे' असे आदेश आजीने आणि त्यादिवशी घरी आलेल्या पुण्याच्या आजीने 'स्काइप' वर प्रकाश दादाला आधीच दिले होते. त्याचे पालन झाले होते बहुदा!
त्यादिवशी सारे नातेवाईक ह्या नव्या सूनेशी बोलायला उत्सुक होते. पुण्याच्या आजी तर प्रचंड! अगदी तोडक्या मोडक्या इंग्लिश मध्ये सारे काही सांगितले जात होते. अर्थात मुलगी रशियन असल्यामुळे तितक्याच तोडक्या मोडक्या इंग्लिश मध्ये उत्तरं मिळत होती आणि आजीची विशेष पंचाईत होत नव्हती! दोघे रशियाला परत जायचा दिवस उजाडला. सर्वजण अगदी भावूक झाले होते. मी देखील प्रसादच्या जवळ उभी होते. सारे काही समजू शकत होते.
"माझ्या सूनेची काळजी घे रे!" आजीने अगदी भावूक स्वरात सांगितले. आम्ही परत यायला निघालो. पुण्याच्या आजीने प्रसादकडे डोळे वटारून कोरड्या स्वरात सांगितले, " आता तुमचा नंबर असेल ना!" आम्ही परत घरी आलो.
प्रसादला आणि मला विधींचे विशेष आकर्षण नव्हते. शिवाय दोन वेगळ्या पार्श्वभूमी असल्यामुळे दोन्हीकडचे लोक आपापले विधी पुढे करतील ह्याची भीती होतीच. त्यामुळे आम्ही सर्वांचा रोष पत्करून कोर्टात लग्न करायचे ठरवले! हा आमचा निर्णय घरी तर अजिबात मान्य नव्हता पण त्या संदर्भात नाराजी ही नातेवाईक मंडळींमध्ये अगदी लगेच पसरली! प्रसाद खंबीर होता आणि सुदैवाने त्याचे वडील आमच्या बाजूने होते. सारे काही व्यवस्थित पार पडले असे जरी नसले तरी ऐन लग्नाच्या वेळेस मात्र कसलाही विघ्न आला नाही. लग्न करून आम्ही घरी आलो. सारे माझ्याकडे टक लावून पाहत होते. बोलत मात्र कुणीच नव्हतं. चिल्ली-पिल्ली मंडळी देखील आपल्या आईचा हात हातात धरून उभी होती. नाही, त्यांच्या आईंनीच त्यांचा हात हातात घेतला होता. मी वाकून सर्वांना नमस्कार करत होते. सारे ' हम्म' एवढे म्हणत होते.
मी आता घरची एक महत्वाची सदस्य झाले होते. आई-बाबा व्यवस्थित बोलायला लागले होते. मी देखील खुलले होते. गप्पांमध्ये सामील होत होते. आणि रविवारी पुण्याच्या त्या आजी आणि इतर एक दोन आजी येणार होत्या हे कळले. सकाळी लवकर उठून मी स्वयंपाक करण्यात आईला मदत केली. बेत तयार झाला. दुपारी जेवण देखील छान गप्पांमध्ये पार पडले. किचन आमच्या बेडरूमच्या अगदी जवळ आहे त्यामुळे तिथे बोलले जाणारे शब्द नीट ऐकू येतात. सगळं झाल्यावर मी झोपायचे म्हणून दिवाणावर पडले होते. प्रसाद बाहेर हॉल मध्ये फोनवर बोलत होता. आणि आत आजींचा संवाद सुरु झाला.
" मला वाटलं होतंच …. जेवण आपल्या सारखं नव्हतं! चव काहीतारी वेगळीच होती. कोण कुठली बायको केली आहे ह्या प्रसादने! तरी वहिनी, मी तुम्हाला सांगत होते ना … ह्या असल्या लग्नांना काहीही अर्थ नसतो! अहो, आपले पूर्वज काय वेडे होते काय नियम घालून द्यायला! लग्न करायचे तर ते आपल्या माणसाशीच! जाऊ दे... हल्लीची मुलं बघून घेतील आपण कोण सांगणार! झोपा तुम्ही!"
मला कधी नव्हे ते हे सारे ऐकून धक्का बसला! आपल्या माणसाशी? रशियातून आलेली सून आपली होती? ती आपल्या पद्धतीने स्वयंपाक करणार होती काय? आणि मग त्या लग्नाला खूप अर्थ होता काय? तेव्हा कुठे गेले तुमचे पूर्वज? ह्याच त्या आजी सूनेची काळजी घे म्हणून त्या दिवशी सांगत होत्या! आणि मी ह्या देशातली सून असून माझी पर्वा नाही कुणाला! रशियातली 'गोरी' वहिनी बघायला मात्र सारी पोरं मोकळी पण मी घरात प्रवेश करताना त्या साऱ्यांचे हात त्यांच्या आईच्या हातात! अगदी घट्ट! माझा नमस्कार कुणीही स्वीकारायला तयार नाही आणि तिकडे? आपली महान संस्कृती समजाव म्हणून बजावले गेले होते! तिच्याशी इंग्लिश बोलायची हौस आणि माझ्याशी मातृभाषेत देखील कुणी बोलायला तयार नाही. पण तेवढ्यात प्रसाद खोलीत येताना दिसला! मला एकदम त्याचा कॉलेज मधला तो लालबुंद चेहरा आठवला! "…आणि मग आम्हाला मातृभूमी नाही असे बाबासाहेब म्हणाले त्यात चूक काय?"
- आशय गुणे
माझे इतर लेख: http://relatingtheunrelated.blogspot.in/
माझे फेसबुक पान: https://www.facebook.com/pages/Aashay-Gunes-Blog/180236325384645?ref=hl
दुखावणं जमत नसेल तर मग तक्रार
दुखावणं जमत नसेल तर मग तक्रार करू नये. निर्णय आपला असतो. त्याची किंमत बघून ठरवायचा असतो - कुणाला दुखवायचं/ तत्वांशी तडजोड करायची/ मन मारायचं/ आर्थिक-सामाजिक-धार्मिक-रहाणीमानाच्या तडजोडी करायच्या, इ, इ. पण एकदा निर्णय घेतला तर मग किंमत चुकती करताना कटकट, तक्रार, रडगाणं नकोच. म्हणूनच पूर्ण विचारांती, साधकबाधक खुलेपणाने चर्चा करून मगच निर्णय घ्यायचा.
आणि शिकूनसवरून, नोकरी करून ही मॅच्युरिटी नसेल तर मग त्या शिक्षणाचा, नोकरीचा, स्वतःला सुशिक्षित म्हणवायचा का ही ही उपयोग नाही.
हे आईवडिलांच्या दुखावण्याचं
हे आईवडिलांच्या दुखावण्याचं जे काय फालतू कौतुक आहे ना आपल्याकडे...
अरे आयुष्य तुम्हाला काढायचंय की त्यांना? त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळे निर्णय घेतल्यावर येणार्या परिणामांची जबाबदारी ते घेणारेत का? ते पुरे पडणारेत का तेव्हा?
इमोशनल ब्लॅकमेल नुसतं.....
केश्वे, बघ तूच. जर सुशिक्षित
केश्वे, बघ तूच. जर सुशिक्षित नोकरदार मुलगीसुद्धा छळ नको म्हणून घराबाहेर पडण्याऐवजी मरण पत्करत असेल तर मग तिच्या मानसिकतेतच प्रॉब्लेम आहे असं नाही का वाटत?
मुलांनी स्वतःचे मन मारून आपले
मुलांनी स्वतःचे मन मारून आपले ऐकले यामुळे बरे वाटणारे आईवडिल खरंच मला बालिश वाटतात.
वरदा, आहेच ना प्रॉब्लेम.
वरदा, आहेच ना प्रॉब्लेम.
असे हे प्रेमविवाह>>>>> कसे का
असे हे प्रेमविवाह>>>>>
कसे का असेना पण झाले पाहिजेत जास्त झाले पाहिजेत... पुढच्या पिढीच्या तरी जाती-मिश्रण होऊन फक्त माणूस म्हणून जगणं सुसह्य असेल.
अशावेळेला मुलीने ठामपणे (आणि
अशावेळेला मुलीने ठामपणे (आणि आकांडतांडव न करता) नकारच द्यायचा. एकदा वाकलात की मग सवय लागते समोरच्याला. ती कमावती आहे ना? आणि हे असे संभाव्य संघर्षाचे मुद्दे आधीच मोकळेपणाने सगळ्यांशी चर्चा केलेले असले तर संघर्षाची धार कमी व्हायला मदत होते. लग्नाआधीच स्पष्ट सांगायला हवं की मी मांसाहारी स्वैपाक करेन्/करणार नाही किंवा इतर रहाणीमानाचे, वेशभूषेचे मुद्दे. हे सगळे मुद्दे लग्नाआधी दोन्ही घरातल्या सगळ्या लोकांसमोर दोघा नवराबायकोंनी स्पष्ट केले तर जास्त सोपं जातं<<<
सॉरी. पटले नाही. अनेकदा असे विवाह मुळात होतातच आई वडिलांच्या परवानग्यांशिवाय! किंवा मग निव्वळ 'त्या वयातील आकर्षणाला प्रेम समजले गेल्यामुळे' होतात. आई वडिलांनी (दोन्हीकडच्या) उदारपणे परवानगी दिली तरीसुद्धा मुलाच्या आणि मुलीच्या मनात (आपापल्या घरचे विचार वगैरे माहीत असल्याने आणि लग्न ठरल्यापासून असे विचार प्रकर्षाने ऐकू यायला लागलेले असल्याने) एक प्रकारची भीती असते.
वर सुचवलेल्या गोष्टी 'मनमोकळेपणे' वगैरे वडीलधार्यांना सांगण्याची हिम्मत तरी होईल का कोणाची? (हिम्मत व्हायला हवी असे म्हणणे असले तर वडीलधार्यांची हिम्मत आधी होईल हे सांगण्याची की तू कमावती आहेस का शिकलेली आहेस ह्याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही, तू कमावती असावीस ही आमची गरज नाही, आम्हाला मटन करू शकणारीच मुलगी सून म्हणून हवी आहे). ('तू कमावती असणे ही आमची गरज नाही' हा मुद्दा 'उदाहरणार्थ' घेतला आहे, अनेक ठिकाणी असेलही गरज, पण तेवढ्याच मुद्याचे सिलेक्टिव्ह रीडिंग करून कृपया प्रतिसाद देऊ नयेत अशी विनंती).
थोडेसे स्पष्टपणे: भाबडेपणाने आपले विचार येथे मांडणे व दोन चार अनुमोदने मिळवणे ह्यापलीकडे जाऊन वास्तव नेमके काय आहे हे बघितले जायला पाहिजे. आकांडतांडव न करता जर सून म्हणाली की मी मटन करणार नाही तर सासरचे आकांडतांडव करतील. हे आकांडतांडव मटन ह्या मुद्यापुरते मर्यादीत न राहता त्याची वारंवारता व तीव्रता वाढत जाईल. एक दिवस नेभळट नवरा घरच्यांची बाजू स्पष्टपणे घेईल. तुम्ही म्हणता तशी मुद्देसूद, समोरासमोर बसून, शांतपणा ठेवून, 'गूड लिसनर' वगैरे होऊन अश्या ठिकाणी चर्चा होत नसते.
ज्यांच्याकडे ती होते त्यांनी स्वतःला नक्कीच सुखी मानावे, पण बहुतांशी ठिकाणी ती तशी होत नाही.
(प्रियांका - तू इंग्लिशमध्ये टाईप करत असलीस तर सरळ इंग्लिशच लिही की? हे असे वाचायला कसेसेच वाटते. आणि जातीपातीबाबत जरा जपून लिहीत जा असा फुकटचा सल्ला, रागवू नकोस).
Nee, ase aai vadil dhigane
Nee, ase aai vadil dhigane milatil tula
वरदा >>>> दुखावणं जमत नसेल तर
वरदा
>>>> दुखावणं जमत नसेल तर मग तक्रार करू नये. ----------------------------- --------------------------------------------------------------------------------
ही मॅच्युरिटी नसेल तर मग त्या शिक्षणाचा, नोकरीचा, स्वतःला सुशिक्षित म्हणवायचा का ही ही उपयोग नाही. <<
या संपूर्ण पोस्टलाही कानामात्रावेलांटीसकट अनुमोदन.
sagali post English madhye?
sagali post English madhye? :ao: tehi mabo war?
tyawarun dusare vad suru hoteel tyapeksha mi nusati vachate charcha ..... tumach chalu det
tuzi post avadali, patali
varada, he sagal bolan khup sopp ahe
sagalyansathi he karan sopp asat tar jagat ewadhe problems nirman zale nasatech
वास्तवात आकांडतांडव होते तर
वास्तवात आकांडतांडव होते तर तेच बरोबर आहे का?
नवरा नंतर नेभळट निघाला हे कळून फ्रस्ट्रेट होण्यापेक्षा दोघांनी आधीच आपली मते ठामपणे एकमेकांपुढे मांडून बघणे बरे नाही का?
दुखावणं जमत नसेल तर मग तक्रार
दुखावणं जमत नसेल तर मग तक्रार करू नये. निर्णय आपला असतो. त्याची किंमत बघून ठरवायचा असतो - कुणाला दुखवायचं/ तत्वांशी तडजोड करायची/ मन मारायचं/ आर्थिक-सामाजिक-धार्मिक-रहाणीमानाच्या तडजोडी करायच्या, इ, इ. पण एकदा निर्णय घेतला तर मग किंमत चुकती करताना कटकट, तक्रार, रडगाणं नकोच. म्हणूनच पूर्ण विचारांती, साधकबाधक खुलेपणाने चर्चा करून मगच निर्णय घ्यायचा.
आणि शिकूनसवरून, नोकरी करून ही मॅच्युरिटी नसेल तर मग त्या शिक्षणाचा, नोकरीचा, स्वतःला सुशिक्षित म्हणवायचा का ही ही उपयोग नाही.
<<<
पूर्णपणे असहमत!
१. मुलामुलींचे वय सुमारे पंचविशीच्या आतबाहेर असते. आर्थिक व अनेकदा वैचारीक परावलंबित्व पालकांवर असते.
२. कोणी सहसा उगाच फॅशन म्हणून आंतरजातीय विवाह करत नाही, सहसा असे आंतरजातीय विवाह हे तात्कालीन आकर्षणामुळे ठरतात. त्यामुळे मुळातच दोन्हीकडच्यांच्या मते ते अस्वीकारार्ह असूनही कसेबसे मान्य केले गेलेले असतात. त्यामुळे 'उद्या वेळ आली की ह्यांना सरळ दुखावू आणि आपले म्हणणे पुढे रेटू' अशी भूमिका घेता येणे जवळपास अशक्य ठरते.
३. साधकबाधक, खुलेपणाने चर्चा करून निर्णय घ्यायला हा एखाद्या कॉर्पोरेट कंपनीसमोरचा व्यावसायिक प्रश्न नाही. येथे प्रत्येकाला मॅसिव्ह इगो असतो, तीव्र विचार असतात, हक्क असतो, डोमेस्टिक व्हायोलेन्स समाजासमोर येणार नाही अशी काहीशी समजूत असते.
(पुन्हा माफ करा, पण मायबोलीवर अनेकदा तद्दन पुस्तकी, वरवर छान छान वाटणारे आणि अजिबातच प्रत्यक्षात आणता न येणारे उपाय सुचवले जातात.)
नवरा नंतर नेभळट निघाला हे
नवरा नंतर नेभळट निघाला हे कळून फ्रस्ट्रेट होण्यापेक्षा दोघांनी आधीच आपली मते ठामपणे एकमेकांपुढे मांडून बघणे बरे नाही का?<<<
हे चांगलेच आहे.
पण प्रेमात आकंठ बुडालेले शपथा घेत असतात 'वाट्टेल त्या परिस्थितीत आपण एकत्र राहू' ह्याच्या. त्यांचे इतके आकलन असू शकत नाही की उद्या मला मटन करायला लावतील तेव्हा वाद होतील आणि नवरा नेभळट निघेल.
त्यामुळे 'ठामपणे मते मांडणे' हा प्रकार दुर्दैवाने होत नाही.
(पुन्हा लिहितो - हा प्रकार व्हायला हवा, असे वाटत असेल तर सहमत आहे, पण तरीही होत नाही कारण ठाम मते मांडण्याचा अधिकार दुर्दैवाने इतर लोकांकडे केव्हाच गेलेला असतो कारण त्यांनी लग्नाला परवानगी देणे, काही प्रमाणात आर्थिक भार उचलणे, वयाने मोठे असणे, वगैरे प्रकार आधीच केलेले असतात).
१. मुलामुलींचे वय सुमारे
१. मुलामुलींचे वय सुमारे पंचविशीच्या आतबाहेर असते. आर्थिक व अनेकदा वैचारीक परावलंबित्व पालकांवर असते. >>>> not always
२. कोणी सहसा उगाच फॅशन म्हणून आंतरजातीय विवाह करत नाही, सहसा असे आंतरजातीय विवाह हे तात्कालीन आकर्षणामुळे ठरतात. त्यामुळे मुळातच दोन्हीकडच्यांच्या मते ते अस्वीकारार्ह असूनही कसेबसे मान्य केले गेलेले असतात. त्यामुळे 'उद्या वेळ आली की ह्यांना सरळ दुखावू आणि आपले म्हणणे पुढे रेटू' अशी भूमिका घेता येणे जवळपास अशक्य ठरते. >>> Partially agree
३. साधकबाधक, खुलेपणाने चर्चा करून निर्णय घ्यायला हा एखाद्या कॉर्पोरेट कंपनीसमोरचा व्यावसायिक प्रश्न नाही. येथे प्रत्येकाला मॅसिव्ह इगो असतो, तीव्र विचार असतात, हक्क असतो, डोमेस्टिक व्हायोलेन्स समाजासमोर येणार नाही अशी काहीशी समजूत असते.
>>>>again so called 'samaj' but its fact
अवांतर पोस्ट - बेफिकीर, मी
अवांतर पोस्ट -
बेफिकीर, मी आयुष्यात स्वतः प्रत्यक्षात आणलेल्या, आसपास अनुभवलेल्या गोष्टीच इथे लिहिते. माझ्याकडे पुस्तकी लिहिण्याइतकी कल्पनाशक्ती अथवा प्रतिभा नाही. तुम्हाला पटत नसतील तर ठीकच आहे की. कुणाला पटावं असा अजिबातच अट्टाहास नाही.
धन्यवाद
वरदा, अनुमोदन!
वरदा, अनुमोदन!
पुन्हा माफ करा, पण मायबोलीवर
पुन्हा माफ करा, पण मायबोलीवर अनेकदा तद्दन पुस्तकी, वरवर छान छान वाटणारे आणि अजिबातच प्रत्यक्षात आणता न येणारे उपाय सुचवले जातात <<<
माझ्या एवढ्याश्या जगाबाहेर काही अस्तित्वातच नाही हे ठरवलेलं असलं की झालं.
ज्या गोष्टी अनेकिंच्या अनुभवातून आलेल्या आहेत, अनेकिंच्या बाबतीत घडलेल्या आहेत त्या केवळ तुम्हाला माहित नाहीत म्हणून तद्दन पुस्तकी वगैरे झाल्या हे फारच विनोदी आहे.
एक्झॅक्टली वरदा.
एक्झॅक्टली वरदा.
वरदा... "...पूर्ण विचारांती,
वरदा...
"...पूर्ण विचारांती, साधकबाधक खुलेपणाने चर्चा करून मगच निर्णय घ्यायचा....." ~ प्रत्यक्षात असे क्वचित घडते. बेफिकीर म्हणतात त्याप्रमाणे अनेकदा असे विवाह त्या वयातील आकर्षणाला प्रेम समजले गेल्यामुळे होत असल्याने तिथे पूर्ण विचाराला स्थान नसतेच....अपवाद असतील जरूर पण ते तो नियम सिद्ध करण्यापुरतेच.... बारावी नापास झालेला मुलगा आणि बी.कॉम. झालेली मुलगी प्रेमविवाह करत होते....मुलगा मोटार ट्रान्स्पोर्ट कंपनीत गोण्या मोजायला तर मुलगी एका को-ऑपरेटिव्ह बॅन्केत टायपिस्ट....किती पगार असेल दोघांचा मिळून ? सहा हजार होता (ही चौकशी मी स्वतः केली होती). मुलीला लाख वेळा समजावून सांगितले...एकुलती एक. मुलग्याला तर डोके नव्हतेच मुळात. आपण प्रेमात आहोत ही गोष्टच त्याच्या दृष्टीने गौरवाची होती. दोघेही एकाच जातीचे असल्याने तिकडून विरोध होणे शक्य नव्हते. पण शैक्षणिक तफावत जरी विचारात घेतली तर त्या मुलाला मुलीने वर मानू नये या विचारावर मी आणि मुलीचे चुलते ठाम होते. आईबाप तर संतापाने पेटलेलेच होते. मुलीने जीवाचे काही बरेवाईट करून घेऊ नये म्हणून मध्य मार्ग काही निघतो का ते आम्ही पाहात होतो.
पण नाही....मुलगीने "परवानगी द्या नाहीतर आम्ही रंकाळ्यात उडी टाकणार..." अशी वरून पोकळ जरी वाटत असली तरी धमकी ही दिलीच. मरा म्हटले सार्यांनी....आणि वाडीला जाऊन लग्न लागले. ग्रॅज्युएट मुलगी तीही बर्यापैकी कमावती असलेली, घरी आली म्हणून मुलाकडील मंडळीना आनंद होणे स्वाभाविकच आहे. पण त्यानंतर तो मुलगा लाजेकाजेस्तव का होईना पुढील शिक्षण पूर्ण करील असे आम्हाला जे वाटत होते त्याला फटकारा बसलाच. मुलीच्या पगाराच्या आधारे हा अंबानी होऊन बिझिनेस सुरू करणार म्हणू लागला. काय स्वप्न ? आणि कशाच्या जोरावर ? तर बायकोच्या तुटपुंज्या वेतनावर. सासूसासरे म्हणू लागले की सूनबाईने सारा पगार त्यांच्याकडेच दिला पाहिजे...नवर्याचे मत 'तुमचा काही संबंध नाही'....दोघांनाही आता घराबाहेर काढले आहे....माहेर बंद अगोदरच झाले होते....भाड्याचे घर पाहिले...दोन खोल्यांच्या जुन्या घराला तीन हजार भाडे....यांचा पगार सहा हजार....उरलेल्या तीन हजारात आता कसे दिवस काढतील हे प्रेमवीर ?
त्यामुळे पूर्ण विचार तसेच साधकबाधक विचार असला प्रकार अशा अडाण्यांच्याबाबतीत अर्थशून्य ठरतो.
पूर्णपणे असहमत! १.
पूर्णपणे असहमत!
१. मुलामुलींचे वय सुमारे पंचविशीच्या आतबाहेर असते. आर्थिक व अनेकदा वैचारीक परावलंबित्व पालकांवर असते.
२. कोणी सहसा उगाच फॅशन म्हणून आंतरजातीय विवाह करत नाही, सहसा असे आंतरजातीय विवाह हे तात्कालीन आकर्षणामुळे ठरतात. त्यामुळे मुळातच दोन्हीकडच्यांच्या मते ते अस्वीकारार्ह असूनही कसेबसे मान्य केले गेलेले असतात. त्यामुळे 'उद्या वेळ आली की ह्यांना सरळ दुखावू आणि आपले म्हणणे पुढे रेटू' अशी भूमिका घेता येणे जवळपास अशक्य ठरते.
३. साधकबाधक, खुलेपणाने चर्चा करून निर्णय घ्यायला हा एखाद्या कॉर्पोरेट कंपनीसमोरचा व्यावसायिक प्रश्न नाही. येथे प्रत्येकाला मॅसिव्ह इगो असतो, तीव्र विचार असतात, हक्क असतो, डोमेस्टिक व्हायोलेन्स समाजासमोर येणार नाही अशी काहीशी समजूत असते. >>>>>>>>
मी ह्या प्रतिसादाशी पूर्णपणे असहमत!
हे असंच्या असं अरेंज मैरेज मध्ये होत नाही का?
नवरा नंतर नेभळट
नवरा नंतर नेभळट निघाला>>>>>>>>
जुन्या लोकांची मानसिकता बदलणं कठीण असतं>>>>
हे ही असंच्या असं अरेंज मैरेज मध्ये होत नाही का?
बर्याच दिवसांनी चर्चेला
बर्याच दिवसांनी चर्चेला कौटुंबिक जिव्हाळ्याचा विषय मिळाला.
तरी अजून आंतरजातीय विवाह नक्कोच म्हणणारे नाही आलेत.
अशोक. - अशा इम्मॅच्युअर
अशोक. -
अशा इम्मॅच्युअर लोकांना ती चुकीच्या निर्णयाची किंमत मोजायलाच लागते. दुर्दैवाने अशा इम्मॅच्युअर लोकांची संख्या जास्त आहे सध्या हेही माहित आहे, आसपास खूपवेळा बघितलेलं आहे. पण म्हणून मॅच्युअर लोक नसतातच, किंवा अत्यंत अल्पसंख्य असतात असंही नाहीये अगदीच.
निर्णय चुकला तर पुढे काय करायचं, नाही, कष्टात रहायचं हे त्या दोघांनीच ठरवायचं आहे. हव्यात कशाला प्रत्येकवेळी घरच्यांच्या/दारच्यांच्या कुबड्या?
मुळात आपला निर्णय - आपली जबाबदारी हे आपल्या सामाजिक मानसिकतेत बसत नाही आणि त्यामुळे आईवडिल बहुतेक वेळा मुलामुलींना परस्वाधीन रहायची सवय लावतात. मग हे असे सगळे प्रॉब्लेम्स निर्माण होण्यात भर पडते. म्हणूनच लिहिलं होतं की निदान स्वतःचा विचार करायला तरी सुशिक्षित मुलींनी शिकलं पाहिजे. संघर्ष सगळीकडेच आहे. चुकीच्या निर्णयात, स्वतः घेतलेल्या निर्णयात, आईवडिलांनी लादलेल्या निर्णयात. तुम्ही निवडायचा कुठला लढायचा ते... पण एकदा निर्णय घेतल्यावर निभावायची हिंमत पाहिजे.
संदीप आहेर, अॅरेंज्ड
संदीप आहेर, अॅरेंज्ड मॅरेजमध्ये असे होत नाही असे कोणाचे म्हणणेच नाही आहे.
हे म्हणजे त्या दुसर्या धाग्याप्रमाणेच झाले. काँग्रेसचा विरोध म्हणजे संघिष्टच असला पाहिजे. असे मुळीच नाही.
माझे म्हणणे हे आहे की ज्यांना हे सल्ले दिले जात आहेत त्यांना ते सल्ले बहुतेकदा 'न मानवणारे', 'कृतीत न आणता येणारे' असतात. मग तरीही असा विवाह करायचा असला तर पळून जावे, वेगळे राहावे वगैरे!
=========
वरदा,
तुम्ही घेतलेले अनुभव इतरांना लागू होतील असे गृहीत धरून 'शिक्षणाचा वगैरे का ही ही उपयोग नाही' अश्या कमेंट्स करणे हे तुम्हाला चमत्कारीक वाटत नाही का? तुम्हाला खुलेपणाने, साधकबाधक चर्चा करता आली हे सुदैव आहे हेही तुमच्या लक्षात येत नाही का? त्याचे श्रेय तुम्ही स्वतःच्या 'विचारपूर्वक केलेल्या कृतीला' देत आहात, पण असे लाखो लोक आहेत ज्यांच्या मनात येऊनही त्यांना असे वागणे अशक्य असते. त्यांच्या शिक्षणाचा, सुशिक्षित असण्याचा, सुसंस्कृत असण्याचा काहीही उपयोग नाही हे म्हणण्याचा तुम्हाला काही अधिकारच असू शकत नाही असे माझे तरी स्पष्ट मत आहे.
वरदा : प्रत्येक पोस्टसाठी +१
वरदा : प्रत्येक पोस्टसाठी +१
मुलीच्या पगाराच्या आधारे हा
मुलीच्या पगाराच्या आधारे हा अंबानी होऊन बिझिनेस सुरू करणार म्हणू लागला. काय स्वप्न ? आणि कशाच्या जोरावर ? तर बायकोच्या तुटपुंज्या वेतनावर. >>>
काय वाईट होतं त्यात.
अशा इम्मॅच्युअर लोकांना ती
अशा इम्मॅच्युअर लोकांना ती चुकीच्या निर्णयाची किंमत मोजायलाच लागते. दुर्दैवाने अशा इम्मॅच्युअर लोकांची संख्या जास्त आहे<<<
अच्छा, म्हणजे ज्यांना तुमच्याप्रमाणे साधकबाधक चर्चा वगैरे करण्याची हिम्मत झाली नाही, करता आली नाही, करू देण्यात आली नाही, ते सगळे अपरिपक्व आणि त्यामुळे त्यांना हालअपेष्टा सहन कराव्याच लागणार! अरे वा?
त्यात पुन्हा त्यांच्या शिक्षणाला, सुशिक्षित असण्याला, सुसंस्कृत असण्याला का ही ही अर्थही नाही. व्वा!
जग अश्याच लोकांनी भरलेले आहे आणि त्यांच्यासमोरचेच प्रश्न अधिक तीव्र आहेत. ज्यांना साधकबाधक व खुलेपणाने चर्चा करण्याची संधी (कशाहीमुळे का असेनात पण) मिळाली त्यांनी स्वतःला पूर्णपणे परिपक्व व इतरांना अपरिपक्व समजणे ही मोठी गफलत आहे. पुन्हा एकवार माफी, स्पष्टपणाबद्दल!
अशोकमामा तुम्हांविषयी पुर्ण
अशोकमामा तुम्हांविषयी पुर्ण आदर आहे,
पण ह्या वाक्याला तितकाच विरोध.
मुलीच्या पगाराच्या आधारे हा अंबानी होऊन बिझिनेस सुरू करणार म्हणू लागला. काय स्वप्न ? आणि कशाच्या जोरावर ? तर बायकोच्या तुटपुंज्या वेतनावर. >>>
अंबानी नाही पण नारायण मुर्तींनी नक्कीच बायकोच्या पगारातून बिझिनेस सुरू केला.
काय वाईट झालं का,
आपल्या आसपासची परिस्थिती
आपल्या आसपासची परिस्थिती बदलायचे प्रयत्न करणं आपल्याच हातात असतं हाही स्वानुभवच आहे. आणि कुठलाही निर्णय - अगदी आईवडिलांचं तंतोतंत ऐकायचाही - हा आपण आपला इन्फॉर्म्ड घ्यावा, नंतर त्या निर्णयाबद्दल तक्रार करू नये यात मॅच्युरिटी आहे.
आणि ज्यांना खरंच एखाद्या रीतिने वागायचे असेल त्यांना सगळ्या परिस्थितीच्या विरुद्ध जाऊनही वागताना पाहिलंच आहे. अगदी अर्धशहरी ग्रामीण भागात सुद्धा. तेव्हा आपण काय करायचं हे प्रत्येकाच्या हातात असतं.
माझे म्हणणे हे आहे की ज्यांना
माझे म्हणणे हे आहे की ज्यांना हे सल्ले दिले जात आहेत त्यांना ते सल्ले बहुतेकदा 'न मानवणारे', 'कृतीत न आणता येणारे' असतात. मग तरीही असा विवाह करायचा असला तर पळून जावे, वेगळे राहावे वगैरे! >>>>>
बेफी,
हा सोपा उपाय आहे तो अनेक वर्ष अमंलात आणला जातोच आहे,
पण अवघड पण जगलं पाहिजे नां,
तेच तुम्ही जे म्हणत होतात "two states" च्या धाग्यावर का एवढी पंचाईत करायची आई वडिलांना खूष करायची जर विचार बोल्ड असतील तर....
पण अवघड पण जगलं पाहिजे नां,
Pages