साहित्य -
एक रेफ्रिजिरेटर (चालू)
आईसक्यूब ट्रे (न गळणारा)
पाणी (प्यायचे)
कृती -
१. एका तांब्यात (हे एका प्रकारचे भांडे असते) पाणी घ्यावे.
२. स्वच्छ धुतलेल्या आईसक्यूब ट्रे मध्ये ते हळूहळू ओतावे*.
३. पाणी भरलेला हा ट्रे न हिंदकाळता फ्रीजच्या डीप फ्रीजर मध्ये ठेवावा. (कृतीचा हा भाग फार अवघड आणि महत्वाचा आहे. भरलेला ट्रे एका हातात धरुन त्यातले पाणी न सांडता दुसर्या हाताने आधी फ्रीजचा आणि मग डीप फ्रीजरचा दरवाजा उघडणे हे एक परिश्रमसाध्य स्कील आहे.)
४. आता डीप फ्रीजचा आणि मग फ्रीजचा दरवाजा बंद करावा.
५. तुमच्या फ्रीजच्या लायकी प्रमाणे आणि तुमच्याकडे किती वेळ सलग वीज असते त्याप्रमाणे कधीतरी बर्फ तयार होईल.
६. बर्फ वापरायच्या वेळी तो ट्रे डायगोनली पकडून धुणे पिळल्याप्रमाणे हाताची हालचाल करावी. हे करताना काळजी घ्यावी कारण काही चुकार आईसक्यूब्स एकदम उडी मारुन नको तिथे पडू शकतात.
७. अशा प्रकारे तयार झालेला बर्फ इतर अनेक कृतीत वापरता येतो उदा. हळूच कॉलरमागून शर्टात टाकणे इ.इ.
* ही स्टेप करताना पाण्याशी गोड बोलल्यास चांगले आणि त्याला शिव्या घातल्यास खत्रूड आकाराचे क्यूब्स तयार होतात म्हणे. http://rationalwiki.org/wiki/Water_memory
फक्त इच्छाधारी नागांनाच नव्हे तर पाण्यालाही मेमरी असते हेच यावरुन सिद्ध होते.
मस्त कृती! निवडक दहात! फार
मस्त कृती! निवडक दहात!
फार निगुतीने करावा लागणारा प्रकार आहे हा!
रेफ्रिजरेटर नसेल तर काय
रेफ्रिजरेटर नसेल तर काय वापरता येईल?
पाण्याऐवजी दुध, सरबत असे पदार्थ वापरले तर चालतील का?
अनवट पाककृती !!! फोटो असता
अनवट पाककृती !!!
फोटो असता तर अजून बहार आली असती
रेफ्रिजरेटर नसल्यास काय
रेफ्रिजरेटर नसल्यास काय वापरता येईल?
आमच्या गावात लोड शेअरिंगमुळे वीज १४ तास नसते. त्यामुळे दुसरा पर्याय सुचवा.
स्टेप करताना पाण्याशी गोड
स्टेप करताना पाण्याशी गोड बोलल्यास चांगले आणि त्याला शिव्या घातल्यास खत्रूड आकाराचे क्यूब्स तयार होतात >>:) :
आईसक्यूबच्या ट्रे ऐवजी
आईसक्यूबच्या ट्रे ऐवजी स्टीलच्या वाट्या वापरल्यास? त्यातून बर्फ सोडवताना >>बर्फ वापरायच्या वेळी तो ट्रे डायगोनली पकडून धुणे पिळल्याप्रमाणे हाताची हालचाल करावी. << या कृतीचे काय आणि कसे करावे हे कृपया सचित्र द्या.
बाकी तुमचे शिक्षकाचे कौशल्य इथेही दिसून येते हं!
जाई +1. क्रमवार फोटो येउद्या
जाई +1. क्रमवार फोटो येउद्या आता...
एका तांब्यात (हे एका प्रकारचे
एका तांब्यात (हे एका प्रकारचे भांडे असते) >> एकपे रहो जी. तांब्या बोलो नही तो भांडे बोलो.
एका तांब्यात (हे एका प्रकारचे
एका तांब्यात (हे एका प्रकारचे भांडे असते) पाणी घ्यावे. >>>
एक रेफ्रिजिरेटर (चालू) >>> रेफ्रिजरेटरबरोबर हे करणारा माणूसही चालू असेल तर बर्फ कोणत्या प्रकारचा तयार होईल?
फ्रीझर ला गुरूत्वाकर्षणाचे नियम लागू होत नाहीत. तेथे प्रचंड शीत उर्जा असते. तुम्ही बर्याच वेळा दार उघडल्यावर वाफेसारखे काहीतरी बाहेर पडताना पाहिले असेलच. कधीकधी ट्रे च्या एका बाजूला बरेच मोठे तर दुसर्या बाजूला जेमतेम स्कॄ ड्रायव्हरने उचकटता येतील असे क्यूब जमा होतात. काही सायंटिस्ट लोक त्याचे कारण म्हणजे फ्रीझर मधे आधीच ठेवलेली खोबरे ई ची पाकिटे ट्रे च्या खाली एका बाजूला असल्याने तो तिरपा बसतो वगैरे सांगतात. पण विज्ञानाला अजून सर्व माहीत नाही.
एक रेफ्रिजिरेटर (चालू)>>>
एक रेफ्रिजिरेटर (चालू)>>> चालूमधला च चकलीचा की चपलेचा?
आगावा.. उन्हाळ्याच्या सुट्टी
आगावा.. उन्हाळ्याच्या सुट्टी लागली आणी तुझा वेळ काही केल्या जात नाहीये ना ????
येस... आज पहिले पान पाहुन
येस... आज पहिले पान पाहुन माझीही अशीच काहितरी पाकृ द्यायची ईच्छा झाली होती
फोटो असता तर अजून बहार आली असती >>> खरच की... आगावा गुगलसर्च करुन टाकायचा ना एखादा फोटो.. लोक तेच करतात
पाणी (प्यायचे) >> प्यायचे मग
पाणी (प्यायचे) >> प्यायचे मग ओतायला कुठून आणायचे?
नीधप, तुम्ही फारच उत्तम
नीधप, तुम्ही फारच उत्तम प्रश्न विचारला आहे.
स्टीलच्या वाटीत बर्फ लावल्यास त्यात थोडे साधेपाणी सोडून बर्फ वितळू लागला की तो सोडवून घ्यावा किंवा वाटी उलटी करुन तिच्या वर हातोडा मारावा किंवा वाटी जोरात किचन कट्ट्यावर आपटावी.
फारेंड यांचा मुद्दा चिंतनीय आहे. वरील कृती मध्ये डीप फ्रिजर रिकामा आहे हे गृहीत धरले आहे (होपिंग अगेन्स्ट द होप म्हणतात ते हे). खरे तर त्यात बर्फ बनलेले योगर्ट, सुके खोबरे, त्याच्या अस्तित्वाचे गूढ वाढवणारा चमचा, वूली मॅमथ असे काहीही असू शकते.
वूली मॅमथ डीप फ्रीजरमध्ये
वूली मॅमथ डीप फ्रीजरमध्ये जिवंत राहील का?
ता.क. - 'राहील' असे विकिपीडिया म्हणतो आहे. रच्याकने, यावरून 'हत्तीला तीन स्टेपमध्ये फ्रीजमध्ये कसे ठेवाल?' हा अजरामर बालजोक आठवला. यानंतर जोकची खुमारी वाढवायला अनुक्रमे 'उंटाला चार स्टेपमध्ये फ्रीजमध्ये कसे ठेवाल?' आणि 'एकदा सिंहाच्या वाढदिवसाच्या पार्टीला सगळे प्राणी जातात पण एक प्राणी जात नाही. का?' हे जोक सांगावेत.
नवे ता.क. - या ताकाचे क्यूब करून लस्सीत घालू शकतो ना?
सर two मिनिट्स maggi नूडल्स
सर two मिनिट्स maggi नूडल्स ची पाकृ पण दिलीत तर फार बर होईल
श्र, जिवंत वूली मॅमथ एकच,
श्र, जिवंत वूली मॅमथ एकच, अनिल कपूर.
बाकीचे सगळे फॉसिल्स.
डीप फ्रिजर रिकामा आहे हे
डीप फ्रिजर रिकामा आहे हे गृहीत धरले आहे >> खाली भरलेला व वरती रिकामा असे अनेक लोकांचे प्रतीक फ्रीज मधे उमटेल अशी एक कल्पना चाटून गेली. हे वाक्य उपमा/अनुप्रास ई च्या मर्यादेबाहेर पडून वाचू नये.
लोकहो हा बाफ सतत वरती राहू द्या. आम्हाला बाफांची नावे वरून खालती वाचायची सवय असल्याने कधी "घटस्फोटांच्या रात्री गारेगार बर्फ" तर कधी "सखे तुझ्या केसांमधले गारेगार बर्फ" वाचले जाते आहे.
(No subject)
खाली भरलेला व वरती रिकामा असे
खाली भरलेला व वरती रिकामा असे अनेक लोकांचे प्रतीक फ्रीज मधे उमटेल>>>
हसणार नव्हते या बाफवर... पण फा ने हशीवलंच
फारेन्डा
फारेन्डा
फारेण्ड... आगाऊ, तेरा
फारेण्ड...
आगाऊ, तेरा बर्फ हॉट जा रहा है..
(No subject)
आम्हाला बाफांची नावे वरून
आम्हाला बाफांची नावे वरून खालती वाचायची सवय असल्याने >>> बाफ वर राहिला तर 'उन्हाळ्यासाठी गारेगार बर्फ घटस्फोटाच्या रात्री ..' असे वाचले जात आहे.
आम्हाला बाफांची नावे वरून
आम्हाला बाफांची नावे वरून खालती वाचायची सवय असल्याने>>>>>
म्हंजे तू चिनी पारंपरिक पद्धतीने वाचतोस की फारएण्डा..
मंजूडी, हा बाफ हसण्यासाठी
मंजूडी, हा बाफ हसण्यासाठी नाहीच ही गंभीर पाकृ आहे हे ओळखल्याबद्दल धन्यवाद.
का हो आआगाऊ, हे सगळे झाल्यावर
का हो आआगाऊ, हे सगळे झाल्यावर हात धुतले तर चालतात काय?
(No subject)
अरारा..... पारच धुतलाय की..
अरारा..... पारच धुतलाय की..
जाई +१ (इतरही सगळे प्रतिसाद
जाई +१
(इतरही सगळे प्रतिसाद +१ कोणी एकालाच अनुमोदन दिलं करत ओरडत येऊ नका.)
आगाऊ, तुमची पाकृ वाचुन माझी आई माझ्या लहानपणी जो बर्फ आम्ही खाल्यावर पाठीवर धपाटा द्यायची, त्या बर्फाची चव जिभेवर आणि धपाट्याची आठवण पाठीवर रेंगाळली.
Pages