नि. ग वर नाडण वर चर्चा झालीच आहे तर चला मी तुम्हाला आमच्या गावी/घरी घेऊन जाते. नाडण हे गाव आहे हापुससाठी प्रसिध्द असलेल्या देवगड तालुक्यात. हे एक अगदि छोटसं गाव आहे, ज्याची वस्ती असेल दोन अडीच हजारापर्यंत. कोकण रेल्वे ने वैभववाडी स्टेशन पासून ५० /६० कि. मी. दूर आहे. मुंबई गोवा हायवे तळेरे येथे सोडुन पाटगाव फणसगाव मार्गे ही जाता येतं. हे माझ्या सासरचे गाव आहे. दोन छोट्या टेकड्यांच्या मधे हे वसले आहे आणि मधुन जातो एक ओढा ज्याला आम्ही वहाळ म्हणतो. घरं सगळी थोडी उंचावर आहेत त्यामुळे पाय-याना ( कोकणच्या भाषेत पावठण्या) पर्याय नाही. चला, आता घर दाखवते. हे घर माझ्या आजे सास-यानी स्वतः बांधले आहे. त्यांना बांधकामाची जाण होती कोणतेही शिक्षण न होता सुध्दा.
हा आहे रस्ता आमच्या घराकडे जाणारा.
From mayboli
आता ह्या पाय-या उतरून आलो आपण खळ्यात म्हणजे अंगणात. घराची रचना ओटी, माजघर, स्वयंपाकघर, देवघर, आणि पससदार अशी आहे.
From mayboli
हे आहे तुळशी वृंदावन. तो जो दगडी कोनाडा दिसतो आहे, त्यात संध्याकाळी निरांजन ठेवले की वारा न लागता तेवत राहते शांतपणे तुळशीपाशी.
From mayboli
मुख्य घराला जोडून माडी बांधलेली आहे. दोघांना जोडणारा छोटासा पूल
From mayboli
हे आहे परसदार ज्याला कोकणात आगर म्हणतात.
From mayboli
पोफळी अशा चव-या ढाळताहेत. पोफळीना वेढून मिरीवेल, आणि नागवेली उभ्या आहेत.
From mayboli
एका हौदात ही निळी कमळं डुलताहेत.
From mayboli
हे जवळून
From mayboli
पूजेसाठी लागणारी फुलं आगरात असतातच. ही डबल तगर.
From mayboli
हा चाफा
From mayboli
आणि ह्या जास्वंदी
From mayboli
From mayboli
हा कवठी चाफा
From mayboli
आमच्या आगरात बर्ड ऑफ पॅराडाईज, हेलिकोनिया अशी विलायती झाडे ही आहेत बरं का
From mayboli
From mayboli
हे आहे वडाचे बोन्साय. अगदी पारंब्या आल्या आहेत.
From mayboli
कोकण प्रसिध्द आहे आंब्यांसाठी, पण इथले चिकू लाजवाब. असतात जरासे लांबट. साल असते बाहेरून खरखरीत आणि जाड. पण चवीला साखर फि़की पडेल इतके गोड आणि रसाळ.
From mayboli
हे आहे पेरवीणीचे फुलं. आमच्याकडे पेरूच्या झाडाला पेरवीण, चिकूच्या चिकवीण, लिंबाच्या लिंबीण असं म्हणतात. जसं शेजारच्या जोशी बाईना आपण जोशीण म्हणु तसं.
From mayboli
हे काय आहे ते सांगण्याची गरजच नाही.
From mayboli
वाळत टाकलेल्या सुपा-या आणि कोकमं
From mayboli
From mayboli
हा आमचा जॉनी. सदा लक्ष ठेउन असतो घरावर. जरा खुट्ट वाजलं की धावून जाणारा, मुलांनी मात्र कितीही त्रास दिला तरी शांत असतो. ह्याची शेपटी म्हणजे कडबोळं जणु.
From mayboli
आणि अंगाच मुटकुळं करुन गुरगुटुन झोपलेली आमची मनी. कुत्रा आणि मांजर हवीतच घरात.
From mayboli
घरं उतारावर असल्याने टेकडी चढून वर सड्यावर जाण्यासाठी अश्या पाय-या बांधलेल्या आहेत. ह्याच कोकणातल्या घाट्या. ही आमची घाटी माझ्या आजे सास-यांनी स्वतःच्या हातानी स्वतः कष्ट करुन बांधलेली आहे. त्यामुळे तिचे जास्त कौतुक आम्हाला. घाटीच्या दोन्हि बाजुला आंब्याच्या बागा आहेत.
From mayboli
आमराईचा दूरून व्ह्यु.
From mayboli
आमराई जवळून
From mayboli
From mayboli
From mayboli
लेकुरवाळा फणस. मे महिन्यात फणसाची भाजी, तळलेले गरे, फणसाची साट म्हणजे फणसपोळी, फणसाच सांद्णं असे विविध प्रकार बनत असत्तात.
From mayboli
करवंदाची जाळी
From mayboli
सड्यावरुन दिसणारा सूर्यास्त.
From mayboli
असं हे आमचं घर. आम्हाला सगळ्यांना अति प्रिय असणार. आमच्या कुटुंबाच वैशिष्ट्य म्हणजे आमचं सहा पिढ्यांच एकत्र कुटूम्ब आहे आणि ह्या घरी ते सगळे एका स्वयंपाकघरात, एकत्र, मजेत, आनंदात, रहात आहेत. आज तिथे पंधरा जण रहात आहेत. काही जण नोकरी निमित्ताने मुंबईला पुण्याला किंवा अगदी परदेशी ही गेले आहेत पण त्यांची घराबद्दलची, कुटुंबाबद्द्लची ओढ तिळमात्र ही कमी झालेली नाही. माझे सासरे त्यांच्या माणसांशी पत्राद्वारे संपर्कात रहात आता पुढची पिढी फोन, फेसबुक, वॉट्सअॅप, इमेल ने संपर्कात असते एवढाच काय तो फरक. बाँडिंग तसूभरही कमी नाही.
काय मस्त गाव आहे. तळेरेला
काय मस्त गाव आहे. तळेरेला माझी चुलतबहीण होती. आता नाही ती. तिच्याकडे कधी जाणे झाले नाही.
आमचे बहुतेक नातेवाईक कोकणात. अधून मधून फेरी असतेच माझी.
वॉव..सही..एक दिवसतरी अशा घरी
वॉव..सही..एक दिवसतरी अशा घरी राहायला मिळावं, ही इच्छा
कसलं मस्त घर आहे! एक दिवसतरी
कसलं मस्त घर आहे!
एक दिवसतरी अशा घरी राहायला मिळावं, ही इच्छा >> +१००
फार फार सुरेख आहे सगळं.
फार फार सुरेख आहे सगळं. नशीबवान आहात.
चिनूक्स +१
Wow! So nice.. चिनूक्स +१
Wow! So nice..
चिनूक्स +१
मस्त! चिनूक्स् +१
मस्त!
चिनूक्स् +१
मस्त मस्त! माझ्या आत्यचं घर
मस्त मस्त! माझ्या आत्यचं घर पण देवगडात आहे. नारिंग्रे नावाचं छोटसं गाव. असच सगळं आहे. फार फार आठवण झाली त्या घराची.
वरचे प्रतिसाद वाचून जाणवलं की कितीतरी उन्हाळी सुट्ट्यांत इथे राहायला मिळालं हे माझं भाग्य!
खूप छान ! \ माझेही घर कोकणातच
खूप छान !
\
माझेही घर कोकणातच आहे .... अप्रतिम फोटो .
शेअर केल्याबद्दल आभार !
चिनुक्स +१... कसलं मस्त आहे
चिनुक्स +१...
कसलं मस्त आहे सगळंच.. निवांतपणा भरून राहीला आहे फोटोमध्ये.
अप्रतिम! खरंच नशिबवान
अप्रतिम! खरंच नशिबवान आहात!
तुम्ही सर्व जण असेच सलोख्यात रहा, हीच सदिच्छा!
भार्री!!
भार्री!!
कसल मस्त घर आहे आणि आगदि तिथे
कसल मस्त घर आहे आणि आगदि तिथे जाऊन आल्यासारख वाटल...
तुमच हे घर असेच खेळिमिळेने कायम रहो हि सदिच्छा
-----------------------------------------------------------------------
फुलं आणि फळं ह्यांचे फोटो आगदिच भारि
मस्त आहे गाव एकदम. काही फोटो
मस्त आहे गाव एकदम. काही फोटो बघून आमच्या कोकणातल्या घराची आठवण आली. तुमच्याकडे तिथे माणसं रहात असल्यामुळे चांगली काळजी घेतली गेलेली दिसतेय.
आमच्याकडे घराकडे जाणारी जी घाटी आहे तो नुसताच लाल मातीचा रस्ता आहे, पायर्या नाहीत त्याला. दोन्ही बाजूंनी तुमच्या फोटोतल्या सारखी झाडं आहेत.
मस्त, फार सुरेख घर आहे
मस्त, फार सुरेख घर आहे तुमचे
रच्याकने, या प्रकारची तुळशीवृंदावनं मी कोकणात, गोव्यात पहिल्यांदा बघीतली, ईतर ठिकाणी बघण्यात आल्याचे आठवत नाही.
मनीमोहोर अगं चुकून कोकणातल्या
मनीमोहोर अगं चुकून कोकणातल्या आमच्या घराचे फोटो टाकलेस का?
अगदी जॉनी नावासकट सगळं सेम ़ आहे म्हणून म्हट्लं!
कित्ती कित्ती सुंदर फोटो
कित्ती कित्ती सुंदर फोटो हेमाताई. वॉव.
दोन वर्षापूर्वी डोंबिवलीहून गाडी करून आमच्या गावाला जातांना देवगडमार्गे न जाता फणसगाव, मोंड, नाडणमार्गेच (तुमच्या घरावरूनच), आमच्या गावाला गेलो होतो. खूप मस्त आहे तुमचं घर आणि तुळशीवृंदावन अप्रतिम. चला तुमच्यामुळे यंदा गावाला गेल्याचा फील आला.
शुम्पी, माझी चुलतनणंद राहते नारिंग्रे येथे.
मस्त! खूप भाग्यवान आहात
मस्त!
खूप भाग्यवान आहात तुम्ही!
अहाहा.. काय अप्रतिम घर आणि
अहाहा.. काय अप्रतिम घर आणि परिसर, एकदम निसर्गाच्या सान्निध्यात, शांत, निवांत, प्रसन्न.
खूप खूप सुंदर आहे तुमचं घर.
सुंदर!!! चिनुक्स +४ (म्हणजे ४
सुंदर!!!
चिनुक्स +४ (म्हणजे ४ दिवस रहायला मिळावे).
कोकण - निसर्गाने भरभरुन दिले
कोकण - निसर्गाने भरभरुन दिले आहे... लोकंपण तशीच साधीसुधी!
अहाहा!!!!! पहिले दोन फोटो
अहाहा!!!!! पहिले दोन फोटो पाहुन उद्गारलो. खुपच सुंदर
मामाचा गाव आणि घर असावं तर असंच.
मी कुणकेश्वर ते विजयदुर्ग प्रवासात हि गावे बाहेरूनच पाहिली होती. तेंव्हाच आवडलेली. अतिशय शांत आणि निसर्गमय परीसर आहे.
ओह्हो!!! किती सुंदर.... घर,
ओह्हो!!! किती सुंदर.... घर, बाग, माडी, पूल, फुलं, झाडं,फळं.. सगळच अप्रतिम
ममो किती ल्क्कीयेस गं..
मी तर अजून कोकण लांबूनही पाहिलेलं नाही...
खूप बघावसं वाटतंय आता प्रत्यक्षात
मस्त मस्त मस्त!
मस्त मस्त मस्त!
किती सुरेख! कोकणातल्या
किती सुरेख! कोकणातल्या आजोळाची आठवण झाली
खूप सुरेख घर आहे तुमचं. आजूबाजूचा परिसर तर फारच सुंदर आहे.
मस्त
मस्त
माझ माहेर आहे कोकणात
माझ माहेर आहे कोकणात दापोलीजवळ. यावेळच्या कोकणवारीत घराचे फोटो काढलेत आणि इथे टाकलेत. लिंक देईन नंतर.
माझेही घर कोकणातच आहे ....
माझेही घर कोकणातच आहे .... अप्रतिम फोटो . >>++११
आता जाणार आहे ... तेव्हा इथे फोटो देइन...
घर मस्तच आहे तुमच.. आता जाणार
घर मस्तच आहे तुमच..
आता जाणार आहे ... तेव्हा इथे फोटो देइन...>>>>> यु टु सृष्टी?? ग्रेट्ट..
मनीमोहोर्,किती छान लिहीले
मनीमोहोर्,किती छान लिहीले आहेस.अगदी तुझ्याबरोबर फिरते आहे असे वाट्ले.फोटो किति मस्त आलेत.सर्व फुलान्चा सगन्ध इथपर्यन्त पोहोचला.कोकण स़़जीव करणारे तुझे शब्द नि चित्र आहाहा.तुमच्या कुटूंबाला सलाम.फणसाचा व आंब्याचा रसाळ्पाणा तुझ्या लिहिण्यात नक्किच आहे.........
व्वाह. किती सुंदर! तुम्ही
व्वाह. किती सुंदर! तुम्ही खरोखर भाग्यवंत आहात!
फोटो सगळेच झकास!!
<<आमच्या कुटुंबाच वैशिष्ट्य म्हणजे आमचं सहा पिढ्यांच एकत्र कुटूम्ब आहे आणि ह्या घरी ते सगळे एका स्वयंपाकघरात<< __/|\__ हे खुप आवडलं.
Pages