नि. ग वर नाडण वर चर्चा झालीच आहे तर चला मी तुम्हाला आमच्या गावी/घरी घेऊन जाते. नाडण हे गाव आहे हापुससाठी प्रसिध्द असलेल्या देवगड तालुक्यात. हे एक अगदि छोटसं गाव आहे, ज्याची वस्ती असेल दोन अडीच हजारापर्यंत. कोकण रेल्वे ने वैभववाडी स्टेशन पासून ५० /६० कि. मी. दूर आहे. मुंबई गोवा हायवे तळेरे येथे सोडुन पाटगाव फणसगाव मार्गे ही जाता येतं. हे माझ्या सासरचे गाव आहे. दोन छोट्या टेकड्यांच्या मधे हे वसले आहे आणि मधुन जातो एक ओढा ज्याला आम्ही वहाळ म्हणतो. घरं सगळी थोडी उंचावर आहेत त्यामुळे पाय-याना ( कोकणच्या भाषेत पावठण्या) पर्याय नाही. चला, आता घर दाखवते. हे घर माझ्या आजे सास-यानी स्वतः बांधले आहे. त्यांना बांधकामाची जाण होती कोणतेही शिक्षण न होता सुध्दा.
हा आहे रस्ता आमच्या घराकडे जाणारा.
From mayboli
आता ह्या पाय-या उतरून आलो आपण खळ्यात म्हणजे अंगणात. घराची रचना ओटी, माजघर, स्वयंपाकघर, देवघर, आणि पससदार अशी आहे.
From mayboli
हे आहे तुळशी वृंदावन. तो जो दगडी कोनाडा दिसतो आहे, त्यात संध्याकाळी निरांजन ठेवले की वारा न लागता तेवत राहते शांतपणे तुळशीपाशी.
From mayboli
मुख्य घराला जोडून माडी बांधलेली आहे. दोघांना जोडणारा छोटासा पूल
From mayboli
हे आहे परसदार ज्याला कोकणात आगर म्हणतात.
From mayboli
पोफळी अशा चव-या ढाळताहेत. पोफळीना वेढून मिरीवेल, आणि नागवेली उभ्या आहेत.
From mayboli
एका हौदात ही निळी कमळं डुलताहेत.
From mayboli
हे जवळून
From mayboli
पूजेसाठी लागणारी फुलं आगरात असतातच. ही डबल तगर.
From mayboli
हा चाफा
From mayboli
आणि ह्या जास्वंदी
From mayboli
From mayboli
हा कवठी चाफा
From mayboli
आमच्या आगरात बर्ड ऑफ पॅराडाईज, हेलिकोनिया अशी विलायती झाडे ही आहेत बरं का
From mayboli
From mayboli
हे आहे वडाचे बोन्साय. अगदी पारंब्या आल्या आहेत.
From mayboli
कोकण प्रसिध्द आहे आंब्यांसाठी, पण इथले चिकू लाजवाब. असतात जरासे लांबट. साल असते बाहेरून खरखरीत आणि जाड. पण चवीला साखर फि़की पडेल इतके गोड आणि रसाळ.
From mayboli
हे आहे पेरवीणीचे फुलं. आमच्याकडे पेरूच्या झाडाला पेरवीण, चिकूच्या चिकवीण, लिंबाच्या लिंबीण असं म्हणतात. जसं शेजारच्या जोशी बाईना आपण जोशीण म्हणु तसं.
From mayboli
हे काय आहे ते सांगण्याची गरजच नाही.
From mayboli
वाळत टाकलेल्या सुपा-या आणि कोकमं
From mayboli
From mayboli
हा आमचा जॉनी. सदा लक्ष ठेउन असतो घरावर. जरा खुट्ट वाजलं की धावून जाणारा, मुलांनी मात्र कितीही त्रास दिला तरी शांत असतो. ह्याची शेपटी म्हणजे कडबोळं जणु.
From mayboli
आणि अंगाच मुटकुळं करुन गुरगुटुन झोपलेली आमची मनी. कुत्रा आणि मांजर हवीतच घरात.
From mayboli
घरं उतारावर असल्याने टेकडी चढून वर सड्यावर जाण्यासाठी अश्या पाय-या बांधलेल्या आहेत. ह्याच कोकणातल्या घाट्या. ही आमची घाटी माझ्या आजे सास-यांनी स्वतःच्या हातानी स्वतः कष्ट करुन बांधलेली आहे. त्यामुळे तिचे जास्त कौतुक आम्हाला. घाटीच्या दोन्हि बाजुला आंब्याच्या बागा आहेत.
From mayboli
आमराईचा दूरून व्ह्यु.
From mayboli
आमराई जवळून
From mayboli
From mayboli
From mayboli
लेकुरवाळा फणस. मे महिन्यात फणसाची भाजी, तळलेले गरे, फणसाची साट म्हणजे फणसपोळी, फणसाच सांद्णं असे विविध प्रकार बनत असत्तात.
From mayboli
करवंदाची जाळी
From mayboli
सड्यावरुन दिसणारा सूर्यास्त.
From mayboli
असं हे आमचं घर. आम्हाला सगळ्यांना अति प्रिय असणार. आमच्या कुटुंबाच वैशिष्ट्य म्हणजे आमचं सहा पिढ्यांच एकत्र कुटूम्ब आहे आणि ह्या घरी ते सगळे एका स्वयंपाकघरात, एकत्र, मजेत, आनंदात, रहात आहेत. आज तिथे पंधरा जण रहात आहेत. काही जण नोकरी निमित्ताने मुंबईला पुण्याला किंवा अगदी परदेशी ही गेले आहेत पण त्यांची घराबद्दलची, कुटुंबाबद्द्लची ओढ तिळमात्र ही कमी झालेली नाही. माझे सासरे त्यांच्या माणसांशी पत्राद्वारे संपर्कात रहात आता पुढची पिढी फोन, फेसबुक, वॉट्सअॅप, इमेल ने संपर्कात असते एवढाच काय तो फरक. बाँडिंग तसूभरही कमी नाही.
अरेरे!! लोकसत्ताकडून तरी अशी
अरेरे!!
लोकसत्ताकडून तरी अशी अपेक्षा नव्हती.
मूळ लेखिकेची/छायाचित्रकाराची
मूळ लेखिकेची/छायाचित्रकाराची पूर्व परवानगी न घेता परस्पर असा फोटो छापणे म्हणजे किती बेजबाबदार वर्तन आहे ! तेही लोकसत्तासारख्या नामांकित वॄत्तपत्राकडून?
मनीमोहोर , तुम्ही सर्व फोटोवर
मनीमोहोर , तुम्ही सर्व फोटोवर वॉटरमार्क टाका.
हो आता तसे करावे लागेल. माझे
हो आता तसे करावे लागेल. माझे फोटो कुणाला कॉपी करावेसे वाटतील असे कधी स्वप्नातही आले नव्हते.
माझ्या फोटो ग्राफीच्या आणि कॅमेरा हाताळण्याच्या महान कौशल्यावर एक मस्त गोष्ट होईल. ( स्मित) मला ईंटरेस्ट होता पण येत नव्हत काही. कसं हळू हळु शिकतेय वगैरे वैगेरे....
खुप मस्त ! केरळ मधे गेलो
खुप मस्त !
केरळ मधे गेलो तेव्हा अशाच घरी राहण्याचा योग आला. पण काही भाग कवेलू व काही भाग स्लॅब
हेमाताई तुमची फोटोग्राफी
हेमाताई तुमची फोटोग्राफी सुंदर आहे हा.
लोकसत्तावाल्यांनी तुमची परमिशन घ्यायला हवी होती आणि फोटोच्या खाली तुमचे नाव द्यायला हवं होतं, फोटो सौजन्य म्हणून.
(No subject)
सुंदर फोटो आणि सुन्दर लिखाण .
सुंदर फोटो आणि सुन्दर लिखाण .
आमच्या गावाकडच्या घराची आठवण आली .
खूपच सुंदर घर आणि तिथे
खूपच सुंदर घर आणि तिथे राहणारे एकत्र कुटुंब तर आणखी सुंदर .
शंभरावा प्रतिसाद .. धन्यवाद
शंभरावा प्रतिसाद .. धन्यवाद सगळ्याना .
कोकणावर असंच प्रेम करा .
मने, सुंदर फ़ोटो. (आधी
मने, सुंदर फ़ोटो. (आधी प्रतिसाद दिलाय का माहित नाही. पण हा परत. )
सर्व फोटो खूपच सुंदर आहेत
सर्व फोटो खूपच सुंदर आहेत.फुलांच्या आणि फळांच्या बागेत फेरफटका मारून आल्यासारखे वाटले.लिखाणशैली मस्त..
शोभा, धन्यवाद.
शोभा, धन्यवाद.
किरण, तुम्ही तुमच्या गावावर लिहिलेला लेख वाचला तेव्हा मला आमच्याच गावची आठवण आली आणि आज तुम्ही प्रतिसाद दिलात ही . खूप छान वाटलं . कोकणातली खेडी अजून ही खूप छान वाटतात.
सुन्दर!!
सुन्दर!!
अगदी कोकणात जाउन आल्यासारखे वाटले.
Pages