नि. ग वर नाडण वर चर्चा झालीच आहे तर चला मी तुम्हाला आमच्या गावी/घरी घेऊन जाते. नाडण हे गाव आहे हापुससाठी प्रसिध्द असलेल्या देवगड तालुक्यात. हे एक अगदि छोटसं गाव आहे, ज्याची वस्ती असेल दोन अडीच हजारापर्यंत. कोकण रेल्वे ने वैभववाडी स्टेशन पासून ५० /६० कि. मी. दूर आहे. मुंबई गोवा हायवे तळेरे येथे सोडुन पाटगाव फणसगाव मार्गे ही जाता येतं. हे माझ्या सासरचे गाव आहे. दोन छोट्या टेकड्यांच्या मधे हे वसले आहे आणि मधुन जातो एक ओढा ज्याला आम्ही वहाळ म्हणतो. घरं सगळी थोडी उंचावर आहेत त्यामुळे पाय-याना ( कोकणच्या भाषेत पावठण्या) पर्याय नाही. चला, आता घर दाखवते. हे घर माझ्या आजे सास-यानी स्वतः बांधले आहे. त्यांना बांधकामाची जाण होती कोणतेही शिक्षण न होता सुध्दा.
हा आहे रस्ता आमच्या घराकडे जाणारा.
From mayboli
आता ह्या पाय-या उतरून आलो आपण खळ्यात म्हणजे अंगणात. घराची रचना ओटी, माजघर, स्वयंपाकघर, देवघर, आणि पससदार अशी आहे.
From mayboli
हे आहे तुळशी वृंदावन. तो जो दगडी कोनाडा दिसतो आहे, त्यात संध्याकाळी निरांजन ठेवले की वारा न लागता तेवत राहते शांतपणे तुळशीपाशी.
From mayboli
मुख्य घराला जोडून माडी बांधलेली आहे. दोघांना जोडणारा छोटासा पूल
From mayboli
हे आहे परसदार ज्याला कोकणात आगर म्हणतात.
From mayboli
पोफळी अशा चव-या ढाळताहेत. पोफळीना वेढून मिरीवेल, आणि नागवेली उभ्या आहेत.
From mayboli
एका हौदात ही निळी कमळं डुलताहेत.
From mayboli
हे जवळून
From mayboli
पूजेसाठी लागणारी फुलं आगरात असतातच. ही डबल तगर.
From mayboli
हा चाफा
From mayboli
आणि ह्या जास्वंदी
From mayboli
From mayboli
हा कवठी चाफा
From mayboli
आमच्या आगरात बर्ड ऑफ पॅराडाईज, हेलिकोनिया अशी विलायती झाडे ही आहेत बरं का
From mayboli
From mayboli
हे आहे वडाचे बोन्साय. अगदी पारंब्या आल्या आहेत.
From mayboli
कोकण प्रसिध्द आहे आंब्यांसाठी, पण इथले चिकू लाजवाब. असतात जरासे लांबट. साल असते बाहेरून खरखरीत आणि जाड. पण चवीला साखर फि़की पडेल इतके गोड आणि रसाळ.
From mayboli
हे आहे पेरवीणीचे फुलं. आमच्याकडे पेरूच्या झाडाला पेरवीण, चिकूच्या चिकवीण, लिंबाच्या लिंबीण असं म्हणतात. जसं शेजारच्या जोशी बाईना आपण जोशीण म्हणु तसं.
From mayboli
हे काय आहे ते सांगण्याची गरजच नाही.
From mayboli
वाळत टाकलेल्या सुपा-या आणि कोकमं
From mayboli
From mayboli
हा आमचा जॉनी. सदा लक्ष ठेउन असतो घरावर. जरा खुट्ट वाजलं की धावून जाणारा, मुलांनी मात्र कितीही त्रास दिला तरी शांत असतो. ह्याची शेपटी म्हणजे कडबोळं जणु.
From mayboli
आणि अंगाच मुटकुळं करुन गुरगुटुन झोपलेली आमची मनी. कुत्रा आणि मांजर हवीतच घरात.
From mayboli
घरं उतारावर असल्याने टेकडी चढून वर सड्यावर जाण्यासाठी अश्या पाय-या बांधलेल्या आहेत. ह्याच कोकणातल्या घाट्या. ही आमची घाटी माझ्या आजे सास-यांनी स्वतःच्या हातानी स्वतः कष्ट करुन बांधलेली आहे. त्यामुळे तिचे जास्त कौतुक आम्हाला. घाटीच्या दोन्हि बाजुला आंब्याच्या बागा आहेत.
From mayboli
आमराईचा दूरून व्ह्यु.
From mayboli
आमराई जवळून
From mayboli
From mayboli
From mayboli
लेकुरवाळा फणस. मे महिन्यात फणसाची भाजी, तळलेले गरे, फणसाची साट म्हणजे फणसपोळी, फणसाच सांद्णं असे विविध प्रकार बनत असत्तात.
From mayboli
करवंदाची जाळी
From mayboli
सड्यावरुन दिसणारा सूर्यास्त.
From mayboli
असं हे आमचं घर. आम्हाला सगळ्यांना अति प्रिय असणार. आमच्या कुटुंबाच वैशिष्ट्य म्हणजे आमचं सहा पिढ्यांच एकत्र कुटूम्ब आहे आणि ह्या घरी ते सगळे एका स्वयंपाकघरात, एकत्र, मजेत, आनंदात, रहात आहेत. आज तिथे पंधरा जण रहात आहेत. काही जण नोकरी निमित्ताने मुंबईला पुण्याला किंवा अगदी परदेशी ही गेले आहेत पण त्यांची घराबद्दलची, कुटुंबाबद्द्लची ओढ तिळमात्र ही कमी झालेली नाही. माझे सासरे त्यांच्या माणसांशी पत्राद्वारे संपर्कात रहात आता पुढची पिढी फोन, फेसबुक, वॉट्सअॅप, इमेल ने संपर्कात असते एवढाच काय तो फरक. बाँडिंग तसूभरही कमी नाही.
किती सुरेख आहे गं तुझे हे
किती सुरेख आहे गं तुझे हे खेड्यामधले घर कौलारु... कायम असेच निवांत असु दे आणि तुलाही निवांतपणा लाभु दे इथे.
आहे पेरवीणीचे फुलं. आमच्याकडे पेरूच्या झाडाला पेरवीण, चिकूच्या चिकवीण, लिंबाच्या लिंबीण असं म्हणतात. जसं शेजारच्या जोशी बाईना आपण जोशीण म्हणु तसं.
शशांक , साधना खूप खूप
शशांक , साधना खूप खूप धन्यवाद.
साधना, अगं आमच्याकडे पेरूच्या झाडाला जसं पेरवीण म्हणतात ना तसं आंब्या फणसाच्या झाडांनाही त्यांना येणा र्या फळांच्या गुणधर्मावरून नाव दिलेली आहेत.
अहो स्वर्ग म्हणतात याला.
अहो स्वर्ग म्हणतात याला. अप्रतिम
जेडी१११, आम्हाला आमचं घर
जेडी१११, आम्हाला आमचं घर म्हणजे खरचं स्वर्ग वाटतो. घरावरच्या प्रेमामुळे असेल कदाचित, पण तुम्हाला ही तसं वाटलं खूप खूप धन्यवाद.
जबरदस्त!
जबरदस्त!
आहाहा!! काय मस्त घर आणि
आहाहा!! काय मस्त घर आणि अंगण!!
>>खूप भाग्यवान आहात तुम्ही! >> +१
किती सुंदर
किती सुंदर
मनीमोहोर तुमचे घर आणि लेखन
मनीमोहोर
तुमचे घर आणि लेखन दोन्ही खुपच छान आहे. कोकणतील घर हा एक खरच जिव्हाळ्याचा विषय आहे. तुमच्या एकत्र कुटुम्बाला आणि सुंदर घराला मनापासून शुभेच्छा. अशाच येणा-या अनेक पिढ्या ह्या घरात गुण्यागोविंदाने नांदोत हिच सदिच्छा.
एक प्रश्न - तुम्ही लेखाच्या सुरुवातीला ' नि. ग वर नाडण वर चर्चा झालीच आहे ' असे लिहीले आहे. त्यात नि.ग. म्ह्णजे काय?
प्रिया
ओहो कसलं भन्नाट घर आहे. एकेक
ओहो कसलं भन्नाट घर आहे. एकेक प्रचि वरुन नजर हटत नाही
पहिल्या प्रचितला रस्ता तर कातिल आहे अगदी
चिनूक्सला खूपच अनुमोद्न
मनीमोहोर तुम्ही खर्या भाग्यवान
धन्यवाद सर्वाना. प्रियास,
धन्यवाद सर्वाना.
प्रियास, कोकणातील घर हा एक खरच जिव्हाळ्याचा विषय आहे>> खरचं आहे.
नि ग म्हणजे निसर्गाच्या गप्पा माबो वरचाच एक धागा. http://www.maayboli.com/node/48236 पान २२/२३ वर मी काही को़कणचे फोटो शेअर केले होते त्यावरुन विषय निघाला. तो हा संदर्भ.
सुरेख! कोकणसयीची आठवण आली
सुरेख!
कोकणसयीची आठवण आली पुन्हा.
मनीमोहोर खुलाशाबद्द्ल
मनीमोहोर
खुलाशाबद्द्ल धन्यवाद. नि.ग. च्या लिंकलाही जरुर भेट देईन. तो ही अजुन एक जिव्हाळ्याचा विषय.
प्रिया
मस्त फोटो !!
मस्त फोटो !!
खूप आवड्लं घर.रहायला मिळाले
खूप आवड्लं घर.रहायला मिळाले तर मज्जा!
खूप आवड्लं घर.रहायला मिळाले
खूप आवड्लं घर.रहायला मिळाले तर मज्जा!
==मलाहि.
अहाहा ! काय सुरेख फोटो आणि
अहाहा ! काय सुरेख फोटो आणि वर्णन. गेल्या महिन्यातच मी मालवणला गेले होते. काकुच्या घरी. तीच आठवण झाली.
फारच सुंदर. खुप भाग्यवान आहात
फारच सुंदर. खुप भाग्यवान आहात तुम्ही.
मनीमोहोर काय सुरेख आहे गाव
मनीमोहोर काय सुरेख आहे गाव आणि घर सुद्धा. असं घर असणं म्हणजे नशिबाचा भागच.
मला तुझा हेवा वाटतोय
मस्त मनीमोहोर, आपल्या रिक्षात
मस्त मनीमोहोर, आपल्या रिक्षात बसून आलो ईथे आपल्या गावाला.. मजा आली
व्वाह!!, खुपच सुंदर फोटो
व्वाह!!,
खुपच सुंदर फोटो आहेत. फार छान आहे तुमचं कोकणातलं घर..
धन्यवाद सर्वांना परत एकदा
धन्यवाद सर्वांना परत एकदा फोटो आवडले म्हणून.
I must confess that I envy
I must confess that I envy you for such a wonderful house! खुपच भारी!
नवे फटू टाकले ममो.. आत्ता
नवे फटू टाकले ममो..
आत्ता बघीतले..
मस्तच गं ..
हायला ! हे राहिलं होतं की काय
हायला ! हे राहिलं होतं की काय वाचायच ?...
सहीच आहे
ममो, नवीन फोटो
ममो, नवीन फोटो भारीच..
आमच्याकडे घाटया सोडून सगळं शेम टू शेम
मस्त गाव मस्त घर
मस्त गाव मस्त घर
मनीमोहोर, तुमचा वरचा अंगणाचा
मनीमोहोर, तुमचा वरचा अंगणाचा फोटो लोकसत्तामध्ये वापरला आहे.
http://www.loksatta.com/vasturang-news/house-yard-1142467/
मला तो फोटो बघितल्यावर लगेच हा लेख आठवला. आधी वाटल की तुम्हीच ती लेखिका आहात की काय पण नाव वेगळे आहे.
इथे सांगितले ते बरे केले
इथे सांगितले ते बरे केले चैत्रगंधा.
हो ना. हेमाताई मागे
हो ना.
हेमाताई मागे वास्तुरंगमध्ये खळयाचा लेख आला होताना तुमचा, हाच फोटो. मग लोकसत्तावाल्यांना माहिती असेलना मूळ फोटो तुमचा आहे.
चैत्रगन्धा पियु, अंजू
चैत्रगन्धा पियु, अंजू धन्यवाद हे इथे लिहील्याबद्दल . मला मध्यंतरी श्री. आसुफ यानी ही हे विपु करुन सांगितले होते काल तुम्ही ही सांगित्ल्यावर मी पाठ्पुरावा केला .
मी आमच्या गावच्या अंगणावर एक लेख लिहीला होता मायबोलीवर त्याची ही लिंक.
http://www.maayboli.com/node/54165
तोच लेख मी लोकसत्तेत ही दिला होता. त्यानी तो छापला होता वास्तुरंग मध्ये. त्यात हा वरचा फोटो दिला होता मी.
आज मी वास्तुरंगला फोन केला होता. त्या म्हणाल्या की मेधा प्याटी ह्यांच्या अंगणावरच्या लेखासाठी चांगला फोटो मिळत नव्हता लोकसत्तेला. अनायसे माझा फोटो होताच त्यांच्याकडे म्हणून तोच त्यांनी छापला.
काय बोलु यावर ?
Pages