मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती आणखी एक जाहिरात येतेय सध्या..‘त्या मुलाला जोरात बाथरूम लागलेली असते आणि त्याची बहिण त्याला ‘हमको मन की शक्ती देना’ ऐकवते... छान वाटली ती जाहिरात...

येस्स... हमको मन की शक्ती देना... वोडाफोन.. मस्त आहे Happy

त्या एअरटेल च्या गबाळ्या, आळशी वरूण च्या जाहिराती मात्र डोक्यात जातात... तुम्ही दिवसभर निवांत पडून रहा, गाणी ऐकत.. आणि विसरलेल्या गोष्टींची आठवण तीर्थरुपांनी करुन दिली की मग, मी लई भारी म्हणत, मोबाईल वरून सगळ्या गोष्टी करा असा काहीसा संदेश जातो नकळत..

>>तो वरूण अक्षरशः डोक्यात जातो. जाहिरात पाहिल्यावर आपल्यालाच आळस येतो. +१११११

पण त्याच्या वडिलांची आणि आईची एक्स्प्रेशन्स फार चांगली आहेत.
जाहिरातीत फार कमी टेक्समध्ये शॉट ओके करावा लागतो असे ऐकले आहे. त्यामुळे ते अ‍ॅप्रिशिएबल आहे.

रिनची आई-मुलगी मोठ्या हॉटेलात जेवायला जातात ती जाहिरात बेकार गंडलेली आहे. रिनने कपडे धूता, मग शालही धुतली असती तर? ती धुतलेलीही नाही आणि चुरगाळलेलीही आहे वर!

रच्याकने, अनेक मराठी अभिनेत्यांना इतक्यात जाहिरातीत मुख्य रोलमध्ये पाहिले- सायडी किंवा गडी म्हणून नाही. उदा. फ्लिपकार्टच्या अ‍ॅडमध्ये अभिजित चव्हाण, डोकोमोत हृषिकेश जोशी, कॅस्ट्रॉलमध्ये अनिकेत विश्वासराव आणि अजून एक, रोहिणी हट्टंगडी आणि अतुल परचुरे एव्हरेस्ट सांबार मसालात आणि पल्लवी सुभाष तर बर्‍याच अ‍ॅड्जमध्ये असते. छान वाटतं हे बघायला Happy

एक्स्पर्ट नावाच्या भांडी घासायच्या साबनाच्या जाहीरातीत माधुरीने कामवालीचा रोल केलेला...

आणि त्याच साबनाच्या दुसर्या जाहीरातीत प्रियांका चोप्रा होती त्यात तीचा रोल घरातल्या मुलीचा होता...

असा रोल माधुरीला का नाही मिळाला अथवा का देण्यात आला नाही ? माधुरी सुध्दा मोलकरीणचा रोल मी करणार नाही दुसरा कुठला रोल द्या...अशी मागणी का केली नाही ?

माधुरी सुध्दा मोलकरीणचा रोल मी करणार नाही दुसरा कुठला रोल द्या...अशी मागणी का केली नाही ?>> यावर माधुरीचं उत्तर एका मुलाखतीमध्ये असं होतं की तो एक रोल आहे आणि मी त्याच्याकडे त्याच नजरेने पाहिलं. सो व्हॉट?

मी वर म्हणाले ते चेहरे तसे लोकलच आहेत. मराठीत सगळे नावाजलेले आहेत. पण हिंदी जाहिरातदार संपूर्ण देशभर पोचेल असा चेहरा प्रिफर करतात. त्यात यांना निवडलं ते पाहून बरं वाटलं.

नेस्ले ची नविन जाहीरात छान आहे.. दत्तक मुलीची

>> लींक प्लीज..

ती फाईव्ह स्टारची अ‍ॅड बकवास आहे.

त्या एअरटेल च्या गबाळ्या, आळशी वरूण च्या जाहिराती मात्र डोक्यात जातात... तुम्ही दिवसभर निवांत पडून रहा, गाणी ऐकत.. आणि विसरलेल्या गोष्टींची आठवण तीर्थरुपांनी करुन दिली की मग, मी लई भारी म्हणत, मोबाईल वरून सगळ्या गोष्टी करा असा काहीसा संदेश जातो नकळत.. +१

रिनची आई-मुलगी मोठ्या हॉटेलात जेवायला जातात ती जाहिरात बेकार गंडलेली आहे. रिनने कपडे धूता, मग शालही धुतली असती तर? ती धुतलेलीही नाही आणि चुरगाळलेलीही आहे वर! +१

रच्याकने, अनेक मराठी अभिनेत्यांना इतक्यात जाहिरातीत मुख्य रोलमध्ये पाहिले >> स्वानंद किरकिरे सुद्धा

माधुरीचं उत्तर एका मुलाखतीमध्ये असं होतं की तो एक रोल आहे आणि मी त्याच्याकडे त्याच नजरेने पाहिलं. सो व्हॉट?

>> माझं वैयक्तीक मत.. तिचं हे उत्तर अज्जिबात नाही पटलं. या लेव्हलला आल्यावर मराठी अस्मितेचा थोडासा विचार करायला काय हरकत आहे? निदान स्वतःच्या स्टेटसचा विचार करायला काय हरकत आहे?

तिचं हे उत्तर अज्जिबात नाही पटलं. या लेव्हलला आल्यावर मराठी अस्मितेचा थोडासा विचार करायला काय हरकत आहे? निदान स्वतःच्या स्टेटसचा विचार करायला काय हरकत आहे?>>>

अरे अरे... इतका संकुचित विचार का करताय..
माधुरीला कमबॅक करण्यासाठी घराघरात झळकण्याची संधी या जाहिरातीने आणि ओरल-बीने दिली. मला वाटतं तिच्यासाठी एवढं पुरेसं आहे.

अवांतर : जाहिराती करणार ती, पैसे कमावणार ती, आणि तुम्ही का त्यावर टिप्पण्या करताय?

सेंटर फ्रेशची जाहिरात भन्नाट आहे...
मल्टिप्लेक्समध्ये एक मित्र दुसऱ्या मित्राला विचारतोय,‘ तू इथे काय करतोयस? पिक्चर बघायला आलायेस का?’ त्यावेळी त्या मित्राचे आणि इतरांचेही एक्‍स्प्रेशन्स जबरी... फक्त ते नंतर इतरांनी टाळ्या वाजवणं आणि बाल कटवाने आया है म्हणणं ठिगळासारखं वाटतं.

>>नेस्ले ची नविन जाहीरात छान आहे.. दत्तक मुलीची

जाहिरात छान आहे पण त्याचा नेस्ले ब्रॅन्डशी जोडलेला संबंध "बादरायण" कॅटेगरीतला वाटला.

>>हमको मन की शक्ती देना

व्होडाफोनच्या ह्या कुटुंबाच्या थीमवरच्या सगळ्या जाहिराती आवडल्या. ते आजोबा आजीला 'देखो रुठा ना करो' ऐकवतात ती आणखी आई-बाबा एका गाण्यात करीना आहे का कॅटरीना आहे ह्यावर भांडत असतात ती सुध्दा.

इलेक्शनच्या सगळ्याच अ‍ॅड डोक्यात जातायेत पण आणखी एक अ‍ॅड पाहीली.
विसा Interview ची..... ती लेडी विचारते की तुम्ही कधी ट्रॅव्हल करताय. कँडिडेट उत्तर देतो १२ एप्रिल ला.
लेडी : ती एक मतदानाची तारिख आहे ना?
कँडिडेट : म्हणतो हो? पण एका मताने काय फरक पडतो
लेडी : if you can not make difference to your own country, Ho can you make to another? Come after 12th.

I just loved that Adv!

खुपच लॉजिकल आणि सणसणीत अ‍ॅड आहे.

मला ती दीवारे दो तरह की होती है हि जाहिरात आवडते. कुठल्यातरी सिमेंट्ची आहे. कोणत सिमेंट? कुठून कुठे गेलेत पण तरीही आवडते.

एफेम वाहिन्यांवरच्या राष्ट्रवादीच्या मराठीतल्या म्हणींचा वापर करून केलेल्या जाहिरातींचा उलट परिणाम होण्याची शक्यता अधिक वाटते. साहेबांची चाल पाहता त्यांचा हेतूही तोच असू शकतो आणि उद्या त्या जाहिरातीत आम्ही कुठे कुणाचं नाव घेतलं होतं? किंवा आम्ही त्या ह्यांच्याबद्दल बोलत होतो असे म्हणायला मोकळे.

Pages