मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारत निर्माणच्या जाहीराती पाहुन, जाहीराती कश्या करु नये याबद्दलचा एक किस्सा आठवला.
एका वजन कमी करणार्‍या उत्पादनाने पाश्चिमात्य देशात चांगला बिजिनेस केला. मग त्यांनी ते उत्पादन अरब देशात उतरवले. कमीतकमी शब्दात लोकांना उत्पादन कळावे म्हणुन तीन चित्रे बनवली. एक जाडजुड कपल, औषध आणि शेवटी सडपातळ यौवना आणि पिळदार अरब.
बरीच जाहीरातबाजी करुनही आणि मोठमोठे प्लेक्स वगैरे लावुनही, एकहि, अगदि एकही बॉटल ६ महिन्यांत विकल्या गेली नाही. जेंव्हा खोलात जाऊन चौकशी केली तेंव्हा कळले की अरब देशात लोकांनी जाहिरात उलटी (उजवीकडुन डावीकडे) वाचली होती.
बहुदा भारत निर्माणचे {जसे इंडीया शायनिंगचे झाले होते} असेच होणार. Lol

झक्या हिरॉईनीत मला त्यातल्या त्यात करिना कपूर बरी वाटते. बाकी लई आवडतं असं कुणिच नाही.
अजय देवगण सोडून >> हिरॉईनीत अजय देवगण???

ओएलएक्सच्या जाहिरातीत जो म्हातारा मेल्याचा शेजाऱ्यांचा समज होतो, तोच दारात अर्ध्या चड्डीत उभा राहतो. त्यामुळे म्हाताऱ्याकडे पाहून तुसडेपणाने ती बाई ‘लोग अपना पुराना सामान ओएलएक्स’ पर बेच देते है, असं म्हणाली. या जाहिरातीत जुनं सामान हा शब्द म्हाताऱ्याला उद्देशून वापरला आहे..

महिंद्रा स्कॉर्पियो च्या सोन्याचे अंडे चोरणार्‍या चोराला पकडणार्‍या जाहीरातीबद्दलः
चोराच्या गाडीला दोरी कोण आणि कधी बांधून देतं? की तो जेम्स बाँड सदृश नायक चोराला गाडीसमोर गाडी थांबवून 'थांब हां जरा, दोरी बांधून घेतो' म्हणून दोरी बांधतो आणि मग परत गाडीत बसून चोराची गाडी फरफटत नेतो?

महिंद्रा स्कॉर्पियो च्या सोन्याचे अंडे चोरणार्‍या चोराला पकडणार्‍या जाहीरातीबद्दलः
चोराच्या गाडीला दोरी कोण आणि कधी बांधून देतं? की तो जेम्स बाँड सदृश नायक चोराला गाडीसमोर गाडी थांबवून 'थांब हां जरा, दोरी बांधून घेतो' म्हणून दोरी बांधतो आणि मग परत गाडीत बसून चोराची गाडी फरफटत नेतो? >> Biggrin

काल झी सिनेमा वर एक जाहिरात सारखी लागत होती..
ब्रिटानिया मारी बिस्कीटाची.
कारण भूक कधीही लागू शकते.. कारण हे.. कारण ते.. असं काही बाही.. या अनेक " काहीं " च्यात एक होते... कारण तुमच्या कडे ५ चा शिक्का आहे... ३-४ वेळा पाहिल्यावर मग झेपलं...
सिक्का - हिंदी
शिक्का - मराठी !!!! __/\__ Uhoh

विविधभारतीवर अजून एक मनरेगाचं कौतुक करणारी अ‍ॅड लागते. एक मित्र त्याच्या परदेशातल्या मित्राचं पार्सल द्यायला त्याच्या आज्जीच्या घरी जातो. पण रस्ता योग्य सांगितला नाहीस असं म्हणून ओरडत असतो. मेट्रो घे म्हणाला असतास तर माझा हाफ डे वाचला असता, एअरपोर्ट आहे तिथे हे ही सांगितलं नाहीस असं म्हणतो. जर हा पार्सल घेऊन जाणारा त्याच शहरातला आहे तर त्याला खुद्द हे बदल माहित असले पाहिजेत ना? Uhoh

'नो उल्लू बनाविंग' च्या सर्व अ‍ॅड्ज एकदम मस्त आहेत Happy ते माना डोलावतात ते फारच भारी Proud

कॅस्ट्रॉल स्कूटर ऑईलच्या दोन जाहिराती पाहिल्या. एकात अनिकेत विश्वासराव आणि अजून एक मराठी नट आहे. दुसरीतही अनिकेत आहेच (मेकॅनिक म्हणून त्याला कॉन्स्टन्ट ठेवलाय) आणि अजून एक नट ज्याला मी ओळखत नाही. दोन्ही जाहिराती मराठीत करून हिंदीत डब केल्या आहेत चक्क. कॉस्ट सेव्हिंग? Uhoh

आठवडाभरापासून एक जाहिरात येतेय.. (प्रॉडक्टचं नाव आठवत नाही) बाळाचा जन्म झाल्याबरोबर ते स्वतःच मोबाइलवर पाहून स्वतःची नाळ कापते, कपडे घालतं, डॉक्टरचे फोटो काढतं, लॅपटॉपवर गूगल सर्च करतो... मस्त जाहिरात आहे. त्यात ती नर्स आणि डॉक्टरचे एक्‍स्प्रेशन्स लै भारी...

बाळाचा जन्म झाल्याबरोबर ते स्वतःच मोबाइलवर पाहून स्वतःची नाळ कापते, कपडे घालतं, डॉक्टरचे फोटो काढतं, लॅपटॉपवर गूगल सर्च करतो... मस्त जाहिरात आहे. त्यात ती नर्स आणि डॉक्टरचे एक्‍स्प्रेशन्स लै भारी...+1

बरोबर.. MTS

ते बाळ टिचकी वाजवुन नर्सला जवळ बोलवतं ते पण आवडलं..

पियू, add आवडली पण इतक्या suddenly एकदम ब्रिटनला कोण जाऊ शकेल, मुंबई-पुणे करायचं तरी प्लानिंग करावं लागतं, काही joint family's मध्ये नवरा-बायकोला एकमेकांसाठी वेळ नसेल मिळत कदाचित.

पियू, add आवडली पण इतक्या suddenly एकदम ब्रिटनला कोण जाऊ शकेल

>> हो. निदान व्हिसा तरी लागतोच ना?

काही joint family's मध्ये नवरा-बायकोला एकमेकांसाठी वेळ नसेल मिळत कदाचित.

>> हे नाही पटलं. वास्तव असेलही पण नाही पटलं. Sad

पियु, ही जाहीरात मी पण पाहिली.. त्यात दाखवल आहे ते खूपस खर आहे. joint family's मध्ये एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नाही.. बर्‍याचदा रुटीन गप्पाही होत नाही.

हां पण डायरेक्ट फ़ॉरेन ट्रीप म्हणजे जरा अतीच दाखवल आहे... कदाचित व्हिसा घेउन ठेवले असतील... नवर्‍याची कंपनी तिकडची असेल म्हणुन त्याच्याबरोबर बायकोनेही व्हिसा काढुन ठेवला असेल अस मानु

नमस्कार सर्वाना..
२०१२ च्या ववि ला जाहिराती आणि उत्पादन यावर एक खेळ घेतला होता त्यात जाहिरातींच्या टॅग लाईन वरुन प्रॉडक्ट ओळखायच होतं.
हा खेळ मला माझ्या शाळेच्या रियुनियन ला घ्यायचा आहे. कुणी मदत करु शकेल का?

कॅडबरी ५ स्टअर का कोणत्या तरी कॅडबरीची अ‍ॅड आहे.
त्यात प्रसूतीचे इतके बीभत्स चित्रीकरण केलं आहे की ताबडतोब ह्या अ‍ॅडवर बॅन यायला हवा असे वाटते.
असे करायचे असल्यास/ निषेध नोंदवायचा असल्यास काय करावे लागते? कोणाला कल्पना आहे का?

कोणती अ‍ॅड रे चैतन्य? Uhoh

राखी काय मदत हवीये सांग?

ती सेंटर फ्रेशची "ये वाला चिविंगगम" वाली अ‍ॅड लै आवडली मला Lol

Pages