मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आसा खरच!
मला तर किळसच येते त्या अ‍ॅदची!
रात्री खाल्लेली भाजी दातात अडकलीये म्हणे त्याच्या
यक!

रिया, अगदी खरय. दातात काही जरि अडकलं तर किती अस्वस्थ व्हायला होतं आणि रात्री खाल्लेली भाजी दातात अडकलीये म्हणे! ठिक आहे अडकली आहे आणि नाही कळलं पण सकाळी दात घासताना नाही दिसली का? समोरच्या दातात तर अडकलेली असते.:राग:

काजोलाची डयपरची एक जाहिरात आहे. त्यात एक बाळ बिछान्यावर रांगत जात असताना त्याचं डोकं आपटतं पण उशीला, अशावेळी तुम्ही मला सांगा तुम्ही बाळाला उचलाल की उशीला?

प्राची , ती अ‍ॅड अशी आहे की बाळ खेळत असतं आणि ते बेडला डोकं धडकवायला निघालेलं असतं... आई ते बघते आणि बाळाच्या खेळण्यात अडथळा न येताच त्याला तिथे उशी ठेवून प्रोटेक्ट करते Happy
मला आवडते ती अ‍ॅड!

प्राची , ती अ‍ॅड अशी आहे की बाळ खेळत असतं आणि ते बेडला डोकं धडकवायला निघालेलं असतं... आई ते बघते आणि बाळाच्या खेळण्यात अडथळा न येताच त्याला तिथे उशी ठेवून प्रोटेक्ट करते>>>> उशीचा सॉफ्टनेस डायपरला आहे अस म्हणायच आहे अ‍ॅडवाल्यांना

लॉरियल काजल मशिग... ऐश्वर्या अ‍ॅज इट इज भयाण दिसते. नो डाऊट.
ते बटबटीत काजळ घालून तिच्या भयाणपणाला चारचाँड लागलेत. Proud

मला ती प्लॅटीनम लव्ह बँड्स ची अ‍ॅड कळलीच नाही.
तो नवरा शर्टच्या कॉलरला पुठ्ठा तसाच ठेवतो ह्याने त्यांच्यात प्रेम कसं वाढतं?

पियू ती आदिती हैदर एकूणच माझ्या डोक्यात जाते त्यामूळे जाहीरात अ‍ॅज इट इज आवडतच नाही ती.

उदय तुझ्यावर बहिष्कार.... देअर आर बेटर थिंग्ज टू बी लाईक्ड दॅन ऐश्वर्या. Proud

आदिती हैदर एकूणच माझ्या डोक्यात जाते >>> ह्या दक्षीला फटकाव रे.
आधी स्पृहा, वर लिहिलय ऐश्वर्या आणि आता आदिती हैदर पण...

OLX ची 'पप्पू, रिमोट!" वाली जाहिरात मला समजलीच नाहीये. शेजारी गेले हा गैरसमज आणि जुन्या वस्तू OLX वर विकणे यांत काय संबंध आहे?

OLX ची 'पप्पू, रिमोट!" वाली जाहिरात मला समजलीच नाहीये. शेजारी गेले हा गैरसमज आणि जुन्या वस्तू OLX वर विकणे यांत काय संबंध आहे?>>>>> मला पण नाही समजली ती अ‍ॅड

अरे बहुदा ती अ‍ॅड अशी आहे की त्यांच्या घरात सामान उचलायला इतके लोकं आलेले असतात की ते लोकांची गर्दी आणि पळापळ पाहुन शेजार्‍यांना वाटतं की त्यांच्या घरात कोणी तरी गेलंय! म्हणून ते सांत्वन वगैरे करत असतात आणि तेवढ्यात ते ग्रुहस्थ येतात म्हणून ते झालेल्या प्रकाराने गोंधळतात आणि भडकतात आणि सांगतात की ओएलएक्स वापर्त जा!

मला तर ते शेजारी जरा जास्तच भोचक वाटतात. उगाच विचारले नाही तरी सल्ला द्यायचा, ह्याला काय अर्थ आहे? Wink Proud

नाही ओ एल एक्स च्या जाहिरातीत जुनं फर्निचर न विकता नविन घेतात त्यामूळे जुनं घराबाहेर काढून ठेवतात आणि त्या गर्दीमूळे कुणी गेलंय असा शेजार्‍यांचा समज होतो. मग ती बाई म्हणते की आधी जुनं ओ एल एक्स वर विकायचं.

अरे दक्षे जरी ओएलेक्स वापरल तरी काय होणारे? ओएलेक्स काय जुन्या मालाची ऑनलाईन डिलीव्हरी देतात का दुसर्‍या परचेसरच्या घरी जुन सामान घेउन जायला लोक येणारच ना घरी??

घरातलं फर्निचर बाहेर ठेवलय आणि घरात बरेच लोक जमलेत असे सहसा घरात काही शुभकार्य / पूजा असेल तरच होते. कोणी गेले तर घरातले फर्निचर बाहेर ठेवलेले मी तरी बघितलेले नाही - ते पण मुंबईसारख्या लहान घरे असलेल्या ठिकाणी पण. इतर ठिकाणी जिथे घरे मोठी असतात तिथे तर तशी आवश्यकताच नसते.

तो नवरा शर्टच्या कॉलरला पुठ्ठा तसाच ठेवतो ह्याने त्यांच्यात प्रेम कसं वाढतं?<<<< इतका अनरोमॅण्टिकपणा???

मला आवडते ती जाहिरात.

तो नवरा शर्टच्या कॉलरला पुठ्ठा तसाच ठेवतो ह्याने त्यांच्यात प्रेम कसं वाढतं? >>> पुठ्ठ्याचा प्रेम वाढण्याशी संबंध नाहीये.

ती माहेरी निघाली असते. तेंव्हा माहेराकरता केलेल्या खरेदीत आठवणीने त्याच्याकरता पण एक शर्ट आणते. तो पण तिला सोडायला जाताना आवर्जून तो शर्ट घालतो. पण (सामानाची बांधाबांध, वाहन मिळवणे / पार्किंग, शेवटच्या क्षणी काही तरी विसरणे अशा सगळ्या) धावपळीत तो त्या नविन शर्टच्या कॉलरमधील पुठ्ठा काढायला विसरतो. तिला दिसल्यावर ती तो काढते. मग वाढणारच ना प्रेम? Happy

खूप सटल आहे ती जाहीरात त्यामुळे पटकन न कळण्याची शक्यताच जास्त.

Pages