मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अय्यो, माझ्या सस्पेन्सची मजाच घालवली की. मी मोठ्ठी पोस्ट टाइप करेपर्यंत सगळं सांगुनच टाकलं.

Fortune Oil ची भली मोठ्ठी आणि त्यामुळे भलतीच महागडी जहिरात आहे ही.

फार छान प्रतिक्रीया आहेत.

मला वाटलेल की कोणी काही सुधारणा सुचवतील. पण एकंदरीतच सूर, श्शी काय घाण अ‍ॅड आहे आणि बनवणारे किती मूर्ख आहेत, असाच दिसला.

मुली परीक्षेत मुलांपेक्षा जास्त का पास होतात
कारण त्या व्हिस्पर वापरतात
मुलानो तुम्हीपण वापरायला लागा , परीक्षेत चांगले मार्क पण मिळतील आणि प्रोडक्ट पण खपेल

कुरकुरेची बोमन इरानीची नवी अ‍ॅड बघून किळस येते.>> खरंच यक्क्स!!! एकदाच चुकून पाहीली गेली... नंतर कधीच बघायचं धारीष्ट्य झालेलं नाही... काहीही आचरट करायला हे लोक कसे तयार होतात??

.@dreamgirl
असे हसाल तर तुम्हाला देखील शारंगधर सुखकारक वटी द्यायला लागेल
चुर्णाला आता रामराम

पण नोबल कॉझ म्हणून काहीही संदेश देतात
आधी ते फ़ेअर आणि लव्हली वाले होते (आता इतर पण सामील झालेत)
आधी मुलगी अपयशाने खचून जाते नंतर तिला क्रीम लावून गोरी करतात
मग काय
आता ती मुलगी तीन वर्षात वेल सेटल होऊन मग लग्न करणार
त्याच्या सारखे घर , परदेशात नोकरी वगैरे वगैरे

हेअर कलर च्या सर्व जाहिराती एकाच ढंगाच्या का असतात ?
नुकताच मी निशा हेअर क्रीम च्या प्लांट वर काम केला
आणि इकडे मुंबईला परत आलो तर त्यांची जाहिरात दिसली
लोरीयाल , किंवा गार्नियर किंवा गोदरेज किंवा ट्रेसेमे यांची एकमेकांनी केलेली नक्कल होती ती पण

असे हसाल तर तुम्हाला देखील शारंगधर सुखकारक वटी द्यायला लागेल>> नको मग मी जुयेरेगा मधल्या मेघना किंवा अर्चू सारखं हसते... Lol
फ़ेअर आणि लव्हली >> अगदी अगदी!! मिस्टर काळे, मिसेस काळे आणि मिस गोरे किंवा मग काय ते कुंकुमादी तैलं असलेली फेअरेव्हर ची अ‍ॅड!!! डोक्यात जातात अगदी

लोरीयाल , किंवा गार्नियर किंवा गोदरेज किंवा ट्रेसेमे यांची एकमेकांनी केलेली नक्कल होती ती पण>> कन्सेप्ट सेम असेल तर वेगळं काय दाखवणार ते तरी? आणि काहीतरी डोकं लावून क्रिएटिव्ह दाखवावं आणि प्रेक्षकांनी डोकं लावून ते पाहावं येवढं बजेट ते पकडत असतील का? तसंही बर्‍याच अ‍ॅडव्हर्टायजर्सना क्रिएटिव्हीटीचं वावडंच असतं आणि वर खापर फोडतात सामान्य प्रेक्षकांच्या मेंदू कुवतीवर!!!

हेअर कलरची ती जुहीची अॆड किती बकवास आहे! असली भंगार हेअरस्टाईल कोण करेल? आणि माधुरीची हेन्कोवाली किती बळंच लांबवलीये... दात असो की कपडे ही थेट रिसर्च सेंटरलाच जाऊन धडकते! त्यापेक्शा शेजारी पाजारी काय वापरतातते विचार की जरा! Lol

>>>>> कन्सेप्ट सेम असेल तर वेगळं काय दाखवणार ते तरी?
.
मी जिथे सोजत मध्ये गेलो होतो प्लांट उभारायला , तिथे जगातील सर्वात जास्त मेंदी होते , आणि हे लोक ती निर्यात करतात .
तसलेच काहीतरी दाखवले असते तर जास्त चांगले वाटले असते .
आणि डोके वापरायचे बोलले तर त्याचे नक्कीच वावडे असते
त्याच प्लांट मध्ये मेंदीचे कोन पण तयार होतात , आणि हे लोक १२कोन च्या बॉक्स सोबत एक हेअर कलर फ्री देतात , आता कुठली बाई १२कोन विकत घेते ?

दात असो की कपडे ही थेट रिसर्च सेंटरलाच जाऊन धडकते! >>> फिदीफिदी तिकडे एकजात सगळे पांढरा कोट घालून फिरत असतात.

तिथे काय, हे सो कॉल्ड एक्स्पर्ट लोक बाहेर कुठेही गेले तरी पांढरा झब्ब घालुनच जात अस्तात.
मग ते फरशी पुसायचं फिनायल असो किंवा दात घासायचं पेस्त. निळी/लाल प्रकाशाची बॅटरी वापरुन लगेच किटानु दाखवाय्चे....
उघड्या डोळ्याने बॅक्टेरीया काय यांच्या ताताश्रिंना दिसलेले का ?

अक्षय कुमारची डॉलर बिग बॉसची नवी जाहिरात अगदी डोक्यात जाते. इतका चांगला कलाकार असून, त्याने अशा जाहिराती का स्वीकारल्या कळत नाही. सैफ अली खानच्या अमूल माचोच्या जाहिरातीही बघवत नाहीत. बाकी धरमपुत्तर सनीच्या ( हल्ली सनी म्हटले की बेबी डॉलच आठवते) लक्स कोझीच्या जाहिराती छान आहेत.

Pepsodent च्या एका जाहीरातीत डायरेक्ट दाखवल आहे कि Pepsodent has 130% more germ attack power than Colgate.
अस चालत का ? कोलगेटने काही आक्षेप नाही का घेतले ???

>>>>>>अस चालत का ? कोलगेटने काही आक्षेप नाही का घेतले ???
.
याला AMBUSH MARKETING म्हणतात.
समोरच्याच्या ब्रांड ला धक्का पोहोचवायचा, त्याने केस केली कि कोर्टात मांडवली करायची.
कोक आणि पेप्सी यासाठी फ़ेमस आहेत

ते सध्या आस्क मी अ‍ॅपच्या अ‍ॅडमधे चाललंय अ‍ॅम्बुश का काय ते..
ते तीन बाकीचे अ‍ॅपवाले आहेत ते सरळ सरळ जस्ट डायल, स्नॅपडील, ओ एल एक्स च्या अ‍ॅडसची आठवण होऊ शकेल असे आहेत.

कोक आणि पेप्सी यासाठी फ़ेमस आहेत>> यांचं शीतयुद्ध कधी गरमागरमीत गेलं समजलंच नाही... यात बॉलीवूडच्या अ‍ॅक्टर्सचीही जंग छेडली गेली... केस स्टडीज धम्माल असतात काही ब्रँडस च्या Happy

>>तिथे काय, हे सो कॉल्ड एक्स्पर्ट लोक बाहेर कुठेही गेले तरी पांढरा झब्ब घालुनच जात अस्तात.

मध्ये एका जाहिरातीत एका डेन्टिस्टच्या पांढर्‍या कोटावर डेन्टल एक्सपर्ट का डेन्टिस्ट असं लिहिलेलं असतं. आणि ते प्रूव्ह करायला असेल कदाचित पण तो लिफ्टमध्ये सफरचंद खात असतो. Angry

>>संतूर ने नवीन मम्मी आणली , बार्बी हांडा

हे त्या बाईचं नाव आहे? Uhoh

एक्सो का कुठल्याश्या भांडी घासायच्या साबणाची जाहिरात आहे. त्यात शिल्पाशेट्टी त्या शेजारणीकडे काहीतरी खायला घेऊन जाते. तर तिच्या सिन्कमधल्या डिशवर मोठ्ठाले झुरळ फिरत असतात. म्हणून म्हणे एक्सो वापरुन भांडी घासा. अरे पण ते झुरळ मारा की आधी आणि ते होऊ नयेत म्हणून उपाय करा. आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी त्यातली गत.

हं,नानाची जाहिरात मस्तच आहे.आवडली.सिग्नेचर अ‍ॅक्शन सहीच आहे.
ज्या दिवशी कुरकुरे खाल्ल्ले त्या रात्रीच बोमन दिसला.आता निदान ती अ‍ॅड बंद होईतो तरी कुरकुरे खायचे बंद. Wink

Pages