मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल क्रिकेटमॅचच्या मधे अजून एक आजी-आजोबांची जाहिरात पाहिली.
आजी - ज्योती सुभाष, आत खोलीत बसलेल्या असतात; आजोबा (कलाकार माहिती नाही) बाहेर बाल्कनीत उभ्या-उभ्या माफक व्यायाम करत असतात. दोघंही एकमेकांबद्दल प्रेक्षकांशी बोलतात. लटक्या तक्रारी, कसं फसवलं, आडून-आडून एकमेकांबद्दल काळजी घेणं, वगैरे. त्यांच्या वाक्यातून ते एकमेकांसाठी किती पर्फेक्ट फिट्ट कपल आहेत हे समजतं.
जाहिरातीची टॅग लाईन पण तशीच काहीशी आहे - जेव्हा आयुष्यभर तोलामोलाची साथ मिळते.. तेव्हा.. पुढे <काहीतरी. काहीतरी> लले ती फेडरल बँकेची जाहीरात आहे... ज्योती सुभाष आवडतेच.

जाहिरातीवर बंदी आणण्यासाठी याच बीबीवर मी कुठेतरी लिंक्स दिल्या आहेत. भारत सरकारच्या इन्फर्मेशन ब्रॉडकास्टींग मिनिस्ट्रीकडे तक्रार करता येते.

आस्कीकडे तक्रार करता येते.

http://www.ascionline.org/index.php/process-of-complaints.html

पियू,बरं झालं सांगितलंत.धन्यवाद... मला वेगळंच वाटलेलं.ती दुसर्‍या मुलीला खुन्नस देतेय,मी बघ कसे कुत्र्याला शर्ट शिवू शकते,नाहीतर तू बघ Biggrin
बॉयफ्रेंडचे शर्ट आहेत ते म्हणून हा खटाटोप्? व्वा! Happy

नॉर सूपच्या जाहिरातीतलं त्या मुलाचं ‘छोटी छोटी भूक बाय बाय...’ हे शेवटचं वाक्य मस्त. त्यावर त्याचे एक्‍स्प्रेशन्सही मस्त.

airwick चि एक जाहिरात काल बघितलि
त्यात ते सांगतात कि
पति के दोस्त आते है घर का सत्यानाश करने
ओर
पत्नि कि सहेलिया आति है दुनिया का सत्यानाश करने
Rofl Rofl Rofl Rofl

नॉर सूपच्या जाहिरातीतलं त्या मुलाचं ‘छोटी छोटी भूक बाय बाय...’ हे शेवटचं वाक्य मस्त. त्यावर त्याचे एक्‍स्प्रेशन्सही मस्त. >>>> +१ + हाल्फ...:डोमा:
माझी आणि माझ्या लेकीची (वय वर्षे दीड) आवडती जाहिरात..
तिला तो मुलगा बाय बाय करतो ते खुप आवडतं..

डिओ च्या अनेक वाह्यात जाहीरातिन्मध्ये आणखी एक भर : कोब्रा डिओ (की परफ्युम . )

तस बघितलत तर काही नाही नाहीतर बरच काही . अत्यन्त खालच्या दर्जाची Angry

मला न आवडणाऱ्या जाहिराती - वृत्तपत्रात मुखपृष्ठभरून केलेल्या सर्व जाहिराती! त्याहून वाईट अर्ध पानवाल्या जाहिराती ज्यामुळे पेपर हाताळणेसुद्धा कठीण होते. सकाळी चहाबरोबर पेपर चालण्याची मजाच हरवली आहे!

त्याहून वाईट अर्ध पानवाल्या जाहिराती ज्यामुळे पेपर हाताळणेसुद्धा कठीण होते. सकाळी चहाबरोबर पेपर चालण्याची मजाच हरवली आहे!>>>>>>>>>>>>>> + १०००००००००००००००

फॉर्च्युन तेलाची पावणेपाच मिनिटांची दीर्घ जाहिरात पियुष पांडेंनी लिहिली आहे. ओग्लिव्ही अ‍ॅन्ड मॅथरने बनवली आहे.

यावर्षीचे अ‍ॅवॉर्डस घेऊन जाणार ती अ‍ॅड.
डिरेक्ट कोणी केलीये? आणि ती आजीचं काम करणारी अ‍ॅक्ट्रेस कोण आहे?

त्या जाहिरातीत आजींची आणि त्या नर्सची एक्स्प्रेशन्स फारच भारी आहेत Happy आजींचे ड्रेसही एकदम डिसेन्ट आहेत Happy

अशीच एक खूप लांब जाहिरात हृथिक-सोनमची कोणत्यातरी मोबाईलची आहे म्हणे. दिसली नाही कुठे Sad

सध्याची एक जाहिरात- नर्सरीमध्ये लेकीला सोडायला आई आलेली आहे. शाळा संपेपर्यंत आई थांबते. शाळा सुटल्यावर आईला शोधणारा बाळीचा चेहरा आणि लेकीला बघितल्यानंतर जवळ घेणारी आई- मला त्या दोघींच्या एक्स्प्रेशन्ससाठी ही जाहिरात फार आवडते. आहे आशीर्वाद आट्याची! Proud

विवेक काकड आहे दिग्दर्शक. आजीचं काम करणारी कोण माहीत नाही. नर्सचं काम करणारीला बघीतलीय असं वाटतं.

नर्सचं काम करणारी बोर्नव्हिटाच्या जाहिरातीत पण आहे. त्या बॉक्सिंग करणार्‍या मुलीची आई.

मला त्यातलं ते कलोनियल स्टाइलचं हॉस्पिटलही भारी आवडलं. मिलिटरी हॉस्पिटल असावं.

सध्या काही कॉस्मॅटीक्सच्या जाहीरातीत एक फीमेल व्हॉईस ऐकुन डोक उठलय... सामान्य माणसाचा घसा बसल्यावर जसा आवाज येतो तसा भसाडा या शब्दाला मागे टाकणारा आवाज आहे तो.... व्हॉइस टेस्टींग वगैरे काही प्रकार नसतो का?

सध्या काही कॉस्मॅटीक्सच्या जाहीरातीत एक फीमेल व्हॉईस ऐकुन डोक उठलय... सामान्य माणसाचा घसा बसल्यावर जसा आवाज येतो तसा भसाडा या शब्दाला मागे टाकणारा आवाज आहे तो....>> मला तर वाटले तो राणी मुखर्जीचा आवाज आहे की काय? तसेही आता तिला फारसे सिनेमे मिळत नाही म्हटल्यावर व्हाईस ओव्हरकडे वळली की काय, असे वाटले.

अशीच एक खूप लांब जाहिरात हृथिक-सोनमची कोणत्यातरी मोबाईलची आहे म्हणे. दिसली नाही कुठे >>> मी फेसबूकवर शेअर केली होती. बचपन की मोहब्बत टाईप जाहिरात आहे. पण काही केल्या ह्रितिक आणि सोनम लहानपणी एकाच वयाचे असतील ही कल्पना सहन होइना. ती सोनम किती थोराड दिसते आमच्या ह्रितिकसमोर!!!!!

ती सोनम किती थोराड दिसते आमच्या ह्रितिकसमोर! >>>> आमच्या हृतिकसाठी प्रचंड अनुमोदन

नाही टोच्या, तिचा घोगरा आवाज मी ऐकला आहे आणि आता तिने ट्रीटमेंट घेउन बराच फरक पडला आहे... हा आवाज आहे तो घोगरा काय भसाडाच्याही पुढे आहे...

Pages