Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34
मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा! पहिलाच प्रतिसाद
व्वा! पहिलाच प्रतिसाद घाटपांडे सायबांचा ! Think of the ----- and the ------ is here! (हलकेच घ्या, सायबानु).
झटपट ज्योतिषी बनण्याची पाककृती माझ्या ब्लॉग वर आहेच , शिवाय मनोगत वर पण डकवली आहे, ईथे आणि कशाला परत?
सकाळी सकाळीच नारू
सकाळी सकाळीच नारू त्र्यंबकेश्वर शास्त्र्यांच्या दारात………
” महाराज, काही तरी सांगा, कधी संपणार माझ्या अडचणी, काय म्हणताहेत माझे ग्रह?”
“नारायणा, एकदम कठीण काळ आहे, ग्रह तुझी परीक्षा बघताहेत…… “
“असे किती दिवस चालणार“
“फार काही नाही, ही पुढची दोन अडीच वर्षे फक्त खूप त्रास होणार, अनेक अडचणी, हालअपेष्टा, दैन्य दारिद्र्य..”
“आणि मग नंतर? “
“नंतर तुला त्याची सवय होईल!”
अनिकेत ला नोकरी मिळाली..
१७ मार्च २०१३ ची गोष्ट, अनिकेत मला भेटला त्यावेळी त्याची अवस्था अगदी केविलवाणी झालेली होती, एव्हढा चांगला हुशार इंजिनियर पण एके दिवशी अनपेक्षितपणे नोकरीतून डच्चू मिळाला, कारण काय तर ‘कॉस्ट रिडकशन’! दुसरी नोकरी काय हसत हसत मिळेल असे म्हणता म्हणता चार महिने निघून गेले आणि मग याच्या तोंडचे पाणी पळाले.
मिळेल का अनिकेत ला नोकरी?
के. पी. होरारी ने उत्तर दिले.. अचूक – ठाम आणि परखड! कसे ते पुढे वाचा….
संपूर्ण पोष्ट माझ्या ब्लॉग वर आहे, पोष्ट फारच मोठी आहे , प्रश्न कुंडली चे चित्र असे असल्याने या ईथे ती पुर्णत: उतरवण्या पेक्षा प्रत्यक्ष पोष्ट चा दुवा दिला आहे.
Suhas
एक लहान ग्रंथालय म्हणता येईल
एक लहान ग्रंथालय म्हणता येईल असा ग्रंथ संग्रह आज माझ्या कडे झाला आहे, या ग्रंथ संग्रहातील काही निवडक ग्रंथांची माहीती मी माझ्या ब्लॉग देण्यास सुरवात केली आहे , त्यासंदर्भात अनेकांनी 'हे ग्रंथ कोठे विकत मिळतील’ अशी विचारणा केली आहे, प्रत्येकाला व्यक्तिशः: उत्तरे देण्यापेक्षा , एकच सविस्तर माहितीची पोष्ट करावी म्हणजे सर्वांना त्याचा लाभ होईल असा विचार करून ही नुकतीच एक मोठी पोष्ट माझ्या ब्लॉग वर लिहली आहे.
आणखी काही माहीती हवी असल्यास विचारा, यथाशक्ती , यथामती प्रयत्न करेन.
सुहास
http://suhasgokhale.wordpress.com/
एक लहान ग्रंथालय म्हणता येईल
एक लहान ग्रंथालय म्हणता येईल असा ग्रंथ संग्रह पुर्वीच माझ्या कडे झाला आहे, या ग्रंथ संग्रहातील काही निवडक ग्रंथांची माहीती मी माझ्या ब्लॉग देण्यास केव्हाच सुरवात केली आहे , त्यासंदर्भात अनेकांनी 'हे ग्रंथ कोठे फुकट मिळतील’ अशी विचारणा केली आहे, प्रत्येकाला व्यक्तिशः: उत्तरे देण्यापेक्षा , एकच सविस्तर माहितीची पोष्ट करावी म्हणजे सर्वांना त्याचा लाभ होईल असा विचार करून ही पुर्वीच एक मोठी पोष्ट माझ्या ब्लॉग वर लिहली आहे.
आणखी काही माहीती हवी असल्यास विचारा, यथाशक्ती , यथामती प्रयत्न करेन.
प्रकाश
ज्यांच्या कुंडलीत रवि ,आणि
ज्यांच्या कुंडलीत रवि ,आणि /अथवा गुरू केंद्रात असतात ते
देव देव फार करतात .त्यांना पूर्वकर्म वगैरेवर विश्वास असतो .त्यासाठीचे (सुधारणा ?) कोणी
उपाय सुचवले की ते श्रध्देने
करतात .पूर्वज ,वडिलधारे ,वरिष्ठ ,परंपरा ,रूढी याबाबत आदर आणि निष्ठा असते .
चालू ठेवणे ,चाकोरीबाहेर
न जाणे ही वृत्ती असते .
समाजाचा विरोध पत्करून
काही अनिष्ठ प्रथा टाळण्याची
धमक यांच्याकडे नसते .
शुक्र अथवा चंद्र केंद्रात असेल
आणि रवि गुरू नसतील तर
वरील गोष्टींच्या विरूध्द असते .काय वाटेल ते बेधडक करतील .
नुसता एखादा ग्रह एखाद्या
नुसता एखादा ग्रह एखाद्या स्थानी आहे म्हणून एखादे विषिष्ठ फळ असे इतके सोपे ठोकताळे नसावेत, तुम्ही म्हणता तशी फळे प्रत्यक्षात फार कमी वेळा अनुभवाला येतील. याला कारण तो ग्रह जर स्वतः सक्षम असेल तरच तुम्ही म्हणता तशी फळे देऊ शकेल अन्यथा ते एक पोकळ आश्वासन/ धमकी ठरेल.
ग्रह सक्षम आहे की नाही हे ठरवण्या साठी त्या ग्रहाचा स्थान , राशी, नक्षत्र , भावेशशत्व , नवमांश स्थिती, द्रुष्टी योग असा सर्वंकश विचार व्हायाला हवा. त्याच बरोबर सर्व ग्रहांचा मिळून एका खेळाच्या 'टिम' सारखा विचार झाला पाहिजे, केवळ आयसोलेटेड एक दोन ग्रहांच्या स्थिती वरुन कोणताही अंदाज करू नये, संपूर्ण पत्रिकेचा अभ्यास झाल्या शिवाय अशी विधाने करता येणार नाहीत (निदान मी तरी करणार नाही).
तसेच धर्म, रुढी, परंपरा , सभ्यता, शिष्टाचार , रितीरिवाज इ. सर्वच संकल्पना व्यक्ती, वय, स्थल , काल सापेक्ष असतात, तेव्हा भविष्यकथन करताना याही घटकांचा आवर्जुन विचार करावा लागतो.
सुहास
http://suhasgokhale.wordpress.com/
माझे हे निरीक्षण आहे . या चार
माझे हे निरीक्षण आहे .
या चार ग्रहांचे कारकत्व पाहिल्यास लक्षात येईल की
हे असेच असते .
फार खोलात न जाता हे पटकन
सांगू शकतो .
प्रश्न शास्त्र का आणि कसे –
प्रश्न शास्त्र का आणि कसे – भाग 1
प्रश्न शास्त्र एक दुर्लक्षित प्रांत
बदलत्या काळातल्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीने व्यक्तीगत आणि कौटुंबिक पातळीवर अभूतपूर्व बदल झाले आहेत. इंटरनेट सारख्या माध्यमाने एकाच वेळी लांबच्या माणसांना जवळ आणण्याची आणि जवळच्या माणसांना दूर लोटण्याची किमया करून दाखवली आहे. पूर्वी कधी कल्पनाही केल्या नव्हत्या अशा अनेक नवीनं समस्या व आव्हाने आज आपल्या पुढे अक्राळ विक्राळ स्वरूपात नित्य नव्याने उभी ठाकत आहेत , ढासळती समाजमूल्ये, नीतिमत्तेच्या बदललेल्या व्याख्या आणि काळ काम वेगाची सातत्याने बदलणारी समीकरणे सोडवताना चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यू सारखी आपली अवस्था झाली आहे. डोळ्यापुढचे सगळे आदर्श कोसळून पडले आहेत, आधार कुणाचा घ्यायचा आणि सल्ला तरी कोणाकडे मागायचा? सगळेच भ्रष्ट! अशा वेळी प्रश्नशास्त्र तुमच्या नक्कीच मदतीला येईल असा माझा विश्वास आहे...............
'प्रश्न शास्त्र का आणि कसे' ही एक प्रदीर्घ लेखमाला मी माझ्या ब्लॉग वर प्रकाशीत करणार आहे.
सुहास
अन्विता नेपच्युनला स्वतन्त्र
अन्विता नेपच्युनला स्वतन्त्र रास नाही हे खरे आहे, पण मीनेतला नेपच्युन पण प्रभावी असतो. मला वाटत लता मन्गेशकरान्च्या पत्रिकेत मीनेतला नेपच्युन आहे शुक्राबरोबर. रवी बुध पन्चमात आहेत त्यान्च्या. नेपच्युन धन स्थानात असेल तर अशा व्यक्तीच्या डोळ्यात निळसर झाक असते, म्हणजे निळे डोळे असतात. ( बुबुळाचा कलर निळसर)
रश्मी बरोबर आहे मीन राशीतला
रश्मी बरोबर आहे मीन राशीतला नेपच्यून जर शुक्र बरोबर असेल तर प्रभावी असतो एक तर मीन हि जलराशी आहे तसेच शुक्र मीन राशीत उच्चीचा मानतात . एकंदरच जलराशीत नेपच्यून प्रभावी वाटतो .
धनस्थानातील नेपच्यून असणाऱ्या लोंकाचा डोळ्यांचा( बुबुळ ) रंग निळा असतो हे नेपच्यून समुद्राचा कारक म्हणून म्हणते आहेस का? तसेच मग कदाचित स्वप्नाळू डोळे किंवा गूढ बोलणे असे logic पण लावता येईल .
पाश्चात्य ज्योतिष शास्त्रात
पाश्चात्य ज्योतिष शास्त्रात नेपच्युन ला मीन राशी दिली आहे.
नेपच्युन व निळे डोळे हे तर्काच्या आधारे योग्य वाटते पण इथे जातकाचा 'वंश' ही बघितला पाहीजे, भारतीय वंशात निळ्या डोळ्यांचे प्रमाण नगण्य आहे, तुलनात्मक पाहता युरोपियन 'वंशा' त हे प्रमाण लक्षणिय आहे.
नेपच्युन च्या बाबतीत श्री वसंतराव भटांनी अतिशय समर्पक भाष्य केले, ते त्यांच्याच शब्दातः
" नेपच्युन ची भावगत फळे बघताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती अशी की नेपच्युन कोणत्या ग्रहांच्या अंशात्मक योगात आहे ते सर्व प्रथम पाहावे लागते, इतर ग्रहांच्या अंशात्मक योगात असेल तरच नेपच्युनची फळे खासकरुन अनुभवास येतात.
सुटा म्हणजेच कोणत्याही ग्रहाच्या अंशात्मक योगात नसलेला नेपच्युन फळें देण्यास असमर्थ असतो, म्हणजे नेपच्युनचे स्थानगत सर्व गुण अवगुण त्या व्यक्तीत सुप्त रुपात असतात पण त्याचे दृश्य परिणाम बर्याच वेळा दिसत नाहीत.
उदाहरणार्थ पंचमात सुटा योग विरहित नेपच्युन असता व्यक्तीकडे भावना , स्फूर्ती , कल्पनाशक्ती उत्कृष्ट असते पण त्याची परिणिती कविता , लेखन यात होणार नाही मात्र हाच नेपच्युन शुक्र वा चंद्राच्या अंशात्मक योगात असेल तर नेपच्युनच्या या गुणधर्माचे रुपांतर सुंदर काव्य, लिखाण यांतून सहजपणे होते म्हणजे योगातले शुक्र वा चंद्र नेपच्युनच्या गुणांचा चांगला फायदा उठवतात.
सप्तमात सुटा नेपच्युन असता व्यक्तीला प्रेम करावेसे वाटेल पण प्रत्यक्षात अशी कोणतीही कृती करण्यास तो धजावणार नाही, प्रेम वा प्रेमविवाह हे एक ध्येय राहते. आता हाच नेपच्युन शुक्राच्या अंशात्मक योगात असेल तर मात्र प्रेम व प्रेमविवाहाला लागणारी आवश्यक ती धडाडी मिळुन व्यक्ती प्रेमप्रकरणात यशस्वी होते.
थोडक्यात योगविरहीत नेपच्युन हा एखादया बालकासारखा असतो.
आध्यात्म ,प्रेम, चैतन्य, उत्क्रांती, गूढ विषयांचे आकर्षण, भावनाशिलता, स्फूर्ती आणि कल्पनाशक्ती हे नेपच्युनचे स्वाभाविक गुणधर्म आहेत. पण या गुणधर्माची जडणघडण करण्याचे सामर्थ्य नेपच्युन ज्या ग्रहाच्या अंशात्मक योगात असेल त्या ग्रहाकडे असते. मंगळाच्या कुयोगात भावनांचा अतिरेक होउुन व्यक्ती आत्महत्येला प्रवृत्त होइल. गुरूच्या शुभ योगात आध्यात्मप्रेमाचा अतिरेक होतो व व्यक्ती सर्व व्यावहारीक जीवनाचा त्याग करुन संन्यास घेइल.
थोडक्यात इतर ग्रहांच्या गुणधर्माच्या माध्यमातून आपल्या स्वाभाविक गुणधर्माचा शुभ वा अशुभ विकास करणारा नेपच्युन एक विचित्र ग्रह आहे हे लक्षात ठेवावे लागते. "
सुहास गोखले
ज्योतिष आणि बरेच काही………..
डायल्स ची
डायल्स ची डिलिव्हरी..
मध्यंतरी मी युरेनियन ज्योतिष पद्धती साठी आवश्यक असलेल्या 90 /45 डिग्री डायल्स परदेशातुन मागवल्या होत्या, साधारण पणे 25 ते 30 दिवसांत त्या मिळतील अशी अपेक्षा होती पण तब्बल 50 दिवस झाले तरी त्या पोहोचल्या नाहीत. मला जरा काळजी वाटायला लागली. काय झाले असेल ? डायल्स पोष्टात गहाळ झाल्या असतील काय? चोरीला गेल्या असतील काय? कस्टम्सवाल्यांनी अटकवून ठेवल्या असतील काय? एक ना दोन अनेक शंका मनात येऊ लागल्या.कधी मिळतील डायल्स?
के.पी. होरारीने अशा पश्नांची उत्तरे चुटकी सारखी मिळतात आणि या ही वेळी ते मिळाले,
अचूक ठाम आणि परखड…
सुहास गोखले, तुमचे इथे
सुहास गोखले, तुमचे इथे स्वागत
>>>> ज्योतिष विषयक चर्चा ( अ.नि.स पद्धती चे वाद विवाद नाही ) करायला आवडेल. <<<<<
अन्निसची काळजी करूच नका..... त्यान्चे वावदूक इथेच काय जगात कुठेही भेटू शकतील, नव्हे नव्हे, असे भेटणे /नाक खुपसणे हा त्यान्चा जन्मसिद्ध (की ग्रहसिद्ध?) हक्क आहे
अन्विता, नेपच्युन वरील तुमचा लेख व ब्लॉग काल वाचला होता. मेलही पाठवली.
अन बर्का सुहासराव, माझा चंद्रनेपच्युन प्रथमपंचमातुन नवपंचम आहे अन नेपच्युन रविशुक्रबुधाचे युतित आहे. पलिकडे नवमात गुरू देखिल आहे.
फक्त थोडा घोळ झालाय........
द्वितियातुन मंगळराहूने नेपच्युन अन इतरांबरोबर केंद्रयोग केलाय, तर या पंचमातल्यान्नी अष्टमातल्या शनिकेतूशी केंद्रयोग केलाय.
त्यामुळे होते काय की मी काहीही केले तरी माझी "आ बैल मुझे मार" अशीच गत होते.....
वर वदांनी सांगितलेली जवळपास सगळी फळे त्यांच्या सीमारेषेपर्यन्त मला नेऊन आणतात...! असो.
इकडे अन्निस/बुप्रावाले/डिपार्टमेण्ट यान्चे बारकाईने लक्ष असते. प्रश्न विचारणारे "जेन्युईन" आहेत याचीही खात्री देता येऊ नये अशी परिस्थिती ज्योतिषविरोधकांकडून निर्माण केली जाते. सबब, जाहीर उत्तरे देताना इथेच काय, कुठेही "पॉलिटीकली व लिगली" करेक्ट उत्तरे देण्याचे बंधन स्वतःवर ठेवा म्हणजे झाले... बाकी तुम्हास खरे तर काहि सांगायला नकोच.
धन्यवाद , लिंबुटीँबूजी, मी
धन्यवाद , लिंबुटीँबूजी, मी तुमचा चाहता आहे.तुमच्यासारख्या अनुभवी तज्ञ ज्योतिर्वीदाचे मार्गदर्शन मलाच काय अनेकांना हवे आहे.
मी मोफत भविष्य कथन करत नाही आणि त्यात ही या अशा सार्वजनिक ठीकाणी तर नाहीच नाही. कोणतीही गोष्ट मोफत मिळाली की त्याची किंमत राहात नाही.
ज्योतिष विषयक लिखाण मला इथेही करता येईल पण त्याच्या वर नंतर ज्या घाणेरड्या पिंका , पिचका-या मारल्या जातील त्या मला आवडणार नाहीत, म्हणून माझे लिखाण सध्यातरी माझ्या ब्लॉग वरच ठेवायचे ठरवले आहे. माझा ब्लॉग नवीन आहे म्हणून माहीती साठी माझ्या ब्लॉग वरच्या पोष्ट्स च्या लिंक्स इथे देत आहे.
सुहास
suhasg , नेपच्यून बद्दल
suhasg , नेपच्यून बद्दल चांगली माहिती दिलीत . मी माझ्या ब्लॉग वर पण काही लिहिली आहे.
limbutimbu , ब्लोग वाचल्याबद्दल धन्यवाद !
तुम्हाला पण reply केला आहे.
अन्विता तुला तर माहीत आहेच की
अन्विता तुला तर माहीत आहेच की वृश्चिक ही एक गुढ रास आहे, त्यातुन नेपच्युन सारखा गुढता आणी अतीन्द्रिय ज्ञानाला पोषक ग्रह त्या राशीत पन्चमात आहे. पण रवी अष्टमात आहे असे तू म्हणालीस, मग रवी एकटा तिथे आहे की बुधाबरोबर आहे? कारण बुध हा ग्रह अष्टमात गुढ विषयाची आवड दाखवतो आणी त्यातुन ज्ञान पण देतो.
बुध आहे अष्टमात पण रवीच्या
बुध आहे अष्टमात पण रवीच्या युतीत नाही.
रवीच्या युतीत नसला तरी
रवीच्या युतीत नसला तरी अष्टमात आहे हे महत्वाचे.
suhasg, >> ज्योतिष विषयक
suhasg,
>> ज्योतिष विषयक लिखाण मला इथेही करता येईल पण त्याच्या वर नंतर ज्या घाणेरड्या पिंका , पिचका-या मारल्या
>> जातील त्या मला आवडणार नाहीत, म्हणून माझे लिखाण सध्यातरी माझ्या ब्लॉग वरच ठेवायचे ठरवले आहे.
अत्यंत उचित निर्णय. गलिच्छ पिंका तर तुमच्या इथल्या या संदेशावर पण मारता येतील. भले तुम्ही सरळ मनाने लिहिला असेल.
आ.न.,
-गा.पै.
भारतीय ज्योतिषशास्त्रात आऊटर
भारतीय ज्योतिषशास्त्रात आऊटर प्लॅनेट्स चा वापर जवळजवळ नाहीच. पाश्चात्यांनी मात्र या ग्रहांचा वाप्रर प्रभावी पणे केला आहे. या संदर्भात आयव्ही जेकबसन गोल्डस्टीन या महान लेखीकेचे काही ग्रंथ आवर्जुन वाचावेत असे मी सुचवतो.
आल्फी लोव्ही या प्रख्यात होरारी ज्योतिर्वीदाने नेपच्युन चा कसा खुबीने वापर केला आहे,ते पाहण्यासारखेच आहे.
भारतात गुरुवर्य श्री म दा भट व गुरुवर्य श्री व दा भट या बंधुद्वयांनी या आऊटर प्लॅनेट्सवर खूप अभ्यासपुर्वक लिहले आहे.
मानसीक आजाराच्या (डिप्रेशन इ.) केसेस मध्ये बिघडलेल्या बुधा बरोबर नेपच्युन चा ही मोठा वाटा असतो.
नेपच्युन (आणि युरेनस) यांचा
नेपच्युन (आणि युरेनस) यांचा चागला अभ्यास करायचा असल्यास या लेखकांचे ग्रंथ अवश्य डोळ्या खालून घालावेतः
सुहासजी, माझा एक मित्र आहे ..
सुहासजी, माझा एक मित्र आहे .. तो ही अनिकेत सारखा cost reduction चा बळी पडलेला आहे. मागच्या ४ महिण्यापासुन नौकरी शोधतोय.. आता खुप निराश राहु लागला आहे.. आपण त्याची काही मदत करु शकता का? तो मुम्बई ला असतो.. फोन वरुन आपल्याशी बोलु शकेल..
ash11: का नाही ? जरुर मदत
ash11:
का नाही ? जरुर मदत करेन, नोकरी शोधणे , त्यासाठी वणवण करणे , निराश होणे या सा-या प्रसंगातुन मी स्वतः एकदा गेलो असल्याने ती अवस्था काय असू शकते याची मला पूर्ण कल्पना आहे. माझा फोन नंबर इथे लिहणे जरा अडचणीचे वाटते , त्यापेक्षा आपल्या मित्राला माझ्या ब्लॉग वरचा 'Contact Form' भरायला जमला तर मी त्याच्याशी संपर्क लगेचच साधू शकेन.
सुहास
suhasg , तुमच्या ब्लॉग वरील
suhasg , तुमच्या ब्लॉग वरील काही posts वाचल्या . लिखाण माहितीपूर्ण व वाचनीय आहे.. लिखाणाकरता शुभेच्छा !
रश्मी , तू पण काही. लेख
रश्मी , तू पण काही. लेख लिहिणार होतीस ना. कधी लिहिते आहेस ? मी तुझ्या लेखांची वाट बघते आहे .
अहो सुहासभौ, कधी वाचणार हो
अहो सुहासभौ, कधी वाचणार हो इतके सगळे?
इतकी वर्षे आयुष्य गेले, तरी समुद्रातल्या चुळकाभर पाण्यायेवढाच अभ्यास झाला आहे अन इतकी वर्षे वाया गेली आहेत असे फार फार वाटते, असो.
बाह्य ग्रहांबाबत तुम्हीच थोडा थोडा विषय प्रवेश करुन द्याल का मराठीतून? म्हणजे त्या ग्रहांची थोडाक्यात माहिती/स्थानविशेष/गुणविशेष इत्यादी.
तेवढे सुत तुम्ही पुरवलेत तर तेवढ्या सुतावरून स्वर्ग गाठायची तयारी आहे आमची! (किंबहुना कोणत्याही ज्योतिषाचा तो मूलभूत स्थायीभाव असला पाहिजे असे मला वाटते)
अन्वीता: कौतुकाचे दोन शब्द
अन्वीता: कौतुकाचे दोन शब्द वाचुन समाधान वाटले.
लिंबु टिंबूजी: जरुर, जसा वेळ होईल तसे काही तरी लिहण्याचा प्रयत्न करेन. वाचनाचे म्हणाल तर, रोज नियमित ठराविक वेळेलाच, ठराविक जागीच बसून, ठराविक इतकी पानें वाचायचीच, असे ठरवले तर जमते असा माझा अनुभव आहे. त्याच बरोबर 'स्पीड रिडींग / फोटो रिडींग' या तंत्राचा मी मुबलक व प्रभावी वापर करतो.स्पीड रिडींग / फोटो रिडींग हे एक अत्यंत प्रभावी तंत्र आहे , कमीत क्मी वेळात जास्तीत जास्त वाचन करण्याची एक कला आहे,प्रयत्नाने आत्मसात करता येते. आणि हे वाचलेले लक्षात ठेवून ते वेळेला हुकमी आठवण्यासाठीचे दुसरेच एक (शिक्रेट!) तंत्र आहे त्याबद्द्ल नंतर कधी तरी सवडीने लिहतो.तूर्तास 'पॉल शिल', 'जीनी ग्रहॅम स्कॉट' ,'अॅन्डी ग्रे', आणि ''हॅरी लोरेन' या मान्यवरांचे लिखाण बघावे असे सुचवतो.
सुहासजी, ते रिडिन्गचे तन्त्र
सुहासजी, ते रिडिन्गचे तन्त्र तुम्ही म्हणता ते काय अस्ते ते माहित नाही, पण माझ्या महाविद्यालयीन जीवनात बारावी नन्तरची तिन वर्षे, दोन्ही सेमिस्टरच्या परिक्षा मी आदल्या रात्री कॉलेजच्या बागेतील दिव्याखाली बसुन मार्गदर्शक पुस्तक /क्रमिक पुस्तक वाचून दुसरे दिवशी परिक्षा द्यायचो ते आठवले, कदाचित तेव्हा मी जे तंत्र वापरत होतो ते स्पीड रिडिंग/फोटो रिडिंग सारखेच काहीतरी असेल. या तंत्रांबद्दलची नेमकी माहिती तुमच्याकडून ऐकायला आवडेल.
"ठराविक इतकी पाने वाचायचीच" हे गेली काही वर्षे मी केवळ मायबोलिपुरतेच करु शकलो आहे, पूर्वी तर ठराविक "आयडीज" वाचायच्याच हे देखिल पाळायचो. अॅडमिननी तो ट्री व्ह्यु बन्द करुन टाकल्यामुळे हल्ली आयडींना फॉलो करता येत नाही. ट्री व्ह्यु पुन्हा कधी सुरु होईल?
बाकी वेळेत मी रोजचे वर्तमानपत्रही वाचू शकत नाही
ते रात्री जेवताना वाचतो. एका हातात पेपर अन दुसरा हात ताटातोन्डाची सान्गड घालतो.
जिथे इच्छा तिथे
जिथे इच्छा तिथे मार्ग.
शिष्याची तयारी झाली की 'गुरु' आपोआप भेटतो.
जाता जाता (बाय द वे चे भाषांतर), सध्या मी 'वेब बेस्ड' (इंटरनेट च्या माध्यमातुन) , इ-लर्नींग स्वरुपाचे ज्योतिष अभ्यासक्रमाची आखणी करत आहे, त्यासंदर्भात आपल्या काही सुचना / अपेक्षा असल्यास कळ्वावे.
नेपच्युनच्या अभ्यासा साठी
नेपच्युनच्या अभ्यासा साठी काही लिंक्स
http://www.skyscript.co.uk/neptune2.html
Neptune, the planet of idealism, mystery and imagination, is also the planet of illusion, self-delusion and dissolution. It is a subtle yet powerful disintegrator, source of hallucinations and the deceptive forces of the subconscious mind. Its principle is to dissolve barriers, being capable of raising us up to mystical experiences, or pulling us down into chaos and confusion.
http://www.skyscript.co.uk/neptune1.html
Introducing Neptune Joanna Watters introduces the key concepts of Neptune and its essential planetary characteristics.
http://www.skyscript.co.uk/neptune3.html
The Significations of Neptune. Philip Graves considers the significations of Neptune, reviewing the symbolism of its planetary glyph, its essential characteristics and its principal rulerships over people, events and physical descriptions.
http://www.skyscript.co.uk/neptuneaspects.html
Neptune Aspects in the Birth Chart Michael McClain's interpretation guides for Neptune aspects in natal charts
Pages