Submitted by अरुंधती कुलकर्णी on 9 February, 2011 - 07:29
येथे सॅलड/ सलाद, रायते, कोशिंबिरीच्या समस्त फॅन्सचे स्वागत आहे!
आपल्या आवडत्या सॅलड्स, वेगवेगळ्या कोशिंबिरी, चवदार रायत्यांची रसभरीत वर्णने करायला ही जागा खास तुमच्यासाठी! आहारातील हा प्रकार आरोग्यासाठी चांगला आणि चव, रंग, स्वाद ह्यांचीही मेजवानीच!
तुमची आवडती, हमखास किंवा जरा हटके सॅलड्स, त्यांना वापरता ती ड्रेसिंग्ज, रायते-कोशिंबिरींची माहिती इथे शेअर करा. काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा. कोणकोणत्या भाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये इत्यादीचे कॉम्बिनेशन वापरून तुम्ही ते पदार्थ बनवता तेही सांगा.
सॅलडच्या माबोवरच्या काही पाकृ इथे आहेत.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोचवणे म्हणजे काय ते सांगायला
कोचवणे म्हणजे काय ते सांगायला जमतेय का ते बघते.
:
कोचवणं म्हणजे काकडी हातात उभी धरुन तिच्यावर सगळीकडून विळीवर हलकेच आघात करत तिचे बारीक बारीक तुकडे करणे. कोचवलेली काकडी आणि चिरलेली काकडी वेगवेगळी दिसते.
आता विळी म्हणजे काय ते नका हं विचारु!!
त्याला चोचवणे म्हणतात
त्याला चोचवणे म्हणतात ना?
सुरीन पण येते चोचवायला काकडी. चिमणी कशा चोच मारतात तशी सुरी मारायची काकडीला जशी जमेल तशी..(हे जसा राग असेल तसा वाचलं तरी जाईल).
चिमणी म्हणजे काय? ती चोच कशी
चिमणी म्हणजे काय?
ती चोच कशी मारते?
अरे देवा!! इब्लिस!! कोबी
अरे देवा!! इब्लिस!!
कोबी द्राक्षं सॅलड : हे कॉम्बो ट्राय केलं, मला चव आवडली.
कोबी बारीक चिरून त्यात द्राक्षं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर घालून फ्रीजमध्ये गार करायचे. ऑऑ + लिंबाचा रस + मीठ + हवी असल्यास किंचित साखर हे ड्रेसिंग बनवून अगदी आयत्या वेळी सॅलडमध्ये मिसळायचे. सॅलड तयार!
पळीभर तेलाची हळद, जिरं घालून
पळीभर तेलाची हळद, जिरं घालून फोडणी द्यायची.>>> पळीभर तेल
अरुंधती, काकडी, कोबी, सिमला मिरची आणि डाळींबाचे दाणे असं सॅलड पण भारी लागतं. फेटलेलं घट्ट दही आणि मीठ, साखर, मिरपूड... थंडगार करून खायचं.
मी काकडी सुरीवर कोचवुन
मी काकडी सुरीवर कोचवुन घेते.:स्मित:
काकडी सोलुन चॉपिन्ग बोर्डवर उभी धरुन तिला गोल फिरवत सुरीने खाचे मारत जायचे. मधुन मधुन चिरुन घ्यायचे. नन्तर काकडी पिळुन घ्यायची.( कोचवलेली काकडी)
नन्तर काकडी पिळुन घ्यायची.(
नन्तर काकडी पिळुन घ्यायची.( कोचवलेली काकडी)
मंजूडी ते सॅलड सह्ही लागतं...
मंजूडी ते सॅलड सह्ही लागतं... पुण्यातल्या एका फेमस थाळी स्पेशल डायनिंग हॉल मध्ये बर्याचदा खाल्लं, आपलं, हादडलं असलेलं चक्क्यातलं आणखी एक सॅलड : चक्क्यात वाफवलेले मटार, लाल भोपळा, बटाटा, सिमला मिरची, श्रावण घेवडा [सर्व वाफवून / शिजवून] घालून मीठ, मिरपूड, किंचित साखर.... गार करून खायचे.
हो नाहीतर अख्खी काकडी आधीच
हो नाहीतर अख्खी काकडी आधीच कशी पिळणार्?:फिदी:
सर्व प्रतिसाद उत्तम !!!
सर्व प्रतिसाद उत्तम !!!
फोटो टाकायचा प्रयत्न करत
फोटो टाकायचा प्रयत्न करत होते.
From mayboli मी केले ले सलाड
मी केले ले सलाड डेकोरेशन.
आणि हे दुसरे From mayboli
आणि हे दुसरे
मस्त!
मस्त!
मस्त फोटो!
मस्त फोटो!
अप्रतीम आणी रसरशीत ! खालचे
अप्रतीम आणी रसरशीत ! खालचे क्रोशा/ लोकरीचे काम उत्कृष्ट आहे.
दोन्ही फोटो मस्त.. खालचे
दोन्ही फोटो मस्त..
खालचे क्रोशा/ लोकरीचे काम उत्कृष्ट आहे. +१
धन्यवाद!! क्रोशे काम ही मीच
धन्यवाद!! क्रोशे काम ही मीच केलेले आहे. माझी ती आवड आहे.
ब्रोकली वापरुन (अगदी कच्ची
ब्रोकली वापरुन (अगदी कच्ची नको, थोडी परतलेली किंवा ग्रील केलेली) चीझ आणि मेयॉनीज शिवाय एखादं सलाड सुचवाल का?
ऑऑ + ठेचलेला लसूण + मीठ +
ऑऑ + ठेचलेला लसूण + मीठ + लिंबाचा रस + वाफवलेले ब्रोकोली फ्लोरेट्स
हेमा -- दोन्ही फोटो छान
हेमा -- दोन्ही फोटो छान
अल्पना, मी मीठ घातलेल्या
अल्पना, मी मीठ घातलेल्या उकळत्या पाण्यात एक ४, ५ मिनिटं ब्रोकोली शिजवून रँचमध्ये बुडवून तशीच खाते. भारी लागते एकदम.
थोडी परतलेली किंवा ग्रिल
थोडी परतलेली किंवा ग्रिल केलेली ब्रोकोली तशीच छान लागते. किन्वा शिजवून त्यात या ब्रोकोलीचे तुकडे मिसळून, त्यात एखादं सिझनिंग मीठबिठ घालून पण चांगलं लागतं.
अल्पना तू कच्ची नको
अल्पना तू कच्ची नको म्हणालीएस, पण तरीही, आर्च ने एक आपल्या पद्ध्तीची कोशींबीर सांगितली होती. ब्रोकोली बारीक चिरुन, लाल कांदा बारिक चिरून, त्यात लिंबुरस मीठ आणि वरून मस्त हिंग घालून फोडणी. सही लागतो हा प्रकार. तुला अगदी हवच असेल तर ब्रॉकोली वाफवून घेऊ शकतेस. मला वाटतं तिने दाण्याच> कुट पण सांगितलं होत त्यात, ते न घालता पण चांगल लागतं.
या धाग्यावर आहे: http://www.maayboli.com/node/17289
अल्पना, ब्रोकोली ऑऑ आणि
अल्पना, ब्रोकोली ऑऑ आणि ठेचलेल्या लसणात टॉस करुन बेक करायची. फार मस्त लागते.
http://www.thedailymeal.com/h
http://www.thedailymeal.com/healthiest-store-bought-salad-dressings-slid...
कधीतरी वेळ कमी म्हणुन कोणाला तयार विकत घ्यायचे असेल तर उगीच आपले लिहुन ठेवावे म्हटले..
तोंडली कोशींबीर : तोंडली
तोंडली कोशींबीर : तोंडली किसून,,कुकरमधे शिजवायची. मग दही,,दाण्याचे कुट,बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर, मीठ साखर अन वरून मोहरी, हिंग,,कढिपत्याची खमंग फोडणी. कळतही नाही तोंडल्याची आहे
अवल मस्त आहे कोशींबीर करुन
अवल मस्त आहे कोशींबीर करुन बघेन आता...
स्टृऑबेरीचे सॅलड होते का?
स्टृऑबेरीचे सॅलड होते का?
स्ट्रॅबेरीजच्या चौकोनी फोडी,
स्ट्रॅबेरीजच्या चौकोनी फोडी, पालकाची पानं चिरून, वॉलनटचे तुकडे असं सॅलड खाल्ल आहे. चांगलं लागतं. लिंबाचा रस, मध आणि ऑऑ असं ड्रेसिंग होतं मी खाल्ल त्यात. वरून अगदी हलकं मीठ आणि मीरपूड.
http://www.iwashyoudry.com/2014/05/05/strawberry-spinach-salad-candied-p... हे सॅलड भारी लागत असणार.
Pages