सॅलड, कोशिंबिरी, रायते फॅन क्लब

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 9 February, 2011 - 07:29

येथे सॅलड/ सलाद, रायते, कोशिंबिरीच्या समस्त फॅन्सचे स्वागत आहे! Happy

आपल्या आवडत्या सॅलड्स, वेगवेगळ्या कोशिंबिरी, चवदार रायत्यांची रसभरीत वर्णने करायला ही जागा खास तुमच्यासाठी! आहारातील हा प्रकार आरोग्यासाठी चांगला आणि चव, रंग, स्वाद ह्यांचीही मेजवानीच!

तुमची आवडती, हमखास किंवा जरा हटके सॅलड्स, त्यांना वापरता ती ड्रेसिंग्ज, रायते-कोशिंबिरींची माहिती इथे शेअर करा. काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा. कोणकोणत्या भाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये इत्यादीचे कॉम्बिनेशन वापरून तुम्ही ते पदार्थ बनवता तेही सांगा.

सॅलडच्या माबोवरच्या काही पाकृ इथे आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक आणखी वेगळा प्रकार :

पिकलेलं /ली केळं/ळी सोलून गोल चकत्या कराव्यात. दही, मीठ, ताजं खोबरं घालून खावं. यम्म्म्म्म्म्म !!

हि कोशिंबीर मी आयूष्यात एकदाच खाल्लीय. कितीही आवडली असली तरी ती परत खायला मिळायची संधी मला मिळू नये, असे वाटते (का ते समजेलच.)

पावसाळ्यात कधी कधी जोरात वारा सुटला कि काहि नारळाची झाडे पडतात. त्या झाडाचा जो वाढणारा भाग असतो, त्याचा गाभा अत्यंत चवदार असतो. त्याची तूलना थोडीफार खोबर्‍याशी होऊ शकते. मालवणला एकदा काकीने त्यात मीठ मिरची घालून आणि नावाला फोडणी करुन एक चवदार कोशिंबीर केली होती.

हा भाग खायची संधी केवळ माड पडला तरच मिळते (म्हणून मला नकोय) वाढत्या झाडाचा हा भाग कुणी काढणार नाही, कारण तसे केले तर माडाची वाढच थांबते आणि झाड मरतेच.

हम्म, दिनेशदा, खरंय तुमचं.... अशी कोशिंबीर कितीही चवदार असली तरी त्यापायी एखाद्या माडाची वाढ नको खुंटायला. शहाळ्याच्या मलईचाही फ्रूट सॅलडमध्ये उपयोग करतात ना? कोणत्यातरी कुकरी शो मध्ये पाहिलं होतं. नीट आठवत नाही, पण त्यात केळी, सफरचंद, लिंबाचा रस असं काहीतरी होतं हे नक्की आठवतंय. आणि शहाळ्याच्या मलईचे तुकडे!! यम्म्म!!

आपल्याकडे जे बोरकूट मिळतं तेही सॅलडमध्ये वापरलं जाऊ शकतं. मी पेरू / काकडी / सफरचंद / मोड आलेले हिरवे मूग इत्यादींवर भुरभुरून टाकते ते. त्याची आंबट-तुरट चव मस्त लागते.

आजच लोकसत्तामधे बिनिवालेंचा लेख आहे. (चतुरंग, न्याहरी) मोड काढलेले मूग, ओले खोबरे, आले आणि मीठ. काय मस्त चव लागेल. आपण लिंबू, चाट मसाला वगैरे घालू.

बिहारमधे कोवळे फणस वाफवून, ठेचून त्यात तिखट मीठ घालून खातात. पण जास्त खाल्ले तर घसा बसतो म्हणे.

अकु, बोरकूट टाकायची कल्पना छान आहे. करुन पाहीन. Happy

इडिबल अरेन्जमेन्ट्स करायला एक किट मिळते. फळांची सजावट करायला एकदा मैत्रिणीकडून आणले होते पण त्यातल्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करावा लागला नाही. Proud

http://www.amazon.com/Deluxe-Fruit-Vegetable-Carving-Knife/dp/B001EI4EPO...

http://www.amazon.com/International-Culinary-Carving-Piece-Wood/dp/B0003...

लालू, त्यातल्या पहिल्या किट्मधल्या २-३ सुर्‍या आणि दुसर्‍या किट्मधला स्कूप चमचा एवढे वगळले तर बाकीचे सर्व प्रकार अनोळखी! Proud पण कल्पना छान आहे, सुर्‍या परजतच फळांना सामोरे जायचे! Happy

दिनेशदा, आल्याचं ड्रेसिंग वापरून उकडलेलं किसलेलं बीट + मीठ/ सैंधव + साखर + लिंबू / दही + कोथिंबीर असाही प्रकार करता येतो. तसेच वाफवलेला श्रावण घेवडा, वाफवलेले फ्लॉवरचे तुरे ह्यांसाठीही हे ड्रेसिंग वापरता येते. हवं तर बचकाभर ओलं खोबरं घालावं. अजूनच मस्त. फक्त, उन्हाळ्यात आल्याचा वापर जरा जपूनच करायचा.

मामी, केळ्याबरोबर दही + ओलं खोबरं ड्रेसिंग घरी सांगितल्याबरोबर मातु:श्रींना त्यांचे पिताश्री तशी कोशिंबीर करायचे ह्याची आठवण झाली. त्यांची टिप म्हणजे घरी विरजलेले सायीचे गोड दही + चिमटीभर साखर ह्यात वापरावे. मी त्या चवीच्या कल्पनेनेच एकदम गारेगार झाले!! Happy लक्ष्मीबाई धुरंधर केळ्याच्या कोशिंबिरीत मोहरीचा दळ घालायला सांगतात.

वाव मस्तच धागा.. संध्याकाळी रोज फक्त सलाड खातो त्यामुळे मस्त उपयोग होणार.. सगळे सेव्ह करून ठेवते..

मेथीचा खुडा
बारीक चिरलेली मेथी
बारीक गोबी चिरून
टोमाटो बारीक चिरून
चिमुटभर मीठ
चवीला तिखट..

तयार खुडा . फ्रेश आणि एकदम मस्त लागतो चवीला..

सलाड करताना त्यात भाज्यासकट दाण्याशिवाय बदाम काप, walnats , भाजलेले सोयाबीन, सूर्यफुलाच्या बिया, टरबुजाच्या बिया, पम्पकिन च्या बिया, असा टाकून केले तर क्रंची आणि हेल्दी बनते, मीठ टाकायची गरज पडत नाही.. कांदा, कांद्याची पात टाकली तर तिखट टाकायची गरज नसते..

आपण मराठी लोक शिंगाडे फारसे खात नाहीत. काळे उकडलेले जे शिंगाडे असतात, ते कुठल्याही कोशिंबीरीत छान लागतात.
मुंबईत ओले शिंगाडे पण मिळतात. त्याची चव छान असते आणि ते छान क्रंची लागतात. ते पण सलाडमधे चांगले लागतात.
वरती प्रित ने लिहिल्याप्रमाणे सर्व बिया वापरता येतात. लाल भोपळा, टरबूज वगैरेच्या बिया आपण टाकून देतो पण त्या, सु़कवून जरा भाजून ठेवल्या तर सवडीने सोलता येतात, आणि त्या सलादमधे वापरता येतात.

मराठी लोक शिंगाडे फारसे खात नाहीत >> जळगाव भुसावळकडे खुप प्रमाणात खाल्ले जातात. तिकडे पिकतही जास्त असतील म्हणून असेल कदाचित.

त्याचप्रकारचे हिकमा (Jicama) नावाचे एक स्टार्ची रूट इथे अमेरिकेत मिळते. च्याची कोशिंबीरही मस्त होते.

हिकमाची चव नाही बघितली अजून. इथे नाहीच मिळायचं.
शिंगाड्याचे पिठ मिळते, कारण गुजराथी लोकांना फार प्रिय ते. पण ताजे शिंगाडे नाहीच.
जळगाव भागात मुद्दाम पिक घेतात का ? मुंबईच्या परिसरात नैसर्गिक रित्या तलावात पिक येते त्याचे.

खुप उपयोगी.. आता सगळ्या रेसीपी करुन बघणार आहे. हा धागा खुप आवड्ला कारण सॅलड च्या मराठी (भारतीय) रेसीपी खुप दिवस शोधत होते , पण एकत्र मिळत नव्ह्त्या कुठे पण. आभारी. उत्तम माहीती.

दुधिभोपळ्याचे दह्यातले भरीत छान लागते.माझा साबा दुधी फक्त तशीच खातो. दुधीच्या सालासकट किंवा साले काढून बारीक फोडी कराव्या व प्रेशर कुकर मध्ये वाफवाव्या.बाहेर काढुन हाताने कुस्कराव्या. लसुण बारिक चिरुन घ्यावी.पळीमध्ये तेलाची जिरे,मोहरी,हळद्,हिंग,हिरवी मिरची तुकडे ,लसूण ठेचून किंवा तुकडे घालून फोडणी करावी.कुस्करलेल्या फोडींमध्ये दही ,मीठ, साखर घालुन वरुन फोडणी घालावी. कोथिंबिर घालावी.सर्व प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे घ्यावे.

वेगवेगळ्या सुकवलेल्या, भाजलेल्या बिया घालून सॅलडचे पोषणमूल्य वाढविण्याची कल्पना मस्त आहे. कलिंगडाच्या, कोहळ्याच्या बियाही सुकवून भाजून वापरता येतात. कांद्याची पात घातल्यावर मीठ, तिखट कमीच लागते सॅलडला मग. थँक्स प्रित. Happy

अजून एक, लसणाची पात किंवा आल्याची पात देखील फ्लेवरसाठी अत्यल्प प्रमाणात सॅलडमध्ये वापरू शकता. अशी पात आपण घरगुती किचन गार्डनमध्ये एखाद्या कुंडीत आले, लसणाचा गड्डा, कांदा खोचूनही मिळवू शकतो.

सॅलड/रायते/कोशिंबीर ह्यांसाठी आपण खालील प्रकारे, घरगुती पध्दतीने वेगवेगळे हर्बल फ्लेवर तयार करू शकतो :

१. कोथिंबीर, कोथिंबीरीच्या काड्या बारीक चिरून दह्यात/ लिंबाच्या रसात घालणे.
२. पुदिन्याची पाने बारीक चिरून दह्यात/ लिंबाच्या रसात
३. कांदा/लसूण/आले पात बारीक चिरून दह्यात/ लिंबाच्या रसात.
४. सेलरी/ पार्सले वापरून.
५. कढीपत्ता बारीक चिरून
६. मिक्स्ड हर्ब्ज किंवा आवडतात त्याप्रमाणे अ‍ॅसॉर्टेड फ्रेश हर्ब्ज वापरून.

अजूनही काही आयडिया मी वापरते. तुळशीच्या मंजिर्‍या चुरडून किंवा तुळशीची पानेही काही सॅलड्समध्ये मस्त लागतात. एक-दोनदा ओव्याची पानेही चुरडून/ बारीक चिरून वापरून पाहिली आहेत. वेगळी चव येते.

आपल्याकडे ताजे बेसिल मिळते आता. त्याची काडी खोचली तरी जगते. त्याची पाने दिसतातही छान आणि सूप, सलाद, पिझा मधे वापरता येतात.

धावतोय नुसता धागा. Happy

कच्चा बीट किसून त्यात उकडलेले मटार व कॉर्नचे दाणे, आणि घेवडा. वरुन चाट मसाला अणि सफेद मिरपूड. चवीला मीठ. लिंबू पिळता येईल अथवा दही घालता येईल.

बेसिलची पाने मस्त लागतात स्वादाला. आता सहज मिळतात, अगदी पुण्यातल्या जुन्या भाजी मंडईतसुध्दा!:-)

दिनेशदा, तुम्ही बहुतेक दिलंय हे आधी, पण आता आठवलं म्हणून टाकतेय इथे पुन्हा: सिमला मिरची भाजून तिचा रंग काळपट हिरवा झाला की ती गार करून बारीक चिरायची. सायीचे दही + जिरेपूड + मिरेपूड / ठेचलेले मिरीचे दाणे + मीठ असे घालून रायते करायचे. काहीजण ह्यात दाण्याचे कूटही घालतात. पण मला दाणेकूट न घालताच येणारी चव आवडते. वरून कोथिंबीर मस्टच!

शैलजा, कॉर्न, घेवडा, मटार, बीट हे कॉम्बोच मस्त आहे! Happy मला उकडलेलं बीट जास्त आवडतं, त्यामुळे मी बीट उकडून घेणार!

अकु, मला उकडलेल्या बीटाचा काहीसा उग्र वास आणि चव आवडत नाही, आमच्याकडे कोणालाच आवडत म्हणून कच्चंच घेतो. Happy

वाळक्याची पण कोशींबीर मस्त लागते...
मराठवाड्यात वाळकं आणि आंध्रात गुड्मकाई (इति साबा)

वाळकं किसुन त्यात दहि, मोहरीची पुड, मीठ, कोथींबिर, आणि जिरं हिंगाची हिरवी मिरची फोड्णी घालायची... मस्त लागते..आणि थंड असते..

वाळकं पिकलेलं नुसतं पण छान लागतं.

वाळक्याचं लोणचं, धपाटे, थालीपीठ... भारी लागत... Happy

पुण्यात का बरे मिळत नसावे.. Uhoh

ही बीबी वाचून न राहावून काल केलेलं झटपट सॅलड..
मक्याचे दाणे, बारीक चिरलेला पालक, थोडे शेंगदाणे उकळत्या पाण्यात ५ मिनिटे ठेवून मग गाळून घेतले. बारीक चिरलेल्या कांदा-टोमॅटो मधे हे मिसळलं. थोडं मीठ, चाट मसाला घातला. दही फेटून वर घातलं. मग घेताना मिरपूड आणि चिली फ्लेक्स.
पालक नको म्हणणारा नवराही "असा पालक चालेल अ‍ॅक्चुली..." म्हणाला. Happy

सिंडरेला, शोधते त्या सॅलडची लिंक. Happy

किट्टु, वाळकं म्हणजे काकडीच्या वर्गातलाच प्रकार ना? मला पुण्यात पाहिल्याचं कधी आठवत नाहीए.

प्रज्ञा, वा, पालक चाटमध्ये बारीक चिरून घालायची कल्पना चांगली आहे! Happy

बुंदी रायत्यात डाळिंबाचे दाणे घालूनही फर्मास लागतात.

कोबीचं अजून एक वेगळ्या प्रकारचं सॅलड : चक्का, साखर, मीठ, मोहरी पूड, थोडंसं दूध असं एकत्र नीट मिसळून घ्यायचं. क्रीमी झालं पाहिजे. कोबीची चिरलेली पाने बर्फाच्या पाण्यात धुवून घ्यायची, म्हणजे कुरकुरीत होतात. कोबी, किसलेलं गाजर, द्राक्षं, चिरलेली सेलरी एकत्र करायचं, त्यात चक्क्याचं ड्रेसिंग नीट मिक्स करायचं. गरजेप्रमाणे मीठ. फ्रीजमध्ये थंडगार करून गट्टम् स्वाहा!!

पालकाची किंवा तत्सम पाने खास किचनमधल्या वापरासाठी जी कात्री असते, त्यांनी छान बारिक कापता येतात. असा धाग्यासारखा कापलेला पालक, सालाद, सुपमधे चांगला दिसतो. याच कात्रीने हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या पण छान कापता येतात.

सोल्लीड रेसिप्या आहेत एकेक...

अकु, असला धागा उघडल्याबद्दल तुझे आभार तरी किती मानु??????????

पहिले पान बघत असताना नजर नेमकी मेधाने लिहिलेल्या
(यात पापडाऐवजी निखार्‍यावर भाजलेले सुके बांगडे घातल्यास अजून बहार )

या वाक्यावर पडली... तोंडाला पाणी किती फास्ट, अगदी काही नेनोसेकंदात कसे काय सुटते याचे नवल वाटले.

किट्टु, वाळकं म्हणजे काकडीच्या वर्गातलाच प्रकार ना >> हो.. पण चवीला आंबट्ट असते. मलाही कुठे दिसले नाही पुण्यात...

ही दक्षिण भारतीय पद्धतीची गाजराची कोशिंबीर.
तेलावर मोहरीची फोडणी करून त्यात हिरव्या मिरच्या, भिजवलेली मुगाची डाळ २ चमचे घालून किसलेली गाजरे घालायची. मीठ घालून वाफ काढायची. वरून लिंबाचा रस आणि चिरलेली कोथिंबीर.

अशी पात आपण घरगुती किचन गार्डनमध्ये एखाद्या कुंडीत आले, लसणाचा गड्डा, कांदा खोचूनही मिळवू शकतो. >>>खूप धन्स उन्हाळात लावेल आता.. तुझ्या सगळ्याच आयडिया एकदम सही आहेत अकु!
दिनेशदा पालक कात्रीने, चाकूने कापू नाही म्हणतात.. खरे खोटे माहिती नाही पण..शोध घ्यायचाय एकदा.. कापल्याने त्यातले पोषक द्रव्य कमी होतात .. त्यामुळे शक्य असेल तिथे मी हाताने तोडून टाकते. म्हणजे वरणात किवा आयते/धिरडे करतना ज्यात कळणार नाही .. घरी आम्ही दोघच जर सलाड खाणार असलो तर मी अक्खी टाकते.. मेथी पण मी अक्खी टाकते शक्यतो..

प्रज्ञा सही.. पालक कुठे हि घालावी त्याला फार विशेष चव नसते. इथे अमेरिकेत तर नाहीच नाही.... जिथे म्हणून कोथिंबीर घालता तिथे पालक घुसडायची थोडी फार प्रमाणात.. मुलं नारळाची, शेंगदाण्याची चटणी खूप आवडीने खातात त्यामुळे मी चटणीत पण पालक टाकते.. २-३ पान टाकलं तर मस्त हिरवा रंग येतो आणि भाजी हि जाते पोटात..!!

Pages