झी मराठी - सा रे ग म प - सूर नव्या युगाचा

Submitted by मंजूडी on 28 January, 2014 - 02:02

झी मराठी वाहिनीवर सा रे ग म पचे नवे पर्व सुरू झाले आहे - सूर नव्या युगाचा!

यावेळी फक्त १४ स्पर्धक निवडून ही स्पर्धा चालू केलेली आहे -
महेश कंटे, श्रीनिधी घटाटे, कौशिक देशपांडे, जयंत पानसरे, भाग्यश्री टिकले, जुईली जोगळेकर, मनोज क्षिरसागर, रसिका गानू, संज्योती जगदाळे, प्रल्हाद जाधव, शंकर गिरी, मृण्मयी पाठक, रेश्मा कुलकर्णी, गणेश मेस्त्री

परीक्षक आहेत अवधूत गुप्ते आणि तौफिक कुरेशी, तर सूत्रसंचालन करतोय अभिजीत खांडकेकर.

दर सोमवार आणि मंगळवार रात्री साडेनऊ ते साडेदहा झी मराठी वाहिनीवर - "सा रे ग म प - सूर नव्या युगाचा"

पुनःप्रक्षेपण - मंगळवार आणि बुधवार दुपारी चार वाजता आणि शनिवारी रात्री साडेनऊ वाजता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवधूत गुप्ते आणि वादकसंच वगळता (मग शिल्लक कोण राहिलं? ;-)) पूर्ण नव्या संचात अवतरलंय झी मराठीवर सारेगमप!

कालच्या भागातली गाणी आवडली. अर्थात् कालचा आणि आजचा डाव देवाला आहे.

अभिजीत खांडकेकर निवेदक म्हणून आवडतोय. तौफिक कुरेशी आणि अवधूत परीक्षक म्हणून धमाल आणतील असं वाटतंय. बघूया!

१४ जण आहेत...

वादकसंचात व्हायोलिन वादक अ‍ॅड झालीये...

कालच्या भागातील काही गाणी पटली नाहीत.. सगळ्यांनाच जुनी गाणी देऊन त्याची नवीन व्हर्जन्स गायला लावायला हवी होती..

तशी तीनच गाणी झाली फक्त..

१४ स्पर्धकांची नावे माहिती आहेत का? वर हेडरमधे टाकते.

अरे ती व्हायोलीन वादक याआधीही होती ना? मी नाव विसरले नेमकं तिचं.. श्रुती का? तिचा भाऊ सारेगमपचा स्पर्धक होता, आणि तिने व्हायोलिनवादक म्हणून एंट्री घेतली होती. त्यांचे वडिलही खूप प्रसिद्ध गायक आहेत.

नविन concept आवडला... innovative ....
सर्व स्पर्धक छान आणि .comfortable वाटतायेत पहिल्या भागा पासुन... .तौफिक कुरेशी आणि अवधूत परीक्षक म्हणून तर मस्त च ...
अभिजित धमाल करनार आहे .. या वेळि...

महेश कंटे, श्रीनिधी घटाटे, कौशिक देशपांडे, जयंत पानसरे, भाग्यश्री टिकले, जुइली जोगळेकर, मनोज क्षिरसागर, रसिका गानू, संज्योती जगदाळे, प्रल्हाद जाधव, शंकर गिरी, मृण्मयी पाठक, रेश्मा कुलकर्णी, गणेश मेस्त्री

श्रीनिधी घटाटे>>> ही पूर्वीपण होती का आलेली. नाव ऐकल्यासारखे वाटते आहे. Uhoh

योग्यवेळी बाफ चालू केल्याबद्दल मंजूसाठी एजोटाझापा. Happy

मला हा कन्सेप्ट कितपत झेपणार आहे ते कळत नाहीये. जुन्या १०० नंबरी गाणी मनात इतकी खोलवर रुजली आहेत की त्यांच्यावर चढवलेला नविन साज पहिल्या ऐकण्यातच आवडणे कठीण जाणार आहे.

पण स्पर्धक मस्त आहेत त्यामुळे आशा आहे. सगळ्यात मोठे आकर्षण म्हणजे तौफिक कुरेशी. अफलातून व्यक्तीमत्व आहे ते.

काल ज्यांनी काही कारणांनी हा कार्यक्रम पाहिला नाही त्यांच्याकरता- आज दुपारी ४ वाजता रिपीट टेलिकास्ट आहे.

हिम्या, धन्यू!
आणि ती व्हायोलीन वादक श्रुती भावे! Happy तीच आहे ना आताही?

प्राची, हो. श्रीनिधी घटाटे लिटिल चॅम्प्समधे आली होती. कार्तिकी गायकवाडच्या पर्वात, भाग्यश्री टिकले पण होती तेव्हाच. आणि पद्मनाभच्या पर्वात जुईली जोगळेकर आली होती.

हो प्राची.

मी अनेक वर्षांनी बघायला सुरुवात केलीये, कंटाळा येईपर्यंत बघेन. तो कौशिक देशपांडे इंडियन आयडॉलमध्ये होता का कधी? बघितल्यासारखा वाटतोय.

मी पण काही वर्षांत पाहिलं नाहिये सारेगमप. आज आठवण झाली तर बघेन. रसिका गानूला गेल्यावर्षी लाईव्ह ऐकलं होतं.

हो.. तो कौशिक देश्पांडे इंडियन आयडल मधे होता. ते आशा भोसलेचे जे पर्व होते, त्यात होता तो.

जुन्या १०० नंबरी गाणी मनात इतकी खोलवर रुजली आहेत की त्यांच्यावर चढवलेला नविन साज पहिल्या ऐकण्यातच आवडणे कठीण जाणार आहे.>> माधव, काल कौशिक देशपांडेचं गाणं ऐकलंत का?

अरे वा... धागा आला का.. चांगलाय.. ऑओ च्या धकाधकीत हा धागा काढायचाच राहिला होता..:P
स्पर्धक चांगले वाटतायत सगळे.. कालची गाणी आवडली..
अभिजीत आणि अवधुत दोघेही आवडतात.. अवधुत-तौफिक कुरेशी कॉम्बो चांगलं जमेल असं वाटतय.. अभिजीतच्या कालच्या त्या कविता टिपी होत्या..
शीर्षक गीताचं रिमिक्स पण आवडलं...

ह्यावेळी बरेच दिवसांनी हे पर्व आल्याने चांगलं आहे.. बघावसं वाटतय...

जुन्या १०० नंबरी गाणी मनात इतकी खोलवर रुजली आहेत की त्यांच्यावर चढवलेला नविन साज पहिल्या ऐकण्यातच आवडणे कठीण जाणार आहे >>>> मला ते प्रोमोमध्ये दाखवलेलं ढिनच्यॅक नाट्यगीत खूप आवडलं.. Happy

यंदाच्या स्पर्धेतले ६ ते ७ जण आधीच अशा स्पर्धात गायलेले आहेत..

महेश कंटे - इ किंवा स्टार प्रवाह वरच्या स्पर्धेतला विजेता होता.

जुईली, श्रीनिधी आणि भाग्यश्री - ज्युनिअर सा रे ग म प मधे होते.

कौशिक - राहुल सक्सेना बरोबर हिंदी सा रे ग म प मध्ये होता.

मी कदाचित या बाबतीत फारच मागास असावी पणः

१. मराठी सारेगमप मध्ये मराठीच गाणी गायली जावीत असं मला मनापासुन वाटतंय.
२. पल्लवी जोशीला खुप मिस करते. अभिजीत खांडेकरची तिच्याशी नकळत तुलना होते.

पल्लवीपेक्षा अभिजीतची 'भाषा' चांगली वाटतेय.

अभिजीत खांडकेकरला २६ जानेवारी दिल्ली परेडच्यावेळी उत्तम सूत्रसंचालनाचे बक्षीस मिळालेले आहे. अधिक तपशीलात लिहिते नंतर.

Pages