Submitted by मंजूडी on 28 January, 2014 - 02:02
झी मराठी वाहिनीवर सा रे ग म पचे नवे पर्व सुरू झाले आहे - सूर नव्या युगाचा!
यावेळी फक्त १४ स्पर्धक निवडून ही स्पर्धा चालू केलेली आहे -
महेश कंटे, श्रीनिधी घटाटे, कौशिक देशपांडे, जयंत पानसरे, भाग्यश्री टिकले, जुईली जोगळेकर, मनोज क्षिरसागर, रसिका गानू, संज्योती जगदाळे, प्रल्हाद जाधव, शंकर गिरी, मृण्मयी पाठक, रेश्मा कुलकर्णी, गणेश मेस्त्री
परीक्षक आहेत अवधूत गुप्ते आणि तौफिक कुरेशी, तर सूत्रसंचालन करतोय अभिजीत खांडकेकर.
दर सोमवार आणि मंगळवार रात्री साडेनऊ ते साडेदहा झी मराठी वाहिनीवर - "सा रे ग म प - सूर नव्या युगाचा"
पुनःप्रक्षेपण - मंगळवार आणि बुधवार दुपारी चार वाजता आणि शनिवारी रात्री साडेनऊ वाजता.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रिझल्ट कुठे लागलाय जिज्ञासा?
रिझल्ट कुठे लागलाय जिज्ञासा? भुंग्याने आतल्या गोटातली बातमी सांगितलीये फक्त. शुट झाला असेल नां आज आणि उद्याचा भाग मागच्या आठवड्यात.
१. अंतिम १२ चे १४ कसे झाले?
१. अंतिम १२ चे १४ कसे झाले? >>>>>
पण अंतिम १२ स्पर्धकांमध्ये ७ मुली आणि ५ मुले होती. सगळ्या स्पर्धकांना डयुएट गाण्यासाठी (७ मुली आणि ५ मुले) हे चुकत होते. म्हणुनच त्यांच्या सोयीसाठी त्यांनी आणखी दोन पुरुष स्पर्धक निवडले आणि स्पर्धकांची संख्या १४ केली.
कौशिक देशपांडेला का घेतले हेच
कौशिक देशपांडेला का घेतले हेच मला पटले नाही. तो आधीच झी हिंदी - सारेगमप आणि सोनी - इंडियन आयडल मध्ये येऊन गेला होता ना? मग तिसरा चान्स?
झी मराठी - सारेगमप ज्युनियरमध्ये येऊन गेलेल्या (श्रीनिधी घटाटे, भाग्यश्री टिकले, जुईली जोगळेकर आणि संज्योती जगदाळे) चौघीना तर केवळ पुर्वपुण्याई वर घेतले असावे.>>> मला हा मुद्दा कळला नाही.
नक्की कशाला आक्षेप आहे तुमचा? मला तरी यात काहीच गैर वाटले नाही. आत्तापर्यंत सगळ्याच कार्यक्रमांमधून असे झालेले आहे. अगदी पूर्व फेरीत न सिलेक्ट होऊ शकलेले पण पुढील पर्वात सिलेक्ट झालेले आहेत. मधल्या काळात जर या गायकांनी कष्ट घेऊन स्वतःला इम्प्रुव्ह केले असेल तर काय चुकीचे आहे?
प्राची, माझा आक्षेप आहे तो ६
प्राची, माझा आक्षेप आहे तो ६ नविन स्पर्धक (४ मुले आणि २ मुली) आणि ८ आधीच्या कार्यक्रमात येऊन गेलेले स्पर्धक (३ मुले आणि ५ मुली) घेतले याला. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. इतर कार्यक्रमात/वाहिन्यांवर येऊन गेलेल्या स्पर्धकांना या कार्यक्रमातले छक्केपंजे माहित असतात. याचा परिणाम नविन स्पर्धकांवर होतो. मग त्यांच्यावर अन्याय का?
पूर्व फेरीत न सिलेक्ट होऊ शकलेले पण पुढील पर्वात सिलेक्ट झाले तर छानच आहे. पण अंतिम १०/१२ किंवा काहिही, एकदा स्पर्धेतुन बाद झालेले असताना पुन्हा दुसरा प्रयत्न का? नविन चेहऱ्यांना संधी द्या ना!
वाहिनीने एकतर सगळे नविन (याअगोदर कुठल्याही कार्यक्रमात/वाहिनीवर न आलेले) स्पर्धक घ्यावेत नाहीतर सगळे आधीच्या कार्यक्रमात येऊन गेलेले स्पर्धक घ्यावेत. या अगोदर असा प्रयत्न इथे केला गेला होता.
http://en.wikipedia.org/wiki/Jo_Jeeta_Wohi_Super_Star
http://en.wikipedia.org/wiki/Jo_Jeeta_Wohi_Super_Star_2
पण वाहिनीने काय आणि कसे करावे
पण वाहिनीने काय आणि कसे करावे हा वाहिनीचा प्रश्न आहे ना...
प्रेक्षकांचा कल त्यांनी का ध्यानात घ्यावा?
मंजूडी, हे तू उपरोधिक का काय
मंजूडी, हे तू उपरोधिक का काय म्हणतात तसं म्हणते आहेस का?
अर्थातच
अर्थातच
धन्यवाद मंजूडी, मी दिलेले मत
धन्यवाद मंजूडी,
मी दिलेले मत अर्थातच माझे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे इतरांनी त्याच्याशी सहमत व्हावे असे मला कधीही वाटले नाही, जमणार सुध्दा नाही मला ते. माझे मत जे काही आहे ते मी लिहिते.
@ सारिका, तुमचा ड्युएट साठी
@ सारिका,
तुमचा ड्युएट साठी समसमान मुले मुली घेतली हामुद्दा पटत नाही कारण ड्युएट राऊंड येईपर्यंत ती संख्या तसेही समसमान राहणार नाहीच. शिवाय यावेळी संपूर्ण कंसेप्ट वेगळा आहे सो ड्युएट असेल का कोणास ठाऊक.
लिटिल चँप (फायनल ५ वगळता) हे सगळेच १५ ते ३० या वयोगटात आता मोडत असल्याने सगळेच जण अधिक तयारीने नशीब आजमावायला आलेले होते त्यतले काही निवडले गेले..... त्यांना लहान वयोगटात आलात ना आता मोठ्या वयोगटात मज्जाव असं म्हणणं अशक्य आहे...... कारण मधल्या वर्षात प्रत्येकाची तयारी फोकस वेगवेगळा असणार आहे.
झी आणि सोनी कट्टार आहेत असं ऐकून होतो कि सोनीच्या ऑडिशनला गेलेल्यालाही झीवर संधी मिळत नाही मग आता कौशिक सोनीवरही होता आणि आता इथेही कसा काय ते झी च जाणो.
बाकी आपल्याला कोल्हापूरचा प्रल्हाद फारच आवडतोय. आणिओवन्स अगेन माझ्ह्यामते जगदाळे इज अ डार्क हॉर्स...... !!!!
शिवाय यावेळी तौफिकना घेऊन
शिवाय यावेळी तौफिकना घेऊन प्रोग्राम केलाय सो थीम ही पर्फॉर्मन्स बेस्ड असणार हे अध्यरूद आहे....... !!!!
आउटडोअर्स, सारिका, कवीन,
आउटडोअर्स, सारिका, कवीन, Thank you!
मी अजून सोमवारचा भाग पाहिला नाहीये पण मला वाटले की आजच्या भागात (या आठवड्यात) स्पर्धेला सुरुवात होईल (जो शूट होताना भुंगा यांना काय झाले ते कळले) आणि पुढच्या आठवड्यात प्रेक्षक मत+ परीक्षक गुण यावर पहिले elimination होईल. मे बी आजचा भाग पाहिल्यावर कळेल काय झाले ते!
झी आणि सोनी कट्टार आहेत असं
झी आणि सोनी कट्टार आहेत असं ऐकून होतो कि सोनीच्या ऑडिशनला गेलेल्यालाही झीवर संधी मिळत नाही मग आता कौशिक सोनीवरही होता आणि आता इथेही कसा काय ते झी च जाणो.
<<
आधी झीवरच होता कौशिक , सारेगमप आणि सारेगमप मेगाचॅलेंज दोन शोज मधे !
नंतर गेला सोनीच्या आयडॉल मधे.
राहुल सक्सेना इंडियन आयडॉल-१
राहुल सक्सेना इंडियन आयडॉल-१ मध्ये होता.
कौशिक काल फारच बंडल गायला.
कौशिक काल फारच बंडल गायला. आणि शंकरही.
प्रल्हादचे गाणे मस्त झाले. मलाही तो आवडलाय व्हर्सटाईल आहे. मुलींमध्ये काल मृण्मयी आवडली.
श्रुतीचे व्हायोलिन टॉप! त्याने एक वेगळीच मजा येत आहे गाणी ऐकायला.
अवांतर- काल सिन्थेसायजरवर नेहेमीप्रमाणे क्लोजप घेतला, तेव्हा घरात चर्चा चालू झाली... सत्यजित नेहेमीच काय सुरेख वाजवतो, तेही न चुकता. त्याचं आडनाव काय आहे बरं??
मुलगा त्वरित आणि अतिशय आत्मविश्वासाने म्हणाला- मुधोळकर!!
तरी तो तू तिथे मी चा पॅसिव्ह ऑडियन्स आहे!
तर, सिन्थ सत्यजितचे आडनाव काय आहे?
प्रभू... कालच्या भागाच्या
प्रभू...
कालच्या भागाच्या नुसार शंकर गिरी बाहेर जाणार.. जर कोणी फारच वाईट गायले नाही तर...
किंवा अजून एक डाव देवाला म्हणून कोणालाच बाहेर काढणार नाहीत...
काल ती नागपूरची मुलगी पण
काल ती नागपूरची मुलगी पण चांगली गायली.. मला तिचं पहिल्या भागातलं गाणं पण ठिक वाटलं होतं..
हो कौशिकचं नाही आवडलं..
अवांतर- काल सिन्थेसायजरवर
अवांतर- काल सिन्थेसायजरवर नेहेमीप्रमाणे क्लोजप घेतला, तेव्हा घरात चर्चा चालू झाली... सत्यजित नेहेमीच काय सुरेख वाजवतो, तेही न चुकता. त्याचं आडनाव काय आहे बरं??
मुलगा त्वरित आणि अतिशय आत्मविश्वासाने म्हणाला- मुधोळकर!! हाहा>>>
सही आहे हे.
शंकर फार्च बेसुरा गायला आणि कौशिक ओव्हर कॉन्फिडंस्मध्ये गेला.
सत्यजित मुधोळकर पौ, एवढी
सत्यजित मुधोळकर
पौ, एवढी पर्व झाल्यानंतर आज त्या गोड आणि गुणी सत्याचं पूर्ण नाव विचारते आहेस.... शोनाहो!
कौशिक तसाही पहिल्यापासून
कौशिक तसाही पहिल्यापासून ओव्हरकॉन्फिडंट वाटतो मला तरी. कालचं त्याचं गाणं मला नाही आवडलं. शंकर आणि कौशिक बद्दल +१
पूनम
पूनम
कोणतं गाणं होतं ते आणि? कधीही
कोणतं गाणं होतं ते आणि? कधीही ऐकलंही नव्हतं मी तर. अगदीच वाईट होतं पण.
मला त्या रेश्माने गायलेलंही आवडलं. नेमकं त्या शंकरचं गाणं मिस केलं मी.
मुलगा त्वरित आणि अतिशय
मुलगा त्वरित आणि अतिशय आत्मविश्वासाने म्हणाला- मुधोळकर!! >>>
कोणतं गाणं होतं ते आणि? कधीही
कोणतं गाणं होतं ते आणि? कधीही ऐकलंही नव्हतं मी तर. अगदीच वाईट होतं पण. >>> +१.
गाणं नक्की मराठी होतं की हिंदी असा प्रश्न पडला ऐकून. गुरू ठाकूरनी असे गाणे लिहावे???
मुलगा त्वरित आणि अतिशय
मुलगा त्वरित आणि अतिशय आत्मविश्वासाने म्हणाला- मुधोळकर!! >>>
अरारा सगळेच मुधोळ केरात म्हणजे.
कौशिकने गायलेलं का? 'बायको
कौशिकने गायलेलं का? 'बायको बायको' रिंगा रिंगा नावाच्या सिनेमातलं.
गुरू ठाकूरनी असे गाणे लिहावे??? >> अहो सिनेमाची मांग असेल ती
धन्स हिम्या. मंजूडी, आडनाव ठाऊक आहे गं, काल एकदम ब्लँक झालो सगळेच
बायको बायको' रिंगा रिंगा
बायको बायको' रिंगा रिंगा नावाच्या सिनेमातलं.>>>आमच्या घरातील प्रत्येकाने वेगळे वेगळे शब्द ऐकले गाण्यात.
गाणं नक्की मराठी होतं की
गाणं नक्की मराठी होतं की हिंदी>> थोडं कोकणी थोडं मराठी थोडं हिंदी.
पण असं धेडगुजरी असलं तरी मूळ गाणं एकदा ऐका... खूप छान आहे.
बायगो बायगो इलायती नाय गो
बायगो बायगो इलायती नाय गो
फेनीची हायगो वायली मजा
बायगो बायगो सांग किदे जायगो
फिक्कर को छोड चल लिक्कर पिला
अहो ते बायको नाही ओ
हिंदी गाणी एलिमिनेशन राउंड
हिंदी गाणी एलिमिनेशन राउंड मधे का Allow करत आहेत? हिंदी गाण्यांचा एक स्पेशल एपिसोड असता तर ठीक होते. हिंदी मराठी सरमिसळ बरोबर वाटत नाही.
बरे झाले पुलंचे रावसाहेब या जगात नाहीत. त्यांनी ते सुरेश वाडकरांचे गाणे म्हटलेल्या मुलाला गोरक्षण संस्थेची पेटी हातात घेउन गाणे म्हणायला पाठवले असते. तौफीक बरेच सौम्य बोलले त्याला. मला नाही वाटत त्याच्या पेक्षा हॉरिबल कोणी गाउ शकेल असे.
तेच तर.... हिंदी गाण्यांसाठी
तेच तर.... हिंदी गाण्यांसाठी आहे ना हिंदीतलं सारेगम... मराठी गाणी गा की लेकांनो चांगली चांगली..
Pages