Submitted by मंजूडी on 28 January, 2014 - 02:02
झी मराठी वाहिनीवर सा रे ग म पचे नवे पर्व सुरू झाले आहे - सूर नव्या युगाचा!
यावेळी फक्त १४ स्पर्धक निवडून ही स्पर्धा चालू केलेली आहे -
महेश कंटे, श्रीनिधी घटाटे, कौशिक देशपांडे, जयंत पानसरे, भाग्यश्री टिकले, जुईली जोगळेकर, मनोज क्षिरसागर, रसिका गानू, संज्योती जगदाळे, प्रल्हाद जाधव, शंकर गिरी, मृण्मयी पाठक, रेश्मा कुलकर्णी, गणेश मेस्त्री
परीक्षक आहेत अवधूत गुप्ते आणि तौफिक कुरेशी, तर सूत्रसंचालन करतोय अभिजीत खांडकेकर.
दर सोमवार आणि मंगळवार रात्री साडेनऊ ते साडेदहा झी मराठी वाहिनीवर - "सा रे ग म प - सूर नव्या युगाचा"
पुनःप्रक्षेपण - मंगळवार आणि बुधवार दुपारी चार वाजता आणि शनिवारी रात्री साडेनऊ वाजता.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तेच तर.... हिंदी गाण्यांसाठी
तेच तर.... हिंदी गाण्यांसाठी आहे ना हिंदीतलं सारेगम... मराठी गाणी गा की लेकांनो चांगली चांगली..>>>>>>> अनुमोदन
प्रोमो मधे दाखवतायत ते धुम ३ गाणं काय डेंजर गातेय जी कोण आहे ती...
मुधोळकर..... हिम्स.....
मुधोळकर.....
हिम्स..... थम्ब्स अप.....!!!!
प्रोमो मधे दाखवतायत ते धुम ३
प्रोमो मधे दाखवतायत ते धुम ३ गाणं काय डेंजर गातेय जी कोण आहे ती...
>>>>>
तीच जगदाळे द डार्क हॉर्स.....
रसिकानं मस्त गायलंय आज. कालचा
रसिकानं मस्त गायलंय आज.
कालचा भाग काय पाह्यला नाय मिळ्ळा..
पातळी प्रचंड खालावली आहे.
पातळी प्रचंड खालावली आहे. मुलांची प्रतिभा कमी पडतेय असे वाटते आहे. बरेच जण चक्क बेसूर गात आहेत. निदान ऐकू तरी बेसूर येत आहे.
मला असे वाट्टे की selection कमी पडलेय.
एकूण, अजूनही नाही आवडलं! एकही गाणं ऐकून " अरे वा! काय गायलेय मुलगी, किंवा मुलगा" असे वाटलेले नाही.
प्रोमो मधे दाखवतायत ते धुम ३
प्रोमो मधे दाखवतायत ते धुम ३ गाणं काय डेंजर गातेय जी कोण आहे ती... >>+१००
पातळी प्रचंड खालावली आहे.
पातळी प्रचंड खालावली आहे. मुलांची प्रतिभा कमी पडतेय असे वाटते आहे. बरेच जण चक्क बेसूर गात आहेत. निदान ऐकू तरी बेसूर येत आहे. >>> +१
कालच्या भागात गणेश मिस्त्रीचेच गाणे त्यातल्या त्यात सूरात वाटले. बाकी सगळेच बेसुरे होत होते अधून मधून.
धूम ३ गाण्यामधे तिचं जे काय
धूम ३ गाण्यामधे तिचं जे काय चालू होतं त्यालाच "किंचाळणं" असं म्हण्तात का?
अत्यंत बेसुरा एपिसोड होता.
धूम ३ गाण्यामधे तिचं जे काय
धूम ३ गाण्यामधे तिचं जे काय चालू होतं त्यालाच "किंचाळणं" असं म्हण्तात का?
>>>>>> +११११११११११...
किंचाळण प्रकाराच प्रात्यक्षिक होत ते
ह्या आठवड्यातली गाणी बघता
ह्या आठवड्यातली गाणी बघता निकाल बरोबर होता.. शंकर गिरीचं गाणं काहितरीच झालं होतं परवा...
धुमला इतकं डोक्यावर का घेतलं कळलं नाही.. अति लाऊड होतं.. आणि काय एकंदरीत हातवारे आणि हावभाव !
टिकले बाईंना गाणं चांगलं मिळालं होतं पण एनर्जी, जोर फारच कमी पडला..
त्या जगदाळेचं गाणं खरंच वन्स
त्या जगदाळेचं गाणं खरंच वन्स मोअर देण्याइतकं चांगलं होतं? आणि त्यातून सुरात नव्हतं हे ही सांगितलं. मग कशाला इतकं डोक्यावर घेतलं तेच नाही कळलं.
आजकाल आयटम सॉन्ङ्ज प्रकाराची
आजकाल आयटम सॉन्ङ्ज प्रकाराची गाणी कशीही म्हटली तरी त्याला पब्लिक डोक्यावर घेताना दिसतं. असली गाणी गायली की किंचाळायची ऑफिशीअल परवानगी मिळाल्यासारखे गायक ओरडतात (असे माझे वैयक्तिक निरीक्षण!!!)
अगदीच नंदिनी. मागच्या
अगदीच नंदिनी. मागच्या एपिसोडमधलं जुईलीचं गाणंही तसंच.
अगदी आडो.. त्या भागातही
अगदी आडो.. त्या भागातही जुईलीचं गाणं उगीच फार डोक्यावर घेतल्यासारखं वाटलं..
बादवे.. मागच्या भागात अवधुतने त्या गणेश मेस्त्रीला का झापलं म्हणे ? मी युट्युबवर पाहिलं त्याचं गाणं.. त्यामुळे नीट काही कळलं नाही..
भुंग्या, काय उगा भुंगा
भुंग्या, काय उगा भुंगा सोडलेलास इथे? निकाल काही अनपेक्षीत नाही वाटला मला. ह्म्म! फक्त जगदाळेचं गाणं डोक्यावर घेणं नाही पटलं पण तसं ते ही अनपेक्षीत नव्हतच
मलाही नक्की नाही माहीत कारण
मलाही नक्की नाही माहीत कारण किचनमधून ऐकत होते नुसतंच. पण बहुधा त्याने म्युझिशिअन्सनां परस्पर इन्स्ट्रक्शन्स दिल्या असं काहीतरी.
बासरी आणि व्हॉयलीनने मात्र
बासरी आणि व्हॉयलीनने मात्र कार्यक्रम बघणं वसूल झालं
बासरी आणि व्हॉयलीनने मात्र
बासरी आणि व्हॉयलीनने मात्र कार्यक्रम बघणं वसूल झालं >> +१००
त्या मनोजला का घेतलंय कळत नाही.
सगळ्यांना मम! गाणं गातानाचे
सगळ्यांना मम!
गाणं गातानाचे संज्योतीच्या चेहर्यावरचे हावभाव मला अतिशय चीप वाटतात.
पग्या, गेल्या आठवड्यात गणेश मिस्त्रीने गाणं सुरू केलं आणि मग वळून 'कट कट' असं म्हणत सगळ्या वादकांना थांबवलं. त्यावरून अवधूतने 'गाणं थांबवण्याचे अधिकार तुम्हाला नाहीत' असं त्याला सांगत झापलं.
बासरी आणि व्हायोलिन >>> +१००
कविता, भुंग्याची मेव्हणी कोण?
यावेळचं सारेगम ना धड लहानांचं
यावेळचं सारेगम ना धड लहानांचं ना धड मोठ्यांचं असंच वाटतेय..... कंटाळा आला. त्यापेक्षा हिंदी सारेगम जसराज, विश्वजीत, महम्मद अमान यांचे एपिसोड पुन्हा पाहायला हवेत.... तसेही इथेही हिंदआच गाणी चाललियेत प्रत्येक एपिसोडमध्ये....
@पराग - गणेश मेस्त्री गेल्यावेळी गाणं गाताना थोडासा चुकला असावा आणि तो स्वतः "कट" म्हणाला.... तुम्ही कितीही सरावलालेले असाल तरी दिग्दर्शक (किंवा एपिसोड डिरेक्टर) किंवा एनी ऑथोराइइज्ड पर्सन यानेच "कट" म्हणून रिपीट गायला देणे अपेक्षित असते..... म्हणून त्याला अवधूतने झापला..... नशीब तो एपिसोड एलिमिनेशनचा नव्हता नाहीतर गणेश कन्फर्म बाहेर किंवा राडा तरी झाला असता.
मंजु, जुईली
मंजु, जुईली
भाग्यश्री टिकले , जुइली
भाग्यश्री टिकले , जुइली जोगळेकर यांना जरा स्पेशल ट्रीटमेंट मिळत आहे असे वाटतय. काल भाग्यश्री टिकले बॉटम थ्री मधे असायला हवी होती. अत्यंत बेसुरा एपिसोड, रसिका गानुचे "सुंदर ते ध्यान" हे भक्तिगीत ऐकतोय का गझल ऐकतोय हेच कळत नव्हते. आता परीक्षकांनी खोटे खोटे 'चांगले झाले गाणे; असे म्हणण्याऐवजी परखड मते सांगायला हवीत. नाहीतर या मुलामुलींना आपले काय चुकतेय हे कधीच कळणार नाही.
प्रोमो मधे दाखवतायत ते धुम ३
प्रोमो मधे दाखवतायत ते धुम ३ गाणं काय डेंजर गातेय जी कोण आहे ती... >>+१०० परीक्षकांना आवडले ते गाणे!!! काहीही
ओह असं झालं होय त्या गणेश
ओह असं झालं होय त्या गणेश मेस्त्रीचं !
बासरी आणि व्हॉयलीनने मात्र कार्यक्रम बघणं वसूल झालं >>>> कविता +१
रसिका गानुचे "सुंदर ते ध्यान"
रसिका गानुचे "सुंदर ते ध्यान" हे भक्तिगीत ऐकतोय का गझल ऐकतोय हेच कळत नव्हते. <<< चांगलं गायलं की तिनं.
ज्यांना ध दिले गेले त्यांच्या तुलनेत तर सरसच होतं ते.
गिरीही गिराना ना कल... मी
गिरीही गिराना ना कल... मी बघितला नाही एपिसोड.. परत आजच असतो तो ही बघता येणार नाही..
शनिवारी रविवारी कधी दाखवला तर बघेन..
एकूणच कुछ मजा नही आ रहा है ह्या वेळेस...
शनिवारी रात्री साडेनऊला सलग
शनिवारी रात्री साडेनऊला सलग दोन्ही भाग दाखवतात, पण आता ती नवी मालिका सुरू होतेय ना?
त्यामुळे या शनिवारी असेल का ठाऊक नाही.
गजानन + १. मनस्मींना रसिकाचं
गजानन + १.
मनस्मींना रसिकाचं गाणं गझल का वाटलं?
'नव्या युगाचे' म्हणजे नक्की
'नव्या युगाचे' म्हणजे नक्की काय ते कळेनासे झालय. मागच्या आठवड्यात चालीत थोडेफार बदल केले होते या आठवड्यात ते पण नाही जाणवले. का ज्याचा परफॉरमन्स चांगला (खरं तर अधीक लाऊड असेच म्हणायला हवे) त्याचे गाणे चांगले असा मंत्र आहे या 'नव्या युगाचा'?
सगळ्याच भागात हिंदी गाणी येताहेत ते खटकायला लागलय. पहिल्या भागापुरते ठीक होते पण प्रत्येक भागात हिंदी गाणी असतील तर मराठी सारेगमचा वेगळ्या मंचाची आवश्यकता काय होती?
एकंदरीत संकल्पनेचे दारीद्र्य जाणवते आहे या पर्वात. स्पर्धक तर अत्यंत सुमार गाताहेत.
वादक मस्त वाजवतात...पण
वादक मस्त वाजवतात...पण गाणारे, आवाजावर अजिबात मेहनत न घेता, घश्याला ताण न देता, येईल तस गातात आणि तो अवधूत पण हात पुढे करत चेहऱ्यावर 'आहाहा...गानेमे क्या दर्द है!' अश्या प्रकारचे भाव आणत कानाला हेडफोन लावून ते गाण सहन करत असतो. (आम्हाला नुसत ऐकताना नकोस होत आणि हा बघा....)
अस वाटत कि प्रतिक्रिया देण्याच्या नादात काही वेळात तो त्याच्या खुर्ची कम सोफ्यावरून घसरून दाणकन खाली आपटेल. गाणार्यांची कमाल आहे मात्र.....कसेहि गात सुटतात.
या रियालिटी शो मध्येही राजकारण होत असावं. एकही गाणारा सुरात कसा गाऊ शकत नाही??? आणि त्यातल्या त्यात जे बरे गातात, त्यांनाही हे एलिमिनेट करत सुटतात.
Pages