झी मराठी - सा रे ग म प - सूर नव्या युगाचा

Submitted by मंजूडी on 28 January, 2014 - 02:02

झी मराठी वाहिनीवर सा रे ग म पचे नवे पर्व सुरू झाले आहे - सूर नव्या युगाचा!

यावेळी फक्त १४ स्पर्धक निवडून ही स्पर्धा चालू केलेली आहे -
महेश कंटे, श्रीनिधी घटाटे, कौशिक देशपांडे, जयंत पानसरे, भाग्यश्री टिकले, जुईली जोगळेकर, मनोज क्षिरसागर, रसिका गानू, संज्योती जगदाळे, प्रल्हाद जाधव, शंकर गिरी, मृण्मयी पाठक, रेश्मा कुलकर्णी, गणेश मेस्त्री

परीक्षक आहेत अवधूत गुप्ते आणि तौफिक कुरेशी, तर सूत्रसंचालन करतोय अभिजीत खांडकेकर.

दर सोमवार आणि मंगळवार रात्री साडेनऊ ते साडेदहा झी मराठी वाहिनीवर - "सा रे ग म प - सूर नव्या युगाचा"

पुनःप्रक्षेपण - मंगळवार आणि बुधवार दुपारी चार वाजता आणि शनिवारी रात्री साडेनऊ वाजता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा आवाज जांभळी ३८ या पट्टीचा आहे.
>>>>>>>>>>>>>>>

चैतन्य, किती जांभळं खावी लेका.....करवंदं खाल्ली असतीस तर बात कुच्छ और होती दोस्त Wink

भुंग्या...
करवंदं बघत होतो... पण ती कोल्ह्याच्या द्राक्षांसारखी आंबट होती.... म्हणून जांभळं खाऊन घेतली Proud

कोणीतरी कृपया झी ला सांगा रे!

आतापर्यंत पाहिलेल्या कुठल्याही सा रे ग म पेक्षा हे कमी प्रतीचे आहे. वाद्य-वृंद उत्तम!!

मला असे वाटते की रेश्मा कुलकर्णी 'माझिया प्रियाला' अजून खूप चांगली गाऊ शकली असती. सो सो गायली. कदाचित शोभा गुर्टुंचे इतके डोक्यात बसलेय त्यामुळेही असेल. पण जागा अगदी वर वर घेतल्या. खरे तर तिच्या आवाजाचा अजून फायदा करून घ्यायला हवा होता.

जुईली जोगळेकर पहिल्या २५ पार्श्व्गायिकांत? अवधूत गुप्ते नी ENT Specialist ना दाखवायची नितांत गरज आहे.

>>अवधूत गुप्ते नी ENT Specialist ना दाखवायची नितांत गरज आहे. <<

अवधूत गुप्ते हे एक ओव्हररेटेड केरेक्टर आहे. हल्ली दाद देताना तर तो अगदी विचित्र चेहरा करतो; जणू कोणी त्याला जोरदार चिमटा काढला आहे… Happy

अवधूत गुप्ते हे एक ओव्हररेटेड केरेक्टर आहे. हल्ली दाद देताना तर तो अगदी विचित्र चेहरा करतो; जणू कोणी त्याला जोरदार चिमटा काढला आहे…>>
तो सुद्धा नको तिथे...:फिदी:

गजानन
वरचा सा देणार्‍या परीक्षकाचा वरचा मजला रिकामा आहे रे...
त्यामुळे त्याला खालून पहिले पंचवीस असं म्हणायचं असणार.. 'खालून' हा शब्द विसरला असेल Proud

काल कट्यार कुलकर्णीचे गाणे मस्त झाले. पण त्याची बदललेली संगीतरचना अजीबात नाही आवडली. कमी केलेली लय आणि व्हॉयलीनची बदललेली सुरावट यांनी गाण्याचा मूड पार उदासवाणा करून टाकला होता.

जगदाळे बाईंनी आशाच्या अप्रतिम गाण्यांची वाट लावायचा सपाटाच लावला आहे. Angry

कौशिकचे गाणे चांगले झाले पण एवढे कौतुक आणि एवढे गुण मिळवण्याएवढे चांगले झाले नव्हते (मा.वै.म). मूळ गाण्यात मन्नादांनी लाजवाब कलाकुसर केली आहे. त्यांचे ते 'हाय राम' तर अफाटच आहे. कौशिक फक्त गाण्याची चौकट गायला असे वाटले. त्याचा आवाज खूप फ्लॅट वाटतो मला.

काल मला तरी महेश कंटेचे गाणे छान वाटले तर त्याला फक्त प दिला.

त्या जगदाळे बाईला वाजवले बरे वाटले.

कौशीकचे गाणे मन्नादांशी कंपेअर केल्यास आवडणे शक्यच नाही पण चांगला गायला. आत्तापर्यंतच्या गाण्यात मला सरस वाटले कालचे त्याचे गाणे.

माधव, त्या कौशिक देशपांडेच्या गाण्याबद्दल सहमतच.

मी आणि नवर्‍याने आपल्याला गाण्यातलं तसंही काही कळत नाही असं म्हणून समजूत घालून घेतली स्वतःची. Proud

पहिला धागा असावा जो गुण्यागोविंदाने हो ला हो करत चाललाय <<< अगदी अगदी! Happy
हे झी वाल्यांना का समजू नये?

परीक्षक कशाला नी देतील नी कशाला म .. अंदाजच लागेना झालाय!

कालचा भाग पाहिला नाही. समूहगान होते काय? प्रोमोवरून तसे वाटले होते. तिघी जणी एकदम गायला बसल्या होत्या.

नाही मंजूडी. काल दिग्दर्शक आणि संगीतकार अशा जोड्यांची गाणी होती.

आज जयंत आणि प्रल्हादचं गाणं हेच अट्रॅक्शन.

समूहगान होते काय? >>> Lol समुहगान म्हटलं की इस्त्री केलेल्या चेहेर्‍यांनी हात दुमडून उभा असलेला गायकांचा ग्रुपच डोळ्यासमोर येतो... Happy

प्रोमो बघून मला 'बसून गाणे' ही थीम असावी असं वाटलं.. कारण प्रोमोतले दोन्ही गायक हाय चेयर वर बसून गात आहेत असं वाटत होतं.. Proud

कालचा भाग पाहिला नाही.. आता युट्यूबवर पाहिन नंतर..

होती तशी बरी. पण परत तेच, हिंदी गाणी कां मराठी गाण्याच्या कार्यक्रमात?

मृण्मयी फाटकचं गाणं काल चांगलं वाटलं. ते गाणं आवडतं आहे म्हणा.

फाटक बाई.. दोन चार ठिकाणी घसरल्याच... सांगितलं पण त्यांना तसं...

एकूण ठिक ठाक भाग.. आधीच्या भागांपेक्षा जरा बराच झाला...

कालची सगळी गाणी बसलेलीच होती.>> कालचीच फक्त??? Wink संपूर्ण कार्यक्रमच बसलेला आहे. परिक्षक धरून!

समुहगान म्हटलं की इस्त्री केलेल्या चेहेर्‍यांनी हात दुमडून उभा असलेला गायकांचा ग्रुपच डोळ्यासमोर येतो... >> पराग आणि एका पायाने ठेका विसरलास का? Lol Rofl

समुहगान म्हटलं की इस्त्री केलेल्या चेहेर्‍यांनी हात दुमडून उभा असलेला गायकांचा ग्रुपच डोळ्यासमोर येतो... >> पराग आणि एका पायाने ठेका विसरलास का? >>> हा हा हा हा....

मला वाटतं पु.लंच्या दुश्यंतासारखी....मायबोलीने एखादी गायनस्पर्धा ठेवायला हरकत नाही. Proud
परीक्षक म्हणून कुणी तरी अ-मायबोलीकर नेमला म्हणजे झाले.

जयंत मस्त गायला. पूर्णपणे त्याच्या आवाजात गाऊन देखील (जयराम शिलेदारांही जराही छाप नाही वाटली त्या गाण्यावर) गाणे अप्रतिम झाले. गुण मात्र कमीच दिले (त्याची अपेक्षा होतीच म्हणा).

जुइलीचे गाणे पहिल्यांदा आवडले काल. पण तौ.कु. म्हणाले त्याप्रमाणे खूप सोपे गाणे होते इतर स्पर्धकांच्या तुलनेत. (चला! एकदा तरी परिक्षकांचे मत पटले बुवा.)

मागच्या आठवड्यात दोन्ही भागांच्या शेवटी अप्रतिम परफॉर्मन्स होते. पहिल्या भागात निलेश आणि दुसरा तालवादक (नाव विसरलो) यांची ढोलकीवर अप्रतिम जुगलबंदी होती. दुसर्‍या भागात तौफिकमियाँनी त्यांच्या शिष्यांना घेउन एक झकास फ्युजन सादर केले होते. कुणाचे बघायचे राहिले असतील तर आवर्जून बघा.

जयंत मस्त गायला. पूर्णपणे त्याच्या आवाजात गाऊन देखील (जयराम शिलेदारांही जराही छाप नाही वाटली त्या गाण्यावर) गाणे अप्रतिम झाले. गुण मात्र कमीच दिले (त्याची अपेक्षा होतीच म्हणा).>>>> सहमत. त्याचं गाणं परत ऐकावसं वाटत होतं मला.

टिकले (एकदाची) पडली बाहेर.

Tikale was the most expected member. खुप आधि बाहेर पडायला हवी होती.

बाहेर कोण पडणार हे जाहिर करताना जे काही केलं तो पूर्णपणे नॉन्सेन्स होता. भावना कसल्या विचारता डोंबलाच्या? भाग्यश्री आऊट होणार म्हणून संज्योतीला सॉरी म्हणणं वगैरे नाटकीपणा अगदीच बिनडोकछाप होता.
काल अवधूतने जयंतच्या गाण्याबद्दल बोलताना त्याच्या फेसबूक पेजचा उल्लेख केला. हे पर्व चालू असताना एकदातरी तिथे मी लिहून येणार आहे की अहो तुमचं वय काय? तुम्ही बोलता काय?

जुईलीचं गाणं मलाही आवडलं काल. प्रल्हाद जाधव आणि जयंत पानसरे दी बेस्ट माझ्यामते.

Pages