Submitted by मंजूडी on 28 January, 2014 - 02:02
झी मराठी वाहिनीवर सा रे ग म पचे नवे पर्व सुरू झाले आहे - सूर नव्या युगाचा!
यावेळी फक्त १४ स्पर्धक निवडून ही स्पर्धा चालू केलेली आहे -
महेश कंटे, श्रीनिधी घटाटे, कौशिक देशपांडे, जयंत पानसरे, भाग्यश्री टिकले, जुईली जोगळेकर, मनोज क्षिरसागर, रसिका गानू, संज्योती जगदाळे, प्रल्हाद जाधव, शंकर गिरी, मृण्मयी पाठक, रेश्मा कुलकर्णी, गणेश मेस्त्री
परीक्षक आहेत अवधूत गुप्ते आणि तौफिक कुरेशी, तर सूत्रसंचालन करतोय अभिजीत खांडकेकर.
दर सोमवार आणि मंगळवार रात्री साडेनऊ ते साडेदहा झी मराठी वाहिनीवर - "सा रे ग म प - सूर नव्या युगाचा"
पुनःप्रक्षेपण - मंगळवार आणि बुधवार दुपारी चार वाजता आणि शनिवारी रात्री साडेनऊ वाजता.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झी मराठी - सा रे ग म प -
झी मराठी - सा रे ग म प - (बे)सूर नव्या युगाचा असं शिर्षक आहे खरतर फक्त बे सायलेंट आहे > > +१
फक्त एक बदल कर... ते 'सारे गम' अस लिही.
खरोखर बे सुर नव्या युगाचा आहे
खरोखर बे सुर नव्या युगाचा आहे हे पर्व... मजा नाहि... zee must look at improving quality standards ..
पुढच्या सारेगमप च्या पर्वात
पुढच्या सारेगमप च्या पर्वात माझी येण्ट्री नक्की होऊ शकेल असा आत्मविश्वास मला वाटायला लागलाय हे पर्व बघून.
माझा आवाज जांभळी ३८ या पट्टीचा आहे.
चुकून कधी मी बेसुरा झालो की मग काळी २ चा आवाज लागतो माझा..
तेव्हा मला पुढच्या पर्वासाठी खूप खूप शुभेच्छा द्या.
एसएमएसचा जोगवा प्रत्यक्ष पर्व सुरू झालं की मागेन....
चैतन्या, परिक्षकांची वाणवा
चैतन्या, परिक्षकांची वाणवा भासलीच तर या बाफावर हाक दे.
झी मराठी - सा रे ग म प -
झी मराठी - सा रे ग म प - (बे)सूर नव्या युगाचा असं शिर्षक आहे खरतर फक्त बे सायलेंट आहे >>>>> १००% अनुमोदन.
लहानपणी पाहिलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात लहान मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी 'स्थानिक कलावंतांचे कार्यक्रम' असायचे. मला तसं काहीतरी पाहिल्यासारखं वाटतंय. किमान स्थानिक कलावंत तरी यापेक्षा छान गायचे. कार्यक्रमाचा दर्जा अतिशय सुमार आहे.
काल त्या श्रीनिधी आणि रसिकाने किती भडक मेक अप केला होता! चेहरा ऊजळणारे ऊत्पादन करणारे प्रायोजक आहेत म्हणुन काय झाले? सगळ्यांच्या चेहऱ्यावर भरपुर पिठ फासायची गरज नाही आहे.
सर्वांना अनुमोदन. कालची संगीत
सर्वांना अनुमोदन. कालची संगीत रचना जितकी फॅन्टॅस्टिक, तितकेच आवाज अगदीच काहीतरी. जोवर संगीत सुरू आहे, तोवर वाह! आवाज आले की मात्र गाडी घसरली. एकही आवाज 'भई वाह' नसावा याचा खेद वाटतो. ५००० का त्यापेक्षाही जास्त लोक ऑडिशनला जातात ना?
या रावजीचं संगीत संयोजन एकदम भारी. माझा असा अंदाज आहे, की पाहुण्या कलाकारांनीच हे संयोजन केलं असावं. एरवीच्या भागांचं संयोजन श्री. भडकमकर यांचं असतं.
झीने फक्त वाद्यवृंदाचा
झीने फक्त वाद्यवृंदाचा कार्यक्रम ठेवावा.... चांगला ट्यार्पी मिळेल...
हे अस्लं भंकस दाखवण्यापेक्षा ते कैक पटींनी चांगलं.....
भुंग्या, तिला मराठी गाणी
भुंग्या, तिला मराठी गाणी गायला सांग, लोकाग्रहास्तव
>>>>>>>>>>>>>
पुढच्या भागात ऐक गो......
पुढचा भाग "फोक साँग" आहे..... सो माझी देवाकडे आणि कमलेश आणि राहुल रानडेंकडे विनंतीवजा प्रार्थना आहे की यात तरी सगळी मराठी गाणी असावीत....
फोक राऊंडमध्ये जर पहाडी संगीत म्हणून हिंदी गाणी आणली तर मग.... चांगभलं रं देवा चांगभलं रं.... सारेगमच्या नावानं चांगभलं रं...... !!!!!!
आजचा भाग पण अॅव्हरेजच...
आजचा भाग पण अॅव्हरेजच... दुसर्या गाण्याला उगाचच 'ध' दिला.. झेपलाच नाही तो..
परत परत तेच लिहायचा कंटाळा आलाय..
पण यावेळी पकडच येत नाहिये
पण यावेळी पकडच येत नाहिये प्रोग्रामची..... "मेंदीच्या पानावर" कॅसेट ऐकल्यासारखं वाटतेय.....
खांडकेकर "बच्चु पांडे" ची आठवण करून देतोय.......
जुईलीसारखी एरवी इतकी चांगली
जुईलीसारखी एरवी इतकी चांगली गाणारी मुलगी एवढी बेसूर का गातीये ?ह्या पर्वातल्या एकाही गाण्यातून आजवर तिची गायकी दिसली नाहीये. काल तर ती अजिबातच सुरात नव्हती आणि तरी तिला "नी"? आणि भारतातल्या पहिल्या २५ पार्श्वगायकांमधे तिचा नंबर? हे भयंकर आहे.
सुरुवातीला बर्याचश्या बाळबोध व घरगुती दिसणार्या व संकोची स्वभावाच्या मराठी मुलींना असा भडक मेकअप करून व अतिभयानक हावभाव करायल लावून एवढे चीप का करतायत?
कट्यार कुलकर्णीला पण "नी" आणि जुईलीला पण "नी" हे झेपतच नाहीये. कुलकर्णी खरंच चांगली गायली.
मृण्मयी फाटक परफॉर्मन्स म्हणून जे काही करत होती ते बघवत नव्हते व तिची किव येत होती. बिचारीला गाणे सोडून नाचावे लागत होते. ह्याच मुलीने नाट्यगीत किती सुंदर व तडफदारपणे म्हटले होते सुरुवातीच्या एपिसोडमधे. नुसते गायले तर चालत नाही त्यांना हल्ली असे दिसते कारण सगळेच जण परफॉर्म करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतान दिसत आहेत.
आमचा उमेदवार प्रल्हाद जाधव,
आमचा उमेदवार प्रल्हाद जाधव, बेश्ट गायला पोरगा!
काल कोण गेलं म्हणे ?
काल कोण गेलं म्हणे ?
काल तो मनोज क्षिरसागर गेला.
काल तो मनोज क्षिरसागर गेला. पुढच्या आठवड्यात टिकल्यांना लावतील टिकली.
काल फक्त रेश्माचं गाणं आवडलं मला तरी. त्या टिकलेला कुठे 'केव्हातरी पहाटे' दिलं?
जुईलीचं गाणं दुसर्या खोलीतून ऐकत होते मी फक्त. चक्क किनरा येत होता तिचा आवाज. पण परिक्षकांनी तारीफ केलीये म्हणजे......
कालच्या भागात तर पार्शालिटी
कालच्या भागात तर पार्शालिटी सरळ सरळ दिसून आली...
झीवाल्यंना नक्की काय करायचे आहे तेच कळत नाहीये. आणि त्यातच गंडलेत ते यंदा.. इंडियन आयडॉल टाईप एक्स फॅक्टर शोधायचा प्रयत्न करत असतील तर पूर्णतः चूकीचे काहीतरी घडते आहे..
अवधूत तर अभिनयाची परिसीमाच
अवधूत तर अभिनयाची परिसीमाच गाठतो आहे. कोणत्याही गाण्याला असे हावभाव असतात की काय गायलंय !! प्रत्यक्षात तसे काहीच नसताना.
पुढच्या आठवड्यात टिकल्यांना
पुढच्या आठवड्यात टिकल्यांना लावतील टिकली. - ती तर पहिल्या आठवड्यात द्यायला हवी होती.
फक्त रेश्मा कुलकर्णी
फक्त रेश्मा कुलकर्णी बेस्ट!!
आपले उमेदवार जयंत पानसरे आणि रेश्मा कुलकर्णी.
या आठवड्यात काय भयाण मेकप केला होता सगळ्यांना
काल भागाचा शेवट करताना मनोज क्षीरसागरने 'नमिला गणपती' गायलं. खूप छान गायला तो. पण किती कमी दाखवलं ते गाणं..
मंजूडी, ऑडिशननंतरची जी
मंजूडी, ऑडिशननंतरची जी सिलेक्शनची राऊंड होती त्यात गायला होता का तो हे गाणं? असं वाटलं मला काल ते ऐकून. छान वाटत होतं ते गाणं काल ऐकताना सुद्धा.
उमेदवारांबद्दल सेम पिंच.
अवधूतच्या एक्सप्रेशन्स आणि हातवार्यांबद्दल लिहायचं राहिलंच मगाशी. अगदीच कंटाळवाणं.
मागच्या आठवड्यात त्यांचे आयडॉल्स, या आठवड्यात सिरियलमधल्या लोकांच्या फर्माईश. कठीणच आहे एकंदरीत.
आठवत नाही गं..
आठवत नाही गं..
हो अडो.. तेच गाणं गायला
हो अडो.. तेच गाणं गायला होता... घासून पुसून स्वच्छ केलेलं असल्यामुळे ते गाणं तो चांगला गातो... पण त्यातली तान गंडतेच त्याची..
माझा आवाज जांभळी ३८ या
माझा आवाज जांभळी ३८ या पट्टीचा आहे!>>
<सुरुवातीला बर्याचश्या
<सुरुवातीला बर्याचश्या बाळबोध व घरगुती दिसणार्या व संकोची स्वभावाच्या मराठी मुलींना असा भडक मेकअप करून व अतिभयानक हावभाव करायल लावून एवढे चीप का करतायत?
मृण्मयी फाटक परफॉर्मन्स म्हणून जे काही करत होती ते बघवत नव्हते व तिची किव येत होती. बिचारीला गाणे सोडून नाचावे लागत होते. नुसते गायले तर चालत नाही त्यांना हल्ली असे दिसते कारण सगळेच जण परफॉर्म करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतान दिसत आहेत.> +१०००००००००
प्रचंड अनुमोदन
पुढच्या १०० वर्षात.. टॉपच्या
पुढच्या १०० वर्षात.. टॉपच्या २५ गायिकांमधे जुइली जोगळेकर कुठल्या बेसिस वर असेल हे कोणीतरी मला समजावुन सांगता का? (बेस्ड ऑन तिची आतापर्यंतची २ गाणी)
हो, हो मनस्मी. ते एक.. ती एक
हो, हो मनस्मी. ते एक.. ती एक खूपच यथोचित भविष्यवाणी होती.....
कालचा भाग नाही पाहिला.
प्रल्हाद खल्लास गायला.....
प्रल्हाद खल्लास गायला..... एम्टीव्ही कोक स्टाइइल्ल...... उत्तम प्रयत्न...
कट्यार कुलकर्णी पण मस्त.
सुरुवातीला बर्याचश्या बाळबोध
सुरुवातीला बर्याचश्या बाळबोध व घरगुती दिसणार्या व संकोची स्वभावाच्या मराठी मुलींना असा भडक मेकअप करून व अतिभयानक हावभाव करायला लावून एवढे चीप का करतायत? >>>>> अनुमोदन
या भडक मेकअप पेक्षा सुरवातीच्या भागात याच मुली किती छान दिसत होत्या. आत्ता पर्यंतच्या पर्वात महाअंतिम सोहळ्यापर्यंत इतका भडक मेकअप नसायचा. पण यावेळी चेहरा ऊजळणारे ऊत्पादन करणारे प्रायोजक मिळाल्यामुळे पहिल्यापासुनच इतका भडक मेकअप आहे. आत्ताच हि तऱ्हा तर मग महाअंतिम सोहळ्याला काय असेल?
मृण्मयी फाटक परफॉर्मन्स म्हणून जे काही करत होती ते बघवत नव्हते व तिची किव येत होती. बिचारीला गाणे सोडून नाचावे लागत होते. नुसते गायले तर चालत नाही त्यांना हल्ली असे दिसते कारण सगळेच जण परफॉर्म करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतान दिसत आहेत. >>>>> अनुमोदन
पुढच्या आठवड्यात टिकल्यांना लावतील टिकली. - ती तर पहिल्या आठवड्यात द्यायला हवी होती. >>>>> अनुमोदन
पुढच्या १०० वर्षात.. टॉपच्या २५ गायिकांमधे जुइली जोगळेकर >>>>> अवधुतचे हे वाक्य ऐकुन मी विनोद म्हणुन घेतले आणि हसत होते.
मराठी कार्यक्रमात हिंदी गाणी खटकत आहेत. झी सा रे ग म प बंगाली, तामिळ, तेलगु वैगरे मध्ये हेच झीवाले इतकी हिंदी गाणी दाखवायची हिंमत करतील का?
या आठवडयातले प्रल्हाद जाधव आणि कट्टयार कुलकर्णी आवडले.
झी बंगाली वर असतात बर्यापैकी
झी बंगाली वर असतात बर्यापैकी हिंदी गाणी.
तमिळवाल्यांची गानीच हिंदीवाले
तमिळवाल्यांची गानीच हिंदीवाले चोरत असतात त्यामुळे ते स्वतःचीच गाणी गातात तरी मध्यम्तरी एक वयस्कर गीतकार नवीन कवींवर भडकले होते. तमिळ गाण्यामधे कसले ते दिल जान दिलबर वगैरे हिंदी शब्द वापरता म्हणून आपल्या तमिळ भाषेत याहून अनेक सुदल्र शब्द आहेत ते वापरत जा म्हणून.
द्ग्धाग्याच्या निमित्ताने
द्ग्धाग्याच्या निमित्ताने मायबोली प्रशासकांना सुचवावेवाटेत्टतेय की कमेंट्लाच लाईक डिसलाईक ठेवायला हवं (थोपूसारखं) म्हणजे कॉपी पेस्टचा वेळच्वाचेल अनुमोदनासाठीचा..... बरीचशी मतं सेमच आहेत...
पहिला धागा असावा जो गुण्यागोविंदाने हो ला हो करत चाललाय
Pages