..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिच्या आवडीच्या एका राजवाड्यात ३ दिवस २ रात्री मुक्काम करायचं पॅकेज >>> यिप्पी!!!! बॅगा भरायला घेते गं.>>>>>

मामी, जाधवगडला जा परत एकदा. Proud

गाओ महोत्सवाचा परिणाम >>> हो हो. या धाग्यावरच्या कोड्यात नविन बालवाडी सुरू झाली आहे. त्यातले काही मेंबर्स खूप गडबड करताहेत. पण असू देत. लहान मुलं म्हणजे देवाघरची foola ना!

रिया, वरचं कोडं इटुकलं पिटुकलंच आहे. हा आता ते गोल्डन एरामधल्या गाण्यावर आहे.

कोडे क्र.: ०७/२७:

जगजीतची जाम गोची झाली होती. मनमीत सिंग त्याचा जानी दोस्त. सुखबीर ही मनमीतची गर्लफ्रेंड. ती मनमीतची जीव की प्राण. पण तिच्या ऐश्वर्या रायसारख्या डोळ्यांत पाहिल्यापासून जगजीतला सुध्दा ती आवडायला लागली होती. एकीकडे दोस्ती आणि दुसरीकडे प्रेम अश्या कात्रीत तो सापडला होता. काही बोललं तर मित्र दुखावणार आणि नाही बोललं तर स्वत:लाच त्रास. शेवटी मनमीत आणि सुखबीर दोघे आसपास असताना त्याने एक गाणं म्हणून टाकलं. त्यांना कळलं तर सोन्याहून पिवळं. नाही कळलं तरी आपण सांगून टाकल्याचं समाधान. जगजीतने कोणतं गाणं म्हटलं असेल?

कोडे क्रः ०७/२८

सलमा, इख्तियार आणि बख्तियार हे तीघेही एकाच कॉलेजमधले. त्यांच्यातील घनिष्ट मैत्रीची चर्चा संपूर्ण कॉलेजभर होत असे. तिघेही एकमेकांचे जिगरी दोस्त होते. हळुहळु सलमाच्या मैत्रीचे रूपांतर बख्तियारच्या प्रेमात होत गेले आणि ती त्याच्यावर मनापासुन प्रेम करायला लागली आणि तोही तिच्यावर प्रेम करतोय असं तिला वाटायचं. पण हाय रे दैवा! इकडे बख्तियार आणि इख्तियार चक्क एकमेकांमध्ये गुंतत होते (त्याच वर्षी ३७७ कायदाही पास झाला होता). सलमाला याची काहीच कल्पना नव्हती ती बिचारी त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. शेवटी न राहवून सलमाने बख्तियारजवळ आपल्या प्रेमाची कबुली दिली, पण त्याने मात्र ते झिडकारले आणि तो आणि इख्तियार दोघे एकमेकांच्या प्रेमात आहे असे सांगितले. सलमाला हा सदमा बर्दाश्त झाला नाही. तिचा प्रेमभंग झाला. ती बख्तियारवर मनापासुन प्रेम करत होती. खरंतर बदनामीला घाबरून बख्तियारलाही हि गोष्ट सगळ्यांपासुनच लपवून ठेवायची होती म्हणुन त्याने सलमाला ते गाव सोडुन जायची विनंती केली किंवा आम्ही दोघेतरी हे गाव सोडुन जातो असे सांगितले. यावर सलमाने त्याला उत्तर दिले ते ही एका गाण्यातुन. कोणतं ते गाण? ओळखा?

०७/२८

तेरी गलियो मे ना रखेंगे कदम
आजके बाद..
...
तुझको तो मिलही गया जो तेरा अपना था

Proud उग्गाच एक फटका माझ्याकडून

कोडे क्रः ०७/२८

जाते हो तो जाओ, पर इतना सुन लो
थोडी चुडिया पहन लो, एक घगरा सिलवा लो ???

हम छोडेगा नै जी टाईप होतंय पण असू दे! Proud

०७/०२८ : यार मिला प्यार मिला दौर चला प्यार का
यार बिना प्यार बिना यार यहां जीना क्या?
यारों के हम है दीवने दिल पे नशा प्यार का

भरत, इशा नाही Happy

जिप्सी एक सणसणीत क्लू दे बरं.>>>>>कुणीतरी म्हटल आहेच कि "नावात काय आहे"?, पण मी म्हणतो कि कुठल्यातरी नावात काहितरी असेलच ना? Wink

Pages