..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडं ०७/३९:

'आप'मधून रा़जीनामा द्यायच्या आधी सुरजित दासगुप्ता कोणतं गाणं म्हणत रडत होता?

उत्तरः
आपके पहलूमे आकर रो दिये

जिप्सीला 'मेरा साया' ची डीव्हीडी

अरे, हा धागा एवढा सुना सुना का पडलाय?
चला, १ फ्रेश कोडं
कोडं ७/४०:

_ने_न _ने_न
_रे _ न_न
_री _री ले_ ग_
दे_ _रा _न
_ने_न _ने_न _ने_न

७/४० उत्तर :

जाने मन जाने मन
मेरे दो नयन
चोरी चोरी लेके गये
देखो मेरा मन
जाने मन जाने मन जाने मन

@इश्श, अर्रे काय हे आम्ही नवे आहोत इथे पण म्हणून काही आम्ही इतकेही लिंबुटिंबु नै कै Proud

७/४० जाने मन जाने मन तेरे दो नयन..

हिम्स्कूल बरोबर Happy

कविन, अगं धागा ओस पडला होता म्हणुन थोडं सोपं कोडं देउन बघितलं. बघ कशा पटापट उड्या पडल्या Happy
आणि मीही नविनच आहे गं इथे Happy

कोडं ०७/३६:

आपल्या मित्राला नक्की काय झालंय ते रामसिंगला कळत नव्हतं आणि म्हणूनच गेले काही दिवस त्याची काळजी वाढली होती. दोनेक महिन्यांपूर्वी ते मुंबईला आले तेव्हा तर सुरजसिंग ठणठणीत होता. रोटीची चवडच्या चवड एका दमात संपवायचा. रात्री पडल्या पडल्या झोपायचा. मित्रमंडळीत सगळ्यांना हसवायचा. पण आता गेल्या आठवड्यापासून त्याचा नूरच बदलला होता. खाण्यावरची इच्छा गेली होती. नजर शून्यात. सदानकदा आपलं छातीवर हात घेऊन उसासे सोडणं. रामसिंगने डॉक्टरकडे सुध्दा नेलं होतं. पण त्यांनी सुध्दा त्याला काही झालं नसल्याचं सांगितलं. रामसिंगने बसल्या बसल्या विचार केला "काय काय झालं होतं मागच्या आठवड्यात? चंदामौसी गौरीच्या लग्नाची खटपट करतेय. ती तेव्हढी तिला कोणालातरी दाखवायला शहरात आली होती. पण त्या दोघी तर आपल्याला भेटून रात्रीच्या गाडीने परत गेल्यादेखील. बाकी कोणी आलं नाही की गेलं नाही.' काही केल्या रामसिंगचं डोकं चालेना तसं त्याने सुरजसिंगला सरळ विचारायचं ठरवलं.

सुरजसिंगने त्याला गाण्यातून काय सांगितलं असेल?

क्लू - समर्थांचिया सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे

उत्तर: बात ये अनोखी मेरे मित हो गयी
रात दिन धडकन दिलकी रीत हो गयी
हो रामा काहे रे मोहे प्रीत हो गयी

ह्या गाण्यात नूतन (शोभना समर्थची मुलगी) आहे

कोड क्र. ७/४१

तेरे चेहरेसे नजर नही हटती नजारे हम क्या देखे
तुझसे मिलके भी प्यास नही बुझती नजारे हम क्या देखे Happy

बिंगो!
झिलमिलला पवनाथडीतले चुलीवरचे मांडे आणि वरुन साजुक तुप! Happy

कोडं क्र. ०७/४१

no1.JPG

उत्तरः
मेरे जीवन साथी, कली थी मैं तो प्यासी
तूने देखा हुई खिल के बहार, मेरे जीवन साथी

कोडं क्र. ०७/४२:

रणवीर सिंग आणि दीपिका बाईकवरून फिरायला निघाले असताना कुठल्या गाण्याची एक ओळ म्हणून टारगट मुलांनी तिची छेड काढली?

कोडं क्र. ०७/४३:

जॉनी वॉकर कंपनीने गोल्डन एरामधल्या एका गाण्यातली हिरो-हिरॉईनची छबी दाखवून जाहिरात केली. कोणतं असेल ते गाणं?

कोडं क्र. ०७/४४:

कराचीतल्या त्या छोट्याश्या हॉटेलात तो न्याहारीसाठी घुसला तेव्हा वेटर मंडळी टेबलावर फडकं मारत होती. त्याला जे सूप प्यायची इच्छा होती ते इथे जसं मिळतं तसं आणखी कुठेही मिळत नाही असं अनेकांनी छातीठोकपणे त्याला सांगितलं होतं.

एक वेटर टेबलाजवळ आला तसं त्याने ते सूप आणि २-३ पदार्थ अशी यादी सान्गितली. 'किचन अभी खुला नही है साब' वेटर पडल्या चेहेर्‍याने म्हणाला. 'कोई बात नही दोस्त, बाकी डीशेस भूल जाओ. बस ये सूप ला दो. बहोत दूरसे आया हू' त्याने असं म्हणताच वेटरचा चेहेरा खुलला. 'जी साब' म्हणत तो पळाला. थोड्या वेळाने ते सूप सर्व्ह केलं गेलं तेव्हा त्याने उत्सुकतेने चाखून पाहिलं. लोक सांगत होते त्यात तथ्य होतं. सूप खरोखर स्वादिष्ट होतं. ते चाखायला मिळाल्याच्या आनंदात तो एक गाणं गुणगुणू लागला आणि ते अगदी चपखल आहे हे लक्षात येताच त्याला हसू फुटलं.

ओळखा ते गाणं.

कोडं क्र. ०७/४२:

रणवीर सिंग आणि दीपिका बाईकवरून फिरायला निघाले असताना कुठल्या गाण्याची एक ओळ म्हणून टारगट मुलांनी तिची छेड काढली?

उत्तरः
रामजीकी निकली सवारी, रामजीकी लीला है न्यारी

कोडं क्र. ०७/४४:

कराचीतल्या त्या छोट्याश्या हॉटेलात तो न्याहारीसाठी घुसला तेव्हा वेटर मंडळी टेबलावर फडकं मारत होती. त्याला जे सूप प्यायची इच्छा होती ते इथे जसं मिळतं तसं आणखी कुठेही मिळत नाही असं अनेकांनी छातीठोकपणे त्याला सांगितलं होतं.

एक वेटर टेबलाजवळ आला तसं त्याने ते सूप आणि २-३ पदार्थ अशी यादी सान्गितली. 'किचन अभी खुला नही है साब' वेटर पडल्या चेहेर्‍याने म्हणाला. 'कोई बात नही दोस्त, बाकी डीशेस भूल जाओ. बस ये सूप ला दो. बहोत दूरसे आया हू' त्याने असं म्हणताच वेटरचा चेहेरा खुलला. 'जी साब' म्हणत तो पळाला. थोड्या वेळाने ते सूप सर्व्ह केलं गेलं तेव्हा त्याने उत्सुकतेने चाखून पाहिलं. लोक सांगत होते त्यात तथ्य होतं. सूप खरोखर स्वादिष्ट होतं. ते चाखायला मिळाल्याच्या आनंदात तो एक गाणं गुणगुणू लागला आणि ते अगदी चपखल आहे हे लक्षात येताच त्याला हसू फुटलं.

ओळखा ते गाणं.
मैने तुझे मांगा तुझे पाया है
आगे हमे जो भी मिले या ना मिले
गिला नही

कोडं क्र. ०७/४३:

जॉनी वॉकर कंपनीने गोल्डन एरामधल्या एका गाण्यातली हिरो-हिरॉईनची छबी दाखवून जाहिरात केली. कोणतं असेल ते गाणं?

उत्तरः
चलो सजना जहा तक घटा चले
(Keep Walking)

तुम अरबों का हेर फेर करने वाले राम जी
सवा लाख की लाटरी भेजो अपने भी नाम जी

चित्रपटः चोरी चोरी

Pages