..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय डोस्कं चालंना >>> अहो भम, तुम्हीच असा धीर सोडला तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पहायचं? श्रद्धानं दिखील माया पातळ केलीये सध्द्या.

कोडं क्र. ०७/६०:

कस्तुरबा = सुगंध आणि केसरबा = रंग

रंग आणि सुगंध एकमेकांत मिसळून जीवनात बहार आणतील टाईपचं गाणं असावं असा एक माझा अंदाज!

कोडं क्र. ०७/६०:

वडोदऱ्यातील त्या सोसायटीत आजकाल एकच विषय - जिग्नेस आणि पिंकलचं प्रेमप्रकरण. आणि त्या दोघांच्या लग्नाला असलेला घरच्यांचा विरोध. जिग्नेसची आई कस्तुरबा आणि पिंकलची आई केसरबा दोघींचं हाडवैर हेच ह्या विरोधाचं मुख्य कारण. जिग्नेस आणि पिंकल दोघांनाही ह्याची पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच ही धार बोथट करायला त्यांनी एक नवीन युक्ती शोधून काढली होती. एक जुनं हिंदी गाणं त्यांनी आपलं मोबाईल रिंगटोन म्हणून वापरायला सुरुवात केली. त्यात आईला मस्का लावणंही होतं आणि परस्परांबद्दल 'प्यार का इजहार' ही. कोणतं होतं ते गाणं.

क्लू १: दोन्ही आयांच्या नावातल्या एका अक्षराचा आणि त्यांच्या मुलांच्या त्यांच्याशी असलेल्या नात्याचा शब्दच्छल करून हे गाणं बनलं आहे.
क्लू २: गाणं ड्युएट आहे

कोडं क्र. ०७/६२:

'तुमचं गावात एखादं घर आहे का?' तिने होणार्या नवऱ्याला विचारलं. त्याच्या कुटुंबाचा गावी खूप जमीनजुमला होता.
'जुनं घर आहे एक. पण ते इतकं जुनं आहे की तिथे आता कोणी रहात नाही. का ग?'
'नाही. परवा टीव्हीवर एक जुना मराठी चित्रपट दिसला त्यात तो पाटील कसल्या मोठ्या घरात रहात होता.' ती डोळे मोठे करत म्हणाली आणि त्याला हसूच फुटलं.
'ओहो, तसं घर पाहिजे आहे काय पाटलीणबाईंना' तो चिडवत म्हणाला आणि ती लाजलीच.
'नक्की बांधू. ह्या दिवाळीपर्यत तसंच बांधू'
बघता बघता दिवाळी आली आणि दोघं गावाकडे रवाना झाली. पण तिने जेव्हा घर बघितलं तेव्हा तिचा भ्रमनिरास झाला. एक टोलेजंग बंगला होता. वर त्याचे बाबा मिशीला पीळ देत म्हणत होते 'काय सूनबाई, आवडला का आमचा बंगला?'.
तिने फक्त त्याच्याकडे पाहिलं. तिला गाणं म्हणता येत असतं तर तिने कोणतं गाणं म्हणून आपली नाराजी व्यक्त केली असती?

क्लू: गावातल्या टोलेजंग घराला मराठीत काय म्हणतात? आठवा जुने मराठी चित्रपट आणि त्या शब्दावर शब्दच्छल करा. हाकानाका Happy

कोडं क्र. ०७/६३:

'काकू, विनीत आहे का घरात?' सुहासने विचारलं.
'नाही रे, आज सकाळपासूनच लायब्ररीत गेलाय. काही काम होतं का?'
सुहासला काय बोलावं ते कळेना. विनीतने त्याच्यावर एक कामगिरी सोपवली होती. विनीतचं एका मुलीवर प्रेम बसलं होतं. पण ती त्यांच्या जातीची नसल्याने घरून प्रचंड विरोध होणार हे तो जाणून होता. सुहास त्याचा जवळचा मित्र. त्याने सांगितलं तर घरचे निदान ऐकून तरी घेतील असं त्याला वाटत होतं. पण त्यामुळे बिचारा सुहास मात्र कानकोंडला झाला होता. कुठून कसा विषय काढावा हेच त्याला समजत नव्हतं.

'काय रे सुहास? काय म्हणतो आहेस?' विनीतचे बाबा हॉलमध्ये येत म्हणाले.
'काका, नाही म्हणजे, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी आणि काकूशी' तो चाचरत म्हणाला.
'अरे मग बोल की. आमच्याशी बोलायला तुला कधीपासून प्रस्तावना करायला लागली?'
'कोण प्रस्तावना करतंय? अरे सुहास तू होय.' विनीतचे आजोबा देवळातून आले.
सुहासला काय करावं ते कळेना. तो नुसताच बसून राहिला. 'आजोबा, नाही, ते म्हणजे, त्याचं काय आहे....' तो चाचपडत म्हणाला.
'मी सांगतो काय आहे ते. तुझं कोणातरी मुलीवर प्रेम बसलंय आणि तुझ्या घरच्यांना आम्ही सांगावं हेच तुला सांगायचं आहे. हो की नाही?'
सुहास दचकलाच. आजोबांना 'तुमचा रस्ता बरोबर आहे पण गल्ली चुकलीय' हे कसं सांगावं ते त्याला कळेना. शेवटी त्याची ट्यूब पेटली आणि त्याने एक हिंदी गाणं म्हणून टाकलं.
विनीतच्या घरच्यांना आधी अर्थबोध झाला नाही. पण मग एकच हास्यकल्लोळ झाला. आणि विनीतची केस पास झाली.

क्लू: विनीत आजोबांचा कोण????? त्यातून आपले सुहासभाऊ सानुनासिक बोलतात. त्यामुळे गाण्याची तोडफोड झालीच.

कोडं क्र. ०७/६४:

प्रीतीला मूळच्या चायनीज इंग्लिश कंपनीत मध्ये नोकरी लागली तेव्हा अगदी आसमान ठेंगणे झाल्याचा भास झाला. त्यात तिची बॉस म्हणजे तिच्या क्षेत्रातल्या नामांकित स्त्री नेत्यांपैकी एक. तरी पण 'ती' तिची बॉस असणार म्हटल्यावर मैत्रिणींनी इशारा दिलाच. 'बघ हं बाई, एकदम कडक शिस्तीची बाई आहे ती.'
'असू देत. पण तिच्याकडून शिकायला किती मिळेल.'
'हं.....घी देखा लेकिन बडगा नही देखा....'
प्रीतीने काही लक्ष दिलं नाही. काही महिने उलटले. मग तिला एक महत्त्वाची असाईनमेंट मिळाली. नवरा कामानिमित्त बाहेरच्या देशात असल्याने तीही रात्रीचा दिवस करून काम करत होती. पण डेडलाईन आली तरी काम पुरं व्हायची चिन्हं दिसेनात. त्यात त्याच दिवशी रात्री नवरा सुध्दा वर्षा-दीड वर्षाने भारतात परत येणार होता.
शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. 'ती' ने बोलावलं आणि प्रीतीला झाप झाप झापलं.
ती परत आपल्या डेस्कवर आली तेव्हा तिचा फोन वाजत होता. फ्लाईट बोर्ड करायच्या आधी नवर्याने फोन केला होता.
तिचा रडवेला आवाज ऐकून त्याने काय झालं म्हणून विचारलं.
त्याचं उत्तर तिने गाण्यांत कसं दिलं असेल?

क्लू: मूळची चायनीज इंग्लिश कंपनी वित्तीय क्षेत्रातील आहे.

भरत बरोबर.....

कोडं क्र. ०७/६२:

'तुमचं गावात एखादं घर आहे का?' तिने होणार्या नवऱ्याला विचारलं. त्याच्या कुटुंबाचा गावी खूप जमीनजुमला होता.
'जुनं घर आहे एक. पण ते इतकं जुनं आहे की तिथे आता कोणी रहात नाही. का ग?'
'नाही. परवा टीव्हीवर एक जुना मराठी चित्रपट दिसला त्यात तो पाटील कसल्या मोठ्या घरात रहात होता.' ती डोळे मोठे करत म्हणाली आणि त्याला हसूच फुटलं.
'ओहो, तसं घर पाहिजे आहे काय पाटलीणबाईंना' तो चिडवत म्हणाला आणि ती लाजलीच.
'नक्की बांधू. ह्या दिवाळीपर्यत तसंच बांधू'
बघता बघता दिवाळी आली आणि दोघं गावाकडे रवाना झाली. पण तिने जेव्हा घर बघितलं तेव्हा तिचा भ्रमनिरास झाला. एक टोलेजंग बंगला होता. वर त्याचे बाबा मिशीला पीळ देत म्हणत होते 'काय सूनबाई, आवडला का आमचा बंगला?'.
तिने फक्त त्याच्याकडे पाहिलं. तिला गाणं म्हणता येत असतं तर तिने कोणतं गाणं म्हणून आपली नाराजी व्यक्त केली असती?

क्लू: गावातल्या टोलेजंग घराला मराठीत काय म्हणतात? आठवा जुने मराठी चित्रपट आणि त्या शब्दावर शब्दच्छल करा. हाकानाका

उत्तरः क्या हुआ तेरा वादा (वाडा)

कोडं क्र. ०७/६०:

College ka ek ladka hai aur college ki ek ladki
Nain mile aur unke dil me ek chigari bhadki
Pyaar ka chakkar hai ye hai na Dekho kisi se na kahna

Sorry for english response.

६५:
एक तळीराम रात्री गावात धिंगाणा घालत असतो ….
तर गावकरी त्याला शिव्या देताना कोणत गान म्हणतील????

मृणाल, स्वाती नाही. मामी, टुक्के मारू नकोस. क्लूजवर विचार कर पाहू. Happy

कृष्णतारा, तुमच्या कोड्याचा नंबर ६५ करणार का? आणि एखादा क्लू द्या प्लीज.

६६:

एक माणूस विटेच्या ढिगार्यावर उभे राहून कसरत करत असतो … त्याला पाहून एक वारकरी कोणत गान म्हणेल???

काही मित्र काश्मीर मध्ये एकदा फिरायला जातात…
.
तेथील निसर्गसौंदर्य पाहून खूप आनंदी होतात आणि गाणे म्हणायला लागतात .ते गान कोणत असेल????

कोडं क्र. ०७/६०:

वडोदऱ्यातील त्या सोसायटीत आजकाल एकच विषय - जिग्नेस आणि पिंकलचं प्रेमप्रकरण. आणि त्या दोघांच्या लग्नाला असलेला घरच्यांचा विरोध. जिग्नेसची आई कस्तुरबा आणि पिंकलची आई केसरबा दोघींचं हाडवैर हेच ह्या विरोधाचं मुख्य कारण. जिग्नेस आणि पिंकल दोघांनाही ह्याची पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच ही धार बोथट करायला त्यांनी एक नवीन युक्ती शोधून काढली होती. एक जुनं हिंदी गाणं त्यांनी आपलं मोबाईल रिंगटोन म्हणून वापरायला सुरुवात केली. त्यात आईला मस्का लावणंही होतं आणि परस्परांबद्दल 'प्यार का इजहार' ही. कोणतं होतं ते गाणं.

क्लू १: दोन्ही आयांच्या नावातल्या एका अक्षराचा आणि त्यांच्या मुलांच्या त्यांच्याशी असलेल्या नात्याचा शब्दच्छल करून हे गाणं बनलं आहे.
क्लू २: गाणं ड्युएट आहे

उत्तरः

गोरे गोरे, ओ 'बा'के छोरे, कभी मेरी गली आया करो
गोरी गोरी, ओ 'बा'की छोरी, चाहे रोज बुलाया करो.

कोडं क्र. ०७/६३:

'काकू, विनीत आहे का घरात?' सुहासने विचारलं.
'नाही रे, आज सकाळपासूनच लायब्ररीत गेलाय. काही काम होतं का?'
सुहासला काय बोलावं ते कळेना. विनीतने त्याच्यावर एक कामगिरी सोपवली होती. विनीतचं एका मुलीवर प्रेम बसलं होतं. पण ती त्यांच्या जातीची नसल्याने घरून प्रचंड विरोध होणार हे तो जाणून होता. सुहास त्याचा जवळचा मित्र. त्याने सांगितलं तर घरचे निदान ऐकून तरी घेतील असं त्याला वाटत होतं. पण त्यामुळे बिचारा सुहास मात्र कानकोंडला झाला होता. कुठून कसा विषय काढावा हेच त्याला समजत नव्हतं.

'काय रे सुहास? काय म्हणतो आहेस?' विनीतचे बाबा हॉलमध्ये येत म्हणाले.
'काका, नाही म्हणजे, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी आणि काकूशी' तो चाचरत म्हणाला.
'अरे मग बोल की. आमच्याशी बोलायला तुला कधीपासून प्रस्तावना करायला लागली?'
'कोण प्रस्तावना करतंय? अरे सुहास तू होय.' विनीतचे आजोबा देवळातून आले.
सुहासला काय करावं ते कळेना. तो नुसताच बसून राहिला. 'आजोबा, नाही, ते म्हणजे, त्याचं काय आहे....' तो चाचपडत म्हणाला.
'मी सांगतो काय आहे ते. तुझं कोणातरी मुलीवर प्रेम बसलंय आणि तुझ्या घरच्यांना आम्ही सांगावं हेच तुला सांगायचं आहे. हो की नाही?'
सुहास दचकलाच. आजोबांना 'तुमचा रस्ता बरोबर आहे पण गल्ली चुकलीय' हे कसं सांगावं ते त्याला कळेना. शेवटी त्याची ट्यूब पेटली आणि त्याने एक हिंदी गाणं म्हणून टाकलं.
विनीतच्या घरच्यांना आधी अर्थबोध झाला नाही. पण मग एकच हास्यकल्लोळ झाला. आणि विनीतची केस पास झाली.

क्लू: विनीत आजोबांचा कोण????? त्यातून आपले सुहासभाऊ सानुनासिक बोलतात. त्यामुळे गाण्याची तोडफोड झालीच.

उत्तरः

नातु (म) ने किया, ना मैने किया
पर होना था प्यार प्यार प्यार हो गया

कोडं क्र. ०७/६४:

प्रीतीला मूळच्या चायनीज इंग्लिश कंपनीत मध्ये नोकरी लागली तेव्हा अगदी आसमान ठेंगणे झाल्याचा भास झाला. त्यात तिची बॉस म्हणजे तिच्या क्षेत्रातल्या नामांकित स्त्री नेत्यांपैकी एक. तरी पण 'ती' तिची बॉस असणार म्हटल्यावर मैत्रिणींनी इशारा दिलाच. 'बघ हं बाई, एकदम कडक शिस्तीची बाई आहे ती.'
'असू देत. पण तिच्याकडून शिकायला किती मिळेल.'
'हं.....घी देखा लेकिन बडगा नही देखा....'
प्रीतीने काही लक्ष दिलं नाही. काही महिने उलटले. मग तिला एक महत्त्वाची असाईनमेंट मिळाली. नवरा कामानिमित्त बाहेरच्या देशात असल्याने तीही रात्रीचा दिवस करून काम करत होती. पण डेडलाईन आली तरी काम पुरं व्हायची चिन्हं दिसेनात. त्यात त्याच दिवशी रात्री नवरा सुध्दा वर्षा-दीड वर्षाने भारतात परत येणार होता.
शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. 'ती' ने बोलावलं आणि प्रीतीला झाप झाप झापलं.
ती परत आपल्या डेस्कवर आली तेव्हा तिचा फोन वाजत होता. फ्लाईट बोर्ड करायच्या आधी नवर्याने फोन केला होता.
तिचा रडवेला आवाज ऐकून त्याने काय झालं म्हणून विचारलं.
त्याचं उत्तर तिने गाण्यांत कसं दिलं असेल?

क्लू: मूळची चायनीज इंग्लिश कंपनी वित्तीय क्षेत्रातील आहे.

उत्तरः

नैना बरसे रिमझिम रिमझिम पिया तोरे आवनकी आस

वित्तीय क्षेत्रातील मूळची चायनीज इंग्लिश कंपनी - एचएसबीसी
तिची बॉस - नैना किडवाई

चंद्र चोरून आणलाय
चल जाऊ पाद्र्याच्या देवळाच्या पाठीमागे
ना कुणी बघतो, ना कुणी जाणतो, बसूया झाडामागे
चल जाऊ पाद्र्याच्या देवळाच्या पाठीमागे

काल बापू उठले होते
(मग ??)
काल बापू उठले होते
माझ्या लज्जेचं बघ
हो, काल व्हायचं ते कालच झालं
आज तर आजचं बघू
उठले होते
उठू देना
चल जाऊ पाद्र्याच्या देवळाच्या पाठीमागे

चंद्र चोरून आणलाय
चल जाऊ पाद्र्याच्या देवळाच्या पाठीमागे
ना कुणी बघतो, ना कुणी जाणतो, बसूया झाडामागे
चल जाऊ पाद्र्याच्या देवळाच्या पाठीमागे

कोडे क्रं. ०७/६५

केजरीवालांचे विचार आवडून गंपु खूप प्रभावीत होतो आणि त्यांना भेटतो. ते म्हणतात माझ्या पक्षात सामील हो.
गंपु पक्षात सामिल होतो. पक्षातील इतर उत्साही लोकांना भेटल्यावर त्याला पक्ष खूपच आवडु लागतो आणि तो नेटाने कामाला लागतो. त्याचे काम बघून पक्षातील लोक त्याची खूप तारीफ करतात.
आणि गंपुला एक एक पद मिळत जातो. गंपु जीव लावून पक्षाचं काम करतो, त्याचा पक्षावर जीव लागतो. पक्ष त्याला अगदी प्राणप्रीय, एक एक उच्च पद मिळवत जातो.
आणि तो जसा वर जायला लागतो तसे काही लोक जळायलाही लागतात. हळुहळु काड्या टाकायला लागतात, चुगल्या करायला लागतात. गंपुला हे कळते तेव्हा तो जाम चिडतो आणि स्पष्टवक्तेपणाने त्यांना सरळ तोंडावर बोलतो. त्याने ते लोक चिडतात खरे, पण या गोष्टीचा फायदा घेउन गंपुची आणखी बदनामी करतात, त्याला उगाच त्रास देतात, तो चिडावा म्हणुन. आणि चिडला की त्याचा आणखी गैरफायदा घेउन त्याला बदनाम करतात, सरळ जनते समोर. असं करत करत शेवटी अशी वेळ येते की एकदिवस गंपुची पक्षातून हकालपट्टी होते.
आपल्या प्राणप्रिय पक्षातूनच आपल्या काढलं याचे त्याला अतोनात दु:ख होते, काय करावे हे कळत नाही.
आणि तो गाणे म्हणतो.
कोणते?

Pages