मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
**********************************************************************************************************
पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.
पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.
स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.
स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.
सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).
कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.
धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.
धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.
या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या.
नाही हिम्सकूल. वरचा क्लू वाचा
नाही हिम्सकूल. वरचा क्लू वाचा
झूमका गीरा रे बरेली के बझार
झूमका गीरा रे बरेली के बझार मे
को़डे क्र.: ७/२० बाजारात फोटो
को़डे क्र.: ७/२०
बाजारात फोटो काढण्याऐवजी मायबोलीकर जिप्सी एक गाणं गुणगुणत काहीतरी शोधत फिरत होता. ओळखा ते गाणं.
उत्तर:
झूमका गिरा रे बरेलीके बाजारमे
झूमका = झूम + का
मिसेस माधव ह्यांच्यासाठी बरेलीचे खास झुमके![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
को़डे क्र.: ७/२१: अस्मिताचं
को़डे क्र.: ७/२१:
अस्मिताचं लग्न झालं आणि लग्नात तिच्या नवर्याने, किसनने, तिचं नाव बदलून सुस्मिता ठेवलं. ती नवर्याला लाडाने जी हाक मारायची तीच गुंफून एका हिंदी गाण्याचाच तिने उखाणा बनवला. ओळखा ते गाणं.
क्लू: नावातच सारं काही आहे.
०७/२१ किसी ने अपना बना के
०७/२१
किसी ने अपना बना के मुझको मुस्कुराना सिखा दिया
अंधेरे घर में किसी ने हँस के चिराग़ जैसे जला दिया???
झुमका गिरा मला आलेलं
झुमका गिरा मला आलेलं![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
त्याआधीच उत्तर आलं
भ्याआआआआआआआआआआ!
को़डे क्र.: ७/२१: अस्मिताचं
को़डे क्र.: ७/२१:
अस्मिताचं लग्न झालं आणि लग्नात तिच्या नवर्याने, किसनने, तिचं नाव बदलून सुस्मिता ठेवलं. ती नवर्याला लाडाने जी हाक मारायची तीच गुंफून एका हिंदी गाण्याचाच तिने उखाणा बनवला. ओळखा ते गाणं.
क्लू: नावातच सारं काही आहे.
उत्तर: किसीने अपना बनाके मुझको मुस्कुराना सिखा दिया
अस्मिता - न हसणारी, सुस्मिता - छान हसू असलेली, किसी - किसनचा शॉर्ट फॉर्म
आर्या, तुला ज्वारीच्या हुरड्याचं गरमागरम थालीपीठ आणि लोण्याचा गोळा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रिया, फर्स्ट कम फर्स्ट
रिया, फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हड बेसिस
रडू नकोस बघू. एक कोडं अजून सोडवायचं बाकी आहे.
को़डे क्र.: ७/१९
जिथून उच्च दाबाचा वीजप्रवाह वाहत असेल तिथे सहसा 'खतरा' असं लिहिलेलं असतं. किंवा कवटी आणि हाडांचं चित्र असतं. पण आलोक नाथच्या घराबाहेर वीजपुरवठ्याची सोय होती त्यावर चक्क एक गाणं लिहिलं होतं. ओळखा ते गाणं.
क्लू: बच्चे कंपनी, हे तुम्हाला यायला हवं.
०७/०१९ बाबूजी जरा धीरे चलो
०७/०१९ बाबूजी जरा धीरे चलो बिजली खडी यहां बिजली खडी है
को़डे क्र.: ७/२२: TLC channel
को़डे क्र.: ७/२२:
TLC channel वर हेअर ऑइलची जाहिरात करताना डाबरने कोणतं गाणं वापरलं?
को़डे क्र.: ७/१९ जिथून उच्च
को़डे क्र.: ७/१९
जिथून उच्च दाबाचा वीजप्रवाह वाहत असेल तिथे सहसा 'खतरा' असं लिहिलेलं असतं. किंवा कवटी आणि हाडांचं चित्र असतं. पण आलोक नाथच्या घराबाहेर वीजपुरवठ्याची सोय होती त्यावर चक्क एक गाणं लिहिलं होतं. ओळखा ते गाणं.
क्लू: बच्चे कंपनी, हे तुम्हाला यायला हवं.
उत्तर: बाबुजी, जरा धीरे चलो, बिजली खडी यहा बिजली खडी
नैनोमे चिंगारीया गोरा बदन शोलोकी लडी
भरत, तुला बुनियादची डीव्हीडी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
को़डे क्र.:
को़डे क्र.: ७/२३:
देशोदेशीच्या राजेरजवाड्यांनी खचून भरलेला स्वयंवर मंडप पाहून राजकन्या बावरली. तिच्या वडिलांनी कुठलाही पण ठेवला नव्हता. त्यामुळे तिची तिलाच निवड करावी लागणार होती. एकेक राजाची महती आणि पराक्रम सांगत तिची प्रिय सखी तिला पुढे पुढे घेऊन जाऊ लागली. ह्यातल्या कोणाची निवड करायची हेच तिला समजेना. तिला हीच गोष्ट गाण्यातून कशी सांगता आली असती?
को़डे क्र.: ७/२४: न रहावून
को़डे क्र.: ७/२४:
न रहावून कुंतीने एकदा गांधारीला विचारलं 'ताई, दादांना दिसत नाही हे कळल्यापासून तुम्ही डोळ्यांना ही पट्टी बांधली आहे. त्यांना एकदा डोळे भरून पहावं असं कधी तुमच्या मनात येत नाही का?'
गांधारीने कुंतीला काय उत्तर दिलं असेल?
क्लू: बच्चे कंपनीला माहीत असेल अश्या चित्रपटातलं हे गाणं एका नटाच्या तोंडी आहे.
कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही.
७/२४: आँखें खुली या हों बंद
७/२४:
आँखें खुली या हों बंद दीदार उनका होता है
कैसे कहूँ मैं ओ यारा प्यार कैसे होता है
?
को़डे क्र.: ७/२१: अस्मिताचं
को़डे क्र.: ७/२१:
अस्मिताचं लग्न झालं आणि लग्नात तिच्या नवर्याने, किसनने, तिचं नाव बदलून सुस्मिता ठेवलं. ती नवर्याला लाडाने जी हाक मारायची तीच गुंफून एका हिंदी गाण्याचाच तिने उखाणा बनवला. ओळखा ते गाणं.
>>>> हे लै भारी होतं, स्वप्ना.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
को़डे क्र.:
को़डे क्र.: ७/२३:
देशोदेशीच्या राजेरजवाड्यांनी खचून भरलेला स्वयंवर मंडप पाहून राजकन्या बावरली. तिच्या वडिलांनी कुठलाही पण ठेवला नव्हता. त्यामुळे तिची तिलाच निवड करावी लागणार होती. एकेक राजाची महती आणि पराक्रम सांगत तिची प्रिय सखी तिला पुढे पुढे घेऊन जाऊ लागली. ह्यातल्या कोणाची निवड करायची हेच तिला समजेना. तिला हीच गोष्ट गाण्यातून कशी सांगता आली असती?
उई, इतनी बडी मेहफिल और एक दिल
किस को दूं, किस को दूं
को़डे क्र.: ७/२५: सायरा आणि
को़डे क्र.: ७/२५:![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सायरा आणि युसुफ बिहारमधील गया शहरातील एकाच कॉलेजात शिकत असतात. दोघांचे एकमेकांवर नितांत प्रेम. सायराच्या वडिलांना जेंव्हा याची कुणकुण लागते तेंव्हा तो दोन गावगुंड कैलाश आणि सागर यांना त्या दोघांच्या पाळतीवर ठेवले. सायरा, युसुफ कुठेही गेले तरी हे दोघे त्यांच्या मागे मागे असत. जेंव्हा सायराच्याच्या वडिलांना, या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे याची खात्री पटते तेंव्हा तो कैलाश आणि सागर यांना सांगुन युसुफलाला बेदम मारहाण करवतात आणि त्याला ते शहर सोडुन जायला सांगतात. तो निराश होऊन त्या शहरातुन निघुन जातो. काही दिवसांनी पोलिस सागर आणि कैलाशला पकडुन त्यांची रवानगी दूर गावच्या जेलमध्ये करतात. इथे सायरा त्याच्या विरहात, त्याच्या आठवणीत सतत दु:खी असते. तो कुठे आहे, काय करतो याची तिला काहिच कल्पना नसते. अशावेळी आपल्या प्रियकराला, युसुफला बोलावण्यासाठी सायरा कुठले विरहगीत म्हणेल.
०७/०२५ मेरे तुम्हारे बीच में
०७/०२५ मेरे तुम्हारे बीच में अब तो ना पर्वत ना सागर
निसदिन रहे खयालों में तुम अब हो जाओ उजागर
अब आन मिलो सजना
मयेकर, जरा १०-१५ मि. तरी जाऊ
मयेकर, जरा १०-१५ मि. तरी जाऊ द्यायची ना.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
भरतला गरमागरम पुरणाची पोळी, साजुक तुपासहित![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
को़डे क्र.: ७/२५:
मेरे तुम्हारे बीच में अब तो ना पर्वत ना सागर
निसदिन रहे खयालों में तुम अब हो जाओ उजागर
अब आन मिलो सजना
चित्रपटः झुक गया आसमान
कोडे क्र.: ०७/२६
कोडे क्र.: ०७/२६
०७/०२६ जवां हो यारों ये तुमको
०७/०२६ जवां हो यारों ये तुमको हुआ क्या? अजी हमको देखो जरा
ये माना अभी है खाली हाथ न होंगे सदा ये दिन रात
अरे यारों मेरे प्यारो मेरी मानो दिलदारो
ओहन्नो! भरतजी! किती पटकन
ओहन्नो! भरतजी! किती पटकन ओळखलत!!
चला, तुम्हाला माझ्याकडुन साजुक तुपातली जिलबी, सोबत दही!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोडं क्र. २६:
![123.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4652/123.JPG)
उत्तरः
जवां हो यारों ये तुमको हुआ क्या? अजी हमको देखो जरा
ये माना अभी है खाली हाथ न होंगे सदा ये दिन रात
अरे यारों मेरे प्यारो मेरी मानो दिलदारो
वा वा आज मयेकर नॉट
वा वा आज मयेकर नॉट लिसनिंग!
जिप्सी, गाडी जोरात आहे. मस्त कोडी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
७/२४: चेहरा न देखो, दिलको
७/२४:
चेहरा न देखो, दिलको देखो
चित्रपटः सच्चा झूठा
को़डे क्र.:
को़डे क्र.: ७/२३:
देशोदेशीच्या राजेरजवाड्यांनी खचून भरलेला स्वयंवर मंडप पाहून राजकन्या बावरली. तिच्या वडिलांनी कुठलाही पण ठेवला नव्हता. त्यामुळे तिची तिलाच निवड करावी लागणार होती. एकेक राजाची महती आणि पराक्रम सांगत तिची प्रिय सखी तिला पुढे पुढे घेऊन जाऊ लागली. ह्यातल्या कोणाची निवड करायची हेच तिला समजेना. तिला हीच गोष्ट गाण्यातून कशी सांगता आली असती?
उत्तर: इतनी बडी महफिल और एक दिल किसको दू
मामीसाठी भारतातल्या सर्व राजवाड्यांना भेट द्यायची आणि तिच्या आवडीच्या एका राजवाड्यात ३ दिवस २ रात्री मुक्काम करायचं पॅकेज![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामीसाठी भारतातल्या सर्व
मामीसाठी भारतातल्या सर्व राजवाड्यांना भेट द्यायची आणि तिच्या आवडीच्या एका राजवाड्यात ३ दिवस २ रात्री मुक्काम करायचं पॅकेज >>> यिप्पी!!!! बॅगा भरायला घेते गं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
को़डे क्र.: ७/२४: न रहावून
को़डे क्र.: ७/२४:
न रहावून कुंतीने एकदा गांधारीला विचारलं 'ताई, दादांना दिसत नाही हे कळल्यापासून तुम्ही डोळ्यांना ही पट्टी बांधली आहे. त्यांना एकदा डोळे भरून पहावं असं कधी तुमच्या मनात येत नाही का?'
गांधारीने कुंतीला काय उत्तर दिलं असेल?
क्लू: बच्चे कंपनीला माहीत असेल अश्या चित्रपटातलं हे गाणं एका नटाच्या तोंडी आहे.
कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही.
उत्तर: आंखे खुली हो या हो बंद दिदार उनका होता है
कैसे कहु मै ओ यारा ये प्यार कैसे होता है
झिलमिलला केकतामातेच्या महाभारताची डीव्हीडी भेट![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>>हे लै भारी होतं,
>>हे लै भारी होतं, स्वप्ना
धन्स मामी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आर्या, जिप्सी मस्त कोडी.
मामी, नवे मेंबर्स कोडी घालायला आणि सोडवायला आलेत. गाओ महोत्सवाचा परिणाम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लोक्स, हे कोडं पेन्डींग
लोक्स, हे कोडं पेन्डींग आहे
को़डे क्र.: ७/२२:
TLC channel वर हेअर ऑइलची जाहिरात करताना डाबरने कोणतं गाणं वापरलं?
स्वप्ना तुम्ही लोकं थोडे
स्वप्ना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्ही लोकं थोडे दिवस आमच्यासाठी इटुकली पिटुकली कोडी द्याना. आणि आम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्ही उत्तर द्यायचं नाही असं ठरवुन घ्या प्लिज
Pages