आजही कात्रज-हडपसर बस गर्दीनं गच्च भरलेली होती, हिवाळ्यातले दिवस, अंधार लवकर, त्यामुळे तर गर्दी आणखी जास्त. खरं तर अशी गर्दी करण्याची `त्यांना' आता काहीएक गरज नव्हती पण, सवय.. ती अशी सहजासहजी मोडणारी थोडीच ?
" पुढे सरका, आत येणार्यांना जागा द्या ", " जरा सरकून घ्या की, बाकीचेही तिकीट घेऊनच प्रवास करतायत " आवाजांची सरमिसळ प्रत्येक थांब्यावर आणखी वाढत जात होती.
मध्येच कुणाचंतरी भांडण उसळलं, पार धक्काबुक्कीपर्यंत, या सगळ्या भानगडीत बसला एक झटका बसला. तसे सगळेच शांत झाले. बस भैरोबा नाल्याला थांबली होती. आधीच भैरोबाचं नांव, त्यात ते घडलं ....
अचानक कुणीतरी आजूबाजूला वावरत असल्याची प्रत्येकालाच जाणिव झाली, मघाची भांडणं आणि आरडाओरडा कमी कमी होत बसमध्ये शांतता पसरली.
अस्तित्वाची जाणिव होती पण दिसत काहीच नव्हतं, कुठल्यातरी सीटवरून एक दबकी किंचाळीही ऐकू आली, पण तिथे नेमकं काय झालं हे पहायला जायची कुणाच्यातच हिंमत होत नव्हती. जमेल तितकं बाजूला राहून ते सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करत होते..
काही मिनीटं, तास गेले आणि हडपसरला एकदाची बस पुन्हा थांबली, ती सुरू झाल्याक्षणीच एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, ` ते जे काही होतं, त्याचं अस्तित्व आता जाणवत नव्हतं '.
इकडे `त्या' बस मधल्या सगळ्यांनी सुटकेचे निश्वास टाकले.
हडपसरला उतरताक्षणीच गिरीशनं व्हॉट्सप वर मेसेज टाकला ` आख्ख्या पि.एम.टी. व्होल्वोत मी एकटाच प्रवासी' आणि कमेंट्सची वाट पहात राहीला
1st
1st
मस्तच
मस्तच
ष पोटफोड्या का लिहिलाय बरें?
ष पोटफोड्या का लिहिलाय बरें?
ष चं पोट शिवलं आता
ष चं पोट शिवलं आता
छान
छान
चाफ्फ्या तरीच विचार करत होतो
चाफ्फ्या
तरीच विचार करत होतो मी, की तु मला बसची वेळ का विचारली.
मला काही झेपल नाही..
मला काही झेपल नाही..
कचा नाय कळ्ळं ब्वा... पार
कचा नाय कळ्ळं ब्वा... पार म्हनजे पारच डोस्क्यावरूनशान ग्येलं...
कसला भारी आहेस अरे तू
कसला भारी आहेस अरे तू
(No subject)
मस्त "अदर्स" ची आठवण झाली.
मस्त "अदर्स" ची आठवण झाली.
दादा डोक्याच 'कवठ' झाल॑ हो
दादा डोक्याच 'कवठ' झाल॑ हो :p ...टोटल बाउन्सर !!!
मस्त रे!! गिरी
मस्त रे!!
गिरी
भारीये!!!
भारीये!!!
मस्तच.. फक्त कात्रज हडपसर
मस्तच..
फक्त कात्रज हडपसर रस्त्यावर तिनहात नाका कुठेच नाहीये... त्यापेक्षा भैरोबानाला किंवा साडेसतरा नळी असे उल्लेख जास्त चालतील..
कर्टनी अॅम्ब्रोसने टाकलेल्या
कर्टनी अॅम्ब्रोसने टाकलेल्या बाउन्सर पेक्षाही बाउन्सर...
चाफा खुप दिवसांनी..नेहमिच्या
चाफा खुप दिवसांनी..नेहमिच्या श्टाईलमध्ये..
मस्तच.. दोनदा वाचली तेव्हा
मस्तच.. दोनदा वाचली तेव्हा कळली
बाउंसर जास्त पडायला लागल्यानं
बाउंसर जास्त पडायला लागल्यानं संपादीत केलेय आणि हिम्स तुझ्या अपडेट बद्दल धन्स रे मी आपला ऐकीव माहितीवर कात्रज-हडपसर मधे तीनहात नाका आणला
मस्त रे. इकडे `त्या'
मस्त रे.
इकडे `त्या' कात्रज-हडपसर बस मधल्या सगळ्यांनी मनोमन वेताळाचे आभार मानले.>>हे वाक्य नसतं तर अजून बेस्ट झालं असतं. ह्या वाक्या शिवाय पण कळतेच आहे
(No subject)
उप्स आता माझ्या what's app ने
उप्स आता माझ्या what's app ने मला हाक मारली आणि आक्षी ट्युब प्येटली
अरे मस्तच मी आज वाचली गीरोबा
अरे मस्तच मी आज वाचली
गीरोबा
कचा... एकूण कथेत बदल केला
कचा... एकूण कथेत बदल केला नसता तरी चाललं असतं...(स्टॉपच्या नावाचा बदल सोडल्यास)
आता एकदमच स्पष्ट झालय सगळं.. आधीचे व्हर्जन जास्त मस्त होते..
मलाही विस्कटायला मजा नाही आली
मलाही विस्कटायला मजा नाही आली पण... , आता परत बदलू ?
कचा... एकूण कथेत बदल केला
कचा... एकूण कथेत बदल केला नसता तरी चाललं असतं...(स्टॉपच्या नावाचा बदल सोडल्यास)
आता एकदमच स्पष्ट झालय सगळं.. आधीचे व्हर्जन जास्त मस्त होते..>>+१०००
बदल परत. पहिल्यासारखीच कर
बदल परत. पहिल्यासारखीच कर
खरच. मला उमजलेलं ग्यान (माझ्या कथेच्या अनुभवाने) - थोडा पेशन्स आपणही ठेवावा, कळते कधी कधी उशीरा कळते, कधी इतरांचे प्रतिसाद वाचून कळते. अगदीच अनाकलनीय असेल तरच बदलायचा विचार करावा.
बदललीस ना. चांगलं केलस
बदललीस ना. चांगलं केलस
कविन तुमचा अनुभव परफेक्ट आहे
कविन तुमचा अनुभव परफेक्ट आहे
जबरी यार.....
जबरी यार.....
Pages