७. ३० ची कात्रज- हडपसर ( द्वीशतशब्द कथा )

Submitted by कवठीचाफा on 18 December, 2013 - 11:06

आजही कात्रज-हडपसर बस गर्दीनं गच्च भरलेली होती, हिवाळ्यातले दिवस, अंधार लवकर, त्यामुळे तर गर्दी आणखी जास्त. खरं तर अशी गर्दी करण्याची `त्यांना' आता काहीएक गरज नव्हती पण, सवय.. ती अशी सहजासहजी मोडणारी थोडीच ?
" पुढे सरका, आत येणार्‍यांना जागा द्या ", " जरा सरकून घ्या की, बाकीचेही तिकीट घेऊनच प्रवास करतायत " आवाजांची सरमिसळ प्रत्येक थांब्यावर आणखी वाढत जात होती.
मध्येच कुणाचंतरी भांडण उसळलं, पार धक्काबुक्कीपर्यंत, या सगळ्या भानगडीत बसला एक झटका बसला. तसे सगळेच शांत झाले. बस भैरोबा नाल्याला थांबली होती. आधीच भैरोबाचं नांव, त्यात ते घडलं ....
अचानक कुणीतरी आजूबाजूला वावरत असल्याची प्रत्येकालाच जाणिव झाली, मघाची भांडणं आणि आरडाओरडा कमी कमी होत बसमध्ये शांतता पसरली.
अस्तित्वाची जाणिव होती पण दिसत काहीच नव्हतं, कुठल्यातरी सीटवरून एक दबकी किंचाळीही ऐकू आली, पण तिथे नेमकं काय झालं हे पहायला जायची कुणाच्यातच हिंमत होत नव्हती. जमेल तितकं बाजूला राहून ते सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करत होते..
काही मिनीटं, तास गेले आणि हडपसरला एकदाची बस पुन्हा थांबली, ती सुरू झाल्याक्षणीच एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, ` ते जे काही होतं, त्याचं अस्तित्व आता जाणवत नव्हतं '.
इकडे `त्या' बस मधल्या सगळ्यांनी सुटकेचे निश्वास टाकले.

हडपसरला उतरताक्षणीच गिरीशनं व्हॉट्सप वर मेसेज टाकला ` आख्ख्या पि.एम.टी. व्होल्वोत मी एकटाच प्रवासी' आणि कमेंट्सची वाट पहात राहीला

Group content visibility: 
Public - accessible to all site users

1st

छान Proud

मस्तच..

फक्त कात्रज हडपसर रस्त्यावर तिनहात नाका कुठेच नाहीये... त्यापेक्षा भैरोबानाला किंवा साडेसतरा नळी असे उल्लेख जास्त चालतील..

बाउंसर जास्त पडायला लागल्यानं संपादीत केलेय Wink आणि हिम्स तुझ्या अपडेट बद्दल धन्स रे Happy मी आपला ऐकीव माहितीवर कात्रज-हडपसर मधे तीनहात नाका आणला Proud

मस्त रे.

इकडे `त्या' कात्रज-हडपसर बस मधल्या सगळ्यांनी मनोमन वेताळाचे आभार मानले.>>हे वाक्य नसतं तर अजून बेस्ट झालं असतं. ह्या वाक्या शिवाय पण कळतेच आहे

कचा... एकूण कथेत बदल केला नसता तरी चाललं असतं...(स्टॉपच्या नावाचा बदल सोडल्यास)

आता एकदमच स्पष्ट झालय सगळं.. आधीचे व्हर्जन जास्त मस्त होते..

कचा... एकूण कथेत बदल केला नसता तरी चाललं असतं...(स्टॉपच्या नावाचा बदल सोडल्यास)

आता एकदमच स्पष्ट झालय सगळं.. आधीचे व्हर्जन जास्त मस्त होते..>>+१०००

बदल परत. पहिल्यासारखीच कर

खरच. मला उमजलेलं ग्यान (माझ्या कथेच्या अनुभवाने) - थोडा पेशन्स आपणही ठेवावा, कळते कधी कधी उशीरा कळते, कधी इतरांचे प्रतिसाद वाचून कळते. अगदीच अनाकलनीय असेल तरच बदलायचा विचार करावा.

Pages