आजही कात्रज-हडपसर बस गर्दीनं गच्च भरलेली होती, हिवाळ्यातले दिवस, अंधार लवकर, त्यामुळे तर गर्दी आणखी जास्त. खरं तर अशी गर्दी करण्याची `त्यांना' आता काहीएक गरज नव्हती पण, सवय.. ती अशी सहजासहजी मोडणारी थोडीच ?
" पुढे सरका, आत येणार्यांना जागा द्या ", " जरा सरकून घ्या की, बाकीचेही तिकीट घेऊनच प्रवास करतायत " आवाजांची सरमिसळ प्रत्येक थांब्यावर आणखी वाढत जात होती.
मध्येच कुणाचंतरी भांडण उसळलं, पार धक्काबुक्कीपर्यंत, या सगळ्या भानगडीत बसला एक झटका बसला. तसे सगळेच शांत झाले. बस भैरोबा नाल्याला थांबली होती. आधीच भैरोबाचं नांव, त्यात ते घडलं ....
अचानक कुणीतरी आजूबाजूला वावरत असल्याची प्रत्येकालाच जाणिव झाली, मघाची भांडणं आणि आरडाओरडा कमी कमी होत बसमध्ये शांतता पसरली.
अस्तित्वाची जाणिव होती पण दिसत काहीच नव्हतं, कुठल्यातरी सीटवरून एक दबकी किंचाळीही ऐकू आली, पण तिथे नेमकं काय झालं हे पहायला जायची कुणाच्यातच हिंमत होत नव्हती. जमेल तितकं बाजूला राहून ते सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करत होते..
काही मिनीटं, तास गेले आणि हडपसरला एकदाची बस पुन्हा थांबली, ती सुरू झाल्याक्षणीच एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, ` ते जे काही होतं, त्याचं अस्तित्व आता जाणवत नव्हतं '.
इकडे `त्या' बस मधल्या सगळ्यांनी सुटकेचे निश्वास टाकले.
हडपसरला उतरताक्षणीच गिरीशनं व्हॉट्सप वर मेसेज टाकला ` आख्ख्या पि.एम.टी. व्होल्वोत मी एकटाच प्रवासी' आणि कमेंट्सची वाट पहात राहीला
पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद
पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद
पॅरलल युनिव्हर्सची कल्पनाही वापरता येईल...>>>> आहो गानुआज्जोबा, आधी दोन कथांमधे वापरून झालेय ती
भारी आहे... चाफा
भारी आहे... चाफा स्पेशल..
प्रतिसादातील, समजली नाही समजले पण टाईमपास..
बाकी नेहमी अश्याच दुनियेत जगतोस का रे
बाकी नेहमी अश्याच दुनियेत
बाकी नेहमी अश्याच दुनियेत जगतोस का रे >>>>> नाही, नॉर्मलच आहे मी
कचा, सही ! थोडक्या शब्दात
कचा, सही ! थोडक्या शब्दात मस्तच.
गिरीची आता परत कधी बसमधे एकटा बसल्यावर घाबरगुंडी होणार. घाबरला नाही तरी एकदा तरी सगळ्या रिकाम्या सीट्स कडे नजर जातेच की नाही बघ.
कवठी चाफा भारी जमलीये गोष्टं.
कवठी चाफा भारी जमलीये गोष्टं. मस्तच
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/30752
.मस्त
.मस्त
अदर्स या सिनेमाच्या अंजाने
अदर्स या सिनेमाच्या अंजाने आणि हम कौन है अशा दोन हिंदी कॉप्या आहेत. तीन्ही यु ट्युबावर फुकट आहेत.
कहिहि कलल नहि मला
कहिहि कलल नहि मला
चाफ्फ्या, पुन्हा एकदा वाचली
चाफ्फ्या, पुन्हा एकदा वाचली आणी
मी पण आज परत एकदा वाचली.
मी पण आज परत एकदा वाचली.
कमाल....प्रामाणीकपणे सांगते
कमाल....प्रामाणीकपणे सांगते की पहिल्यांदा नाही कळली...दुसर्यांदा वाचली आणि त्यातील थरार कळला.
पण कविन यांना अनुमोदन....
tumhi lihit nahi ka ashat..
tumhi lihit nahi ka ashat.. mi junya posts ani katha saglya vachlya..pan latest nahit... lihila tar bar hoil...:)
३ वेळा वाचल्यावर कळली.....
३ वेळा वाचल्यावर कळली......जबरदस्त!!!!!!!
३ वेळा वाचल्यावर कळली.....
३ वेळा वाचल्यावर कळली......जबरदस्त!!!!!!! >>> जी कथा कळण्यासाठी ३ वेळा वाचावी लागते, अशी कथा लिहून लिहिणार्याला काय मिळतं?
म्हातार्याला कुणी समजून सांगेल का >>> आजोबा हे what app वगैरे नाही कळायचं हो तुम्हाला.. तुम्ही अंतरदेशीय पत्र सापडतं का ते पहा Proud ">>>> Proud????? प्रतिसाद वाचून वाईट वाटले
कुणाला ३ वेळा वाचावी लागेल नि
कुणाला ३ वेळा वाचावी लागेल नि कुणाला अर्धी वाचूनच समजेल हे लिहिणार्याला कसे कळावे?
वीर प्रतापसिंग, तुम्ही
वीर प्रतापसिंग, तुम्ही मायबोलीवर नवीन असाल असे धरून सांगतो - इथे प्रतिसादांकडे लक्ष देऊ नये. काही काही गोष्टी फक्त मित्रा मित्रांच्यात असतात, बाकीच्यांना समजणार नाहीत.
तर तिकडे लक्ष देऊ नका.
तो जुना प्रतिसाद आहे 4
तो जुना प्रतिसाद आहे 4 वर्षांपूर्वीचा... तेंव्हा व्हाtsapp नवीन होते, आणि तो आयडी आता नाही आहे माबो वॉर... जुन्या गोष्टी जाऊ द्या आता ...
Pages