आजही कात्रज-हडपसर बस गर्दीनं गच्च भरलेली होती, हिवाळ्यातले दिवस, अंधार लवकर, त्यामुळे तर गर्दी आणखी जास्त. खरं तर अशी गर्दी करण्याची `त्यांना' आता काहीएक गरज नव्हती पण, सवय.. ती अशी सहजासहजी मोडणारी थोडीच ?
" पुढे सरका, आत येणार्यांना जागा द्या ", " जरा सरकून घ्या की, बाकीचेही तिकीट घेऊनच प्रवास करतायत " आवाजांची सरमिसळ प्रत्येक थांब्यावर आणखी वाढत जात होती.
मध्येच कुणाचंतरी भांडण उसळलं, पार धक्काबुक्कीपर्यंत, या सगळ्या भानगडीत बसला एक झटका बसला. तसे सगळेच शांत झाले. बस भैरोबा नाल्याला थांबली होती. आधीच भैरोबाचं नांव, त्यात ते घडलं ....
अचानक कुणीतरी आजूबाजूला वावरत असल्याची प्रत्येकालाच जाणिव झाली, मघाची भांडणं आणि आरडाओरडा कमी कमी होत बसमध्ये शांतता पसरली.
अस्तित्वाची जाणिव होती पण दिसत काहीच नव्हतं, कुठल्यातरी सीटवरून एक दबकी किंचाळीही ऐकू आली, पण तिथे नेमकं काय झालं हे पहायला जायची कुणाच्यातच हिंमत होत नव्हती. जमेल तितकं बाजूला राहून ते सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करत होते..
काही मिनीटं, तास गेले आणि हडपसरला एकदाची बस पुन्हा थांबली, ती सुरू झाल्याक्षणीच एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, ` ते जे काही होतं, त्याचं अस्तित्व आता जाणवत नव्हतं '.
इकडे `त्या' बस मधल्या सगळ्यांनी सुटकेचे निश्वास टाकले.
हडपसरला उतरताक्षणीच गिरीशनं व्हॉट्सप वर मेसेज टाकला ` आख्ख्या पि.एम.टी. व्होल्वोत मी एकटाच प्रवासी' आणि कमेंट्सची वाट पहात राहीला
नेहमी सा रखे मस्त
नेहमी सा रखे मस्त
चाफ्या __/\__ ग्रे८ आहेस
चाफ्या __/\__ ग्रे८ आहेस रे!!! (कालच वाचली होती अगदी लग्गेच... सॉरी उशीरा प्रतिसादाबद्दल)
मस्तच! निकोल किडमन अभिनित 'द
मस्तच! निकोल किडमन अभिनित 'द अदर्स' चित्रपटाची आठवण झाली...
अरे या म्हातार्याला कुणी
अरे या म्हातार्याला कुणी समजून सांगेल का, की हे नक्की काय खरडलंय?
मध्येच what app कसे कडमाडले आणि तो गिरीश कौण आहे...
कविन तुमचा अनुभव परफेक्ट आहे
कविन तुमचा अनुभव परफेक्ट आहे >> बरं बरं आता मला माझे प्रतिसाद बदलून मी जिथे जिथे "तुम्हाला" अरे तुरे केलय तिथे तिथे जाऊन ते बदलावे लागणार. मला वाटलं तुम्ही आमचे जुने कट्टर चाफा आहात म्हणून मी अरे तुरे केलं. स्वारी हा
गिर्याला टांगणीला लावलेलस की
गिर्याला टांगणीला लावलेलस की लेका.
अरे काल गिर्यानेच
अरे काल गिर्यानेच सांगितले.......आख्ख्या पि.एम.टी. व्होल्वोत मी एकटाच प्रवासी ....... एकदा नाही दोनदा सांगितले
गिरी चा प्रतिसाद नाही दिसला
गिरी चा प्रतिसाद नाही दिसला
धन्यवाद सर्वांनाच मला वाटलं
धन्यवाद सर्वांनाच
मला वाटलं तुम्ही आमचे जुने कट्टर चाफा आहात >>>>> आयमाय स्वारी बरंका कविन, आता पुन्यांदा न्हाय चुक व्हनार
म्हातार्याला कुणी समजून सांगेल का >>> आजोबा हे what app वगैरे नाही कळायचं हो तुम्हाला.. तुम्ही अंतरदेशीय पत्र सापडतं का ते पहा
'द अदर्स' चित्रपटाची आठवण झाली... >>>> द अदर्स पहावाच लागणार आता, चकटफू आहे का अॅव्हलेबल
कचा तू हा शिणुमा बघ आणि मला
कचा तू हा शिणुमा बघ आणि मला सांग कसा वाटला.http://WWW.youtube.com/watch?v=hX_yRbpCNVo&guid=&client=mv-google&gl=US&...
पॅरलल युनिव्हर्सची कल्पनाही
पॅरलल युनिव्हर्सची कल्पनाही वापरता येईल...
अजुन एक कोथ्रुड ते हडपसर कथा
अजुन एक कोथ्रुड ते हडपसर कथा लिहिणार का? अशी रिकामी बस मिळण्याचं स्वप्न कथेततरी पूर्ण होइल
चिमुरी
चिमुरी
अजुन एक कोथ्रुड ते हडपसर कथा
अजुन एक कोथ्रुड ते हडपसर कथा लिहिणार का?...>>>... त्या साठी 'चाफ्या'ला वज्र-३ मधे बसुन पूर्ण प्रवास करावा लागेल...
मस्तच. खरं तर अशी गर्दी
मस्तच.
खरं तर अशी गर्दी करण्याची `त्यांना' आता काहीएक गरज नव्हती पण, सवय..>> यात `त्यांना' असे लिहिण्याची गरज न्हवती असे वाटते. तेव्हाच थोडे क्लिक होते. बाकी मस्तच.
त्या साठी 'चाफ्या'ला वज्र-३
त्या साठी 'चाफ्या'ला वज्र-३ मधे बसुन पूर्ण प्रवास करावा लागेल... >>>>>>> वज्र ३ जास्तच सरळ होईल ना??? १९७ मधुन करु दे त्याला प्रवास
मला झेपली नाही गोष्ट
मला झेपली नाही गोष्ट
दक्षिणा... तुझ्या साठी 'चाफा'
दक्षिणा...
तुझ्या साठी 'चाफा' या कथेचं 'अजय देवगण' Version बनवतो आहे...
दक्षिणा काय समजले नाही
दक्षिणा काय समजले नाही
मला पण नाही झेपली
मला पण नाही झेपली
भारी.. मला आता कात्रज- हडपसर
भारी.. मला आता कात्रज- हडपसर बस मधे प्रवास करताना हे नेहमी आठवत राहिन.
मला पण नाही झेपली
मला पण नाही झेपली
कुच समझ्याइच नई... बताओ तो
कुच समझ्याइच नई... बताओ तो यारो!!
भुतांची गर्दी असलेल्या बसमधे
भुतांची गर्दी असलेल्या बसमधे माणूस चढलाय. माणसा करता बस मधे तो एकटाच आहे.
शेवटचं वाक्य सोडता ही कथा भुतोंके नजरसे वाचून बघा ज्यांना कळली नाही/ झेपली नाही म्हणत आहेत त्यांनी
Thanks कविन समजलं
Thanks कविन समजलं
ओक्के .
ओक्के .
माणसांना समजली नाही वाट्ट ही
माणसांना समजली नाही वाट्ट ही कथा!!
माणसांना समजली नाही वाट्ट ही
माणसांना समजली नाही वाट्ट ही कथा>> पण माझ्यासारख्या "बाईमाणसाला" बरोब्बर कळ्लेय हा
भुतांमधे सुध्दा स्त्री पुरुष
भुतांमधे सुध्दा स्त्री पुरुष असतातच की
पहिल्यांदा वाचली तर कळलीच
पहिल्यांदा वाचली तर कळलीच नाही.. प्रतिसाद वाचुन परत वाचली तेव्हा कळली.. कचा तुस्सी ग्रेट हो
Pages