मध्यंतरी दार्जिंलिंगच्या एका टी- इस्टेट वर सॅलड खाल्लं त्यात नॅस्टरशियम (Nasturtium) या झाडाची पानं आणि फुलं देखिल होती. आजूबाजूला बागेतच उगवलेली ती सुंदर रंगित फुलं अशी सॅलडमध्ये सजून धजून समोर आली आणि मी त्या कल्पनेच्या प्रेमातच पडले.
आता सध्या बागकाम करायला घेतली तर लगेच जाऊन त्याच्या बिया आणल्या आहेत. दिसायलाही सुरेख आणि सॅलडलाही उपयोगी. भारीच उत्सुक आहे आता की केव्हा एकदा घरी ती फुलं फुलताहेत आणि मी ती सॅलडमध्ये वापरतेय ......
त्यावरून मनात विचार आला की आपण फारच कमी फुलं खातो. आजूबाजूला इतकी प्रचंड प्रमाणात विविध प्रकारची फुलं असताना आपल्या स्वयंपाकात मात्र त्यांचा वापर अगदी मर्यादित आहे. असं का?
गुलाबाच्या पाकळ्या, शेवग्याची आणि कुड्याची फुलं, केळफूल आणि भोपळ्याची फुलं ... मला तरी इतकीच माहित आहेत / आठवताहेत.
केशराच्या फुलांच्या मधल्या काड्या वापरल्या जातात. शिवाय गुलाब, केवडा अशा फुलांच्या पासून बनवलेले गुलाबजल, केवडाजल स्वयंपाकात वापरले जाते. गुलकंद तर सगळ्यांना माहित आहेच.
माझ्या या वरच्या यादीत आता नॅस्टरशियमच्या फुलांची भर पडली. मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया मध्ये झुकिनीच्या फुलं आतमध्ये काही स्टफिंग भरून ग्रिल करून वापरताना दिसतात. शिवाय इतरही अनेक फुलं सजवण्यासाठी आणि मग अर्थात खाण्यासाठी वापरताना दिसतात. मी घरी आता भोपळ्याचा वेलही लावलाय केवळ त्याची फुलं वापरण्याकरता.
याव्यतिरिक्त अजून काही फुलं आपल्याकडे अथवा इतर देशांत वापरली जात असल्यास इथे कृपया नमुद करा. याच धाग्यावर त्यांच्या पाककृतीही शेअर केल्या तरी चालतील.
या संदर्भातल्या या दोन
या संदर्भातल्या या दोन साईट्स सापडल्या :
http://en.wikipedia.org/wiki/Edible_flowers
आणि
http://www.treehugger.com/green-food/42-flowers-you-can-eat.html
धन्यावाद मामी मस्त धागा सुरू
धन्यावाद मामी
मस्त धागा सुरू केलायस
ikade kahi kahi padarthat
ikade kahi kahi padarthat prajktachi fule waprtat. prajktachya fulanchi bhaj, fule ghalun pulaw vagaire.
http://www.gardeningchannel.c
http://www.gardeningchannel.com/list-of-edible-flowers-a-z/
-ही अजून एक लिंक...
मराठी माहितीतली नावं सांगा की
मराठी माहितीतली नावं सांगा की कुणीतरी. बकुळीची फुलं काढ्यात वापरतात ना?
आजच्याच DNA मध्ये लेख आला
आजच्याच DNA मध्ये लेख आला आहे.
http://epaper.dnaindia.com/epapermain.aspx?pgNo=9&edcode=820009&eddate=2...
लहानपणी केळफुलाची भाजी फार
लहानपणी केळफुलाची भाजी फार आवडायची...... कित्येक वर्षात खाल्ली नाही म्हणजे मिळालेच नाही केळफुल..
मला तर कोणतंच फुल (दगडफुल
मला तर कोणतंच फुल (दगडफुल सोडुन) खातात असं माहीत नव्हतं![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
मी कुठलंच फुल कधी खाल्लं नाहीये
दगडफुलाचे नाव फूल असले तरी तो
दगडफुलाचे नाव फूल असले तरी तो मसाल्याचा पदार्थ आहे रिया.
गुलकंद, गुलाबजल वगैरे कधी खाल्ले नाहीस का? केवडा जल? केळफुलाची भाजी, केळफुलाचे वडे, इत्यादि खाऊन बघ.
मला इथे आल्यावर केळफुलाची भाजी, केळीच्या गाभ्याची भाजी खाऊन खाऊन कंटाळा आला.
प्राची, प्राजक्तच्या फुलांची भाजी वगैरे रेसिपी देना. इन्टरेस्टींग वाटतंय.
मामी, मस्त धागा!!!!!
धन्यवाद लोक्स. प्राची इकडे
धन्यवाद लोक्स.
प्राची इकडे म्हणजे कुठे? प्राजक्ताची फुलं कशी वापरतात .... जरा सविस्तर लिही ना प्लीज. खरंच इंटरेस्टिंग वाटतंय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रिया, दगडफुल हे एक प्रकारचं
रिया, दगडफुल हे एक प्रकारचं शेवाळ (मॉस) आहे (असं वाटतंय).
पुपुवर मोगर्याच्या कळ्या
पुपुवर मोगर्याच्या कळ्या घालून केलेला ओगलेआज्जींचा एक पदार्थ भारी फेमस आहे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
इकडे म्हणजे आसामात. मध्यंतरी
इकडे म्हणजे आसामात.
मध्यंतरी आसामी भाज्यांबद्दल माहिती शोधताना मला प्राजक्ताच्या फुलाच्या पाकृ मिळाल्या होत्या.
आता परत शोधून लिंक्स देते इकडे. मी कधी बनवली/खाल्ली नाहीये.
शेवग्याची फुलांची भाजी,
शेवग्याची फुलांची भाजी, थालिपीठ हे प्रकार आई करायची माझी.
मग गावठी गुलाबी गुलाबाच्या
मग गावठी गुलाबी गुलाबाच्या पाकळ्या चहात उकळवुन तो चहा पिऊन पहा.:खोखो:
आम्ही पीत होतो, कारण घरी गुलाबाचा सुकाळ्.:स्मित:
http://aakholghor.blogspot.in
http://aakholghor.blogspot.in - जस्मिनची फुले घालून बनवलेली फिश करी.
गुलमोहर पाकळ्या, बडिशेपेचे
गुलमोहर पाकळ्या, बडिशेपेचे तुरे,तुळशीची इवली फुले खाल्ली आहेत लहानपणी...
नागकेशर, केशर,दगडफुल हे मसाल्याचे घटक...
अम्बाडीची फुलं (करकेरा),त्त्यांचं सरबत..(मायबोलीकर दिनेश यंन्च्या मुळे ही माहिती मिळाली होती) ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गुलकंद, कमलकाकडी भाजी, केळ्फुल भाजी..
काही मुली झेंडूची फुले पण कच्ची खात असत...
http://www.friedeye.com/2011/
http://www.friedeye.com/2011/07/assamese-cuisines-easy-eats.html - भोपळ्याच्या फुलांची भजी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
http://kavita-myroom.blogspot
http://kavita-myroom.blogspot.in/2009/11/khewali-phool-edible-flowernigh... - प्राजक्ताच्या फुलांचा पुलाव.
http://www.assamesecuisine.co
http://www.assamesecuisine.com/detail_view.aspx?food_id=f001 - प्राजक्ताच्या फुलांची धिरडी
वा वा प्राचीताईंनी लगेच
वा वा प्राचीताईंनी लगेच मनावर घेतलंय. मस्त दिसताहेत. तू करून आता मायबोलीवर टाक हे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गीता छान लिस्ट. पण त्यात सगळीच फुलं नाहीयेत. उदा. बडिशेपेचे तुरे या बिया आहेत. कमलकाकडी कमळाचे देठ आहेत, दगडफूल मॉस आहे.
गुलमोहोराची फक्त ठिपकेदार पाकळी खातात बहुतेक. झेंडुच्या फुलांच्या पाकळ्या काढून आतला पांढरा भाग खायचो आम्ही.
पाळी नियमित आणि सुसह्य
पाळी नियमित आणि सुसह्य होण्यासाठी मुलींना जास्वंदीच्या पाकळ्या तुपात परतून चुरून पिठीसाखर घालून खायला देतात. प्रमाण माहिती नाही.
मामी इथे बघ - झुकिनीची फुले
मामी इथे बघ - झुकिनीची फुले वापरुन पदार्थ केलाय
http://foodblogandthedog.wordpress.com/2013/06/30/fresh-to-go-courgette-...
मस्त धागा. लिंका बघते. दगडफूल
मस्त धागा. लिंका बघते.
दगडफूल हे शेवाळ नाही. लायकेन आहे. लायकेन म्हणजे नॉर्मली अल्गल (शेवाळी, मॉस यात येतात) आणि फंगल (बुरशी ते मश्रूम्स) कल्चर एकत्र असतं.
लायकेन्स हे पोल्यूशन इंडिकेटर्स असतात. म्हणजे जिथे पोल्यूशन नाही तिथेच दिसतात.
दगडांवर किंवा झाडाच्या खोडांवर असू शकतात.
( टिवायबीएस्सीला केलेला अभ्यास कामी आला! )
त्यातली एक स्पेसी आपण दगडफूल म्हणून वापरतो.
आम्ही घाणेरीच्या फुलांचे देठ
आम्ही घाणेरीच्या फुलांचे देठ चोखायचो. एक कणभर गोड चव मिळायची तेवढ्यासाठी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोगर्याची वाळवलेली फुले हिरव्या चहात हा माझा आवडता द्रव पदार्थ आहे.
बाकी मग केळफूल, गुलाब, केशर वगळता अजून खाऊची फुले माहित नाहीत फारशी
ओह, नी, माझं विज्ञानातील
ओह, नी, माझं विज्ञानातील अज्ञान दूर केल्याबद्दल धन्स.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोगर्याची वाळवलेली फुले
मोगर्याची वाळवलेली फुले हिरव्या चहात >>> येस्स!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्ही घाणेरीच्या फुलांचे देठ चोखायचो. हो हो. तसंच ती एक्झोराची केशरी लांब दांड्याची फुलं देखिल चोखून मध प्यायचो. शिवाय पिवळी बिट्टीची फुलं देखिल अशीच चोखता येतात.
निवडुंगाची बोंडं (म्हणजे कळ्या का?) देखिल स्वयंपाकात वापरतात असं कधीतरी कुठेतरी वाचल्याचं आठवतंय. प्रकाश टाका प्लीज.
एक कणभर गोड चव मिळायची
एक कणभर गोड चव मिळायची तेवढ्यासाठी.
>> ही चव मधुमालतीच्या फुलातही मिळते का?
माहित नाही गं. चोखली नाहीत
माहित नाही गं. चोखली नाहीत मधुमालतीची फुलं. आता बघेन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक कणभर गोड चव मिळायची
एक कणभर गोड चव मिळायची तेवढ्यासाठी.
>> ही चव मधुमालतीच्या फुलातही मिळते का?
>> हो.
Pages