स्वयंपाकघरातील फुलं

Submitted by मामी on 20 November, 2013 - 23:12

मध्यंतरी दार्जिंलिंगच्या एका टी- इस्टेट वर सॅलड खाल्लं त्यात नॅस्टरशियम (Nasturtium) या झाडाची पानं आणि फुलं देखिल होती. आजूबाजूला बागेतच उगवलेली ती सुंदर रंगित फुलं अशी सॅलडमध्ये सजून धजून समोर आली आणि मी त्या कल्पनेच्या प्रेमातच पडले.

आता सध्या बागकाम करायला घेतली तर लगेच जाऊन त्याच्या बिया आणल्या आहेत. दिसायलाही सुरेख आणि सॅलडलाही उपयोगी. भारीच उत्सुक आहे आता की केव्हा एकदा घरी ती फुलं फुलताहेत आणि मी ती सॅलडमध्ये वापरतेय ......

त्यावरून मनात विचार आला की आपण फारच कमी फुलं खातो. आजूबाजूला इतकी प्रचंड प्रमाणात विविध प्रकारची फुलं असताना आपल्या स्वयंपाकात मात्र त्यांचा वापर अगदी मर्यादित आहे. असं का?

गुलाबाच्या पाकळ्या, शेवग्याची आणि कुड्याची फुलं, केळफूल आणि भोपळ्याची फुलं ... मला तरी इतकीच माहित आहेत / आठवताहेत.

केशराच्या फुलांच्या मधल्या काड्या वापरल्या जातात. शिवाय गुलाब, केवडा अशा फुलांच्या पासून बनवलेले गुलाबजल, केवडाजल स्वयंपाकात वापरले जाते. गुलकंद तर सगळ्यांना माहित आहेच.

माझ्या या वरच्या यादीत आता नॅस्टरशियमच्या फुलांची भर पडली. मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया मध्ये झुकिनीच्या फुलं आतमध्ये काही स्टफिंग भरून ग्रिल करून वापरताना दिसतात. शिवाय इतरही अनेक फुलं सजवण्यासाठी आणि मग अर्थात खाण्यासाठी वापरताना दिसतात. मी घरी आता भोपळ्याचा वेलही लावलाय केवळ त्याची फुलं वापरण्याकरता. Happy

याव्यतिरिक्त अजून काही फुलं आपल्याकडे अथवा इतर देशांत वापरली जात असल्यास इथे कृपया नमुद करा. याच धाग्यावर त्यांच्या पाककृतीही शेअर केल्या तरी चालतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भोपळ्याच्या फुलांच्या भज्यांचा फोटो भारी आहे. फुलाचा असा वेगळा स्वाद लागतो का?

हेटीची भजी खाल्ली आहेत पण आता चव आठवत नाही. बॅटरमध्ये बुडवून तळली असतील तर वाईट कशाला लागतात?

Pages