मध्यंतरी दार्जिंलिंगच्या एका टी- इस्टेट वर सॅलड खाल्लं त्यात नॅस्टरशियम (Nasturtium) या झाडाची पानं आणि फुलं देखिल होती. आजूबाजूला बागेतच उगवलेली ती सुंदर रंगित फुलं अशी सॅलडमध्ये सजून धजून समोर आली आणि मी त्या कल्पनेच्या प्रेमातच पडले.
आता सध्या बागकाम करायला घेतली तर लगेच जाऊन त्याच्या बिया आणल्या आहेत. दिसायलाही सुरेख आणि सॅलडलाही उपयोगी. भारीच उत्सुक आहे आता की केव्हा एकदा घरी ती फुलं फुलताहेत आणि मी ती सॅलडमध्ये वापरतेय ......
त्यावरून मनात विचार आला की आपण फारच कमी फुलं खातो. आजूबाजूला इतकी प्रचंड प्रमाणात विविध प्रकारची फुलं असताना आपल्या स्वयंपाकात मात्र त्यांचा वापर अगदी मर्यादित आहे. असं का?
गुलाबाच्या पाकळ्या, शेवग्याची आणि कुड्याची फुलं, केळफूल आणि भोपळ्याची फुलं ... मला तरी इतकीच माहित आहेत / आठवताहेत.
केशराच्या फुलांच्या मधल्या काड्या वापरल्या जातात. शिवाय गुलाब, केवडा अशा फुलांच्या पासून बनवलेले गुलाबजल, केवडाजल स्वयंपाकात वापरले जाते. गुलकंद तर सगळ्यांना माहित आहेच.
माझ्या या वरच्या यादीत आता नॅस्टरशियमच्या फुलांची भर पडली. मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया मध्ये झुकिनीच्या फुलं आतमध्ये काही स्टफिंग भरून ग्रिल करून वापरताना दिसतात. शिवाय इतरही अनेक फुलं सजवण्यासाठी आणि मग अर्थात खाण्यासाठी वापरताना दिसतात. मी घरी आता भोपळ्याचा वेलही लावलाय केवळ त्याची फुलं वापरण्याकरता.
याव्यतिरिक्त अजून काही फुलं आपल्याकडे अथवा इतर देशांत वापरली जात असल्यास इथे कृपया नमुद करा. याच धाग्यावर त्यांच्या पाककृतीही शेअर केल्या तरी चालतील.
केळफुलाची भाजी, वडे आहाहा
केळफुलाची भाजी, वडे आहाहा तोंडाला आत्ताच पाणी सुटलंय आठवणीने... शेवङ्याच्या आणि कुड्याच्या फुलांची भाजीही छान लागते. कुड्याची फुले तर पोटाच्या विकारांवर खूप उपयोगी. कुटजारिष्ट हे कुड्यापासूनच बनवतात.
केवडा, गुलाब इ. सुगंधी फुले सरबते, चहाच्या वेगवेगळ्या फ्लेवर्स साठीही वापरतात.
जिंजर लिली नावाचे एक गुलाबी
जिंजर लिली नावाचे एक गुलाबी मांसल फुल बघितले असशील, त्याची कळी थाई / मलाय जेवणात वापरतात.
फणसाची फुले नसतात, छोटे फणसच असतात. ( मराठीत त्यांना कोके म्हणतात. ) त्यांची बिहारमधे कोशिंबीर करून खातात.
कांद्याच्या कळ्या >>>> हो ही
कांद्याच्या कळ्या >>>> हो ही फुलं कधी मधी सिटीलाईट मार्केट बाहेर विकायला असतात. मागे विक्रम डॉक्टरनं याबद्दल एक लेख लिहिला होता.
मामी, एका अर्थाने मश्रुमला पण
मामी, एका अर्थाने मश्रुमला पण कळी किंवा फुल म्हणावे लागेल. पण सध्या मश्रुम्सची गणना ना वनस्पति मधे होत ना प्राण्यात !
मधुमालतीच्या फुलांसारखच
मधुमालतीच्या फुलांसारखच बॉटलब्रशच्या फुलांमधे पण गोड पदार्थ असतो. लहानपणी आम्ही ही फुलं तळहातावर आपटुन त्याचा मध चाटत असु.
का अर्थाने मश्रुमला पण कळी
का अर्थाने मश्रुमला पण कळी किंवा फुल म्हणावे लागेल. <<
मश्रूम्सचा जो भाग आपण खातो त्याला अजूनतरी शास्त्रीय परिभाषेत फळे असेच म्हणले जाते.
आम्ही शिकत होतो तेव्हा ते प्लांट किंगडमचाच भाग सांगितले जायचे. आता नवीन संशोधनानंतर त्यांचे स्थान धोबी का कुत्ता, ना घरका ना घाटका झालेय. त्यांना आता प्लांट आणि अॅनिमल दोन्ही किंगडम्समधे जागा नाहीये.
भारंगीच्या फुलांची भाजी असा
भारंगीच्या फुलांची भाजी असा उल्लेख वाचल्याचं आठवतंय. तसेच रक्तकांचनाच्या फुलांची भाजी औषधी असते असंही वाचलंय कुठेतरी.
हादग्याच्या फुलांची भाजी
हादग्याच्या फुलांची भाजी खाल्लीये का कोणी? भारी लागते. डाळीचे पीठ पेरुन किंवा मुगाची डाळ घालून सुद्धा छान लागते!
खुप छान धागा. थन्क्स मामि
खुप छान धागा. थन्क्स मामि
http://eol.org/info/453 म्हणू
http://eol.org/info/453
म्हणून तर मी एका अर्थाने असे लिहिलेय
इथे अमेरिकेत पँसीची फुलं ,
इथे अमेरिकेत पँसीची फुलं , नॅस्टरशियमची फुलं सॅलड मधे, केक डेकोरेशनमधे वापरतात.
इटालियन / पोर्चुगीझ / स्पॅनिश स्वैपाकात झुकिनी , स्क्वाश च्या फुलांमधे स्टफिंग भरुन, मग तळून खायची पद्धत आहे .
मेक्सिकोमधे भोपळ्याच्या कळ्यांचे/ फुलांचे सूप, किंवा परतून टाको फिलिंग हे पण पॉप्युलर आहे .
अमेरिकेतल्या मेक्सिकन ग्रोसरीमधे फुलांचे, सूपचे कॅन्स मिळतात .
१. दगडफुलाबद्दल शेवाळ्+बुरशी
१. दगडफुलाबद्दल शेवाळ्+बुरशी यांचे सहजीवन हे बरोबर आहे. तो एका साईडने काळा व दुसर्या बाजूस पांढरा असा चुरगळलेल्या कागदासारखा पदार्थ मसाल्यात वापरतात. हे फूल नाही.
२. आमच्याकडे हादग्याची भजी करतात. भाजी खाल्लेली नाही.
३. मोहाची फुले. (महुआ) ही नुसती खाल्लीत तरीही नशा येऊ शकते. याची सातपुड्यात दारू बनवतात. नुसती खायला फुलं मधुर चवीची असतात.
४.गुलमोहोराच्या फुलांच्या पाकळ्यांच्या दांड्या आंबटसर चवीच्या असतात.
५. चिंचेची फुले व पाने लहानपणी खात असू.
६. कोथिंबिरीची फुले. बर्याचदा फुलारलेली कोथींबीर मिळते. ही फुले सॅलडमधे छान लागतील.
७. बुचाच्या फुलाच्या देठात मध असतो. फुलं गोळा करताना देठ चोखून गोडवा मिळवणे अन नंतर त्याची पिपाणी वाजवणे असा कार्यक्रम असे.
८. गुलाबाचा गुलकंद व गुलाबकळ्या/पाकळ्या मिठाईत खातात. गुलाबपाणी हा वेगळा उपयोग.
९. केवड्याचे सरबत.
केवड्याचा काथ देखिल करतात. केवड्याच्या पानांत काथाची भुकटी भरून डब्यात २-३ अठवडे ठेवायची. मग त्या काथाची पोळी लाटून कात्रीने बारीक बारीक शंकरपाळी पाडायची, असे आमची माई (आज्जी) करीत असे. अतीशय सुंदर सुगंधी काथ बनत असे.
१०. लवंग ही देठासह कळी असते. दिनेशदांनी सांगितले आहेच.
११. तुळशीची मंजिरी / बिया / पाने खातात्/चहात इ. वापरतात.
(
अवांतर १
माझ्या माहितीतले एकुलते एक केवड्याचे बन रिसेंटली मेले.. पाण्याची कमतरता अन अती उत्साही पर्यटक, ही कारणे..
*
अवांतर २.
भारतात अत्यंत सुंदर चवींचे मसाले मिळत असल्याने इतर मायनर चवींकडे आपले जास्त लक्ष नसावे. आल्याच्या पानांनाही मस्त फ्लेवर असतो. संत्र्याची/खायच्या लिंबाची फुले वा पाने देखिल चुरडलीत तर संत्र्या/लिंबाच्या सालीचा फ्लेवर देतात. उदा. संत्र्याची किंवा लिंबाची "कॅण्डीड" वा नुसतीच साल वापरणे हा प्रकार आपण करीत नाही. बेसिल लीव्हज हा प्रकार आपण क्वचितच मसाला म्हणून वापरतो.. वगैरे.
*
अवांतर ३. / तळटीप.
औषधी उपयोगांच्या फुलांबद्दल इथे लिहिले नाही. धागाविषय स्वयंपाकघरातील फुलं असा आहे..
चिंचेची फुले व पाने लहानपणी
चिंचेची फुले व पाने लहानपणी खात असू >>> +१
मस्त धागा आहे. एक रेसिपी लिहिते दुपारून. रेसिपीची आई अजून आली नाही हापिसात
मेधा, नॅस्टरशियम हा योग्य
मेधा, नॅस्टरशियम हा योग्य उच्चार सांगितल्याबद्दल धन्यवाद.
वरही बदल करते.
मोगर्याची फुलं पाण्यात घालून
मोगर्याची फुलं पाण्यात घालून ते पाणी लहानपणी प्यायचो कारण दारातच होता वेल आणि तो बहरायचा पण खूप. मस्त सुवासिक होतं पाणी त्यामुळे.
हादग्याच्या फुलालाच
हादग्याच्या फुलालाच हेट्याची फुल म्हणतात का?
तसेच अडुळश्याची फुलही खुप छान लागतात. अगदी गोड.
मस्त धागा. नवीन माहिती.
मस्त धागा. नवीन माहिती.
मामी मस्त आहे धागा. आवडला
मामी मस्त आहे धागा. आवडला एकदम.
लव्हेंडर आईसक्रीम. आणि लव्हेंडर मफीन खावून पहा एकदा.
लव्हेंडर लेमोनेड जबरी दिसते.
मस्त धागा मामी!
मस्त धागा मामी!
फ्राइड स्क्वॉश ब्लॉसमची कृती.
फ्राइड स्क्वॉश ब्लॉसमची कृती. इथे आधी आली असल्यास माहिती नाही. तीन पानं भरून पोस्टी आहेत त्यामुळे न बघता देते आहे.
*************************
स्क्वॉशची फुलं स्वच्छ धुवून घ्यायची. रिकोटा चीजमध्ये गार्लिक पावडर+मीठ घालून ते मिश्रण हलक्या हाताने फुलांमध्ये भरायचं. ऑल पर्पज फ्लार/मैदा, थोडं मीठ, थोडी बियर किंवा सोडा आणि पाणी घालून भज्याच्या पिठासारखं भिजवायचं. या पिठात ती स्टफ्ड फुलं बुडवून शॅलो किंवा डीप फ्राय करायची. चीझ खूप डच्च भरायचं नाही. थोडं थोडंच भरायचं.
*************************
ही मैत्रिणीची रेसिपी. http://www.jessicagavin.com/test-kitchen/appetizers/fried-squash-blossom... या लिंकवर साधारण अशीच रेसिपी डिटेलवार दिलेली आहे.
फ्राइड स्क्वॉश ब्लॉसमची कृती.
फ्राइड स्क्वॉश ब्लॉसमची कृती. >>> जबरी दिसताहेत!
कुठलाही धागा काढला तर किमान १०० पार करणार असं पोटेंशियल आहे मामीमध्ये!
रच्याकने, मोगर्याचं किंवा वाळ्याचं माठातलं गार पाणी प्यावं असं इथे वेदर आहे सध्या! 'कुणी जाल का आणाल का मोगर्याच्या त्या कळ्या?' असं झालय अगदी!
लवेंडर लेमोनेड -
लवेंडर लेमोनेड - http://www.simplyrecipes.com/recipes/lavender_lemonade/
काटेसावरीच्या कळ्यांची भाजी
काटेसावरीच्या कळ्यांची भाजी उत्तरेकडे करतात. कळ्या उलगडून आतल्या पांढ -या भागाची भाजी करतात असे कळ्या झोडपणा-या भय्याने मला गितलेले. मी तेव्हा रेसिपी विचारली नाही कारण ती कल्पना मला फारशी आवडली नाही.
लव्हेंडर आईसक्रीम. आणि
लव्हेंडर आईसक्रीम. आणि लव्हेंडर मफीन खावून पहा एकदा.
>>>> येस्स. लव्हेंडर कशी विसरले? मायबोलीकर इन्डिगोनं तिच्या आवारातल्या लव्हेंडरचं घरी केलेलं आईस्क्रीम मला खाऊ घातलंय. कसलं यम्मी होतं!
आता लव्हेंडर मफिन आणि लव्हेंडर लेमोनेड चाखायला तुझ्याकडे यायला हवं.
लव्हेंडर लेमोनेड भारीच
लव्हेंडर लेमोनेड भारीच टेम्टिंग दिसतंय.
सिंडी, फ्राइड स्क्वॉश ब्लॉसमच्या कृती बद्दल धन्यवाद.
कुणाच्या दारात लॅव्हेण्डरचं
कुणाच्या दारात लॅव्हेण्डरचं झाड असू शकतं हेच माझ्यासाठी भन्नाट रम्य कविकल्पनेसारखं वगैरे आहे.
अगदी अगदी. आणि त्या झाडाची
अगदी अगदी. आणि त्या झाडाची फुलं काढून लगेच त्यांचं आईस्क्रीम! मी देखिल कल्पनेच्या प्रेमात पडले होते.
हे भारतात शक्य आहे? म्हणजे
हे भारतात शक्य आहे? म्हणजे लॅव्हेण्डरचं झाड? कोकणातल्या हवेत?
गावच्या घराभोवती झाडं लावायचीच आहेत. साबांच्या चॉइसचे माड, फणस लावून झाल्यावर एखाद दुसरा कोपरा येईल माझ्या वाट्याला कदाचित. तिथे लावेन.
नी, गाजराची पुंगी!
नी, गाजराची पुंगी!
लव्हेंडर आता मी ही शोधते इथेच मुंबईत लावायला. कोणाला माहिती असेल तर कळवा.
बर्याच नवीन गोष्टी
बर्याच नवीन गोष्टी कळाल्या.
कुणाच्या दारात लॅव्हेण्डरचं झाड असू शकतं हेच माझ्यासाठी भन्नाट रम्य कविकल्पनेसारखं वगैरे आहे << माझ्या कडे आहे बरच पसरलेलं. आधी फुलं प्लेट मधे ठेउन बेड रुम मधे ठेवायचे पण अगदी हातात घेउन वास घेतल्या शिवाय फार काही वास येत नाही त्यामुळे ते बंद केल. आता लेमोनेड बनवुन बघायल पाहीजे.
बाय द वे माझ्याकडे रोझमेरीही आहे आणि त्याचा (पानं/ फुलं + ऑलीव्ह ऑइल) मला सलाड ड्रेसिंग साठी खुपच उपयोग होतो
औषधी उपयोगांच्या फुलांबद्दल इथे लिहिले नाही. धागाविषय स्वयंपाकघरातील फुलं असा आहे.<< इब्लीस, हे वाचायला आवडेल.
Pages