'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली.
आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!!
ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे.
सध्या मिळालेली माहिती:
कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
महत्वाचे:
इथे भांडत बसू नये.
आणि झाडून सगळ्यांचं प्रेम
आणि झाडून सगळ्यांचं प्रेम फक्त आणि फक्त इशावरच. बाकीच्या लहानांनी अगदी घोडी मारलीत यांची.<< हे तर हिंदी पिक्चर मधे नेहमीच दाखवतात...
त्या मोहन जोशीचा तो
त्या मोहन जोशीचा तो डायलॉग...'अहो ती बंदूक नकली आहे.....ती मी हातात धरतो ना, म्हणून ती खरी वाटते....' मस्त होता.
ईशाच वागण, आणि तोडून बोलण जरा अतीच वाटत...पण ओम खूप भारी.....खरच, उ.का. नसता तर मी हि सिरीयल स्पृहासाठीसुद्धा नसती पाहिली कदाचित.....
बाकी ओम आणि ईशाचे संवाद छान आहेत. उ.का.ची अभिनयगिरी मस्त!!! घरातील लोकांमध्ये 'मास्तरची भावी सून' म्हणून जी अभिनेत्री काम करतीये, ति मला आवडली. आणि पार्श्व संगीत बदललय त्यांनी....ए.ल.दु.गो. च नाही वापरलेलं. वापरायला हवं होत....कदाचित पार्श्व संगीत इफेक्टिव नसल्याने कॉमेडी हायलाईट होत नाहीये, अस माझ तरी मत आहे.
लहानांना जरा सिरिअसली घ्या
लहानांना जरा सिरिअसली घ्या म्हणजे नेमकं काय करायचंय ते मला अजिबातच कळालेलं नाहीये
मला पण!!!
मला पण!!!
सिरीयल चांगली आहे पण patches
सिरीयल चांगली आहे पण patches मध्ये! मला वाटतं त्यांनी ए.ल.दु.गो. चं पार्श्वसंगीत वापरू नये! ते ऐकलं की राधा-घना & फॅमिलीच आठवते!
बंडल आणि भंगार सिरियल. स्पृहा
बंडल आणि भंगार सिरियल.
स्पृहा तर बासच...
परवाच्या भागात स्पृहाने छान
परवाच्या भागात स्पृहाने छान अनारकली घातला होता. मस्त दिसत होती ती....
पण रंग किती भडक आहेत तिच्या
पण रंग किती भडक आहेत तिच्या ड्रेसेसचे
सध्या मस्त वाटत आहे ही
सध्या मस्त वाटत आहे ही मालिका... उकाचा (ओंम) अभिनय तर मस्तच...
मला पण आवड्ते हि मालिका...
मला पण आवड्ते हि मालिका...
स्पृहा तर बासच.+१
स्पृहा तर बासच.+१
उ.का. फार गोड काम करतोय!
उ.का. फार गोड काम करतोय! त्याने मस्त styles उचलल्या आहेत, (नाही नाही नाही/बाय बाय बाय). असते अशी सवय अनेकांना!
आणि मला शोध लागला की पटकथा संदेश कुलकर्णी ची आहे चि. मां. ची नाही!
पण रंग किती भडक आहेत तिच्या
पण रंग किती भडक आहेत तिच्या ड्रेसेसचे <<<< +१
येस्स..उमेश कामत यांचा अभिनय
येस्स..उमेश कामत यांचा अभिनय एकदम सिम्पल, डाऊन टू अर्थ आणि जेन्युईन....सीरियलीतल्या इतर बर्याच कलाकारांपेक्षा ( मुख्यम्हणजे स्पृहा जोशी पेक्षा) अधिक सरस. अजूनतरी 'ओव्हर' अॅक्टिंग नाही झालेली.
वकील असुन पण स्प्रुहाबाई एवढे
वकील असुन पण स्प्रुहाबाई एवढे रंगीबेरंगी ड्रेस कसे काय घालतात? नैअतर आमच्याकडे काळ्यापांढर्या शिवाय रंगच नाही. आणि ती कोर्ट अटेंड करणारी वकीलीण दाखवलीये. कॉर्पोरेट्/प्रॉपेर्टी वाली नाही.
उ का ओव्हर अॅक्टिंग नाहीच
उ का ओव्हर अॅक्टिंग नाहीच करत. अतिशय नैसर्गिकपणे वावरतो तो. स्पृहा उगिचच भारावल्यासारखीवगैरे.. डोक्यात जाते कंप्लिट
उमेश मस्तच. मी बघत नाही पण
उमेश मस्तच. मी बघत नाही पण मला आवडतो उमेश नेहेमीच. स्पृहा बंडल.
पटकथा सुरूवातीला चिन्मय
पटकथा सुरूवातीला चिन्मय मांडलेकरचीच होती. काही कारणाने तो व्यग्र झाल्यामुळे त्यांना नवीन लेखक हवा होता. संदेश कुलकर्णी जो एक उत्तम लेखक आहे आणि याच मालिकेत कामही करतो, त्यानेच आता ती जबाबदारी चिमांकडून उचलली आहे.
दक्षे, कित्त्त्ती तो राग तुझा स्पृहावर तिचे ड्रेस मात्र खरंच भयंकर आहेत.
(परत एकदा) उमेश कामत फारच गोड आहे. कालचा त्यांचा दिवे गेल्यानंतरचा भाग सुरेख चित्रित केला गेला. काके, धनश्री पण मजा आणतात.
कालचा त्यांचा दिवे
कालचा त्यांचा दिवे गेल्यानंतरचा भाग सुरेख चित्रित केला गेला >>++१११ मस्तच.
पटकथा सुरूवातीला चिन्मय
पटकथा सुरूवातीला चिन्मय मांडलेकरचीच होती. काही कारणाने तो व्यग्र झाल्यामुळे >> देवा! तुझे कित्ती कित्ती म्हणून आभार मानू
आणि मला शोध लागला की पटकथा
आणि मला शोध लागला की पटकथा संदेश कुलकर्णी ची आहे >>>> हा बहुतेक सोनाली कुलकर्णीचा भाऊ वाटतं
अंजली_१२, हो आणि अमृता
अंजली_१२, हो आणि अमृता सुभाषचा नवरा
ओह येस्स
ओह येस्स
गेले काही भाग खूप मस्त होते.
गेले काही भाग खूप मस्त होते. इशाची मैत्रीण झकास फोडण्या घालतेय दोघांच्यात. आठवड्याचे सगळे भाग नेटवर एकदम विना जाहिराती बघतोय त्यामुळे जास्त एकसंध वाटत आहे. बाकी भरताड मालिकांपेक्षा नक्कीच चांगली आहे.
हो, मस्त चालू आहे मालिका मला
हो, मस्त चालू आहे मालिका
मला पार्श्वसंगीतही खूप आवडलं. (परत एकदा :फिदी:) उमेश कामत गोऽड आहे!
उमेश कामत matra kharach khup
उमेश कामत matra kharach khup गोड ahe. tyachi शैली nahi nahi nahi .. हो हो हो sunderch
स्पृहाचा अनारकली छान
स्पृहाचा अनारकली छान होता...पण त्यावरील बोल्ड प्रिंटमुळे(पांढरी नक्षी) ती जास्तच जाड वाटत होती.
उमेश खुपच सहजरित्या रोल
उमेश खुपच सहजरित्या रोल निभावुन नेतोय.
त्याच्या घरातले चांगला अभिनय करत आहेत.
स्पृहा हळुहळु रुळतेय अस वाटलं.
तिच्या घरातले प्रसंग कैच्या कै असं वाटलं.
गेले दोन एपिसोड अभिनय, संवाद
गेले दोन एपिसोड अभिनय, संवाद व दिग्दर्शन या सर्वच बाबतींत खूपच सरस वाटले. इशा ही एका मोठ्या कुटूंबातील कांहीशी लाडावलेली मुलगी आहे, हें लक्षांत घेतल्यास स्पृहाचा अभिनयही त्या भूमिकेशी सुसंगत वाटतो.
कालच्या एपिसोडमधील धनुष
कालच्या एपिसोडमधील धनुष प्रकरण जरा अतिच होतं...त्या दोघी लाडे लाडे धनुष कित्ती गोsssड आहे, तो कित्ती गोsssड बोलतो....
Pages