एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला एक कळत नाही विनोदनिर्मिती साठी मालिकांमधुन नेहमी विसरभोळे लोकच का दाखवतात?
>>>
+११११११११११११

हेच लिहिणार होते मी Happy

यू आर वेलकम सानी... Happy

काल त्या हिरवीणीच्या घरातली खंडीभर माणसे पाहिल्यावर मला सिनेमातील महाफॅमिलीज आठवल्या- तोच चिकट गोडवा, तेच ओशट संवाद; प्रत्येक पात्र चकचकीत कटआउट्सारखे-टू डायमेन्शनल, नो डेप्थ! >>>>> १०० टक्के अनुमोदन Angry

मालिका कायच्याकाय गंडली आहे. स्पृहा नाय आवडली बुवा.. उ.का चांगला आहे. मुक्ता बर्वेपण चालली असती इथं.. पण मग घनाला राग आला असता ना, त्याला का नाही घेतला म्हणून.. आणि त्याने आयटीनंतर वकिली पेशाची वाट लावली असती... इथे त्याला खरखरं काम करावं लागलं असतं, नुसतं लॅपटॉप उघडून बसलेलं चाललं नसतं. मग काय केलं असतं बिचा-याने? Uhoh

३५ मिस्ड कॉल्स वगैरे काय?? अतीच! आणि बालिका चारच महिन्यांनी घरी गेली होती ना, मग असे वर्षानुवर्षांनी भेटल्यासारखे काय लाडात आलेवते सगळे? मोठे बाबा म्हणजे फारच कुणीतरी दरारायुक्त ज्येष्ठ नागरीक असतील असं चित्र उभं केलं होतं, पण फुस्स झालं! अगदी साधीशी एण्ट्रीसुद्धा पुरेशी झाली असती त्यांच्यासाठी, शुभांगी गोखलेंसाठी होती तशी. बोssssssरिंग होता कालचा एपिसोड! खेळकरपणात आणि पोरकटपणात काही फरक असतो का नाही...

पण उमेश कामतचा रोल, त्याच्या वाट्याला आलेले संवाद आणि त्याचा अभिनय - हे सगळं मात्र मस्तच जमून आलंय. केव्हातरी डोकावतील अशा शुभांगी गोखले, त्यांचा आणि उमेशचा सीन छानच होता आणि आता डॉ. मोहन आगाशे... पण एवढ्या भांडवलावर अख्खी मालिका बघत राहणे अशक्य आहे!!!

आणि घरी ही येणार म्हणून सगळे लपून बसणार, अशी इतकी गोडगिट्ट एकी कोणत्या कुटुंबात असते म्हणते मी? Angry Uhoh

आगावा तुझ्या पोस्टला अनुमोदन.... एक न एक शब्द पटला.

एलतिगोतली स्पृहा पाहून मला उगिचच पुलंच्या नारायण मधली ती जादा शहाणी आठवते... मोठी झाल्यावर अशीच वागेल असा एक विचार तरळून जातो डोक्यात.
चेहर्‍यावरचे भाव कायम उर्मट Uhoh

मला एक कळत नाही विनोदनिर्मिती साठी मालिकांमधुन नेहमी विसरभोळे लोकच का दाखवतात? दुसर्‍या काही सवयी नाहित का ज्याने विनोदनिर्मिती होईल>>>+१

आणि त्याला वर्क फ्रॉम होम पण नसतं करता आलं >>>> आय ऑब्जेक्ट ! ही केस हरला की मग केपीओ जॉईन करून वफ्रॉहो करू शकतोच की Proud

यात स्पृहाच्या घरातली जी छोटी मुलगी दाखवलीये, ती ओळखली का? मराठी पाऊल पडते पुढे मधली श्रुती निगडे आहे. गुणी मुलगी आहे. कसलं पाठांतर आहे तिचं!!! Happy

आणि उकाच्या घरी आलेल्या जोडीतली ती मुलगी-धनश्रीची भुमिका करणारी-कुठल्यातरी मालिकेत हिरवीणीची मैत्रीण होती. कुठल्या बरं? Uhoh

येस्स्स्स!!! धन्स अंजली.. Happy कितीतरी वेळ आठवायचा प्रयत्न केला मी.. पण नाहीच आठवलं.. किती मस्त भूमिका होती तिची आणि कामही किती सही केलं होतं तिने.. खुप आवडलं होतं मला.. Happy असंभव, गुंतता.. सारखे वेगळे छान सस्पेन्स टाईपचे टॉपिक्स घेऊन मालिका यायला हवी आता पुन्हा.. त्याच त्या टिपीकल विषयांचा कंटाळा आलाय..

उमेश कामतसाठी बघावी असे वाटते पण मी नाही बघत, बाकी वैताग आहे.
गुंतता...मधली गौरी असेल तर ती चांगले काम करेल, गुणी आहे ती.

श्रुति निगडे इंडीयाज बेस्ट ड्रामेबाज मधे हिती, क्युट एकदम :).
सिरियल पहायची शक्यता नाही स्पृहा अज्जिबात आवडत नसल्यामुळे , फार डोक्यात जाते तिची ओव्हरअ‍ॅक्टींग !

खरं आहे! किती ओव्हर आणि लाउड करत आहेत सगळंच! माझे patience संपत चालले आहेत! आणि सगळे चांगलं काम करणारे कलाकार असून इतकी वाट कशी लावू शकतात?! कमाल आहे! त्यातल्या त्यात उ.का. च मस्त काम करतोय!
कोणी subtle काही बनवतच नाही का आजकाल? झोका किती गोड आणि सटल लव्हस्टोरी होती!

स्पृहाबद्दल +१.
झोका खरे म्हणजे अजून हवी होती, माधवराव गेल्यानंतरपण रमाबाईंनी बरेच काम केले ते विस्ताराने न दाखवता सिरीयल संपवली.

मला पण त्या स्पृहा मुळे नको वाटते हि मालिका बघायला. "उंच माझा .." मालिका चांगली होती. विक्रम ने काम छान केलं होतं. पण तिकडे सुद्धा मला नाहीच आवडली ती स्पृहा.
इकडे उमेश ला वाया घालवलं आहे. पहिले २ भाग पहिले, अतिशय बोर !

सगळीकडे फक्त एक्ष मुलगा आणि वाय मुलगी भेटतात प्रेमात पडतात काही अडचणींनंतर लग्न व मग सासुरवास. हाच एक टेंप्लेट आहे. त्यात तू मला वगैरे अशी फेक भावूक गाणी. काही एक पब्लिक ला आवडत असेल हे सारे बघायला. कालचा भाग केक कापायचा खायचा इत्यादी पाहिला. फारच बोअर. त्यात उका
घरात एक्टा आ णि नाचतो वगैरे पीळ आहे. मो ठे बाबा हे हिंदीतील बडे पापा चे भाषांतर वाट्ते पण फिट होत नाही

बंडल स्टोरी आणि फालतू अ‍ॅक्टिंग. त्यातून मुख्य पात्रे आणि मोआ सोडले तर बाकी कलाकारांच्या चेहर्‍याकडे बघवत नाही. कुठल्यातरी कास्टिंग एजंटकडून डिसकाऊंटवर मिळाल्यासारखे मठ्ठ चेहेर्‍याचे सहकलाकार भरलेत.

स्पृहाला टॉमबॉईश अ‍ॅक्टींग अजिबात जमलेली नाही!!कहिच्या काहि करते ती!! पुणेकर मुलीचं बेअरींग अजिबात घेता आलं नाहिये!!!पुणेकरांचा उद्ध्ट्पणा जन्म्जात असतो, असा ओढून ताणून आणलेला नसतो!!! Proud Light 1

शुक्रवारचा भाग बकवास .

ती २ लहान मुले आणि त्यांच्याबरोबर जी ताई होती , त्यांचे स्पृहा आपल्या खोलीत झोपावी म्हणून जे काही चाललं होतं ते अत्यंत बालिश आणि कृत्रिम दिसत होतं. वटवाघळाचं तेल ? Uhoh का ही ही ..
आणि ती जी ताई होती तिची ओव्हरअ‍ॅक्टिंग किती चालली होती . Angry

अगदी डोक्यात जाण्यासारखा प्रकार होता. आणि असं पर्समधून कोण तेलाची बाटली घेऊन फिरतं का ?

स्पृहाचे ड्रेसेस ईतके ढगळे ,भडक रंगाचे आणि नवशिक्या टेलर ने शिवल्यासारखे का दिलेत?
तिची उंची (आणि वाढलेली जाडी ) बघून तरी वेषभूषा ठरवायची Sad

मुक्ताच परफेक्ट शोभली असती.
उका बिचारा..... किती काळ तग धरणार मालिका त्याच्या जीवावर?

Pages