'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली.
आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!!
ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे.
सध्या मिळालेली माहिती:
कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
महत्वाचे:
इथे भांडत बसू नये.
स्पृहाला टिपिकल पुण्याच्या
स्पृहाला टिपिकल पुण्याच्या मुलीचे बेअरिंग घेणे जमलेले नाही!>>> मला वाटलं की पुण्याची दाखवण्यासाठीच अशी उध्ध्टासारखी बोलतेय की काय?
कृपया मी मालिकेला यक्क केलेले
कृपया मी मालिकेला यक्क केलेले नाही, मी स्पृहाला यक्क केलेले आहे. त्यातही स्पृहा होती म्हणून ती कधी पाहिली नाही. एलतिगो पाहिली जातेय कारण काम करता करता एकिकडे टिव्ही सुरू असतो. शिवाय इथे ही काही लिहायला मिळते
मी स्पृहाला यक्क केलेले
मी स्पृहाला यक्क केलेले आहे.>>> जुबान को लगाम दो
एखादा अभिनेता / अभिनेत्री
एखादा अभिनेता / अभिनेत्री आवडत नाही म्हणुन चांगल्या सिरियल / चित्रपटच न पहाणे किंवा आवडता आहे म्हणुनच कसेही टुकार चित्रपट / सिरियल पहाणे मला विचित्र वाटते. उदा. शाहरुख आहे म्हणुन तो चित्रपट बघणार नाही. आमीर आहे म्हणजे चित्रपट चांगलाच असणार वै. हेमावैम
बॅक टू सिरियल .. हिला आपण एका
बॅक टू सिरियल .. हिला आपण एका लग्नाची तिसरीच गोष्ट अस म्हणुया का?
एखादा अभिनेता / अभिनेत्री
एखादा अभिनेता / अभिनेत्री आवडत नाही म्हणुन चांगल्या सिरियल / चित्रपटच न पहाणे किंवा आवडता आहे म्हणुनच कसेही टुकार चित्रपट / सिरियल पहाणे मला विचित्र वाटते. उदा. शाहरुख आहे म्हणुन तो चित्रपट बघणार नाही. आमीर आहे म्हणजे चित्रपट चांगलाच असणार वै. हेमावैम>>++१११
या धर्तीवर तुम्ही प्रत्येक
या धर्तीवर तुम्ही प्रत्येक चित्रपट, प्रत्येक मालिका पाहणार की काय ?
मी स्पृहाला यक्क केलेले आहे.
मी स्पृहाला यक्क केलेले आहे. >>> हे काय नवीनच आता?? घूमजाव???
सानी मला पण पहिल्यांदी
सानी मला पण पहिल्यांदी वाचल्या वाचल्या मालिकेलाच यक्क केले अस वाटल होत
हिला आपण एका लग्नाची तिसरीच
हिला आपण एका लग्नाची तिसरीच गोष्ट अस म्हणुया का? >> आनंदी ते अजून नक्की व्हायचंय. इट इज टू अर्ली टू से एनिथिंग अॅट लिस्ट अबाऊट द स्टोरी.. अभिनयाचा आनंद आहे. निदान स्पृहाच्या तरी.
झक्या स्पृहा इतकी आवडते तुला?
झक्या स्पृहा इतकी आवडते तुला?
मला कळली रे लोक्स इष्टोरी..
मला कळली रे लोक्स इष्टोरी.. धन्स टू जान्हवी.. आता कशी खुलवतात ते पहायचं, बास..
स्पृहा डोक्यात जाते. पण उमेश
स्पृहा डोक्यात जाते. पण उमेश कामत साठी बघणार.:स्मित:
हळूहळू मालिकेत रंग भरतील अशी आशा आहे.
मला आवडतिये....कितीही झाल तरी
मला आवडतिये....कितीही झाल तरी स्वप्नील-मुक्ताची सर या दोघांना नाही येणार...पण हा ही एक नवा फ्लेवर आहे.... उमेश-स्पृहाचा!!
बाकी एका लग्नाची दुसरी गोष्टची आठवण येते आणि मग हि मालिका छान वाटते !! रिफ्रेशिंग!!! निदान झी मराठीच्या इतर मालिकांपेक्षा बरीच बरी आहे ही!!!
स्पृहा कधी कधी चकणी बघते असे
स्पृहा कधी कधी चकणी बघते असे मला वाटते. अजून कोणाला वाटते का? की मलाच तसे वाटते. उमेशचे काम आवडले मला. तो नैसर्गिक अभिनय करतो, स्पृहाने नाही चांगले काम केले (वै.मत).
स्पृहा कितीही आव आणीत असली
स्पृहा कितीही आव आणीत असली तरीही ती बालिश वाटते उमेश समोर . तो खूप प्रगल्भ अभिनेता आहे त्याने पुन्हा एकदा सिध्द केलं .
उंच माझा झोका मध्ये मला
उंच माझा झोका मध्ये मला स्पृहा खुप आवडली होती, एलदुगोपेक्षासुद्धा.. पण कॅरेक्टरचं बेअरिंग नीट घ्यायला, त्यात अॅडजस्ट व्हायला, तिला वेळ लागतो बहुतेक.. उंमाझोतसुद्धा सुरुवातीला ती फार अवघडल्यासारखं काम करत होती. नंतर नंतर छान रुळली त्या रोलमध्ये.. इथेही तसंच व्हावं, ही अपेक्षा.. पण तिच्यासारख्या गोड दिसणार्या आणि अभिनय करणार्या व्यक्तीसाठी हा असला उद्धट रोल चुकीचा वाटतोय, तिला बहुतेक असं काम जमत नसावं.. तिचा स्थायीभाव नाहीये तो.. निवड चुकलीये तिची. मुक्ता फिट बसली असती या रोलमध्ये.. पण उकाची पेयर म्हणून मुक्ताचा विचार करता येत नाहीये..
असो, पाहूया, पुढे ती ह्या रोलमध्ये कशी फिट होतेय ते..
बाकी, ते दोन वकील फार ओढूनताणून विनोद करत होते आणि वकीलाच्या व्यवसायात स्मृतीभ्रंशाचा आजार म्हणजे कसंकाय निभावत असणार हा? असा प्रश्न पडला... एकही नाव ज्याला धड आठवत नाही, तो केसस्टडी कशी करणार?
पण उकाची पेयर म्हणून मुक्ताचा
पण उकाची पेयर म्हणून मुक्ताचा विचार करता येत नाहीये.. >>
सानी , उका आणि मुक्ता 'लग्न पहावे करून ' मध्ये आहेतच की.
मुक्ता अॅग्रेसीव्ह रोल मध्ये शोभते खरंतर.
आणि त्या २ वकिलाबद्दच्या कमेंट ला अनुमोदन. विनोद ओढुन ताणून केला की अगदी केविलवाणा प्रकार होतो.
स्पृहाचं कॅरेक्टरच गंडलय
स्पृहाचं कॅरेक्टरच गंडलय
जयेश गुरूजी....सन्देश
जयेश गुरूजी....सन्देश कुलकर्णी..गावाकडची बोली छान जमलीय !
धनश्री ...GHH मधली गौरी.... पहिल्या प्रवेशात तरी छाप नाही पडली.
स्पृहाला सेट व्हायला वेळ लागतोय..
उमेश मात्र मस्तच !
(डॉ.मोहन आगाशेंच्या शेजारी डॉ सतीश देसाई, पुणे यांच्यासारखं दिसणारे गृहस्थ कोण आहेत?)
उका आणि मुक्ता 'लग्न पहावे
उका आणि मुक्ता 'लग्न पहावे करून ' मध्ये आहेतच की>>> हो का माशा? नाही पाहिलं मी... कशी वाटली त्यांची पेयर?
सानी , मीही नाही बघितला 'लग्न
सानी , मीही नाही बघितला 'लग्न पहावे करून ' , पण सिनेमा चांगला आहे असं ऐकलं.
लग्न पहावे करून मध्ये ते दोघे
लग्न पहावे करून मध्ये ते दोघे खूप एकमेकांना शोभून दिसतात . खरे मुक्तालाचा घ्यायला हवे होते .
वकीलाच्या व्यवसायात
वकीलाच्या व्यवसायात स्मृतीभ्रंशाचा आजार म्हणजे कसंकाय निभावत असणार हा? असा प्रश्न पडला... एकही नाव ज्याला धड आठवत नाही, तो केसस्टडी कशी करणार? >> + १०००००
<<स्पृहाचं कॅरेक्टरच गंडलय>>
<<स्पृहाचं कॅरेक्टरच गंडलय>> +१११११११
पहिला एपिसोड काल पाहिला......
स्पृहाच्या अभिनयक्षमतेबद्दल फार माहिती नाही मला पण या मालिकेत तिला नक्की कसे दाखवायचे आहे याबाबत बराच गोंधळ उडालेला दिसतोय. कॅरॅक्टरच जर असे बंडल लिहिले गेले तर स्पृहा तरी बिचारी काय करणार त्याला?
विनोद ओढुन ताणून केला की अगदी
विनोद ओढुन ताणून केला की अगदी केविलवाणा प्रकार होतो.>>> +१
झक्या स्पृहा इतकी आवडते तुला?>> थांब आता भुन्ग्याला पण बोलवतो.
ए ल दु गो मध्ये मला स्पृहाच कॅरेक्टर लैच आवडलेलं.
कॅरॅक्टरच जर असे बंडल लिहिले
कॅरॅक्टरच जर असे बंडल लिहिले गेले तर स्पृहा तरी बिचारी काय करणार त्याला?>>> +१००१.
हलकंफुलकं, लाईट हार्टेड आणि
हलकंफुलकं, लाईट हार्टेड आणि उथळ- बालीश यातली सीमारेषा 'इंडीअन मॅजिक आय'च्या टीमलाच कळत नाही असे आता वाटू लागले आहे.
पुन्हा रिअॅलीटीच्या नावाखाली प्रत्येक व्यवसायाचे कायच्याकाय कॅरिकेचर करुन ठेवतात ते आहेच- आर्कीटेक्चर, आयटी आणि आता वकीली.
काल त्या हिरवीणीच्या घरातली खंडीभर माणसे पाहिल्यावर मला सिनेमातील महाफॅमिलीज आठवल्या- तोच चिकट गोडवा, तेच ओशट संवाद; प्रत्येक पात्र चकचकीत कटआउट्सारखे-टू डायमेन्शनल, नो डेप्थ!
अजून मालिका पाहिली नाही, हे
अजून मालिका पाहिली नाही, हे बरेच झाले. शुभांगी गोखले बर्याच काळाने मराठी मालिकेत दिसताहेत म्हणून उत्सुकता आहे.
वकीलाच्या व्यवसायात
वकीलाच्या व्यवसायात स्मृतीभ्रंशाचा आजार म्हणजे कसंकाय निभावत असणार हा? असा प्रश्न पडला... एकही नाव ज्याला धड आठवत नाही, तो केसस्टडी कशी करणार?>>>> मला एक कळत नाही विनोदनिर्मिती साठी मालिकांमधुन नेहमी विसरभोळे लोकच का दाखवतात? दुसर्या काही सवयी नाहित का ज्याने विनोदनिर्मिती होईल. सामवर लागणार्या पुणेरी मिसळमध्ये किशोरी अंबियेच पात्र दोन म्हणी एकत्र करुन टाकत असते अस दाखवल होत.बाकी मालिका अगदीच भंगार आहे/होती(सध्याच स्टेटस माहीत नाहीये या मालिकेच म्हणुन हे अस) पण दोन म्हणी एकत्र करुन टाकण्याच किशोरी अंबियेच टायमिंग एकदम भारी.
Pages