एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'सुटलो' एकदाचा.... आता त्या गोखल्यांचं पण एकदा गंगेत न्हाऊ घाला रे, म्हणजे बघावं लागणार नाही!

साड्या काय भयाण नेसल्या होत्या.. +१

तुझ्या मनात जो राग आहे, तो कधीनाकधी तरीमाझ्या नातीवर निघाला असता म्हणून मला त्याचा निचरा करने आवश्यक वाटले अशा अर्थाचा संवाद काल्च्या एपिसोडमधे होता. तो खूप छान लिहिला होता...+१

<< आता त्या गोखल्यांचं पण एकदा गंगेत न्हाऊ घाला रे, >> आयतं गोखले महिला मंडळ तीर्थयात्रेला गेलं होतं तेंव्हां नाहीं का हें सांगायचं ! Wink

काल संपली ना हि मालिका...

सेट मस्त होता ..

नुसता खर्चाच नाही तर एकंदरीत फुलांची सजावट आणि पडद्यांची रंगसंगती वगैरे आवडलीच.

पहीला/ दुसरा भाग आठवा.
ईशा त्यात टॉम बॉय, डॅशींग दाखवली असतांना मधल्या काही एपीसोडस मध्ये मुळूमुळू, मेंगळट दाखवलीय. ते मनाला पटत नव्हते.
एकूणच दगडापेक्षा वीट मऊ च्या चालीवर असे म्हणावे वाटते की इतर बिनडोक फापटपसार्‍यात हीच मालीका चांगली होती.
उमेश एकदम मस्त.

मोहन आगाशेंसाठी पाहिली ही मालिका. शेवटचे दोन्ही भाग मस्त केले त्यांनी. मला शेवटी शिल्पा तुळसकरही + गौरी आवडली. ती ओमला म्हणते - तुझ्या बोलण्याने फरक पडतो, जा. ते फार्रच भारी वाटलं. आपण जवळच्या माणसांना किती कमी वेळा अशा ओळखून कॉम्प्लिमेंट्स देतो?!
साड्या टोटल ईस्टमन कलर. त्यातल्या त्यात शोभना आणि गौरी - वरमाया, सुंदर दिसत होत्या. सर्वात भयंकर मेकप ईशाचा. त्या फुलस्लीव्हज ब्लाऊजमुळे ती अजूनच बुटकी आणि जाड दिसत होती. लिपस्टीक एवढी लाल आणि जड/जाड लावली होती की ओठ खाली पडतील असे वाटत होते.
तो वेटर पण आला होता लग्नाला. मस्त, Lol

- तुझ्या बोलण्याने फरक पडतो. आपण जवळच्या माणसांना किती कमी वेळा अशा ओळखून कॉम्प्लिमेंट्स देतो?! >> देतात गं देतात.... फक्त ते कॉम्प्लिमेंट्स असतात की टोमणे Lol

उमेश कामत, मोहन जोशी, शुभांगी गोखले यांनी फारच मस्त अभिनय केला.

दोन्ही वकिल, कामत आजोबा, मधु ही कॅरेक्टर्स मात्र डोक्यात गेली. अधुनमधुन इशाही. इशाच्या माहेरचे ते कार्टे मात्र सही होते.

सर्वात भारी म्हणजे मोठे बाबा. Happy

सुंदर शेवट केला मालिकेचा.

गौरीसारख्या बेगड्या आईला दिलेला भाव खूप खटकत होता. पण शेवटी तिच्या तोंडून तिची ओमच्या बाबतीतली चूक वदवून घेतली त्याने ती ठुसठुस थोडी कमी झाली.

सत्यजीतला 'आता तू एकटाच जग' असं ओम सांगतो मग तो लग्नात कसा हे नाही कळाले.

झालेली प्रतारणा आणि त्याने आलेला राग/दु:ख दाखवण्यात अलका झालेल्या नटीचा अभिनय खूपच कमी पडला. ती लुटुपुटुची रुसली आहे असेच वाटत होते.

पण ह्या लहानसाहान त्रुटी वगळता खूप समर्पक शेवट केला. आणि कसलाही फाफट्पसारा नव्हता.

सगळ्यात जास्त आवडले ते आई/वडील म्हणून शोभना/दत्ताभाऊ यांना दिला गेलेला पहिला मान. 'मानलेली नाती ही रक्ताच्या नात्यापेक्षा काकणभर सरसच असतात' हे जे सूत्र होते मालिकेचे ते त्याने छान अधोरेखीत झाले.

१४ ऑक्टोबर २०१३ ते १६ ऑगस्ट २०१४. अवघ्या दहा महिन्यात मालिका संपवल्यापध्दल संपुर्ण एएलतिगो टीमचे आभार.
उका आणि स्पृजो पहिल्यांदाच एकमेकांसोबत काम करत असल्याने सुरुवातीच्या काही भागांत दोघांचेही अवघडलेपण जाणवत होते. पण नंतर दोघांचे टयुनिंग जमल्यावर दोघांचाही अभिनय खुलला आणि मालिका बघायला छान वाटली.

सर्वांशी सहमत. मालिका छान संपली. मध्ये मध्ये बोअर करत होते. पण नीट संपवली. सगळं काही ओममुळे आणि ओमसाठी. विल मिस ओम Happy

साड्या मात्र भयंकर Sad स्पृहाला केवढा मोठा चान्स होता सुंदर दिसायचा. चमचम साडी आणि चीप दागिने घालून सगळी मजा घालवली. असो.

शेवटी सगळ्यांनी बाय बाय बाय बाय केले Happy

आजपासून सुरू होणारी मालिका बघणार ना? Wink

पौर्णिमा,
आजपासून सुरू होणारी मालिका बघणार ना?
या बाफवर हे विचारणारी तु पहिली. तेव्हा 'का रे दुरावा' मालिकेचा नवीन बाफ काढायची जबाबदारी तुझी!
बाकी… तुझ्या नविन बाफवर Happy

Pages