'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली.
आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!!
ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे.
सध्या मिळालेली माहिती:
कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
महत्वाचे:
इथे भांडत बसू नये.
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=vA69fcPpoZk
अनिता दाते ला आज कांदे पोहे
अनिता दाते ला आज कांदे पोहे सिनेमात बघितलं आणि राधीला पण .स्पृहा मला पण आवडत नाहीये
आजोबांचं पत्र मला नाही आवडलं
आजोबांचं पत्र मला नाही आवडलं
एक एक ओळ म्हणून चांगलं होतं पण बरचंस विस्कळीत वाटलं
पुन्हा एकदा, उका खूऊऊऊऊऊऊऊऊऊउपच गोड आहे.
परवा वेटरसोबतच्या प्रसंगामध्ये त्याचा अभिनय आवडला मला.
मस्तय तो
रिया सेम पिंच उगिच वेळ जात
रिया सेम पिंच उगिच वेळ जात नसल्यासारखं पत्र होतं उगिच गोड गिट्ट, भारावून गेल्यासारखं वागते त्या स्पृहाची फॅमिली. इतके घट्ट बंध उगिचच कोणत्याही कुटूंबात नसतात. काहीही दाखवतात.
आणि सिरियल काय आणि सिनेमा काय दोन्हीत दोन टोकं अगदी. एकाचं घर गोकुळ एक अत्यंत एकटा म्हणजे ठार एकटा. एक अतिशय श्रीमंत, दुसरा गरिब असलाच पाहिजे.
फॅमेली बंध असतात गं पण ते
फॅमेली बंध असतात गं
पण ते उगाच दर वेळेला एका एका क्षणाला ते बंध कुठलीच फॅमेली दाखवत बसत नाही.
ठिकेय म्हणजे ते दोघं प्रेमात वगैरे पडले. म्हणून लगेच पत्रं बित्रं?
त्यांच्या कुटुंबात या आधी कोणी प्रेमात पडलं नव्हतं का?
त्या स्पृहाचा हात दुखावलाय तर
त्या स्पृहाचा हात दुखावलाय तर रांग लावून प्रत्येकजण एकच प्रश्न विचारतो
आणि ती पण माठ, फॅमिलीला ओळखत नाही का? एकच मिटिंग बोलवून एकदाच सांगून टाकायचं ते नाही.. अर्थात अशाने सिरियल झट झट संपेल ना.
हे लिहायचं विसरलेले मी हो
हे लिहायचं विसरलेले मी
हो ना!
पत्र लिहिण्याचा छंद असलेली
पत्र लिहिण्याचा छंद असलेली काही लोक असतात, आजोबाना पण आहे. म्हणून ते नातीला पत्र लिहितात.
नंदिनी, तसं असतं तर या आधी
नंदिनी, तसं असतं तर या आधी बरेच पत्र किंवा किमान उल्लेख तरी आले असते मालिकेत.
असो पत्र लिहिलं हा मुद्दा नाहीये. ते काही खास नव्हतं हा मुद्दा आहे
मला खुप दिवसांपासुन पडलेला एक
मला खुप दिवसांपासुन पडलेला एक प्रश्नः
त्या वरच्या फोटोत (पक्षी: रोज एलतिगोचं जे टायटल दाखवतात फोटोत दाखवल्याप्रमाणे) त्यात मोहन जोशी का नाहीये? काही खास कारण असेल का?
करेक्ट पियु, तो शेजारचा
करेक्ट पियु, तो शेजारचा म्हातारा कशाला आहे? त्यापेक्षा मोहन जोशी हवे होते.
तो शेजारचा म्हातारा कशाला
तो शेजारचा म्हातारा कशाला आहे? त्यापेक्षा मोहन जोशी हवे होते.>>>+१११
आजी पण नहियेत फोटोत.
आजी पण नहियेत फोटोत.
कालच्या भागात सर्वात आवडलेली
कालच्या भागात सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे,
"पुण्याहून मुंबईला येतांना वाटेत लोणावळा लागणारच ना!!!"
आणि,
"मुलगी शिकली, प्रगती झाली!!!"
अजिबात न आवडलेली गोष्ट,
"उंदिर, उंदिर, ......उंदिर उंदिर, उंदिर.............."
ईईईईईईईई!!!!!!!!!!!!!!सगळ्या रोमँटीक मूड्चा पार कचरा!!!!
"पुण्याहून मुंबईला येतांना
"पुण्याहून मुंबईला येतांना वाटेत लोणावळा लागणारच ना!!!"<<< हे क्लास वाक्य होतं.
मागे अज्जी हरवल्या होत्या त्या एपिसोडपासूनच नवरा "हा म्हातारा बघ शुभा खोटेवर लाईन मारतो" म्हणत होता. काल त्याचा अंदाज अचूक ठरला.
रोचीन +१ उका खुSS प गोड्डं
रोचीन +१
उका खुSS प गोड्डं आहे..
नंदिनी, ती तर लै जुनी गोष्ट
नंदिनी, ती तर लै जुनी गोष्ट आहे अग
लोणावळा क्लास
लग्न आणि सारवासारव बोअर... जशीच्या तशी सरेझुमबो मधुन उचलली आहे
उका खरचं खुप गोsssड आहे
कालच्या भागात सर्वात आवडलेली
कालच्या भागात सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे,
"पुण्याहून मुंबईला येतांना वाटेत लोणावळा लागणारच ना!!!"
आणि,
"मुलगी शिकली, प्रगती झाली!!!" फिदीफिदी>>>> अगदी अगदी!
उका हिरव्याजर्द झब्ब्यात किती गोऽऽड दिसत होता
स्पृहा आणि स्पृहाची फॅमिली
स्पृहा आणि स्पृहाची फॅमिली जामच बोर आहे. मोहन आगाशे काम हातखंडा करतात पण त्यांच्या त्या टिपिकल भूमिका आता कंटाळा आणतात. उमेश कामत खरंच फार गोड काम करतो.
स्पृहा आणि स्पृहाची फॅमिली
स्पृहा आणि स्पृहाची फॅमिली जामच बोर आहे. >> मोहन अगाशे आणि बाकी दोन ते छोटे कलाकार सोडले तर बाकी सगळ्यांचा अभिनय नाटकी आहे अत्यंत
ती स्पृहाची आई काय अशी डोळे,
ती स्पृहाची आई काय अशी डोळे, भुवया विस्फारुन बोलत असते
मुलांपैकी तो मुलगा मस्त करतो काम.
लग्न आणि सारवासारव बोअर...
लग्न आणि सारवासारव बोअर... जशीच्या तशी सरेझुमबो मधुन उचलली आहे<< जिथे पूर्ण कथाच त्यावर आधारित आहेत तिथे "उचलली आहे" काये? व्यवस्थित परवानगी वगौरे घेऊन याचे मराठीकरण केलेले आहे.
कालच्या भागात सर्वात आवडलेली
कालच्या भागात सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे,
"पुण्याहून मुंबईला येतांना वाटेत लोणावळा लागणारच ना!!!"
आणि,
"मुलगी शिकली, प्रगती झाली!!!"
>> खरंच मस्त वाटलं.. आणी त्या प्रसंगात उका.. हाय्य्य्य्य्य्य !!!
मला क्षणभर हेवा वाटला स्पृहाचा..
हो का नंदिनी? मला नव्हतं
हो का नंदिनी?
मला नव्हतं माहीत की त्यांनी फक्त मराठीकरण केलय ते ही परवानगी घेऊन.
मला वाटलेलं की फक्त कल्पना तिथुन घेतलीये.
जर मराठीकरण केलं असतं तर सगळंच तसच्या तसं असतं....
(म्हणजे एकजण डोंबारी, एक चोर, एक बालब्रह्मचारी, एक नाचणारी असं)
पण तसं नाहीये या कथेत... त्यामुळे मला वाटलेलं फक्त कल्पना त्या मालिकेतली आहे बाकी कथा, घटना सगळं वेगळं असेल.
>>उका हिरव्याजर्द झब्ब्यात
>>उका हिरव्याजर्द झब्ब्यात किती गोऽऽड दिसत होता
+१००
उका नेहेमीच गोड दिसतो.
कथा बेकार असली तरी बघायला मजा येतिये. कालचा लग्नाचा प्रसंग तर अगदी धमाल होता. ती हिंदी सिरिअल मी बघितली नसल्याने पुढे काय होणार हे माहिती नसते. ते माहिती असते तर इतकी मजा आली नसती.
थोडंफार बदलून, थोडंफार तसंच
थोडंफार बदलून, थोडंफार तसंच ठेवून केलेलें आहे ते.
अप्रतिम मालिका ए.ल.ति ग़ो मला
अप्रतिम मालिका ए.ल.ति ग़ो
मला मुळात स्वप्नील कुलकर्णी चा अभिनय आवडत नाही म्हणून दुसरी गोष्ट पाहणे टाळले !!
स्वप्नील कुलकर्णी चा अभिनय
स्वप्नील कुलकर्णी चा अभिनय आवडत नाही म्हणून दुसरी गोष्ट पाहणे टाळले !!>>>> स्वप्नील जोशी म्हणायचेय का तुम्हांला?
मी एलतिगो फक्त फक्त आणि फक्त
मी एलतिगो फक्त फक्त आणि फक्त उका साठी बघते!!!! आणि माझा नवरा उकावर जळतो
२४ सुद्धा नीट परवानगी घेऊन
२४ सुद्धा नीट परवानगी घेऊन केलेली असली तरी त्यातही काही बदल केलेले आहेतच की..
Pages