एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आला आला, इथेही गोडाचा शिरा.. >> सध्या पेटंट आहे वाटतं झी कडे शिर्‍याचं>> अरे एकच शिरा सगळ्या सेट वर फिरत असेल. यु नो कॉस्ट कटीन्ग, रिसेशन वै वै. Happy

घर ओमचंच आहे. स्वयंपाक धना आणि मावशी करतात. बाकी लोक अधूनमधून सामान आणताना दाखवलेत. दक्षे, तू कुठेही लॉजिक शोधतेस! त्यापेक्षा लव्ह स्टॉरी बघ, कशी गोड चाल्लीये, उका किती गोड दिसतो, पार्श्वसंगीत किती गोड आहे Proud Happy
कालचा भाग कोणी पाहिला का? गाडीच्या आरशाचा फारच भारी उपयोग केला होता. संदेशला मानलं.

उका किती गोड दिसतो. कालचा भाग कोणी पाहिला का? गाडीच्या आरशाचा फारच भारी उपयोग केला होता. संदेशला मानलं.>>>>>>> +१११ उका खरच खुप गोड Happy

स्पृहा एकदम टाकूवू कपडे घालते.
कशीतरीच दिसते... जाडी, बुटकी...(खूपच बुटकी आहे वाटतं.. ५"१'वगैरे०)

मराठी कुटुंबात काय सारखे शिरे , पोहेच खातात हा समज व्हायचा लोकांचा..
बरं, शिरा असा टाकते( हो टाकतेच) की जेवण जेवतायेत...
एका ताटलीत बचाकभर शिरा... वाळूच्या ढिगासारखा... त्याच्याआधीच पोहे खावून झालेले..... काहीही

कालचा भाग कोणी पाहिला का? गाडीच्या आरशाचा फारच भारी उपयोग केला होता. संदेशला मानलं.>> मी पाहिला. खूप गोड झाला होता तो सीन. उमेश कामत अगदी म्हणजे अगदीच रोमॅण्टिक वाटतो. ते "बाय बाय" पण मस्त चालू होतं.

एकंदरीत सीरीयल गोड्मिट्ट असल्याने आम्हाल बघायला आवडते आहे. कटकारस्थानं वगैरेला अजिबात स्कोप नाही.

एकंदरीत सीरीयल गोड्मिट्ट असल्याने आम्हाल बघायला आवडते आहे. कटकारस्थानं वगैरेला अजिबात स्कोप नाही. >> +१

शिरा असा टाकते( हो टाकतेच) की जेवण जेवतायेत...
>> काल बहुतेक चक्क भातवाढीने वाढत होती शिरा.. की मला भास झाला? Uhoh

ती कांदेपोह्याच्या प्लेट मधल्या मिरची सारखी मध्ये मध्ये येते Uhoh
उका कित्ती गोडेय Blush
काश मी ती प्रिया असते Proud

आम्ही स्पृहाकडे बघतच नै!!!! >>> Lol
आमच्याकडे पण अगदी खुदूखुदू हसत खूप आवडीने एन्जॉय करत ही सिरीयल पाहिली जातेय! तो शिर्‍याचा भाग पाहून रविवारी, "आई, आज ब्रेक्फास्टला शीरा...." असे फर्मान निघाले! Happy झोपायला आपापल्या रूम मधे जातांना तो "बाय बाय, बाय बाय, आता फायनल बाय! " चा सीन रोज होतोय!
बाकी, खरंच तो शीरा अगदी प्लेटभर आणि चक्क भातवाढीने वाढला.
शेवटी, उका खरंच खूऊऊऊऊप गोड!! Happy

पियु, तो भास नव्हता, मी माझ्या नवर्‍याला तेच म्हटल, एक तर भातवाढीने वाढतेय आणि किती वाढतेय.

अरे वा! बर्‍याच जणी पाहतात की ही सिरियल. आणि आवडतदेखील आहे. मग हा धागा इतका आळशी का? सहा सास्वा नसल्यामुळे का? Wink Light 1

लिहित जा इथे- काय आवडले आणि काय नाही ते. आणि त्या ही शिवाय, 'उका गोऽड आहे' - हे वाक्य तर मी रोज लिहू शकेन Proud

पूनम, मी अगदी नुकताच म्हणजे तो रेस्टॉरंटमधे तिला प्रपोज करतो त्या सीनपासून पहायला लागले. उमेश काम त प्रच्म्ड आवडला त्या भागाम्धे, म्हणून बघितला, पण पुढच्या भागात पण मोहन जोशींचं "माझी उंदरं वाट बघतायत" अफाट होतं.

कालच्या एपिसोडमध्ये,

घरातून आज्जी, धना आणि गुरुजी निघून गेल्यावर ओमला सर्वात जास्त काळजी वाटते ती आज्जीची.....संभाव्य अश्या सगळ्या ठिकाणी ओम तिला शोधून येतो. काका आणि दत्ताराम सुद्धा जोडप्याला शोधायला बाहेर पडतात. शेवटी रेल्वे स्टेशन वर ते जोडपं सापडतं. आणि जेव्हा गुरुजीला कळत तसं तोही आज्जीला शोधायला बाहेर पडतो. देवळात चौकशी केल्यावर त्याला समाजात कि आज्जी एक इस्पितळात आहेत. मग ओम आणि गुरुजी तिथून तिला घेऊन घरी येतात
.
ओम घरच्यांची म्हणजे मानलेल्या घराच्या लोकांची माफी मागतो आणि ते त्याला माफसुद्धा करतात. रक्ताच्या नात्यापेक्षा मनानी जोडलेली नाती त्यांना जवळची वाटू लागली आहेत असं सगळ्यांच्याच बोलण्यातून व्यक्त होत होत. ओमने केलेले पोहे खात गप्पागोष्टी करत असतानाच तिथे ईशा येते आणि सगळ्यांची दातखीळ बसते.
आज्जी सोडून बाकी सगळे कारण देऊन निघून जातात.

राहिला बिचारा ओम.....ईशा त्याच्यावर प्रश्नांचा वर्षाव करते. 'तो त्याच्या सासरहून न सांगता का निघून आला' पासून ते 'तो बेडखाली का झोपतो इति.....
ओम तिला घरच्यांबद्दल खर सांगायचा प्रयत्न करतो पण नेहमीप्रमाणे ईशा त्याला झापते आणि गप्प करते.
पण ओम एक मात्र तीच्या कडून कबुल करून घेतो कि जे तो सांगतोय ते ती च महत्वाच मानत नाहीये. तेव्हड्यात तिकडे 'ओम्ब्या'ची बहिण येते....शोभना मावशीन दिलेला शिरा दोघांना देत 'आई'न पाठवला आहे अस
सांगते.
बाहेर पडल्यावर ओम आणि ईशा दोघांना चिडवण्याची मजा मात्र एकही जण सोडत नाही. त्याचं आरशातून तिला पाहत राहाण, गाडीला चावी लावायला विसरणं, दोघांच लाजण....ह्या गोष्टींमुळे घरचे दोघांना पोटभर चिडवून घेतात. दोघांचे लाजून चेहरे लाल झालेले असतात.

दुसऱ्या दिवसी इशाच तर ऋषीमुनींत रुपांतर झालेलं असत. पहाटे उठून ती प्राणायाम करत असते आणि आशूला मोठ्ठ ज्ञानामृत सुद्धा पाजत असते. 'ओम'काराची प्रचीती....दुसर काय!!!

ईशा तिच्या आजोबांना फोनवर ओमच्या घरच्यांबद्दल पसंती कळवते आणि सांगते कि ओमला त्याच्या परिवाराबद्दल कसला तरी कॉम्प्लेक्स आहे.....आणि म्हणूनच तो त्यांची अट ऐकून तिथून निघून आला होता.

पौर्णिमा Happy
रीया, स्पृहाला 'मिरची' म्हणणे जरा अतिच हां.... फारतर कांदेपोह्याच्या प्लेटमधला खवट ढ्ब्बू शेंगदाणा म्हण!!
आमच्याकडे 'यमू' चे असेही वागणे-बोलणे खूप एन्जॉय केले जातेय..... हो, आमच्याकडे स्पृहाला अजून 'यमू'च म्हणतात! (आता ही 'यमू' कोण ते विचारू नका! Wink )

नो अपडेट्स प्लिज मधुरा Happy
बोअर होत जातं हळू हळू ते Happy
त्या दिवशीच्या भागातलं आजीच्या तोंडचं ते वाक्य "जे नात्यांची काळजी करतात ते खरे नातेवाईक " म्हणजे अफाट होतं!
खुप आवडलं मला ते वाक्य Happy

ओवी Happy
मिरचीच ग Sad
खुप पकवते ती !
आणि तिचे डायलॉग पण त्यानेच लिहिलेले असतात का जो सगळ्यांचे लिहितो?
इफ येस मग तिच्याच तोंडी विचित्र का वाटतात ते ?:अओ:

Proud यमू = रमाबाई = उंमाझो!! त्यातली ती लहान यमू माझ्या लेकाला खूप आवडायची! (अगदी त्याला तशीच बायको हवी होती!! Wink ) मग ती मोठी यमू = स्पृहा त्याने आवडून घेतली.... तर आता ती सध्या ओमची मैत्रीण आहे! Proud

रियू, मी नाही पाहिली गो उंमाझो.

नो अपडेट्स प्लिज मधुरा :)>> +१. कोणाला काही स्पेसिफिक हवं असेल तर विचारेल आणि बघणारे सांगतील.

ओवी Lol

रियू, मी नाही पाहिली गो उंमाझो.
>>>
अरेरे!
त्या एकट्यातच काय त्या स्पृहाने चांगलं काम केलेलं ... मिसलंस तू Happy

त्या एकट्यातच काय त्या स्पृहाने चांगलं काम केलेलं ... मिसलंस तू >>> + १००
खरंतर इथेही ती हळूहळू रुळेल असं वाटलं होतं...... आणि तो रोलच तसा आहे...... जरा लाडावलेली इ इ . पण मे बी उका पुढे फिकी ठरतेय ती.....

मला आवडते स्पृहा. इथेही आवडतेय.. किंवा तुम्हाला जितकी नकोशी झालीये तितकी नावडती नाहीये ती माझी Proud अजून तिला तिचा सूर सापडला नाहीये हे आहेच पण.
पण आपल्या ओमला आवडते ना, मग आपणही आवडून घेऊया तिला Wink

अरे! ओवी Happy सेम पिंच!

Pages