Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुद्दाम संभ्रम निर्माण
मुद्दाम संभ्रम निर्माण करतात्...फक्त टी आर पी साठी. गंभीरपणे घेउ नका.
एक लक्षात आले का कोणाच्या? ते दोघे समोरासमोर आले की ती उंच दिसते त्याच्यापुढे, म्हणून ती अशी खांद्यात जरा वाकते किंवा मग त्यांना एक उभे एक बसलेले असे तरी दाखवतात. माझी मुलगी म्हणते, समोरासमोर असताना तीच त्याची "तायडा" वाटते.
अवांतर्. हे डॅडा, तायडा, आय्डी, मोठे बाबा वगैरे प्रकरण भयाण डोक्यात जाते.
मामा कालच्या अपडेट्स बद्दल
मामा कालच्या अपडेट्स बद्दल धन्यवाद....कालचा भाग मिसला होता मी......
हश्श १० दिवसातले सगळे मिसलेले
हश्श १० दिवसातले सगळे मिसलेले भाग आधी वाचुन काढले. मालिका म्हणावी अशी काही पुढे सरकलेली नाहीये. आईआजी परत आली हे ऐकुन बर वाटल...बेबी आत्याचा राग आला आणि बाकीच्या सासवांच जास्त करुन शरयुच कौतुक वाटल आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे दिवाळीला आई आणि मामा बार्शीला गेलेले पाहुन परमानंद झाला.
हि बातमी जर खरी असेल तर छानच
हि बातमी जर खरी असेल तर छानच आहे,ही जोडी खरच मस्त दिसते.
They have wonderfull onscreen chemistry,offscreen will be even great!!
मला पण ती बातमी वाचून आश्चर्य
मला पण ती बातमी वाचून आश्चर्य वाटल
खरेच आहे हे का
सुमेधा प्यार उंची बिंची नही
सुमेधा प्यार उंची बिंची नही देखता
सुमेधा प्यार उंची बिंची नही
सुमेधा प्यार उंची बिंची नही देखता>>>>+१००००० उंची बिंची क्या कुछ भी नही देखता.........
बातमी आहे की या संदर्भात
बातमी आहे की या संदर्भात जोडीने मिळविलेल्या लोकप्रियतेचा टीआरपीसाठी लाभ करून घेण्याच्या उद्देश्याने झी स्टुडिओत शिजविलेले खास रसायन आहे, हे कळेलच लवकर.... तरीही वर एका प्रतिसादात जाई म्हणते तसे खरे असेल तर......तर मग मला खूप आनंद वाटेल. अर्थात या लोकांच्या खाजगी चौकटीत डोकावू नये असे म्हणतात, पण यांचे खरेच दोनाचे चार झाले म्हणजे घटनेचे स्वागत करावे असेच वाटेल.
ओ मामा खरे आहे का ते े मलाही
ओ मामा खरे आहे का ते े मलाही माहीत नाही
मी तो अंदाज व्यक्त केलाय
फ़क्त
बरोबर आहे मामा तुमचे....
बरोबर आहे मामा तुमचे....
कदाचित मालिकेच्या T R P साठी
कदाचित मालिकेच्या T R P साठी असेल पण काही महिन्यापूर्वीच राहुल डोंगरेबरोबर साखरपुडा झाल्याचे फोटो FBवर होते त्यामुळे ही बातमी खरी असेल तर मला पचवणं थोडे कठीण आहे.
काही कठिण नाही. काम करता करता
काही कठिण नाही. काम करता करता प्रेमात पडले असतील एकमेकांच्या..
अन्जू.... होय. आजही ते फ़ोटो
अन्जू.... होय. आजही ते फ़ोटो आहेत...पण तेथून आता तेजश्री गायब दिसत्ये. शिवाय राहुल डोंगरे यांच्या पेजवरूनदेखील ती लुप्त झाली आहे.....सहज त्यांचे पेज पाहिले तिथे तर एक नोंद दिसली : "..I know my heart will never be the same again... But I'm telling myself I'll be okay....." यातील भावना तेजश्रीच्याच बाबतीतील असेल तर मग ऐकीव बातमीत काहीतरी तथ्य दिसते....तरीही ही नोंद आहे ती ३ आक्टोबर २०१३. महिना झाला.
खरंच काही कळेनासं झालंय !
खरंच काही कळेनासं झालंय ! आनंद मानावा की वाईट झालं म्हणावं ?
मात्र जोडी अफलातून दिसतेय..:) MADE FOR EACH OTHER !:डोमा:
ticha lagna kharach modala
ticha lagna kharach modala aahe... tinech modlay aani te...
shree sobat chya batamicha mahit nahi.. pan ashi udaharana aahetch na.. padadyavarcha couple becomes a real life couple chi!
कित्ती बेक्कार आहे मग हे
कित्ती बेक्कार आहे मग हे
बिचारा राहुल
असं खेळू नये कोणाच्या मनाशी!
आय हेट हर देन
कित्ती बेक्कार आहे मग हे
कित्ती बेक्कार आहे मग हे अरेरे
बिचारा राहुल अरेरे
असं खेळू नये कोणाच्या मनाशी!
आय हेट हर देन >> don't judge her! का आणि खरेच हे लग्न मोडले हे अजुन कुठे माहितिये.
राहुल डोंगरे दिसतोय तरी
राहुल डोंगरे दिसतोय तरी चांगला. पण लग्न नक्की मोडलंय का ? त्याची कारणं आपल्याला काय माहित? असं बाहेरून कुणाला जज्ज करणं योग्य नाही असं मला वाटतं. शेवटी आपण फक्त सिरियल पुरते. त्यांच्या खाजगी आयुष्याशी आपल्याला काय करायचंय? त्यामुळे तिला सिरियल पुरते लाईक /डिसलाईक करा.. इतर कोणत्याही (ज्याच्याशी आपला काडीमात्र संबंध नाही अशा) कारणांमुळे तिच्याबद्दल मत निर्माण करणं हे आपल्यालाच त्रासदायक ठरू शकतं.
शिरेल जोवर गोड चाल्लिये तोवर मज्जा करा ना राव.
रिया +१ आणि परद्यावरची
रिया +१
आणि परद्यावरची जान्हवी जर रिअल मधे असेल तर ती ठरलेले लग्न मोडणार नाही अगदीच तसे असल्याशिवाय. आणि जर श्री साठी राहुल ला टांग तर अजुन तिसरा कोणी आला तर श्री ची पण असीच वाट लागणार का?
जौदे दक्षिणा म्हणते तेच खरं
जौदे दक्षिणा म्हणते तेच खरं
बुधवार दि.७ नोव्हेंबर २०१३ :
बुधवार दि.७ नोव्हेंबर २०१३ : अपडेट
~ दिवाळी दिवाळी आणि दिवाळीतील पाडवा, भाऊबीज हे उपप्रकार प्रत्येक घरातील. त्यामुळे जान्हवीच्या दृष्टीने सारेच महत्वाचे कारण तिची ही पहिली दिवाळी जी ती गोखल्यांकडे साजरी करीत आहे.... सूनबाई ह्या नात्याने. रात्री सासूबाई ह्या नव्या सुनेला "गोखले घराण्याच्या परंपरेनुसार सारे दागिने द्यायचे असतात" असे कौतुकाने सांगत तिच्या हाती दागिन्याचा डबा ठेवतात. जान्हवी लाजते आणि या प्रेमाने प्रभावितही होते. पाडव्या दिवशी अगदी नऊवारी नेसून, नथीसह दागदागिने लेवून ही नवनवरी नवर्याला मनःपूर्वक ओवाळीत आहे आणि तिन्ही सासवा, मावशी तो कार्यक्रम अगदी आत्मियतेने आणि प्रेमाने पाहात असताना बाजूला उभी असलेली बेबीआत्या जणूकाय जगबुडी जवळ आली आहे असा चेहरा करून फुरंगठून उभी आहे. तिला जान्हवी पसंत नाही हे ठीक; पण घरातील बाकीच्या स्त्रिया जान्हवीवर खूष आहेत हे पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकी गेली असल्याचे दिसते. पण आता तिच्याबाबतीतही जान्हवी काहीतरी हालचाल करेल अशी चिन्हे दिसतात.
"गोकुळ" मधील कार्यक्रम संपल्यानंतर श्री आणि जान्हवी दोघेही सहस्त्रबुद्धे यांच्या घरी सदाशिवरावांच्या पाया पडण्यासाठी येतात. तो भावुक असा कार्यक्रम होतो. पिंट्याही बहिणीला पाहून आनंदित होतो शिवाय सर्वांना चहाही करायला लागतो ते पाहून बहिणीला समाधान होते....चहा घेतानाच मनिषही तिथे येऊन सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. दरम्यान श्री आणि जान्हवी दोघेही वडिलांना "दिवाळी साजरी करण्यासाठी तुम्ही आमच्या घरी चला..." असे निमंत्रण देतात खरे, पण सदाशिवराव ते निग्रहाने नाकारतात, म्हणतात, "दिवाळी दिवशी जावयाने सासर्याच्या घरी यावे अशी परंपरा आहे....ती तुम्ही पाळावी....मला बोलाविले याबद्दल आभार...पण तुम्हीच इकडे येणे योग्य आहे...".
दुस-या दिवशी भाऊबीज आहे; पण जान्हवी आता काहीशी चिंतेत आहे कारण काल पाडव्याच्या निमित्ताने ती माहेरी आली होती आणि आज परत भाऊबीज आहे असे सांगून माहेरी जाण्याची परवानगी सासूबाईकडून घ्यायची याबद्दल तिच्या मनी संभ्रम निर्माण झाला आहे. श्री तिला धीर देवून "मी आईला सांगून तुला परवानगी द्यायला सांगतो..." असे म्हणताच जान्हवी उद्गारते, "नको श्री....मीच विचारते. अन्यथा आईंची समजूत होणार की ही नेहमी श्री ला पुढे करून आपल्या मनासारखे सारे करून घेत आहे..." यावर श्री देखील होकार देतो. दुसर्या दिवशी स्वयंपाकघरात जान्हवी तणावात भाजीपाला निवडीत असताना नर्मदाआई पाहतात आणि तिला सांगतात, "तुला भाऊबीजेसाठी घरी जायचे आहे ना ? जरूर जा. लग्न झालेल्या मुलीला अशा सणासमारंभाच्या दिवशी माहेरची आठवण येणे स्वाभाविक आहे....जा तू...." यावर आनंदाने जान्हवी तिथून निघते व माहेरी येते.
सायंकाळी श्री तिला आणायला बाहेर पडतानाच शरयू आणि सरस्वती मावशी त्याला अडवितात, म्हणतात, "तू जान्हवीच्या घरी चालला आहेस ना ? तर आम्हीही तिचे घर पाहिलेले नाही, तेव्हा आम्ही तुझ्याबरोबर येणार..." यावर श्री हसतहसत काही उत्तर देणार तोपर्यंत दोघीही बाहेर जाऊन त्याच्या कारमध्ये बसतातही.
उद्याच्या कार्यक्रमात या दोघींना आपल्या घरी पाहून जान्हवीला झालेला परमावधीचा आनंद दाखविला आहे.
आजच्या भागात पौर्णिमेचा चंद्र
आजच्या भागात पौर्णिमेचा चंद्र दाखवला। भाउबिजेला पौर्णिमेचा चंद्र ??
तेजश्री आणि राहुलचे लग्न
तेजश्री आणि राहुलचे लग्न मोडले आहे हे खरे आहे... मला मिळालेल्या माहितीनुसार तिच्या (होणा-या) सासरच्यांना तिचं काम करण पटत नव्हतं.. आणि श्री व जान्हवीची लोकप्रियता बघून बाकीचे लोक डोंगरेंकडच्या (तिच्या होणा-या सासरच्या) लोकांना प्रश्न विचारायचे की त्या दोघांचं (शशांक व तेजश्री) खरचं काही आहे का? त्यामुळे हे लग्न मोडले ( सासरच्यांनी स्वत:हून की त्यांच्या या प्रश्नामुळे किंवा संशयी स्वभावामुळे तेजश्रीने ते लग्न मोडलं हे माहीत नाही.)
दक्षिणा तुला १०० टक्के अनुमोदन.. आपण सीरियल पाहतो... त्यात गुंतवतो स्वत:ला ते ठीक... पण त्या कलाकारांच्या खासगी आयुष्यात ते पडद्यावर दिसतात तसेच ( गुडी गुडी, चांगले) असावेत असा नियम नाही, त्यामुळे तशी अपेक्षा करण चुकीचचं आहे. पडद्यावरचा आणि ख-या आयुष्यातला माणूस वेगळा असू शकतो... याची आपण तयारी ठेवावी... नाहीतर त्यांचे वैयक्तिक आयुष्यातलं रुप वेगळ दिसल्यावर आपला भ्रमनिरास होतो ते बरं नाही...
आणि शेवटी कोणाचही लग्न तुटण हे वाईटच आहे.. पण त्यामागचे खरे कारण माहीत नाही आपल्याला मग उगाच का तर्कवितर्क लावत बसावेत.. श्री - जान्हवी आवडतात तर त्यांना मालिकेत बघा, भरभरून प्रेम करा.. तेच महत्वाचं आहे. नाही का?
दक्षिणा +1
दक्षिणा +1
मालिकेत सध्या बर्यापैकी गोड
मालिकेत सध्या बर्यापैकी गोड गोड चालले आहे,(शशिकला+मामा नाहीत, पिंट्या लायनीवर येतोय,तीन सासवा काबीज, आईआजी खोलीत बंद, राहता राहिल्या बेबीआत्या आणि मोठी आई.) त्याचा लगेच कंटाळा आल्याने अभिनेत्रीच्या खाजगी आयुष्यातील बातम्यांची चटपटीत फोडणी का?
हल्ली श्री आणि जान्हवीचे
हल्ली श्री आणि जान्हवीचे आदर्शवादी वागणे डोक्यात जायला लागलय माझ्या. किती ते गुडी गुडी वागायचं !!
सारखे तत्वज्ञानच देत असतात.
कलाकारांच्या खाजगी आयुष्यात
कलाकारांच्या खाजगी आयुष्यात आपण प्रेक्षक म्हणून किती गुंतवून घ्यावे याला निश्चित अशी एक मर्यादा आहेच. ती ओलांडून घेतल्यास आपल्याच मस्तकी शूळ उठतो, म्हणून वर दक्षिणाने जे सांगितले आहे त्यातील अक्षरनअक्षर सत्य मानावे. आपला संबंध "श्रीरंग गोखले" आणि "जान्हवी सहस्त्रबुद्धे....आता गोखले" यांच्याशीच. पडद्यावर जे दाखविले जात आहे ते बरोबर की चूक हे ठरविता येईल; पण म्हणून केतकर व प्रधान घरात जी काही भांड्यांची (कथीत) आदळाआपट चालली आहे त्यातून जे काही निष्पण्ण होईल त्याच्याबाबत ते आणि त्यांचे नशीब.
मात्र ही काही झी ने केलेली प्रसिद्धीची चाल असेल तर ती संतापजनक ठरेल....तसे नसेलही बहुधा, कारण मालिका विलक्षण लोकप्रिय ठरलेली आहेच.
मामा तुम्हालाही १०० टक्के
मामा तुम्हालाही १०० टक्के अनुमोदन ....
आजच्या भागात पौर्णिमेचा चंद्र
आजच्या भागात पौर्णिमेचा चंद्र दाखवला। भाउबिजेला पौर्णिमेचा चंद्र ?? +१
परवा पण एकदा जान्हवी दिवे लावत असताना पूर्ण चन्द्र दाखवला होता.
थॅन्क्स जान्हवी.... मोहाच्या
थॅन्क्स जान्हवी....
मोहाच्या ठिकाणाचे माहेरघर असलेल्या चित्रपट आणि दूरदर्शन सृष्टीला हा एक प्रकारचा शापच असावा की कालचे नात आज राहात नाही....आजचे उद्या राहाणार नाही...आणि जे राहते वा निर्माण होते त्यातून त्या दोघांना सर्वार्थाने समाधान लाभेलच असेही नसते.....इतिहास आहे सार्या घटनांना...तोही कित्येक प्रसंगी कटूच सिद्ध झालेला आहे....पण त्यातून कुणी ठोस असे ज्ञान मिळविलेले नाही हेही तितकेच खरे.
तुमच्या माझ्यासारख्या हजारो प्रेक्षकांना वाटत असते की पडद्यावरील अमुक एका जोडीचे दोनाचे चार व्हावेत. असे वाटणे ही आपली कलाकाराविषयी तसेच कलेविषयीची आत्मियता असते....पण त्याची मर्यादा तेवढीच असणेही गरजेचे आहे. एक काळ असा होती की, लोकांना दिलीपकुमार मधुबाला....देव आनंद सुरैय्या....राज कपूर नर्गीस....राजेन्द्रकुमार सायराबानू...धर्मेन्द्र मीनाकुमारी.....असे विवाह व्हायला हवे होते.....एकही प्रत्यक्षात उतरला नाही [अनेक कारणांपैकी महत्वाचे कारण असे होते की या प्रेमाच्यासमयी फक्त दिलीपकुमार आणि देव आनंद हेच दोघे अविवाहित होते....बाकी दोनतीन पोरापोरींचे बाप होते], मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य बर्याच प्रमाणात त्रस्तही झाल्याचे पाहाण्यात/वाचनात आले होते. निर्माते मात्र अशी अॅन्टी-पब्लिसिटी एनकॅश करून घेत...... श्री जान्हवी प्रकरण देखील अशाच मुशीतील असेल तर मग प्रश्नच मिटला.
Pages