आमची जंगलरूम

Submitted by सावली on 29 October, 2013 - 00:52

आमची जंगलरूम.

आमच्या घरात आम्ही खोल्यांना नावे दिली आहेत. ओशन रूम, जंगलरूम, स्काय रूम इत्यादी. बाकीच्या खोल्यांमध्ये नावाप्रमाणे काही सजावट नाही मात्र जंगलरूममध्ये जंगलाचे चित्र काढायचे असे बरेच आधी ठरवून ठेवले होते. या चित्रातल्या प्रत्येक प्राण्याला काहीतरी नाव आहे आणि त्या प्राण्यांच्या कथाही आहेत. कथा पुन्हा केव्हातरी इथे देईन. तोवर आमची जंगलरूम बघा.

इथे अजून टेबल, बेड इत्यादी काही केले नाही. सध्या पसारा मांडून खेळायला जागा हवीये. जरा मोठी झाली की बाकीचे करून घेणार. ते साधेच , मोठे झाल्यावरही वापरता येईल असे असणार आहे.

१ - दरवाज्यातून आत आल्यावर उजवीकडे पियानो , पुस्तकाचे कपाट

२ - पूर्ण भिंतीवरचे चित्र. या भिंतीला लागून असलेल्या भिंतीवर खिडकी आहे.

३.  खिडकीच्या बाजूला मोठे भिंतीतले कपाट.

४. दरवाज्याच्या डावीकडे व्हाईट बोर्ड आणि त्याखालचे चित्र. व्हाईट बोर्डच्या वर सरस्वतीचे चित्र येणार आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !!

अरेच्च्या ते राहिलंच का सांगायचं ? Proud हो, हो, मीच रंगवली. बेस कलर रंगार्‍यांकडुन करुन घेतला. वरची चित्र मी काढली.

सावली अप्रतिम रंगवले आहेस..किती बाई तो उत्साह Happy
खरंच मज्जा आहे बाहुलीची.
केपी, अ‍ॅक्वारूम चा झब्बू पण भारी. भारतात मजा आहे मुलांची असे म्हणावे का? Wink

किती छान! अतिशय सौम्य सुरेख डेकॉर आहे. मला वेगळेच विचारायचे आहे. तसा पियानो किंवा सिंथेसायझर मला हवा आहे. तो कोठून घेतला? प्लीज टु बी टेलिन्ग.

मस्तच..!

सध्या आमची प्रिन्सेस रूम की फेअरी रूम ह्यावरून बोलणी (फिस्कटून) होत आहेत Wink

महिन्याभरानंतर माझा झब्बू देईन.. कदाचित!

वा. सगळ्या उत्साही आयांना/बाबांना दंडवत.
सकाळपास्नं दंडवतच घालतोय Proud

मस्तच आहेत दोन्ही रुमस
सावली / कांदेपोहे, वरची चित्र काढायला कोणते रंग वापरलेस? वॉल पेंट्स की पोस्टर कलर्स?

वरची चित्र काढायला कोणते रंग वापरलेस? वॉल पेंट्स की पोस्टर कलर्स?>>
पोस्टर कलर्स. ऑईलपेंट. मुलांच्या मामीने रंगवली आहे रुम. ती अशी कामे घेते.

झक्कास!
पण अमा +१ Wink

त्या पियानोनंच माझं अधिक लक्ष वेधून घेतलं. घरात मी एकटीनंच असावं, सर्व काम उरकलेलं असावं, आसपास शांतता असावी आणि मग त्या पियानोसमोर बसून मनात येतील ती, आठवतील ती गाणी वाजवत बसावं. अहाहा! तहान-भूक सगळं विसरायला होईल मला. Happy

Pages