आमची जंगलरूम.
आमच्या घरात आम्ही खोल्यांना नावे दिली आहेत. ओशन रूम, जंगलरूम, स्काय रूम इत्यादी. बाकीच्या खोल्यांमध्ये नावाप्रमाणे काही सजावट नाही मात्र जंगलरूममध्ये जंगलाचे चित्र काढायचे असे बरेच आधी ठरवून ठेवले होते. या चित्रातल्या प्रत्येक प्राण्याला काहीतरी नाव आहे आणि त्या प्राण्यांच्या कथाही आहेत. कथा पुन्हा केव्हातरी इथे देईन. तोवर आमची जंगलरूम बघा.
इथे अजून टेबल, बेड इत्यादी काही केले नाही. सध्या पसारा मांडून खेळायला जागा हवीये. जरा मोठी झाली की बाकीचे करून घेणार. ते साधेच , मोठे झाल्यावरही वापरता येईल असे असणार आहे.
१ - दरवाज्यातून आत आल्यावर उजवीकडे पियानो , पुस्तकाचे कपाट
२ - पूर्ण भिंतीवरचे चित्र. या भिंतीला लागून असलेल्या भिंतीवर खिडकी आहे.
३. खिडकीच्या बाजूला मोठे भिंतीतले कपाट.
४. दरवाज्याच्या डावीकडे व्हाईट बोर्ड आणि त्याखालचे चित्र. व्हाईट बोर्डच्या वर सरस्वतीचे चित्र येणार आहे.
काय सुरेख आहेत चित्रं!
काय सुरेख आहेत चित्रं!
मस्तच आहे त दोन्ही रूम्स.
मस्तच आहे त दोन्ही रूम्स. आम्ही आपली वॉल डी कॅल्स लावून सजवल्ये...तीच आमची कलाकारी. जमले तर फोटो टाकते.
केपीची अॅक्वारुम पण छान आहे!
केपीची अॅक्वारुम पण छान आहे!
थँक्यु, मामी, कालच्या
थँक्यु,
मामी, कालच्या प्रश्नाला उत्तर द्यायचे राहीले. उजवीकडच्या झाडावर एक पार्याचा थर्मोमीटर आहे. तो केव्हातरी फिरायला गेलो तिथले सोवेनीअर म्हणुन घेतलेला. इथे तो ३० च्या खाली कधीच जात नाही आणि एक आईने केलेले की होल्डर आहे. ते की होल्डर शाळेचे आयकार्ड आणि टाय लटकवायला वापरते.
मधुबनी पेंटींग >> ते मधुबनी पेंटींग आईने केलेले आहे.
पुस्तकांचे कपाट >> ते मी डिझाईन आणि मापं / कलर्स देऊन बनवून घेतलेले आहे. त्याचे शेल्फ रँडमली ( वाटतील असे) तिरके आहेत. आणि आतले रंग पण रँडम आहेत.
सावली, आईनी केलेलं मधुबनी
सावली, आईनी केलेलं मधुबनी पेंटींग खूप सुरेख आहे. हे व्हेजिटेबल रंग वापरुन (जसं ओरिजनल करतात) केले आहे की पोस्टर कलर्स वापरुन?
आईने केलेल्य की चेन होल्डरचा क्लोझ अप टाक ना.
अल्पना, क्लोज अप नंतर टाकते.
अल्पना, क्लोज अप नंतर टाकते. नाही ते पेंटींगही कॅनवासवर अॅक्रिलिक कलर्स वापरुन केलं आहे.
रायगड , माझ्या आठवणीप्रमाणे तुलाही चित्रं काढायला काय कठीण आहे? काढुन बघ.
सहीच!! सावली आज फेसबुकवर
सहीच!! सावली आज फेसबुकवर घाईघाईत चक्कर टाकताना मी हे पहीले चित्र पाहीले होते, आणि कुठल्यातरी पॉप्युलर साईटवरचे, मुलांची रूम अशी रंगवा वगैरे आर्टीकल असेल असं समजून चालले होते.. आत्ता उघडले तर तेच चित्र! किती (सुखद) धक्का बसला मला! भन्नाट काम केलं आहेस!
मला तसली जपानी भावली पण फार
मला तसली जपानी भावली पण फार आवडते. सालारजंग म्युझीअम मध्ये एक भाग अश्या भावल्यांचा आहे. खूप बारकी बारकी एलि मेंट्स घेउन सजविलेली असते ही जपानी स्त्री.
Pages